कळा ज्या लागल्या जीवा (भाग-2) टीम मारवा

This is a love story

कट्टर प्रतिस्पर्धी असणारे असीम आणि अमृता आता बेस्ट फ्रेंड झाले होते. पेपरमधला त्यांचा फोटो आणि त्यांची मैत्री बरीच गाजत होती… बोर्डात आल्यानंतरच्या प्रत्येक सत्कार समारंभाला त्यांना एकत्रच बोलावत असत… त्यामुळे आता सगळ्यांच्या तोंडी… असीम - अमृता असं जोडूनच नाव येई!.. वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या मुलाखतीतून त्यांचा आत्मविश्वास आणि बुद्धीचं तेज अगदी प्रत्येकालाच जाणवत असे..

दोघेही आता तारुण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले होते.अमृता गव्हाळ रंगांची,सडपातळ बांध्याची, भुरे डोळे,चाफेकळी नाक, केसांचा ब्लंट कट अशी आकर्षक नवतरुणी दिसू लागली होती!! असीम तर कितीतरी मुलींसाठी ऋषी कपूरच होता!!... 

लोकांसाठी कितीही चर्चेचा विषय असला… तरी असीम - अमृता आणि त्यांच्या घरातले यांच्यासाठी मात्र ही मैत्री अत्यंत निखळ होती!!..

आता कॉलेजच्या ऍडमिशनची धूम सुरू झाली आणि मात्र असीम आणि अमृताच्या मनाची घालमेल सुरू झाली… दोघांना एकमेकांची आवड माहीत होती… पण दोघांनाही त्यांची मैत्री प्रिय होती आणि त्यांना ती गमावण्याची...वेगळं होण्याची भीती वाटत होती. दोघांना ही वाटत होतं की आपण एकमेकां बरोबर असावं!!.. पण हट्ट कोण सोडणार!!

         असीमला पहिल्यापासूनच सी. ए. व्हायचे होते..तर अमृताला आर्किटेक्ट!!... त्यामुळे साहजिकच दहावी नंतर दोघांच्याही वाटा वेगळ्या होणार होत्या आणि त्याचीच भीती दोघांना वाटत होती….आता आपल्या मैत्रीत दुरावा येणार आपल्याला वेगळं व्हायला लागणार म्हणून दोघांची ही घालमेल चालू होती! पण दोघे ही त्यांनी निश्चित केलेले ध्येय सोडायला! दोघांनी निवडलेले मार्ग  सोडायला मात्र तयार नव्हते. उलट असीम आणि अमृता एकमेकांना स्वतःच्या स्ट्रीममध्ये ओढण्याचा प्रयत्न करत होते. अमृताचे म्हणणे होते की असीमने सायन्स घ्यावे आणि असीम अमृताने कॉमर्सला ऍडमिशन घ्यावे म्हणून आडून बसला होता. दोघांच्यात चाललेली  रस्सीखेच शेवटी भांडणात परावर्तित झालीच!!...

        असेच ऍडमिशनच्या संदर्भात  अमृताला मनवण्यासाठी असीम अमृताच्या घरी गेला... असीमने दाराची बेल वाजवली आणि अमृताच्या आईने दार उघडले….

त्यांनी प्रसन्न हसून त्याचे स्वागत केले.

अमृताची आई,“ अरे असीम ये… बस...! मी पाणी घेऊन येते!”

असीम,“काकू... अमृता कुठे आहे?” त्याने मनातील विचार बाजूला सारत विचारले.

अमृताची आई,“ आहे की तिच्या रूममध्ये! आणि तुमच्या ऍडमिशनचे कुठे पर्यंत आले?” त्यांनी पाण्याचा ग्लास त्याला देत विचारले.

असीम,“  चालले आहे काकू!त्याच संदर्भात चर्चा करायला आलो आहे मी अमृताशी!तुम्ही तिला बोलवा ना प्लिज!” तो  म्हणाला.

अमृताची आई,“ अरे हो मी बोलवते तिला… पण ती कुठली यायला… आत्ता गाण्याचा कार्यक्रम लागतो ना.. खोलीच्या खिडकीत नीट चालतो म्हणून तिथेच रेडिओ ठेऊन गाणी ऐकत बसली असेल!!.. जा.. तुम्ही तिच्या रुममध्ये बसा!...अमृताsss” त्यांनी असं म्हणून तिला हाक मारली आणि अमृता बाहेर आली. असीमला बघून ती  आश्चर्याने म्हणाली,“ असीम तू इथे अचानक! कसा काय आलास?” 

अमृताची आई,“ अग असं काय विचारतेस! तो तुझ्याशी ऍडमिशन संदर्भात चर्चा करायला आला आहे! त्याला तुझ्या रूममध्ये घेऊन जा मी चहा नाष्टा घेऊन येते!” त्या असं म्हणून किचनकडे वळाल्या.

       अमृता असीमला घेऊन तिच्या रूममध्ये आली...असीम तिची रूम न्याहाळत होता... छोटीशीच पण भरपूर सूर्यप्रकाश असलेली आणि टापटीप रूम पाहून तो प्रसन्न हसला.. "ही नेहमीच परफेक्ट असते!.. "तो मनात म्हणला. 

अमृताने त्याला स्टडी टेबल समोरची खुर्ची बसायला दिली आणि ती बेडवर बसत तिने चौकसपणे विचारले, “ काय बोलायचे आहे तुला ऍडमिशन संदर्भात?” 

“अमृता... ऐक ना! तू माझ्या बरोबर कॉमर्सला ऍडमिशन घे ना ग!” तो अजिजीने म्हणाला.

अमृता,“ वेडा आहेस का असीम तू? अरे मी कॉमर्स घेऊन काय करू? मला आर्किटेक्ट व्हायचे आहे!तुलाच मी किती दिवस झाले सांगत आहे की उलट तूच सायन्सला ऍडमिशन घे म्हणून!” ती चिडक्या सुरात म्हणाली.

असीम,“ अग मी सायन्स घेऊन काय करू? मला C. A. व्हायचे आहे… तू तर गणितात इतकी हुशार आहेस.. इथेही सहज टॉप करशील... अमृता! तू जरा समजून घे ना! आपण जर वेगवेगळ्या क्षेत्रात गेलो तर… आपण वेगळे होऊ.. मग आपली मैत्री???!” तो तिला समजावत म्हणाला.

अमृता,“ मीच का समजून घेऊ रे?... हे नेहमीचं आहे तुझं!!... मला ही माझी स्वप्न आहेत! माझी ध्येय आहेत!तू घे की ऍडमिशन सायन्सला! सायन्स घेतलेस तर पुढे  बऱ्याच क्षेत्रात करिअरची संधी आहे तुला असीम!” ती थोडी रागातच म्हणाली...

असीम,“ ठीक आहे तर तुला जे करायचं ते तू कर! मला जे करायचं ते मी करेन!आज पासून आपले मार्ग वेगळे आणि आपली मैत्री इथेच संपली!” तो रागाने म्हणाला आणि उठून तरातरा निघूनही गेला!!...

      त्याला असं जाताना पाहून नाष्टा घेऊन आलेल्या अमृताच्या आईने अमृताला विचारले, “ असीम असा का निघून गेला ग? तुम्ही भांडलात की काय दोघे?”

अमृता,“ तसं काही नाही मम्मा! त्याला काम होत म्हणून गेला तो!” ती नजर चोरत म्हणाली पण तिच्या आईच्या लक्षात आले होते की दोघांचे काही तरी बिनसले आहे..

