Jan 26, 2022
प्रेम

कळत नकळत भाग 14

Read Later
कळत नकळत भाग 14

आपण मागील भागात पाहिले की नेहाला निरवची डायरी मिळते.. ती मीराला फोन करायला सांगते पण मीरा नकार देते.. नेहा सहजच डायरी उघडून बघते तर त्यात चारोळी, कविता आणि बरंच काही असत.. आता पुढे..

"अरे हा किती छान लिहितो.. मस्तच. कविता पण एका पेक्षा एक सरस आहेत.." असे मनात म्हणत नेहा एका मागून एक पाने पलटत असते..

पाने पलटताना तिला शेवटी काही मिटींगच्या वेळा आणि तारखा दिसतात.. "अरे बापरे.. हे तर त्याच्या गरजेचं आहे.. तो नक्कीच डायरी शोधत असणार.. किती वेंधळा आहे हा.. फोन करू की नको.. पण महत्त्वाचं आहे म्हटल्यावर फोन करून सांगायलाच हवं.. नाहीतर एखाद्याला त्रास दिल्यासारखे होईल.." असा विचार परत नेहा अर्थातच मनात करत असते..

नेहा निरवला फोन करते.. "हॅलो मी नेहा बोलतेय." नेहा.

"हॅलो खरंच तुम्ही नेहा बोलताय.." निरव.

"आता काय पुरावा द्यायचा का??" नेहा थोडी चिडून..

"नाही तसं नाही.. मला वाटलं पण नव्हतं तुम्ही मला फोन कराल.." निरव.

"करणारच नव्हते.." नेहा.

"मग काय झालं.. पण थॅन्क्यू फोन केल्याबद्दल.." निरव.

"तुम्ही येथे काहीतरी विसरला आहात??" नेहा.

"अरे मेरा दिल वहाॅ पे रह गया है.." निरव

"तुम्हाला गम्मत सुचते.. तुमच्या वस्तूंची कदर नाही काय हो तुम्हाला.." नेहा.

"म्हणजे?? मला काही कळेना.." निरव.

"तुमची डायरी आहे का तुमच्याजवळ.." नेहा.

"हो आहे की.." असे म्हणत निरव बॅग उघडून बघतो पण डायरी नसते.. "अरे.. डायरी तर नाहीच.. कुठे गेली.." निरव.

"माझ्याकडे आहे.." नेहा

"तुझ्याकडे कशी आली.." निरव.

"तूच तर सकाळी विसरून गेलास.." नेहा

"अरेच्चा.. बरं झालं तुलाच मिळाली.. मी घ्यायला येईन तोपर्यंत जपून ठेव.." निरव

"मग मला एक पेनल्टी पाहिजे.." नेहा.

"काय पाहिजे बोल.. मे तो मेरा दिल भी तुझे निकालकर दुॅगा.." निरव

"ए बस कर नौटंकी.." नेहा

"बोल काय हवं आहे.." निरव

"तू मीराला तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी मॅनेजमेंटचं काम देणार आहेस ना.." नेहा.

"हो का??" निरव.

"मग तिला सांग.. अमरची पण यामध्ये सोबत असायला हवी.. मगच हे काम देऊ.." नेहा.

"असे का बरे.." निरव.

"त्याची खूप मोठी स्टोरी आहे.. बघू कधी भेट झालीच तर सांगेन.." नेहा

"जशी तुमची आज्ञा.." निरव.

"बरं बाय.." नेहा

"ओके पण माझी डायरी कधी देणार??" निरव.

"आता तू मीराकडे येशीलच ना.. तेव्हा घेऊन जा.." नेहा

"ओके.." निरव

संध्याकाळी निरव परत मीराकडे जातो.. "मी तुम्हालाच हे काम देणार आहे.. पण माझी एक अट आहे.." निरव

"अट.. कोणती??" मीरा

"तुमच्यासोबत तुम्ही मिस्टर अमरला पण घ्यायला पाहिजे.. गेल्या वेळेस तुम्ही लग्नात खूप धमाल केला होतात.. माझ्या बहिणीच्या लग्नासाठी मलाही तसंच हवं आहे.. कोणतीच कमी नको.." निरव

"अमर नसला तरीही आम्ही कोणतीच कमी सोडणार नाही सर.."मीरा

"पण आम्हाला अमरच हवा आहे.. तो का नाही.. बाहेर गेला आहे का??" निरव

"आहे.. मी बघते त्याला घेऊन यायचा नक्कीच प्रयत्न करेन.." मीरा

"प्रयत्न नको मॅडम.. घेऊनच या.." निरव

"बरं.." मीरा

लग्नाचे काॅन्ट्रॅक्ट मीराला देऊन निरव जात असतो.. तो आल्यापासून नेहाला शोधत असतो.. पण ती कोठेच दिसत नाही.. मीराला कसे विचारायचे?? म्हणून तो गप्प बसला.. जाताना बाहेर बघतो तर नेहा असते.. लगेच त्याच्या चेहर्यावर हास्य फुलत..

"ही घ्या तुमची डायरी.." नेहा

"थॅन्क्यू सो मच.." निरव

"छान आहेत कविता.. तुम्ही लिहिल्या आहेत.." नेहा

"हो.. काही शंका.." निरव

"तुमच्याकडे बघून वाटत नाही.." नेहा

"म्हणजे कविता करणारे वेगळे दिसतात काय.." निरव

"तस नाही.." नेहा

"मग कसं??" निरव

"बरं ते जाऊ दे.. माझं काम केल्याबद्दल थॅन्क्यू.." नेहा

"विषय बदलू नका.." निरव

"बरं जा आता बाय.." नेहा

"बरं.. बाय.." म्हणून निरव जातो..

नेहाला भेटल्यापासून निरव खूप खूश होता.. त्याला खूश बघून घरचे पण खूश होते..
रात्री निरव नेहाला गुड नाईट असा मेसेज टाकतो.. नेहा मेसेज बघते पण रिप्लाय देऊ की नको करत तिच्या नकळतच ती गुड नाईट असा मेसेज पाठवते..

इकडे मीराच्या मनाची घालमेल सुरु झाली होती.. "आता अमरला सांगावं लागेल की माझ्या मदतीला ये.. आता त्याच्याशी बोलावं लागेल.. पण तो मला मदत करेल.. तो माझ्याशी बोलेल.. खरंच मी त्याचं मन दुखावल आहे.. त्याला पैसे द्यायला नको होत.. काय वाटलं असेल त्याला?? उद्या नक्की बोलूयात.. बोलावच लागेल.. नाहीतर काॅन्ट्रॅक्ट हातचं जायचं.. तो भाव पण खाईल.. पण असू दे.. आपण बोलूयात.. आता कुठे करियर सुरू झालंय.. त्यात इगो आल्यामुळे हातच काम जायला नको.." असा विचार करत मीरा झोपते..

मीरा उद्या अमरशी बोलल्यावर तो बोलेल का?? तो तिच्याबरोबर काम करायला तयार होईल का?? हे आपण पुढच्या लेखात पाहू..

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.

*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..