Jan 23, 2022
प्रेम

कळत नकळत भाग 1

Read Later
कळत नकळत भाग 1

दारावरची बेल वाजली. घरात मीरा एकटीच होती. तिने दरवाजा उघडला. तेथे एक तरूण रूबाबदार मुलगा होता. तो अचानक आत शिरला.

मीराने त्याला अडवले, “ओ मिस्टर, कोण आपण आणि आत काय शिरताय?” तेव्हा तो म्हणाला, “ओ मॅडम आत काय शिरताय काय? हे घर माझं आहे. “

“ए तुझं कुठलं असतय? कोण जाणे कोण आहे हा?”

“ए तू कुठली कोण? मला विचारतीस मी कोण म्हणून?”

“ए बाबा जा आता. नंतर ये आता घरी कोण नाही. “

“ए बाई माझ्या घरातून कोठे जाऊ?कोण ही बाई मला अडवते आहे?”

असे म्हणत तो आत यायचा प्रयत्न करत असतो तोच ती त्याला अडवत असते. या झटापटीत दोघेही जमिनीवर पडतात.

तेवढ्यात कदम काका काकू येतात. त्या मुलाला पाहून अगदी आश्चर्याने ,”अरे अमर तू कधी आलास आणि येणार म्हणून सांगितले नाहीस? अरे असा दारात का उभा आहेस? चल आत.”

अमर आई बाबांचा एकुलता एक मुलगा होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी करण्यासाठी तो परदेशात गेला. त्यामुळे इकडे आई बाबा दोघेजणच घरी असत. त्यामुळे एक दिवस अमरची आई अमरच्या बाबांना म्हणाली, “आपण एक भाडेकरू अर्थात पेईंन गेस्ट ठेऊया काय? म्हणजे मला पण तेवढीच सोबत होईल. “ अमर च्या बाबांनी लगेच होकार दिला.

मग तिने भाडेकरू शोधायला सुरुवात केली. तेव्हाच मीरा घर शोधत होती. तिला समजले की इथे एक घर आहे. अर्थात तिच्या मैत्रीणीनेच सुचवले होते. ती विचारपूस करण्यासाठी तेथे आली.

मीरा एक अनाथ मुलगी होती. तिचे आईबाबा लहानपणीच वारले. तिला कोणी नातेवाईक पण नव्हते. ती अनाथ आश्रमातच मोठी झाली होती. मीरा दिसायला खूप सुंदर होती. अगदी सालस, लांब सडक केस, कुणालाही बघितल्या क्षणी आवडणारी. ती वेडिंग प्लॅनिंग एन्टप्राईज म्हणजेच लग्नासाठीची पूर्ण तयारीचे मॅनेजमेंटचं ती करत असे. तिला एक लहानसा व्यवसाय चालू करायचा होता त्या हिशोबाने ती तेथे आली होती. ती काकूंना भेटली. काकूंनी तिला बघता क्षणी ती त्यांना आवडली. तिला तेथे रहायला परवानगी मिळाली.

पण तिला माहित नव्हतं की त्यांना एक मुलगा पण आहे आणि अमरला सुध्दा माहित नव्हतं की त्यांनी भाडेकरू ठेवला आहे. त्यामुळे हा सगळा घोळ.

अमर रागातच आत गेला आणि फ्रेश होऊन खाली आला. काकूंनी त्याला चहा करून दिला. चहा पिताना "वाह! काय चहा बनवलायस आई तू? मस्तच. किती महिन्यानी मी असा चहा प्यायलो आहे? मला तर संपवूच नये असंच वाटतंय." अमर त्याच्या आईला म्हणाला.

"अरे चहा मी नाही मीराने बनवला आहे. छान आहे ना. मला पण खूप आवडतो तिच्या हातचा चहा, म्हणून तिलाच करायला सांगितले." अमरची आई म्हणाली.

अमर नुसता तिच्याकडे बघतो. काहीच बोलत नाही. "माझ्या घरात राहून मलाच विचारते मी कोण? आता काय तर चहा? माझ्या आईबाबांना जवळ करायचा प्रयत्न करते आणि माझ्या घरावर कब्जा मिळवायचा प्रयत्न चालू आहे. कोण आहे तर कोण ही?" असे अमर मनात विचार करत असतो.

मग तो आईबाबांना विचारतो. “आई बाबा ही कोण आहे? आणि आपल्या घरात काय करत आहे?”

आईने त्याला सांगितले की, “ही मीरा आपल्या घरात भाड्याने राहत आहे म्हणजे ते पेईंन गेस्ट म्हणतात ना ते. तेवढीच आम्हाला पण सोबत. “

"मग मला का सांगितलं नाही?" अमर

"अरे राहून गेलं. ते राहू दे. मला सांग तू किती दिवस सुट्टी घेऊन आला आहेस?" अमरची आई.

"चांगले दोन महिने मी आलो आहे. मस्त तुझ्या हातच जेवणार, मित्रांबरोबर एन्जाॅय करणार. हा पण माझ काम चालूच राहणार आहे. पण मी ते रात्री पूर्ण करेन." अमर आईला सांगतो.

"झालं म्हणजे दोन महिने याला झेलाव लागणार आता." मीरा मनात म्हणते.

"बरं झालं बाबा. खूप दिवसांनी आला आहेस. निदान दोन महिने तरी आहेस. इथेच बदली करून ये ना रे. तू तिथे असतोस आम्ही इथे आम्हाला कुणाचा आधार असणार आहे." अमरची आई म्हणाली.

"आहे की तुमची ती पेईंन गेस्ट." अमर हळूच आईला म्हणतो.

"गप्प रे. चांगली आहे बिचारी." अमरची आई.

"बिचारी म्हणे. मघाशी कसलं भांडत होती बघ माझ्या बरोबर. मलाच माझ्या घरात घेत नव्हती. तुम्ही आलाय म्हणून नाहीतर मला असंच परत जावं लागलं असतं." अमर.

"बरं मला सांग तू इकडे कधी बदली करून घेतोस? तुझा काही विचार आहे की नाही." अमरचे बाबा म्हणतात.

"हो बाबा. हे एक वर्ष करावे लागेल. पुढच्या वर्षी मी येईन इकडेच कायमचा. मलाही एकट्याला करमत नाही तिकडे." अमर.

"छान मग आम्ही तुझ्यासाठी एक सुंदर मीरासारखी मुलगी बघू. मग आम्ही मोकळे." अमरची आई.

"तिच्यासारखी कशाला आई. रोज माझ्या बरोबर भांडत बसेल." अमर हसत म्हणाला.

"ए गप्प रे. उगाच काय तिच्या मागे लागलायस." अमरची आई.

"तुला का तिचा पुळका. म्हणजे मुलापेक्षा ती तुला जवळची." अमर.

"तसे नाही रे...." असे अमरची आई म्हणणार इतक्यात मीरा तेथे येते आणि "काकू माझं थोडं काम आहे मी जाऊन येते." म्हणून सांगते.

"लवकर ये बाळ. आम्ही जेवायला तुझी वाट बघतो." अमरची आई.

"बरं काकू येते मी." असे म्हणून मीरा जाते.

पुढे काय होतंय ते पुढच्या लेखात पाहू...

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.

*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..