Aug 18, 2022
प्रेम

कळत नकळत भाग 23

Read Later
कळत नकळत भाग 23

आपण मागील भागात पाहिले की अमर आणि नेहाच्या लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम चालू असतो.. निरव नेहाला शेवटचं म्हणून भेटायला आलेला असतो.. आणि तो तिच्या गालाला हळद लावतो.. नेहाला त्याच्या डोळ्यांमध्ये खूप वेदना दिसतात.. तो गेल्यावर ती चक्कर येऊन पडते आता पुढे..

नेहाला हाॅस्पिटलमध्ये नेण्यात येते.. तिथे डाॅक्टर इंजेक्शन देतात आणि डोक्यावर ताण आल्यामुळे झालेलं आहे.. काही काळजी करण्याचे कारण नाही.. असे सांगतात.. मग सगळे निश्चिंत होतात.. आता नेहा शुध्दीवर यायची वाट बघत असतात..

काही वेळानंतर नेहा शुध्दीवर येते.. ती सगळ्यांना बघते.. आता तिला आणि काय झाले म्हणून सगळे पण तिच्याकडेच बघत..

"सगळे असे का बघत आहात.." नेहा

"तू कशी आहेस.. तुला आता बरं वाटतंय ना.." नेहाचे बाबा

"हो मी बरी आहे.. अम्या तू कसा काय आलास.." नेहा

"तुला बघायलाच की.. यायला नको होतं काय??" अमर

"तसे काही नाही रे.. निरव आला नाही काय रे.." नेहा

"म्हणजे??" नेहा

"अम्या देऊ काय एक.. म्हणजे काय विचारतोयस??" नेहा

"अगं तुला निरव आठवतोय.." अमर आश्चर्याने विचारतो..

"आठवतो म्हणजे?? का नाही आठवणार??" नेहाचे हे बोलणे ऐकून अमरला खूप म्हणजे खूपच आनंद होतो.. तो उड्याच मारायला लागतो..

"ए अम्या असा काय नाचतोस.. काय झालंय सांग बघू.." नेहा

"अगं खूप मोठी हिस्टरी आहे ती.. खरंच बाई माझ्या डोक्यावरच ओझं कमी केलस.." अमर

"आता सांगशील का?? काय झालं ते.." नेहा

"बरं बरं सांगतो.. तू आमच्या घरातून गेलीस आणि थोड्या दिवसात तुझा ऍक्सिडेंट झाला.." अमर

"होय मग??" नेहा

"मग काय मॅडम तुमच्या डोक्याला खूप लागलं.. आणि तुझी स्मरणशक्ती गेली.." अमर

"मग??" नेहा

"मग काय?? तुझ्या आणि माझ्या बाबांनी आपलं लग्न करण्यासाठी वचन घेतल होत.." अमर

"अरे बापरे!!"नेहा

"आणि तुला निरव आठवतही नव्हता.." अमर

"काय??" नेहा

"होय.. बिचारा.. त्याने तर तो तर खूपच नाराज झाला.. आणि तू सुखी रहावं म्हणून कायमचं निघून गेला.." अमर

"काय?? आता कुठे आहे तो मला भेटायच आहे.." नेहा

"हो मी फोन करून बोलावून घेतो.. उद्या तो जाणार होता.. त्याला सगळं सांगतो.." अमर

"कोण हा निरव.. आणि नेहा हे काय चाललंय तुझं.." नेहाचे बाबा

"बाबा मी तुम्हाला सगळं सांगणार होते.. निरव मला मागणी घालायला येणार म्हणून सांगितले नाही.. साॅरी बाबा.." नेहा

"पण हा कोण?? काय करतो.. की असंच कोणाच्याही प्रेमात तू पडणार आणि आम्ही परवानगी द्यायची.." नेहाचे बाबा थोडे चिडून बोलतात..

