Jan 26, 2022
प्रेम

कळत नकळत भाग 24(अंतिम)

Read Later
कळत नकळत भाग 24(अंतिम)

आपण मागील भागात पाहिले की नेहाला आधीच सगळं आठवत.. निरव आणि नेहाच्या प्रेमाबद्दल सगळ्यांना समजत.. मग ठरलेल्या तारखेला त्या दोघांचं लग्न होतं.. आता अमर मीराला फोन करतो.. पण तिचा फोन बंद असतो.. आता पुढे..

मीराला कोठे शोधायचे याचाच विचार अमरच्या मनात घोळत असतो.. त्याचे आईबाबा पण त्याला विचारतात.. पण तो सापडेल इतकंच बोलतो.. पण त्यालाही माहित नसतं की कुठे?? आणि कधी??

एकदा अचानक त्याला आठवत की जयंत मीराचा सहकारी हा तिच्यासोबत अनाथ आश्रमात होता.. त्याला नक्कीच माहीत असणार.. म्हणून अमर त्याला फोन करतो..
"हॅलो जयंत" अमर

"बोला कशी काय आठवण झाली या गरीबांची. " जयंत

"अरे असं काय बोलतोस??" अमर

"बरं ते जाऊ दे.. फोन का केलास ते सांग.." जयंत

"अरे ते मीरा कोठे आहे माहित आहे का तुला.." अमर

"आता आठवण झाली का तुला??" जयंत

"तसं नाही रे.." अमर

"मग कसं.. प्रेम करायचं आणि नंतर लग्न करायचं नाही म्हणजे.." जयंत

"जयंत तुला त्यातलं काही माहित नाही.. तू मला फक्त मीरा कुठे आहे ते सांग.." अमर

"का सांगू?? आणखी त्रास द्यायला.. मी सांगणार नाही.." असे म्हणून जयंत फोन बंद करतो..

अमर परत फोन करताना तो उचलत नाही.. मग अमर मनालीला फोन करतो..

"हॅलो मनाली.." अमर

"हॅलो.. बोल ना.." मनाली

"अगं जयंतला काय झालंय??" अमर

"म्हणजे?? तू त्याला फोन केला होतास.." मनाली

"हो का ग??" अमर

"अरे मीरा आणि तुझं ब्रेकअप झाल्यापासून तो तुझ्यावर चिडतोय.." मनाली

"ब्रेकअप??" अमर

"अरे म्हणजे तुझ्या बाबांनी दुसरी मुलगी पसंत केली होती.. मग मीरा तुझ्या आयुष्यातून गेली.. ते ब्रेकअप.." मनाली

"अगं तस काही नाही.. मी तुला सविस्तर सांगतो.." असे म्हणत अमर तिला घडलेली सगळी हकीकत सांगतो..

"अरे बापरे.. इतकं घडलं.. बिचारे तुम्ही सगळे.. याची काहीच कल्पना नव्हती रे.." मनाली

"बरं आता सांग.. मीरा कोठे आहे.." अमर

"अरे ती वसुंधरा अनाथ आश्रमात आहे.. तिथेच लहानाची मोठी झाली आहे.. दुसरं घर मिळू पर्यंत तिथेच राहणार होती.." मनाली

मनालीचे हे बोलणे ऐकून अमरला खूप म्हणजे खूपच आनंद झाला.. तो लगेच तयार झाला आणि अनाथ आश्रमात जायला निघाला..

आश्रमात गेल्यावर तो अगदी वेड्यासारखं मीराला शोधू लागला.. मीरा कुठेच दिसेना.. तिथे एका मॅडमला तो विचारतो.. तेव्हा "पलिकडे गार्डनमध्ये ती आहे.." असे त्या मॅडमनी सांगितले.. अमर सुसाट वेगाने गार्डनकडे जातो..

तिथे समोरच त्याला मीरा दिसते.. मीरा पण त्याच्याकडे पाहते.. दोघांनाही अश्रू लपवता येत नाही.. अमर पळत जाऊन मीराला मीठी मारतो.. दोघेही बराच वेळ तशाच अवस्थेत असतात.. थोड्या वेळाने मीरा मिठीतून बाहेर येते..

"तू का आलास??" मीरा

"माझ्या प्रेमाला माझ्यासोबत घेऊन जायला.." अमर

"मी येणार नाही.." मीरा

"तुला यावच लागेल.." अमर

"तू माझ्या मनाविरुद्ध काहीही करू शकणार नाहीस.." मीरा

"ठिक आहे.. मग मी पण येथेच राहतो.." अमर

"तुला कळत कसं नाही रे.." मीरा

"तू चल.. बाकी मला काही सांगू नकोस.." अमर

"ते आता शक्य नाही.." मीरा

"का बरं??"अमर

"काका काकूंचा जो विश्वास होता तो मी कधीच गमावलाय.. आता कुठल्या तोंडाने येऊ.." मीरा

"तू विश्वास गमावला नाहीस तर विश्वास कमावला आहेस बाळ.." काकू

"काकू काका तुम्ही इथे.." असे म्हणत मीराच्या डोळ्यातून पाणी येत..

"हो बाळ.. तुझ्या जागी दुसरी मुलगी असती तर आमच्या मुलाला काहीतरी सांगून तेव्हाच लग्न केले असते.. पण तू खूप समजूतीने घेतलेस.. खरंच खूप गुणाची पोरं आहेस.. चल बाळ घरी.. तुला घेऊन जायला आलोय आम्ही.." काकू

हे ऐकून मीराला आणखीनच रडायला येत..
"रडू नको बाळ.." काकू

"मला वाटतं होतं की इतक्या दिवसांनी जे आईवडील मिळाले आहेत.. ते पण आता दुरावलतील.. माझ्या नशिबात आईवडीलांच सुख नाहीच.. पण तुमच्या आशिर्वादाने आणि माझ्या पुण्याईने तुम्ही मला परत मिळाला.." मीरा

अशाप्रकारे या कथेचा शेवट गोड झाला.. तर या कथेला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.. कथेमध्ये काही चूका झाल्या असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा.. आणि माझे असेच नवनवीन कथा वाचण्यासाठी मला फाॅलो करायला नक्कीच विसरू नका.. धन्यवाद..

प्रियांका अभिनंदन पाटील. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..