नमस्कार
मी गीता उघडे माझ्या मासिक पाळी या कथेला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार,
आता पुन्हा घेऊन आले आहे
एक नवा विषय जो आपल्या खुप जवळचा व जिव्हाळ्याचा आहे व तुम्हांला देखील आवडले ही आशा करते
धन्यवाद
काळजी भाग 1
(वयात आलेल्या मुलीच्या आईची कथा )
मी सुनीता,
एक सुशिक्षित, घरंदाज, देवपूजा व्रतवैकल्य याची प्रचंड आवड असलेली स्त्री,
कधी कधी माझे पती (विकास) जे एका नामांकित कंपनी मध्ये नोकरी करता.
ते मला चिडवण्यासाठी म्हणतात की आमच्या घरी 33 कोठी देव गुण्यागोविंदाने नांदतात
व काही काही घरात फक्त सासू सुना देखील नांदू शकत नाही.
खुप राग येतो तेव्हा मला पण हसून सोडून देते मी.
मला नुकतीच वयात आलेली एक मुलगी आहे स्नेहा तिचे नाव व मुलगा लहान आहे तिच्यापेक्षा सुरज.
या दोन फुलावरून आमच्यात नेहमी वाद होतात.
विशेषतः स्नेहा वरून
अजूनतरी तिच्या पालनपोषनाविषयी आमच्यात एकमत झाले नाही व होईल की नाही ते देवालाच माहीत.
फुलं म्हणजे आमचे दोनी मुलं
आमच्या संसार रुपी वेलीला आलेले ते फुलचं आहेत असे मी मानते.
पण माझ्या व यांच्या (नवऱ्याचे नाव एकेरी घेऊ नये व घेतलच तर उखाण्यात घ्यावे अशी रीत आहे आमच्याकडे आणि या रितिभाती मी कटाक्षाने पाळते )
तशी मी खुप पुराणकालीन नाहीये
पुराणे खयलात की 1857 मधील नाहीये
किंवा आधुनिकतेचा मला तिरस्कार देखील नाहीये.
पण मुलगा व मुलगी यांच्या संगोपनात फरक असावा या मताची मी आहे
व याविषयावर मी हवी तितकी भांडू शकते
(गंमत केली बर )
जे की घरात कुणालाही पटत नाही.
यांना तर अजिबात नाही.
असो,
माझी सगळी कामे आवरून झालीत आता स्वाऱ्या कधी उठतात ते बघते.
म्हणजे आमचे हे व त्यांचे दोन पाखरं.
सुट्टीचा दिवस म्हणजे यांचा झोपायचा दिवस असतो.
मला शनिवारी रात्रीच सांगितलं जातं
हे बग आई,
रविवार हा एकच दिवस मिळतो झोपायला.
रोज तर उठतोच ना आम्ही.
मग please
रविवारी तरी झोपू देत जा ग.....
आणि हो तुझ्या देवपूजेच्या गंटी चा आवाज मर्यादित ठेव उगाच सकाळी सकाळी घंटा नाद करून पूर्ण सोसायटीला
उठवू नको.
बाबा च्या लाडाने वाया गेलेत ना..
पण मी कुठे कुणाचे ऐकते
मी माझ्या दिनचर्या प्रमाणे सकाळीच उठले, अंघोळ केली , दारात रांगोळी काढून देवपूजेला फुलं आणली
आणि चालू केला माझा देवपूजेचा कार्यक्रम.
ते तिघे माझ्या देवाला व मला खुप हसतात म्हणून मी पण मुद्दाम त्रास देते त्यांना
म्हणजे गंटी जोरात वाजवणे
घरात धूप लावणे
त्यांना माझी व मला त्यांची सवय झाली आहे आता.
मी माझे सगळे आवरून त्यांना उठवायला गेले नेहमीप्रमाणे उत्तरे मिळाली थांब पाच मिनिटे
यांचे पाच मिनिटे कधीच संपत नाही हे माहीत होतं मला
सुरज च एकवेळ ठीक होत पण स्नेहा ने झोपलेलं मला कधीच आवडायचं नाही.
कदाचित तुम्हाला माझे विचार पटणार नाहीत पण अशीच आहे मी व माझे विचार.
मुलगी म्हणजे परक्याचे धन
तिला तिच्या मर्यादा कळायला नकोत का ??
उद्या सासरी जाईल
मग तेव्हा काय
होतो माझ्या नावाचा उद्धार
सकाळ संध्याकाळ
आई ने हेच शिकवले का ?
