Jan 19, 2022
प्रेम

कळत नकळत भाग 19

Read Later
कळत नकळत भाग 19

आपण मागील भागात पाहिले की मीराने सगळ्यांना पार्टी दिलेली असते.. आणि तेव्हाच अमर मीराला प्रपोज करतो.. त्यानंतर नेहा परत तिच्या घरी जात असते.. ती बॅग भरत असते.. आता पुढे..

अमर खाली येऊन निरवला फोन करतो आणि नेहा परत जात आहे.. हे सांगतो.. निरवला विश्वासच बसेना.. बरं मी लगेच येतो असे म्हणून तो लगेच आला.. निरव आल्यानंतर त्याने अमरला "नेहा कोठे आहे.." असे विचारले..

अमरने "ती वरती रूममध्ये आहे.." असे सांगितले..

"मग मी जाऊ का??" निरवने विचारल्यावर अमरने लगेच होकार दिला.. त्यावेळी काका काकू घरी नव्हते.. ते मंदिरला गेले होते.. त्यामुळे निरव नेहाच्या रूममध्ये गेला..

"कुठे चाललीस??" निरव

"घरी" नेहा

"मला न सांगता.." निरव

"तुला कळलेच की आता.." नेहा

"पण तू सांगितले नाहीस.. आणि न भेटताच जाणार होतीस.." निरव

"तुला का म्हणून भेटायचं.." नेहा

"कारण प्रेम करतो मी तुझ्यावर.." निरव

"मग माझ्या आईबाबांकडे येऊन रितसर मागणी घाल.." नेहा

"अच्छा.. म्हणजे मला जाळ्यात अडकवून तू पसार होतेस होय.." निरव

"तस समज.." नेहा

"बरं आज तू जा.. मी येतोच तुझ्या मागून तुला मागणी घालायला.." निरव

"मी वाट बघेन.." नेहा

मग निरव तिचा हात हातात घेतो.. आणि तिच्या कपाळावर हलकाच किस घेतो.. मग दोघेही खाली येतात..

काका काकू मंदिरातून येतात.. आणि सगळ्यांना असे बघून ते एकमेकांच्याकडे बघतात..

"काय झालं.. असे का थांबला आहात??" काका

"काही नाही बाबा.. नेहा जात आहे.." अमर

"अरे.. असे कसे जात आहे.. काहीही न सांगता.." काकू

"मी तुम्हाला सांगण्यासाठी तुमचीच वाट बघत आहे.." नेहा

"अगं पण आधी सांगायचं नाही का?? आणि हो इतक्या घाईत का बरं जात आहेस??" काका

"खूप दिवस झाले येऊन.. आणि एक ना एक दिवस मला जावच लागणार होते ना.." नेहा

"बर बाई तू बोलण्यात कधी ऐकले आहेस का??" काकू

"ते तर आहेच.. बरं येते.." म्हणून नेहा काका काकूंना नमस्कार करते..

"बरं अमर तिला स्टाॅप पर्यंत सोडून ये जा.." काका अमरला म्हणतात..

"मी तिकडेच जात आहे.. मी सोडू का?? " निरव म्हणतो.

"हो चालेल.." नेहा म्हणते..

ते दोघे जातात.. आता अमर आणि मीरा काका काकूंना त्यांच्या प्रेमाबद्दल सांगणार असतात..

"आई बाबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे.." अमर

"बोल ना.." काका

"बाबा माझं आणि मीराच एकमेकांवर प्रेम आहे.. आणि आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.. अर्थात तुमच्या परवानगीशिवाय काहीही होणार नाही.." अमर

"काय?? अरे मी तुझ्यासाठी एक मुलगी पसंत केली आहे.." अमरचे बाबा

"काय?? मला न विचारताच तुम्ही कसा निर्णय घेतला तुम्ही??" अमर

"अरे तू अजून कोणाच्या प्रेमात नाहीस म्हणून मी निर्णय घेतला.." अमरचे बाबा

"आता माझा नकार आहे त्या मुलीला.. मी लग्न केले तर मीराशीच करणार.." अमर

"अरे पण मी तिच्या बाबांना वचन दिलं आहे.." अमरचे बाबा

"बाबा एक तर तुम्ही न विचारताच निर्णय घेतलात.. त्यात वचनही दिलात.. हे तुम्ही बरोबर केलं नाही.." अमर

"आता काय बरोबर काय चूक हे तू मला सांगणार.." अमरचे बाबा

"तसे नाही बाबा.." अमर

इतक्यात काकांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर पडले.. सगळे खूप घाबरले.. मग काकांना दवाखान्यात घेऊन जातो.. डाॅक्टर सगळी तपासणी करून त्यांना सौम्य अटॅक आल्याचे सांगितले..

हे ऐकताच काकूंची बीपी कमी झाली.. काकू पण अॅडमिट झाल्या.. थोडे दिवस दोघांना दवाखान्यात ठेऊन घेतले.. मीरा आणि अमरने सगळं व्यवस्थित केल..

मग त्या दोघांना डिस्चार्ज मिळाला.. काका काकू घरी आले.. डाॅक्टरांनी त्यांना कसलेही टेन्शन द्यायचे नाही म्हणून सांगितले.. त्यामुळे अमरही काहीच विषय काढला नाही.. काका काही बोलू लागले तर नंतर बोलू म्हणून तो विषय बदलायचा..

काका काकू घरी आल्यावर मीरा ते घर सोडण्याचा निर्णय घेते..

"मीरा नको ना जाऊ.. यावर नक्कीच काहीतरी मार्ग निघेल.. आपण बसून बोलूया.." अमर

"नाही अमर.. खूप झाले.. माझ्यामुळे काका काकूंची तब्येत बिघडली.. आणखी त्यांना त्रास नको.. खूप चांगले आहेत ते दोघे.. माझ्यामुळे उगाच तुमच्यात वाद नको.. नाहीतर आतापर्यंत मी एकटीच होते.. यापुढेही एकटीच राहीन.. माझा विचार तू सोडून दे.. काका काकूंची काळजी घे.. मी आधी होते तशीच राहीन.. माझ्यामुळे कुणाला त्रास झालेला मला चालणार नाही.. बाय.. टेक केअर.." असे म्हणून मीरा कायमची त्याच्या आयुष्यातून निघून जाते..

आता पुढे काय होतंय ते पुढच्या लेखात पाहू..

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.

*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..