कळत नकळत भाग 21

Marathi love story

आपण मागील भागात पाहिले की नेहाचा ऍक्सिडेंट झाला होता.. तिला हाॅस्पिटलमध्ये ठेवले होते.. अमर आणि निरव दोघेही तिला भेटण्यासाठी हाॅस्पिटलमध्ये जातात.. तेथे ती निरवला ओळखत नाही.. डाॅक्टर सांगतात डोक्याला लागल्यामुळे मधला काही काळ त्यांच्या डोक्यातून पुसला गेला आहे.. आता पुढे..

नेहाला डाॅक्टर इंजेक्शन देतात.. आता ती झोपलेली असते.. अमर आणि निरव दोघेही बाहेर येऊन बसतात..

"हे असे का होत आहे.. एक चांगल झालं की दुसरी काहीतरी समस्या तयारच असते.. मीरा मला मिळेल की नाही अशी शंकाच वाटत आहे आता.. काहीच समजत नाही.. काय करावं.. माझं तर डोकच काम करत नाही.. खरे प्रेम कधी मिळणारच नाही का?? मी आता काय करू.. नेहाचे बाबा मी सांगितलेल ऐकणारच नाहीत.. बिचारा निरव त्याला तर कुठे त्याच प्रेम मिळत आहे.." असा मनात विचार करत अमर डोके खाली करून बसलेला असतो..

"मी पहिल्यांदाच कुणाच्यातरी प्रेमात पडलो.. मला पहिल्यांदाच कोणीतरी आवडलं.. आणि ते पण प्रेम अधुर रहाव का?? म्हणजे माझ्या आयुष्यात प्रेम नाहीच का?? आता पुढे काय होईल?? नेहाला सगळं नक्की कधी आठवेल.. की मला आयुष्यात नेहा कधीच मिळाली नाही तर.. नाही नाही असे होणार नाही.. नेहा मला मिळायलाच हवी.. हे परमेश्वरा काहीतरी कर.. पण नेहाला आधीच सगळं आठवू दे.. प्लीज.." निरव असा मनात विचार करत असताना त्याचे डोळे भरून येतात..

बराच दोघेही एकमेकांशी बोलत नाहीत.. मनातल्या मनात विचार करत तसेच बसून राहतात.. पुढे काय करायचं दोघांनाही कळत नव्हते..

ते दोघे बसलेले असतात तिथे नेहाचे बाबा आणि त्यांचे एक मित्र असे दोघेजण येतात.. मग नेहाचे बाबा त्यांच्या मित्राला अमरची ओळख करून देतात..

"हे आमचे होणारे जावई.. बघा आतापासूनच होणार्या बायकोची किती काळजी आहे.." असे म्हणून ते हसू लागतात..

"काका तसे काही नाही.." अमर

"अरे होय रे थोडी गम्मत केली.. तुझ्या बाबांनी तुला सांगितलंय ना.. मला तसे वचनच दिले आहे.. आणि तुम्ही लहानपणापासून मित्र त्यामुळे काहीच अडचण नाही.." नेहाचे बाबा

अमर काहीच बोलत नाही.. हे बोलत असताना निरवला कुणीतरी छातीत खंजीरच खुपसले आहे की काय.. असे वाटत होते..

"मग काय.. नेहा बरी झाली की लावून देऊया तुमचं लग्न.." नेहाचे बाबा

अमर काहीच बोलत नाही.. त्याला काय बोलावे तेच सुचत नाही.. थोडा वेळ बोलून नेहाचे बाबा निघून जातात..

"अमर आता काय करायचं??" निरव

"मला पण काहीच समजेना.. आधीच माझे बाबा मला न विचारताच निर्णय घेतले आहेत.. त्यात ही नेहा.. हिला काहीच आठवेना.. मी तरी काय करू.." अमर

"मी समजू शकतो रे.. माझी अवस्था काही वेगळी नाही.." निरव

"साॅरी रे.." अमर

"अरे साॅरी काय त्यात.. मी समजू शकतो.. आपण एक काम केल तर.." निरव

"काय??" अमर

"नेहा बरी झाली तर आपण तिला तुमच्या घरी घेऊन जाऊ.. आणि आधी जे जे घडलं जिथे जिथे घडलं.. तिथे तिथे तिला नेऊ.. बघूया काही फरक पडतो का?? तिला थोड जरी आठवलं तरी पुरेसं आहे.." निरव

"हो रे.. ती फक्त तुला ओळखली तरी बास.. बाकी काही नको.." अमर

"हम्म.. " निरव

"तुझी कल्पना चांगली आहे.. बघू ती घरी आल्यावर तिच्या बाबांची परवानगी घेऊ.." अमर

"ओके.. चालेल.." निरव

मग ते दोघे नेहाच्या बाबांना सांगून तेथून निघाले.. ते आपापल्या घरी आल्यावरही त्यांचे मन स्थिर नव्हते.. नुसता मनामध्ये विचारच चालू असायचा.. कोणत्याही कामात लक्षच नसायचे..

आता नेहाची तब्बेत आता हळूहळू सुधारत होती.. तिला आता डिस्चार्ज मिळाला होता.. ती सुखरूप घरी आली होती.. डाॅक्टरांनी थोडी काळजी घ्यायला सांगितली होती.. तिला आधीचं आठवण्यासाठी जास्त फोर्स करू नका म्हणून सांगितले होते.. त्यामुळे घरात कायम खेळीमेळीचेच वातावरण होते..

घरी आल्यावर काही दिवसातच नेहाच्या बाबांनी भटजींना बोलावून लग्नाचा मुहूर्त विचारला.. भटजींनी दोन तीन तारखा काढून दिल्या..

त्यातील एक तारीख त्यांनी पसंत केली.. जी दोन महिन्यानी होती.. तोपर्यंत नेहाची तब्बेत पण व्यवस्थित होईल.. तिला थोडा आराम मिळेल.. आणि लग्नाच्या तयारीला पण वेळ मिळेल..

नेहाच्या बाबांनी अमरच्या बाबांना फोन करून लग्नाची तारीख सांगितली.. त्यांनी फक्त "बर" म्हटले..

"आपण काही दिवसासाठी नेहाला इकडे आणूया काय?? म्हणजे तिला हवा बदल पण होईल.. आणि इकडे आल्यावर काही आठवलं तर बरंच होईल.." निरवने सांगितले होते ते आठवून अमर लगेच आईबाबांना याबद्दल विचारतो..

त्याच्या आईबाबांनी पण लगेच संमती दिली.. मग तसे नेहाच्या बाबांना सांगून तेथून तिला घेऊन आले..

नेहा घरी आल्यावर तिला मीराची रूम दिली.. त्यादिवशी ती पूर्ण आराम केली.. आता दुसर्या दिवसापासून अमर तिला ती आधी आलेली तेव्हा गेलेल्या एकेक ठिकाणी घेऊन जाऊ लागला.. जेणेकरून तिला थोडेफार तरी आठवेल..

निरवची पण दिवसातून एक चक्कर असायचीच.. पण तो अमरचा मित्र म्हणून घरी येत असे.. पण नेहासाठी तो अनोळखीच होता.. तिला आठवण्यासाठी जास्त फोर्स कोणी करत नसत.. कारण तिच्या बाबांनी आणि डाॅक्टरांनी पण तसेच सांगितले होते..

अमर तिला रोज एकेक करत सगळ्या ठिकाणी घेऊन गेला.. निरवने पण खूप प्रयत्न केले.. पण नेहाला आधीचे काहीच आठवले नाही.. सगळे खूप निराश झाले.. सगळ्यांना आता काळजी वाटू लागली..

काही दिवसांनी नेहाचे बाबा तिला नेण्यासाठी आले.. कारण आता लग्न जवळ आले होते.. आणि लग्नापूर्वी मुलगी थोडे दिवस तरी आमच्या जवळ राहू दे.. अशी त्यांची इच्छा होती.. त्यामुळे ते नेहाला घेऊन जाणार होते..

नेहाला इतक्या दिवसात आधीचे काहीच आठवले नाही म्हणून सगळे उदास होतेच.. सगळे प्रयत्न व्यर्थ गेले आणि अमरला आता लग्न करावे लागणार म्हणून निरव खूपच अस्वस्थ होता.. इतक्यात त्याला काहीतरी आठवलं आणि तो लगेच अमरकडे आला..

त्याने अमरला काहीतरी दिले आणि हे नेहाला दाखवायला सांगितले.. अमर नेहाला ती वस्तू दिला.. ती वस्तू म्हणजे निरवची डायरी होती.. त्यातील कविता नेहाने वाचल्या.. पण अशक्तपणा असल्यामुळे दोन ओळी वाचल्यावर लगेच तिला ग्लानी आली.. मग ती डायरी तशीच राहिली..

थोड्या वेळाने नेहाचे बाबा नेहाला घेऊन गेले.. आणि आता लग्नाची वरातच घेऊन येतो म्हणाले.. आता अमर आणि नेहाचे लग्न कोणीही मोडू शकणार नाही.. ते होणारच..

पण काही चमत्कार झाला तर.. नेहाला काहीतरी आठवले तर?? ते कसे आठवेल?? की आठवणारच नाही??

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.

*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील. 

🎭 Series Post

View all