मुलगा मुलगी समाणतेने वाढवा पण मुलीला बाई तू एक काचेचे भांडे आहेस पडले तर तडकणारच याची जाणीव करून द्या.
तिच्या वाढलेल्या वयाबरोबर तिच्या शरीरातील बदल तिला समजावून सांगा.
तीच वागणं, बोलणं, हसणं ,खेळणं हे वयासोबत बदलायला हवं हे तिला सांगा.
तिचे कपडे, विचार, मित्र, मैत्रिणी कसे असावे हे तिच्याशी बोला.
नवजन्म देण्याची क्षमता फक्त तिच्यात आहे व हे तिचे वेगळेपण जपा.
आई व मैत्रीण दोनी भूमिका तिच्या सोबत निभवा.
आता तर मी पक्की आऊटडेटेड वाटत असेल ना ?
तुम्हांला
तर वाटू द्या
मी आऊटडेटेड वाटले ना तरी मला चालेल.
पण कुणी माझ्या लेकीकडे वाईट नजरेनं बघितलेलं नाही चालणार.
शेवटी आई आहे ओ मी तिची
मुळात मी तर म्हणेन
माझ्या मुलीवर कुणाची नजर च जाऊ नये यासाठी मला जे जे करता येईल ते मी करेल,
मग तिला
कॉलेज ला नेणं आणणे असो,
तिचे कपडे असो,
की तिची घरी येण्याची वेळ,
मी तरी हे सगळं पाळते.
मुलीला सुशिक्षित, कणखर, निर्भीड बनवा
पण तू एक स्त्री आहेस व तुला काही मर्यादा आहेत हे तिला सांगायला विसरू नका.
तिची नजर आकाशावर असू द्या
पण संस्काराचा पदर डोक्यावर ठेऊन.
कारण त्या कोवळ्या जीवावर होणारे
अत्याचार जेव्हा मी टिव्ही वर ऐकते ना तर आतून पूर्ण कोलमडून जाते.
उद्या माझी मुलगी देखील या जगात जाणार आहे तिला सोसल ना हे सगळं की कोलमडून पडेल ती देखील
पण जर तिचेच पाऊल चुकीचे पडले तर ???????
विचार करूनच काळजाचे पाणी पाणी होत.
खरच खुप अवघड असत हो वयात आलेल्या मुलीची आई होणं.
या विचार चक्रातच गॅस वरील दुधाने फरशी गाठली
यांनी किचनमध्ये येऊन गॅस बंद केला व मला भानावर आणले.
काय सौभाग्यवती आज कोण आहे आपल्या आरोपी च्या पिंजऱ्यात.
हे हसत म्हणाले.
मी
तुम्हाला फक्त मस्करी सुचते
जरा वयाचे भान ठेवत जा
आता आपण लहान नाही आहोत
मुलगी वयात आली आता आपली.
स्नेहा चा विषय काढला की हे चिडतात.
आली का त्या पोरीवर
तुला दुसरे काही सुचत नाही का ग
नेहमी पोरगी वयात आली
पोरगी मोठी झाली
अग एकविसावे शतक आहे
आज पोरी पोरापेक्षा कमी नाहीत
मी तर म्हणेन की दोन पाऊले पुढे आहेत,
अग चंद्रावर चालल्यात मुली आता , क्रिकेट खेळतात, विमान चालवतात असे एक क्षेत्र नाही जिथे मुलगी नाही
आणि माझी स्नेहा तर माझा अभिमान आहे.
हो अभिमान म्हणे राहू द्या
तुमचे विचार तुमच्याकडे व तुमचा अभिमान अजून उठला का नाही जरा बघा मी त्यांना चिडवण्यासाठी बोलले
ते स्नेहा व सुरज ला उठवण्यासाठी त्यांच्या रूम कडे गेले.
दोघांनाही वेगवेगळ्या रूम आहेत कारण मुलांना त्यांचा स्पेस दिला की ते आई वडिलांशी मैत्री करतात असे यांचे म्हणणे होते.
त्यांनी स्नेहा चा दरवाजा वाजवला पण दरवाजा उघडला गेला नाही
क्रमशः
का नसेल उघडला स्नेहा ने दरवाजा जाणून घेण्यासाठी सोबत राहा व प्रतीक्षा करा पुढील भागाची
व मला फॉलो करायला विसरू नका
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा