कळत नकळत भाग 17

Marathi love story

आपण मागील भागात पाहिले की अमर, मीरा आणि नेहा तिघे मिळून लग्नाच्या मॅनेजमेंटचं प्लॅनिंग करतात.. प्रत्येक जण आपापल्या परीने कामं करायचं ठरते.. आता पुढे..

मीरा आणि अमर दोघेही हाॅल बुक करतात.. केटरिंग.. आणि अशी सगळी मोठी कामे करून घेतात.. मेहंदी, हळदीचा कार्यक्रम घरीच करणार असतात.. त्यामुळे त्याच्यासाठी काही करावं लागणार नव्हतं.. पूर्वतयारी सगळी व्यवस्थित झाली..

आज मेहंदीचा कार्यक्रम होता.. घरीच असल्यामुळे जास्त कोणी नव्हते.. संगीतसाठी बाहेरूनच लोक आले होते.. नेहा मुलीली मेहंदी लावायला बसली.. तसे गाणी चालू झाली.. मीरा आणि अमर पण तेथेच होते.. निरव घरात थोडी आवराआवर करत होता..

मेहंदी साठी म्हणून सगळेजन मस्त आवरून आले होते.. निरवची आई त्यांचे चहापान वगैरे बघत होती.. बराच वेळ गेल्यानंतर निरव तेथे आला.. नेहाकडे बघून त्याने छान स्माईल दिली.. मग तो अमरसोबत बोलायला गेला..

"तू नेहा आहेस ना.." निरवची बहिण

"हो.." नेहा

"तू माझी वहिनी होशील.. प्लीज.." निरवची बहिण

"असे का ग विचारत आहेस.." नेहा

"माझा निरव दादा.. खूप चांगला आहे ग.. त्याचे मित्र कोणी नाहीत.. म्हणजे आमचे बाबा गेले.. आणि सगळी जबाबदारी त्याच्यावरच पडली.. त्याला मनमोकळ आयुष्य जगायलाच मिळालं नाही..आता पण पहिला माझं लग्न केल्यावरच तो त्याच्या लग्नाचा विचार करणार म्हणाला.. तो तुला खूप सुखी ठेवेल.." निरवची बहिण

"हो ते बरोबर आहे.. पण अग प्रेम ठरवून होत नाही ना ग.. ते आपोआप व्हावं लागतं.." नेहा

"माझा निरव दादा तुझ्यावर खूप प्रेम करतो.." निरवची बहिण

"तुला काय माहित ग.." नेहा

"मी त्याची डायरी बघितली.. त्याने खूप कविता केल्या आहेत तुझ्यावर.." निरवची बहिण

"कशावरून ग त्या कविता माझ्यावरच केल्या आहेत.." नेहा

"कारण त्याच्यात तुझं नाव आहे.. तो तुझ्यावर खूप प्रेम करतो.." निरवची बहिण

"पण मी अजून करत नाही ना.." नेहा

"तुला एक सांगू.. वाईट तर वाटणार नाही ना.." निरवची बहिण

"बोल ना.." नेहा

"आपण कुणावर प्रेम करतो त्यापेक्षा आपल्यावर कोण प्रेम करत त्याच्यावर प्रेम करावं.. मगच आपण सुखी बनतो.." निरवची बहिण

"सेम अमरचा डायलॉग बोललीस बघ.." नेहा

"आता अमर कोण??" निरवची बहिण

"माझा बालमित्र.. तो बघ तेथे आहे तो.." असे म्हणून नेहा अमरला दाखवते..

"बघ तुझा बालमित्र पण तेच म्हणतो की नाही.." निरवची बहिण

"ओके मॅडम.. मी नक्कीच विचार करेन.." नेहा

"थॅन्क्यू सो मच.. तुला लवकरच वहिनी म्हणून हाक मारायच आहे.. सो लवकरच विचार कर.." निरवची बहिण असे म्हणत असते.. तोवर तिच्या मैत्रिणी तिला डान्स करण्यासाठी घेऊन जातात.. मग कपल डान्स सुरु होतो.. सगळे कपल डान्स करायला जातात..

अमर पण डान्स करण्यासाठी मीराच्या समोर हात करतो.. मीराला खूप भारी वाटतं.. ती लगेच जाते.. मग ते दोघे निरव आणि नेहाला पण तयार करतात.. पण नेहा तयार होत नाही.. अमर नेहाचा हात धरून डान्स करायला नेतो.. मीरा तशीच उभी असते.. मग ती पण निरवला सोबत घेऊन जाते.. एका ठराविक वेळी जोड्यांची अदलाबदल करून अमर-मीरा.. आणि निरव-नेहा.. असे डान्स करतात.. अशाप्रकारे मेहंदीचा कार्यक्रम संपतो..

दुसर्या दिवशी हळदीचा कार्यक्रम असतो.. तो कार्यक्रम संध्याकाळी असल्याने सगळेजन थोडे रिलॅक्स असतात.. सकाळी नेहा आवरून खाली येते.. तेथे अमर पेपर वाचत बसला होता.. मीरा आणि काकू किचनमधे होत्या.. नेहा अमरजवळ जाऊन बसते..

"काय मग काल मजा आली की नाही.." अमर

"हो मग.. खूप मजा आली.." नेहा

"आणि डान्स करताना.." अमर मुद्दामच विचारतो..

"तसे काही नाही रे माझ्या मनात.. मला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही.." नेहा

"मग कर विचार.." अमर

"असे एकदम येईल का विचार.. तू तर करशील का??" नेहा

"बर बाई साॅरी.. तुला जे योग्य वाटते ते कर.." अमर

"आता कसं.." नेहा.. असे म्हणत त्यांची आवराआवर सुरू होते..

संध्याकाळी हळदीला सगळेजन वेळेच्या आधीच जातात.. हळदीला बरेच पाहुणे आले होते.. त्यामुळे यांना फार काही करावे लागले नाही.. मुलीला सगळेजन एक एक करत हळद लावू लागले..

आता निरवचा नंबर होता.. त्याने पण बहिणीला हळद लावली.. सगळेजन एकमेकांना पण हळद लावत होते.. अमर थोडी हळद हातात घेऊन नेहाकडे गेला आणि नेहाच्या गालाला अलगद त्याने हळद लावली.. नेहाला काहीच कळेना.. ती थोडा वेळ त्याच्याकडेच पाहत होती..

त्यावेळी तिच्या मनात काहीतरी झाल.. काहीतरी म्हणजे अगदी तिच्या हृदयाला कोणीतरी स्पर्श केल्यासारखं झालं.. तिचं तिला काहीच कळत नव्हतं.. ती एका वेगळ्याच दुनियेत गेली..

इतक्यात अमर तेथे येतो.. "कसं वाटतंय.."

"खूप.." असे ती बोलणार इतक्यात त्याच्याकडे बघते.. तो चेष्टा करत आहे हे जाणवून ती "तुला काय करायचं रे. " म्हणते..

"म्हणजे प्यार तो होना ही था.." असे म्हणत अमर तिला चिडवू लागतो..

"गप्प बस रे.." नेहा.. अशाप्रकारे त्यांचे चिडवणे चालूच असते..

अमर पण आता हे लग्न झाल्यावर मीराला प्रपोज करणार असतो..

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.

*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील.

🎭 Series Post

View all