Jan 23, 2022
प्रेम

कळत नकळत भाग 16

Read Later
कळत नकळत भाग 16

आपण मागील भागात पाहिले की मीरा अमरशी बोलायला आलेली असते.. पण अमर लवकर बोलत नाही.. थोडा भाव खातो.. नंतर तो बोलू लागतो.. आता पुढे..

"आत येऊ का??" अमर दरवाजा टकटक वाजवून म्हणतो..

"अरे ये ना.." मीरा.

"काय चाललंय.." अमर

"काही नाही रे.." मीरा

"ओह!! Love story ❤ ..मस्त आहे पुस्तक.. तू वाचतेस??" अमर आश्चर्याने विचारतो.

"का?? वाचायला नको.." मीरा

"नाही मला वाटलं सुंदर मुली पुस्तक वाचत नसतील.." अमर

"मग मला पण वाटतं मुलं पुस्तक वाचत नसतील.. नुसतं क्रिकेटच खेळत असतील.." मीरा

"कशावरून ग.." अमर

"तू आता म्हणालास त्यावरून.." मीरा

"हा हा व्हाॅट अ जोक.. काय पकतेस ग तू.. बरं झालं तुला बाॅयफ्रेण्ड नाही.. नाहीतर बिचारा दिवसभर बोअर होणार.." अमर

"उगाच विषय वाढवू नकोस हं.. नाहीतर परत भांडण होईल.." मीरा

"आधीच इतकी भांडणं.. एकत्र आल्यावर पुढे काय होणार काय माहित??" अमर मनात विचार करत असतो..

"कुठे हरवलास.." मीरा

"कुठे नाही.." अमर

"मग काय विचार करतोयस.." मीरा

"तुझं कसं व्हायचं.." अमर

"माझी काळजी करण्यापेक्षा तुझीच कर.." मीरा रागाने..

"माझी काळजी करायला माझे आईबाबा आहेत.. तुझं कोण आहे.." असे नकळत अमर बोलून गेला..

मीराला खूप वाईट वाटले.. तिच्या डोळ्यातून टपकन पाणी येत.. अमरला खूप वाईट वाटले.. तो तिच्या बाजूला जाऊन बसतो आणि तिचा हात हातात घेतो..

"सो साॅरी.. मी मुद्दाम नाही म्हणालो.. चुकून तोंडात आल ग.." अमर

"हमम.." मीरा

"हे बघ मीरा.. आजपासून तुला कोणतीही मदत लागली.. किंवा अगदी काहीही लागलं.. तर हा अमर कायमस्वरुपी तुझ्या सोबत आहे.. तू एकटी नाहीस मी तुझ्या सोबत आहे.. सो आता कधीच डोळ्यात पाणी आणायचं नाही.." अमर

"हो.." मीरा

"बरं मला सांग आपलं लग्न कधी आहे??" अमर

"काय??" मीरा

"आपलं लग्न कधी आहे??" अमर

"म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय.." मीरा

"अगं ए.. तुच मगाशी म्हणत होतीस ना एक काॅन्ट्रॅक्ट आहे म्हणून.." अमर

"अच्छा ते होय.." मीरा

"तुला काय वाटलं.." अमर

"काही नाही.." हळूच हसत मीरा म्हणते..

"खरं सांग तुला नक्की काय वाटलं.." अमर

"काही नाही रे.." म्हणत मीरा हसू लागते..

"अशीच हसत रहा.. हसताना खूप सुंदर दिसतेस.." अमर

मीरा लाजून त्याच्याकडे पाहते.. तो पण तिच्याकडे पाहतो.. मग काय ऑखो ही ऑखो मे.. करत एकमेक पाहत बसलेले असतात.. इतक्यात नेहा येते..

"येऊ का आत.." खोकल्याची अॅक्टिंग करत नेहा म्हणते..

"ये ना.. त्यात काय विचारायच.." मीरा

"नाही.. तुमचं काही सिक्रेट असेल तर.." नेहा

"ये तुला सिक्रेट सांगतो.." करत अमर तिचा हात पकडून फिरवतो.. आणि रूममध्ये एकच दंगा चालू होतो..

थोडं शांत झाल्यावर अमर मीराला लग्न कधी आहे असे विचारतो..

"अरे आठ दिवसांनी आहे.. त्यांचे जास्त नातेवाईक पण नाहीत.. आणि मुलाकडचे भरपूर नातेवाईक आहेत.. म्हणून त्यांनी सगळंच आपल्याला करायला सांगितले आहे.. म्हणजे मेहंदी, संगीत, हळदी वगैरे सगळ्याचेच नियोजन आपण करायचे आहे.. खूप काम आहे आणि वेळ कमी आहे.." मीरा

"मी पण आले तर चालेल का??" नेहा

"हो ये ना.. खूप मदत होईल तुझी.. प्रत्येकाने एक एक जरी केले तरी होऊन जाईल.." मीरा

"दॅट्स ग्रेट.. मला मेहंदी खूप छान जमते.. मी ते काम उत्तम करू शकेन.." नेहा

"व्वा ग.. माझं काम निम्म हलकं झालं बघ.. मला त्याचच तर टेन्शन होतं.. थॅन्क्यू सो मच.." मीरा

"इट्स ओके.. माझा पण तेवढाच टाईमपास.." नेहा

"मला काहीतरी काम सांग ना.." अमर

"होय.. आपण कामाची विभागणी करू.. त्यांना कोठेही कमतरता नको आहे.. म्हणून निरव स्वतः आपल्यासोबत असणार आहेत.. आपण दोन दोनचे ग्रुप करूया.. माझे सहकारी जयंत आणि मनाली यांचा एक ग्रुप.. आता अमर, नेहा, निरव सर आणि मी आपण चौघेजण राहतो.." मीरा

"मी काही निरव बरोबर काम करणार नाही.. आपण चौघेजण एकत्र काम केलो तर.." नेहा

"बरं बघू.. कसे जमेल तसे आपण एकमेकांसोबत काम करू.." मीरा

मग सगळेजन एकत्र काम करायला तयार होतात.. त्या पद्धतीने त्यांचे काम सुरू होते..

त्यांनी सगळ्या कामाची नोंद केली.. व्यवस्थित प्लॅनिंग केल.. कशासाठी किती खर्च होणार आहे याची पण विभागणी केली.. हे सगळं करायला खूप वेळ लागला.. मध्यरात्र होत आली.. आता नेहाला झोप येऊ लागली म्हणून ती झोपण्यासाठी जाते..

अजून थोडस काम शिल्लक होत.. म्हणून मीरा आणि अमर दोघेही ते काम करू लागले.. आता अमरला पण झोप येऊ लागते.. तो हळूहळू पेंगत धपकन खाली पडतो.. मीराला काहीच कळेना.. ती घाबरून बेडवरून खाली उतरते.. आणि अमरला "कोठे लागल का??" विचारते.. तो "नाही " म्हणतो.. मग दोघेही झोपायला जातात..

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.

*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..