           
             दरम्यान दोघे ही एकमेकांशी बोलायचे आणि भेटायचे ही बंद झाले. अमृताने फर्ग्युसनला सायन्सला ऍडमिशन घेतले तर असीमने BMCC ला कॉमर्सला...दोघे ही आपापल्या कॉलेजच्या नव्या दुनियेत रमले... नवीन मित्र-मैत्रिणी नवीन ग्रुप्स!..अभ्यास!...

तसं सगळं छान होतं... पण कुठे तरी एक पोकळी निर्माण झाली होती... दोघांनाही एकमेकांची कमतरता जाणवत होती…दोघेही झुरत होते.. पण .. पहिल्यांदा बोलणार कोण !!!. 

असेच तीन महिने निघून गेले.  दोघांनाही  एकमेकांची आठवण येत असूनही ते शांत होते…दोघांच्या आई-वडिलांना सगळं माहीत होतं. दोघांचे भांडण आणि आता एकमेकां बद्दल वाटणारी ओढ पण!.. पण त्या चौघांनी या दोघांमध्ये न बोलणेच पसंत केले. 
★★★

            1985चा काळ.. ऑक्टोबरच्या त्या संध्याकाळी असीम आणि अमृता त्यांच्या त्यांच्या ग्रुप सोबत रुपाली वर पोचले…आणि योगायोगाने अचानक पणे दोघे एकमेकां समोर आले… तीन महिन्यांनी दोघे एकमेकांना बघत होते.. अमृता त्या सगळ्या ग्रुपमध्ये उठून दिसत होती… आणि अमृतालाही कॉलेजला जाऊ लागल्यानंतर असिमचा वाढलेला स्मार्टनेस जाणवत होता...दोघांचे ही मन एकमेकांकडे ओढ घेत होते. दोघांचे ही लक्ष मित्र-मैत्रिणी मारत असलेल्या गप्पा मध्ये आणि खाण्यात देखील नव्हते. दोघे ही एकमेकांना चोरून पाहत होते. पण प्रश्न होता कोण आधी बोलणार याचा? तासभर कल्ला केल्यानंतर दोघांचेही ग्रुप उठून जाऊ लागले... अमृता ही तिच्या ग्रुप बरोबर निघाली तसे असीमने तिला न  राहवून  अडवले आणि तो म्हणाला,“ अमृता थांब मला तुझ्याशी बोलायचे आहे!”

        अमृताने ही त्याचे ऐकले आणि तिने तिच्या ग्रुपला बाय केले.. जाताना दोन्ही ग्रुपमध्ये कुजबुज सुरु झाली.. दोघे ही तिथेच एका कोपऱ्यातील टेबलवर बसले. पाच मिनिटे तर अस्वस्थ शांततेच गेली. शेवटी अमृतानेच विचारले,“ काय बोलायचे होते तुला असीम? बोल ना!”

“ sorry!” तो खाली मान घालून म्हणाला.

“ sorry??.. for what?” तिने त्याला निरखत विचारले.

“ मी त्या दिवशी तुला जे बोललो त्यासाठी! मी मैत्री तोडण्याची भाषा केली त्यासाठी! मी स्वतःची स्वप्न, ध्येय सोडू शकत नाही आणि तुझ्याकडून मी तुझी स्वप्न, ध्येय सोडावीस अशी अपेक्षा केली त्यासाठी!” तो आवंढा गिळत म्हणाला.

“ मी पण ...sorry! मी ही तुझ्याकडून तीच अपेक्षा केली…. सायन्स घे! तुझी स्वप्न सोड असे म्हणाले.” त्याच्या हातावर हात ठेवत ती डोळ्यात पाणी आणून ती म्हणाली.

"आपली करिअर वेगळी असली! आपले मार्ग भिन्न असले म्हणून काय झाले! आपण एकमेकांच्या स्वप्नांचा आदर करत! एकमेकांना सपोर्ट करत आपली मैत्री जपू शकतोच की!” असीम गोड हसून म्हणाला.

अमृता,“ हो रे!!! आपण उगीचच भांडत बसलो! मैत्री आहे म्हणजे दोघांची ध्येय आणि मार्ग एकच असावा असे थोडीच आहे!... मार्ग भिन्न असून ही आपण आपली मैत्री टिकवू शकतोच की!.. ठरल तर मग आपण न भांडता उलट एकमेकांना सपोर्ट करू आणि आपली मैत्री अशीच अबाधित ठेवू! Friends?” तिने हसून हात पुढे करत  विचारले…" ही आमच्या कॉलेजची पद्धत आहे"...ती म्हणाली

“ yes!  Always and forever  friends!” असीमही तिला शेकहँड करत हसून म्हणाला.

अमृता,“आणखीन एक आपल्या या निखळ मैत्रीच्या नात्यामध्ये आणखी काहीच यायला नको!!.. आपली मैत्री आहे तशीच अबाधित राहावी!” ती म्हणाली.

असीम,“ हो अमृता पण माझी एक अट आहे?” तो गंभीर होत म्हणाला.

“  आता कसली अट रे?” ती थोडी बुचकळ्यात पडून म्हणाली.

“ अग इतकं दचकायला काय झालं? अट अशी आहे की आपण कॉलेज सुटल्यावर पंधरा मिनिटं तरी भेटायचे ते ही रोज!” तो तिला पाहत म्हणाला.

अमृता,“ अरे देवा! ही अट होय मी घाबरले की आता तू आणि कोणती अट घालणार म्हणून भेटू की रोज; त्यात काय इतकं आणि विकएन्डला बाहेर मस्त फिरायचा प्लॅन ही करू!” ती म्हणाली.

असीम,“ ok मग उद्या पासून भेटू आपण याच ठिकाणी कॉलेज सुटल्यावर! चल मी निघतो!” तो उठत म्हणाला.

अमृता,“ हो नक्कीच भेटू! चल बाय!” ती ही निघत म्हणाली….

आज दोघांनाही एकमेकांच्या नजरेत काहीतरी वेगळं जाणवत होतं… बाहेर पडताना रेडीओवर गाणं लागलं होतं… " तुमसे मिलकर… ना जाने क्यों… कुछ और भी याद आता है…." दोघेही मनातून खुलले… पण बाकी कश्याहीपेक्षा पुन्हा गवसलेल्या मैत्रीचा आनंद मोठा होता…
★★★

     तर...  असीम आणि अमृता यांच्या मैत्रीत आलेले हे वादळ आज शमले होते! दोघांची मैत्री अतूट!अबाधित राहिली होती! दोघांनी निवडलेले मार्ग वेगळे होते! करिअर वेगळे होते पण मैत्री मात्र अतूट होती!!...

    पण ही खरचं मैत्री होती का? की अमृता आणि असीमचे हे नाते त्यांच्या ही न कळत मैत्रीच्या ही पुढे निघून गेले होते? पुढे अमृता आणि असीमच्या आयुष्यात काय घडणार होते? दोघांनाची मैत्री कोणते नवीन वळण घेणार होती?... पाहूया पुढच्या भागात!!..

★★★

    नमस्कार वाचक हो!

     मी तुमची लाडकी लेखिका,
     स्वामिनी   (अस्मिता) चौगुले तुमच्यासाठी घेऊन आले आहे नवीन कथा पण या वेळी माझ्या टीम सह तर   सध्या इरावर सुरू आहे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आणि या स्पर्धेत मी माझ्या टीम सह भाग घेत आहे.माझ्या टीमचे नाव आहे मारवा! तर मला आणि माझ्या टीमला तुमच्या सपोर्टची गरज आहे तर वाचत राहा कथा मालिका 
“ कळा ज्या लागल्या जीव!
                      एक वेगळी प्रेम कथा!
   आणि तुमच्या लाईक कमेंट देऊन आमच्या मारवा टीमला विजयी करा! ही नम्र विनंती!

©स्वामिनी(अस्मिता) चौगुले.