Jan 26, 2022
प्रेम

कळत नकळत भाग 15

Read Later
कळत नकळत भाग 15

आपण मागील भागात पाहिले की नेहा निरवला सांगते.. तू मीराला काॅन्ट्रॅक्ट दिलास तर अमरला पण घ्यायला पाहिजे असे सांग.. मग मीराला रात्रभर झोप लागत नाही.. तो बोलला नाही तर.. असे तिला वाटू लागले.. आता पुढे..

"अम्या आज ती तुझ्याशी बोलायला येईल बघ.." नेहा.

"काय?? असे कसे.." अमर एकदम आश्चर्याने विचारतो..

"ते तुला नंतर सांगते.. पण लगेच बोलायला जाऊ नकोस.. थोडा भाव खा.. पण फारच आढेवेढे घेऊ नकोस.. थोड्या वेळाने बोल.. नाहीतर ती तुझा नाद सोडून देईल.." नेहा

"जशी तुमची आज्ञा.. महाराणी.." अमर

"अच्छा महाराणी काय.." असे म्हणत नेहा अमरला मारू लागते.. इतक्यात मीरा तेथे येते.. त्यांना तसे बघून ती तशीच निघून जाते..

"ऑल द बेस्ट.." म्हणून नेहा तिथून जाते..

थोड्या वेळाने मीरा परत येते.. पण ती लगेच बोलत नाही.. थोडा वेळ तशीच शांत बसते.. मग थोड्या वेळाने "काय करतोस?? प्रोजेक्ट का??" मीरा म्हणते..

"हमम" अमर

"खूप काम आहे.." मीरा

"हमम.." अमर

"बोलायला वेळ आहे का??" मीरा थोडी रागातच बोलते..

"काय??" अमर

"माझं थोडं काम होतं.." मीरा

"हमम.." अमर

"नुसता हो आणि नाही मधेच उत्तर देणार आहेस का?? मग मी बोलायच की नाही.." मीरा

"तुझी इच्छा.." अमरचे असे बोलणे ऐकून मीरा थोडी रागातच शांत बसते..

"मला आणखी एक काम मिळालं आहे.." मीरा

"मग??" अमर

"तू असंच बोलणार आहेस का रे.." मीरा

"तुझ्यामुळेच तर झालंय सगळं.." अमर

"साॅरी रे.." मीरा

अमर आता काही बोलणार इतक्यात मीरा "बास आता इथेच विषय संपव.. पुढे वाढवू नकोस.. प्लीज.."

"का?? काय झालं.." अमर

"मला त्रास होतोय.." मीरा

"कशाचा??" अमर

"तुझ्याबरोबर बोलले नाही म्हणून.." मीरा नकळत बोलून जाते..

"अच्छा म्हणजे माझ्याशी बोलणं झालं नाही म्हणून तुला त्रास होतोय.." अमर चेष्टेत तिला म्हणतो..

"तसे काही नाही.." मीरा

"मग कसे??" अमर

मीरा लाजून मान खाली घालते.. आणि पेपर समोर धरते..

"मॅडम पेपर उलटा धरलाय.." अमर

मीरा पेपर बघते तर खरंच ती पेपर उटला धरलेली असते.. आता तिला काय करावे कळेना..

इतक्यात अमरच बोलतो.."कोणते काम मिळाल आहे.."

"अरे आणखी एका लग्नासाठी अरेंजमेंट करायची आहे.." मीरा

"वाव दॅट्स ग्रेट न्यूज.. मग काय तयारी जोरात चालू असेल.." अमर

"नाही अजून.." मीरा

"का बरं.. करायची नाही का तयारी.." अमर

"तुझ्याशिवाय कशी होईल.." मीरा

"अरे मी काय कायमचा तुम्हाला पुरणार आहे का?? तुमचं तुम्हालाच करावं लागेल ना.." अमर

"खरं आहे.. तू काय आयुष्यभर थोडीच माझ्यासोबत असशील.. त्या नेहा बरोबर जाशील ना.." मीरा मनात बोलते..

"जरा मोठ्याने बोललीस तर मलाही कळेल.." अमर

"काही नाही रे.. त्या क्लायंटला तूच हवा आहेस.." मीरा

"अच्छा.. म्हणून तू बोलायला आली आहेस होय.." अमर म्हणतो..

"तसे नाही रे.. मी बोलायला येणारच होते.." मीरा

"कधी?? मी गेल्यावर.." अमर

"काय वाटेल ते बोलू नकोस.." मीरा

"अमेरिकेत ग.. तुला काय वाटलं.. वरती??" अमर

"उगाच काहीतरी बडबडू नकोस.. असे म्हणत मीरा त्याला मारायला जात असते.. इतक्यात तिचा पाय घसरून ती त्याच्या जवळ जाऊन पडते.. मग दोघे एकमेकांच्याकडे बघत असतात.. तेव्हाच अमर तिच्या कपाळावर आलेले केस अलगद हाताने बाजूला करतो.. तेव्हा तिच्या अंगावर शहारे येतात..

अमर तिचा हात हातात घेणार इतक्यात ती लगेच उठते.. आणि निघून तिच्या रूममध्ये जाते..

"ही अशी का गेली.." अमर असा मनात विचार करत असतानाच नेहा तेथे येते..

"ओहो हिरो.. काय पहिल्याच बाॅलला सिक्स.. मस्तच ह.." नेहा

"सिक्स कुठलं आऊट झालो.." अमर

"का रे काय झालं.." नेहा

"ती रागावून गेली ना.." अमर

"तू काही बोललास.." नेहा

"काहीच नाही.. मग ती अशी का गेली.." अमर

"अरे वेड्या तुला कळत कसं नाही रे.. ती लाजून गेली.." नेहा

" काय.. म्हणजे मी करेक्ट ट्रॅक वर आहे.." अमर

"येस.." नेहा

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.

*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..