Login

कळत नकळत भाग 10

Marathi love story

आपण मागील भागात पाहिले की नेहा मीराला भेटते.. अमरच्या आणि तिच्या मैत्रीबद्दल सांगते.. तसेच बोलता बोलता ती अमरला प्रपोज करणार हे पण सांगते.. ते ऐकून मीराला खूप वाईट वाटते.. आता पुढे..

नेहा एका हाॅटेलमध्ये जाते आणि अमरला बोलावून घेते.. अमर तेथे येतो..
"काय ग नेहा, इथे का बोलावलेस?? आणि येणार असतो तर आपण एकत्रच आलो असतो की. असे वेगवेगळे का आलोय??" अमर.

"काही नाही रे, सहजच. खूप दिवस झाले मी येथे आलेच नाही म्हणून आले.. मग मला कंपनी म्हणून तुला बोलावून घेतले.. आता शांत बस.." नेहा.

"तू तर अजबच आहेस.. तुझ्या मनात काय चाललंय कधीच कळत नाही.." अमर.

"आणि कळणार पण नाही.." असे म्हणून नेहा हसते..

"बरं काय ऑर्डर द्यायचं?? तूच दे.." अमर.

"मी नाही आज तुझ्या आवडीचं ऑर्डर दे.. आज खास तुझा दिवस.." नेहा.

"अच्छा म्हणजे आज काहीतरी विशेष नक्कीच आहे.." अमर.

"होय आजचा दिवस खास आहे.." नेहा.

"काय बोल की.." अमर.

"इतक्यात नाही.. थोडा वेळ जाऊ दे.." नेहा.

"बरं.." अमर असे म्हणून ऑर्डर देतो.

आज नेहा खूप खूश असते.. ती खूप छान नटून आलेली असते.. सुंदर ड्रेस.. मोकळे केस.. डार्क लिपस्टिक लावलेली.. हलकासा सेंटचा सुवास दरवेळत होता.. हलकासा मेकअप.. ती सुंदर दिसत होती.

"आज छान दिसत आहेस.." अमर.

"थॅन्क्यू.." नेहा म्हणते. आणि "तुझ्यासाठीच तर नटले आहे.." नेहा मनात म्हणते.

ऑर्डर येते.. दोघेही जेवतात.. जेवण झाल्यावर अमर बिल द्यायला जाणार असतो.. तेच नेहा म्हणते.. "आज माझ्याकडून ट्रीट.. बिल मी देणार.." म्हणून नेहा बिल पे करते..

मग ते दोघे बाहेर येतात.. अमर पुढे असतो आणि नेहा मागे असते.. नेहा पाठीमागून जाऊन अमरचा हात धरते.. त्याच्या हातात तिचा हात अलगद देते.. अमरला काहीसं वेगळं जाणवतं.. आज ही नेहमीसारखी नाही.. असे त्याच्या मनात विचार येऊन जातो.. इतक्या वर्षांची मैत्री पण ही अशी कधीच वागली नाही.. असेही त्याच्या मनात आले..

अमरने हळूच त्याचा हात काढून घेतला.. नेहा परत हातात हात घेते.. हाॅटेलच्या बाहेरील गार्डनमध्ये आल्यावर "अमू तुला एक सांगायचं आहे.." नेहा म्हणते.

"बोल की, तू कधीपासून परवानगी घ्यायला लागलीस??" अमर.

"अरे तस नाही.. पण तुला कसं सांगायच तेच कळेना.." नेहा.

"काही सिरियस आहे का??" अमर.

"सिरीयस नाही रे.." नेहा.

"मग बिनधास्त बोल.." अमर.

"आपण लहानपणापासून किती छान मित्र आहोत.." नेहा.

"हमम मग.." अमर.

"मला तर तुझ्याशिवाय करमायचच नाही.. बाबांची बदली झाली आणि नविन शाळेत मला एकटीलाच जाव लागलं.." नेहा.

"होय ग.. आपण एकत्र जायचो, एकत्र यायचो.. अभ्यास, खेळ सगळं एकत्रच असायचं.." अमर.

"हो ना.." नेहा.

"काय भारी होते ते दिवस.." अमर.

"होय.. मला तर ते दिवस संपू नयेत अस वाटायचं.. तू आणि मी आपण दोघेच असायचो.. आपल्याला जास्त मित्र पण नसायचे.. तशी कुणाची गरजच भासली नाही.. आपण एकमेकांना पुरेपुर होतो.. तशी आपली मैत्री होतीच.." नेहा.

"हमम.." अमर.

मग काही वेळ शांतच असतात दोघेही.. लवकर कोण बोलत नाहीत.. शांत वातावरणात दोघेही लहानपणीच्या आठवणीत बुडालेले असतात.. "रम्य ते बालपण.." नेहा मध्येच म्हणते.

"हेऽ तू काहीतरी सांगणार होतीस.. बोल ना.." अमर.

"तू लहानपणी जसा होतास तसाच आहेस.. गोड, बडबडया, गुबर्या गालाचा.. मायाळू.. प्रेमळ.." नेहा त्याच वर्णन करत असते.

"ए थांब थांब.. तू माझं इतकं कौतुक करू नकोस ह.. आणि काय काम आहे बोल?? कुठे जायचं आहे??. इतकं गोड गोड बोलत आहेस म्हणजे नक्कीच काहीतरी काम असणार.. बोल लवकर.." अमर.

"काम काही नाही रे.." नेहा.

"मग.." अमर.

"तुझी साथ हवी आहे.." नेहा.

"अगं माझी साथ आहेच.. मी कुठे चाललोय.. आपली मैत्री अबाधीत आहे.." अमर.

"तस नाही रे.." नेहा.

"मग कसं??" अमर.

"तुझी मला कायम स्वरूपी साथ हवी आहे.. पण मैत्री या नात्याने नव्हे.." नेहा.

"मग??" अमर.

"हे बघ मी माझ्या मनातलं बोलते.. तू राग मानू नकोस.." नेहा.

"अगं काय बोलायचं आहे ते जरा स्पष्टच बोलतेस का?? मला कळेल असे.." अमर थोडा आवाज करून म्हणतो.

"अमर आय लव्ह यू..." नेहा.

"कायऽऽ..." अमर.

"हो अमर.. मला तू अगदी लहानपणापासून आवडतोस.. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.." नेहा अमरला प्रपोज करते.

आता यावर अमर काय रिऍक्ट होतो.. त्याचं प्रेम नेहावर असत की मीरावर हे आपण पुढच्या लेखात पाहू..

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.

*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील.


🎭 Series Post

View all