आयुष्यात बऱ्याच घटना कशा असतात, की त्याला धैर्याने
प्रसंगावधान राखून सामोरे जाणे कठीण असते. एखादेवेळी
देवच कोणत्या ना कोणत्या रूपात येतो. व त्या प्रसंगातून
आपल्याला सोडवतो.
अशीच एक घटना माझ्या बाबतीत घडली होती. माझी दोन मुले,
चार वर्षाची मुलगी व दोन वर्षाचा मुलगा घराच्या अंगणात खेळत
होती. घराच्या अगदी जवळच एक मोठी विहीर आहे.
कुणीतरी चुकून घराचे गेट उघडे टाकले असावे. दोन्ही मुले ..
खेळतांना त्या विहिरीजवळ गेली. व विहिरीत वाकून पाहू लागली.
मी घरात स्वयंपाक करत होते. गेट बंद असल्यामुळे मी निश्चित होते.
पण चाहूल घेतचं होते. मुलांचा आवाज का ऐकायला येत नाही,
म्हणून सहज मी अंगणात आले तर गेट उघडे होते व दोन्ही मुलं
विहिरीच्या छोट्या पायरीवर बसून विहिरीत वाकून बघत होती.
ते पाहून मी इतकी घाबरले की माझ्या तोंडातून आवाजही निघेना.
मात्र सुदैवाने एक जण अचानक धावत आला व त्याने दोन्ही
मुलांना अलगद उचलून घेतले. नंतर त्याने मला सांगितले, की..
तुम्ही जर आरडाओरडा केला असता तर ती मुलं दचकली असती
व कदाचित त्यांचा तोलही केला असता.
मला तर त्या व्यक्तीचे आभार कोणत्या शब्दात व्यक्त करायचे
तेच कळत नव्हते. खरोखरचं तो क्षण सुन्न करणारा होता.
त्या व्यक्तीच्या रूपात धावत आलेला तो जणू देवदूतच होता.
वेळीच समय सूचकता दाखवून त्याने दोन्ही मुलांना
जणू जीवनदानचं दिले होते.
खरंच काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा