Jan 26, 2022
प्रेम

कळत नकळत भाग 22

Read Later
कळत नकळत भाग 22

आपण मागील भागात पाहिले की अमर नेहाला आपल्या घरी जागा बदल साठी आणलेला असतो.. तसेच तिला काहीतरी नक्कीच आठवेल या आशेवर तो तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातो.. पण त्याचा काहीच उपयोग होत नाही.. शेवटी लग्न करण्याचे ठरतेच.. आता पुढे..

नेहा तिच्या घरी जाते.. तिथे आधीपासूनच लग्नाची गडबड सुरु असते.. नेहा आईबाबांची एकुलती एक होती.. त्यामुळे तिचे लग्न अगदी थाटामाटात करून द्यावे अशी तिच्या आईबाबांची इच्छा होती.. ते लग्नात कसलीच कसूर सोडणार नव्हते..

त्यांनी लग्नासाठी अमरच्या घराजवळ जे त्यांचे जुने घर होते तेच निवडले.. ते घर अगदी स्वच्छ करून घेतले होते आणि लग्नाच्या आठ दिवस आधी ते त्या घरात रहायला जाणार होते.. सगळे विधी एकत्रच होऊ देत अशी त्यांची इच्छा होती.. दोन्हीकडेही पाहुण्यांची काहीच कमी नव्हती..

नेहाने सगळी पूर्वतयारी करून घेतली.. कारण एकदा का त्या घरात रहायला गेले की तिला बाहेर जाता येणार नाही.. तिने काही कपडे.. मेकअपचे किट.. साड्या यासारख्या वस्तूंची शाॅपिंग केली.. लग्नाच्या साड्या जुन्या घरात आल्यावर दोन्हीकडची मंडळी जाऊनच करणार होती.. त्यामुळे ती रेग्युलर साड्या तेवढ्याच घेऊन आली..

आता लग्नाला आठ दिवसच बाकी होते.. नेहा आणि तिचे आईबाबा जुन्या घरात रहायला आले.. जे अमरच्या घराजवळच होते.. हळूहळू पाहूणे पण जमू लागले.. दोन्हीकडची मंडळी मिळून लग्नाच्या साड्यांच्या खरेदीसाठी जातात.. साड्या खरेदीनंतर नेहाचे बाबा "कुठेतरी जवळपास फिरून या.." म्हणाले..

अमर नको म्हणणार इतक्यात नेहा "चल मला आइस्क्रीम हव आहे.." म्हणत त्याला घेऊन जाते..

दोघेही जातात.. पण अमरचे लक्ष कशातच नसते.. तो पुढे पुढे जात असतो.. नेहाचे लक्ष नुसता अमरकडेच असते.. अमर तिला आइस्क्रीम घेऊन देतो..

"तुला.." नेहा

"मला नको.." अमर

"का??" नेहा

"तब्बेत थोडी बरी नाही.." अमर

"खरंच काय??" नेहा

"होय ग.." अमर

"हे लग्न तुला नको आहे का??" नेहाच्या या प्रश्नाचे उत्तर काय द्यावे अमरला कळेना..

"तसे काही नाही.." अमर

"मग तू खूश नाहीस.." नेहा

"आहे तर.. खूशच आहे.." अमर खोटं हसू आणत म्हणतो..

"तसे काही असेल तर सांग.." नेहा

"हमम.." नेहाच्या या वाक्यानंतर अमरले सगळं सांगावस वाटलं.. पण तो गप्प बसला.. कारण आधीच तिची तब्बेत नाजूक होती.. आणि काही झालं तर.. जबाबदार कोण?? म्हणून तो काहीच बोलला नाही..

आज मेहंदीचा कार्यक्रम होता.. सगळे पाहुणे जवळपास जमा झाले होते.. संगीत पण त्याच दिवशी ठेवले होते.. नेहा सुंदर लेहंगा घालून आली होती.. ती खूपच सुंदर दिसत होती.. पण आज ती मनापासून खूश नव्हती.. तिला मनापासून आनंद वाटत नव्हतं..

"आज मला काय होतंय?? माझी मेहंदी आहे.. संगीत आहे.. पण मी आज खूश का बरं नाही.. काहीतरी मिसिंग होत आहे.." नेहाच्या मनात दिवसभर हेच विचार चालू होते..

निरवची अवस्था तर खूपच वाईट होती.. त्याचे कशातच लक्ष लागत नव्हते.. शेवटी त्याने प्रेमासाठी सगळं विसरायचं ठरवलं.. "नियतीने पण काय वाढून ठेवले आहे काय माहित.. आज तिलाच आठवत नाही.. त्याला ती तरी काय करणार.. आज ती माझ्यासोबत असती जर तिला सगळं आठवत असतं तर.. पण आमचं दुर्दैव.. अमरची अवस्था पण खूप वाईट आहे.. मला माहित आहे.. ठिक आहे.. मी आता त्यांच्यापासून दूर जाणार.. खूप दूर.. पण त्याआधी एकदा फक्त एकदाच नेहाला भेटणार.." असे निरव मनात ठरवतो..

निरव सगळं त्याच्या आईला सांगतो.. तिला पण खूप वाईट वाटते.. ती तर सगळं व्यवस्थित होऊ दे म्हणून लगेच सगळे देव पाण्यात ठेवते.. बिचारीची भोळी आशा..

आज निरव नेहाला भेटणार होता.. कदाचित शेवटचं.. ती कोठे आहे हे त्याने अमरला विचारून शेवटी निरव नेहाच्या जुन्या घरात आला.. आज नेहाची आणि अमरची हळद होती.. निरवला खूपच वाईट वाटत असते.. निरवची एण्ट्री झाली तसे अमरचे त्याच्याकडे लक्ष जाते.. पण निरव फक्त आणि फक्त नेहाकडेच बघत होता..

तो येताना नेहाचे त्याच्याकडे लक्ष जाते.. तिला त्याच्या डोळ्यांमधे खूप वेदना दिसतात.. तिला त्याच्याकडे बघून कसेतरीच होते.. "याच्या डोळ्यात इतक्या का वेदना दिसत आहेत.. हा इतका का दुःखी आहे.. मला याच्याकडे बघून अस्वस्थ का होत आहे.. मी याला खूप आधीपासून ओळखते का??" असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात चालू असतात.. पण ती त्याच्याकडेच बघत असते..

निरव हळूहळू नेहाच्या जवळ येत असतो.. तो जसजसे जवळ येईल तसतसे तिच्या मनाची धडधड वाढू लागते.. हे सगळं अमर लांबूनच बघत असतो.. त्यालाही आता काहीतरी नक्कीच घडणार असे वाटत होते..

निरव नेहाच्या जवळ येतो.. तिच्या हळदीचा कार्यक्रम चालू असतो.. एक एक करत सगळेजन तिला हळद लावत असतात.. पण तिचे लक्ष फक्त निरवकडेच असते.. निरव तिच्या जवळ असलेल्या भांड्यातील हळद हातात घेतो आणि तिच्या गालावर अलगद लावतो.. निरव हळद लावताना नेहाचे डोळे आपोआप बंद होतात.. आणि डोळ्यातून नकळत पाणी येते..

हे असे का होत आहे?? याच उत्तर तिच्याकडे नसत.. ती जेव्हा डोळे उघडते तेव्हा निरव तिथून बाहेर जात असतो.. ती त्याच्या पाठमोर्या आकृतीकडे एकटक पाहतच बसते.. तिच्या मनाची अस्वस्थता वाढत असते.. "त्याला थांबवावे का?? पण का आणि कशासाठी?? तो जात आहे तर माझे मन इतके बेचैन का होत आहे?? मी नक्कीच याला ओळखत असणार.. याचे डोळे खूपच वेदनादायी होते.. पण मी त्याचा का विचार करत आहे.. आता माझे लग्न आहे.. मला खूश रहायला पाहिजे.. पण मी खूश नाही.. पण का?? " असा ती मनात विचार करत असताना निरव जातो..

तो गेलेलं ती बघते आणि लगेच चक्कर येऊन तिथेच पडते.. घरच्यांची नुसता धावपळ.. तिला लगेच हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आले.. "डोक्यावर ताण आल्यामुळे थोडी चक्कर आली आहे.. घाबरण्याचे काही कारण नाही.." असे डाॅक्टर म्हणाले.. मग सगळं निश्चिंत झाले..

क्रमशः

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.

*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..