"काका खूप चांगला मुलगा आहे तो.. त्याचा स्वतःचा एक बिझनेस आहे.. मी गॅरेंटी देतो त्याची.." अमर

"काय हे.. तुम्हाला प्रेम करू नका असे बंधन नाही.. पण सांगत जा ना आम्हाला.. आता तुला आठवलेच नसते तर काय झालं असतं.. नंतर आठवून काय उपयोग.. किती जणांना त्रास झाला बघ आता.." नेहाचे बाबा

"साॅरी बाबा.." नेहा

"झालं.. साॅरी म्हटलं की झालं.. आता तुझी तब्बेत बरी नाही म्हणून काही बोलत नाही.." नेहाचे बाबा

"लव्ह यू बाबा.." नेहा

थोड्या वेळाने निरव लगेच धावत पळत हाॅस्पिटलमध्ये येतो.. त्याचे डोळे पाण्याने भरुन येतात.. तो आल्यावर फक्त नेहाकडेच बघत असतो..

"कशी आहेस??" निरवचा कंठ दाटून आला

"साॅरी.." म्हणत नेहा कानाला हात धरते..

निरव मानेनेच नाही म्हणतो.. तेव्हा रूममध्ये कोणीच नसते.. दोघेही अगदी बेधुंद होऊन बराच वेळ एकमेकांकडे बघत असतात.. त्यांना जगाच भान नसतं.. तो क्षण संपू नये असंच वाटतं होत त्यांना... खरंच हेच असतं प्रेम..

इतक्यात अमर येतो.. दाराचा आवाज ऐकून दोघेही भानावर येतात.. अमर त्या दोघांना रूममध्ये बसून "साॅरी.." म्हणून बाहेर जात असतो..

"ए अम्या.. बास नौटंकी.. ये आत.." नेहा

तोपर्यंत नेहाचे आई बाबा येतात.. अमरचे पण आई बाबा येतात..

"आता लग्नासाठी इतके पाहुणे आले आहेत.. सगळी तयारी पण झाली आहे.. सगळं व्यर्थ गेल.. पाहुण्यांची फरफट झाली.. आता सगळे नाव ठेवत जाणार.. मी काय म्हणून तोंड दाखवू त्यांना.." नेहाचे बाबा

"तू काही काळजी करू नकोस.. सगळं व्यवस्थित होईल.." अमरचे बाबा

"मी एक सांगू काय??" अमर

"काय??" नेहाचे बाबा

"आता अशीही लग्नाची तयारी झाली आहे.. निरव आणि नेहाचे एकमेकांच्यावर प्रेम आहे ते तुम्हाला मान्य आहे.." अमर

"मग??" नेहाचे बाबा

"मग काय.. आहे त्या तारखेला दोघांचे लग्न लावून द्या.." अमर

"दॅट्स ग्रेट.. निरव तुझ्या घरच्यांना काही सांगावे लागेल का??" नेहाचे बाबा

"नाही.. माझ्या घरी मी आणि आई दोघेच असतो.. बहिणीच लग्न झाल आहे.. तेव्हा सगळं मॅनेज होईल..." निरव

"झालं तर मग.. आहे त्या तारखेला दोघांचे लग्न लावून द्यायचे.." नेहाचे बाबा

आता सगळेच खूप खूश झाले.. ठरलेल्या दिवशी निरव आणि नेहाचे लग्न झाले.. खूप छान लग्न झाले..

आता अमरला मीराची ओढ लागली होती.. त्याने तिला खूप वेळा फोन केला.. पण तिचा फोन बंद होता..

"आता हिला कोठे शोधायचे.. हिचे कोणीच नातेवाईक पण कोणी नाहीत.. कोठे राहते ते पण माहित नाही.. आणि फोन पण बंद येत आहे.. आता काय करू.." असा अमर मनात विचार करत असतो..

आता मीरा सापडते का?? ती कुठे गेली असेल?? काय करत असेल?? हे आपण पुढच्या लेखात पाहू..

क्रमशः

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.

*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..