काळ आला होता पण वेळ आली नव्हती...

Sudaivane Mi ani maz bal sukhrup wachlo

काळ आला होता पण वेळ आली नव्हती...


गोष्ट छोटी डोंगराऐवढी...


आपला आयुष्यात अशा अनेक घटना घडतात जे आपलं मन सुन्न करून जातात. कधी कधी कल्पना बाहेरील घटना घडतात आणि हृदयन हेलावून टाकतात.

माझ्या आयुष्यातही अश्या काही घटना घडल्या ज्या अगदी अनपेक्षित होत्या.

शॉपला जाण्यासाठी घरून निघाले, बारा साडे बाराची वेळ होती, गाडी मिडीयम स्पीड मध्ये होती, थोड्या समोर डाव्या बाजूला डेपो होतं, मी माझी सरळ गाडी नेत होते आणि अचानक डाव्या बाजूने बस आली, बसला बघून मी घाबरले, ब्रेक लावला असता तरी मी बसला धडकले असते, स्पीड कमी व्हायचा तो आणखी वाढला, उजव्या बाजूने गाडी वळवली, एका पानठेल्या जवळून खाच खड्यातून गाडी काढली. पानठेल्या मधील लोक जोरात ओरडलीत. मी कुठेही न थांबता शॉप समोर गाडी थांबवली आणि दीर्घ श्वास घेतला. त्या दिवसापासून आजही मी आधी तिथून स्पीड कमी करते आणि बस येत आहे की नाही शहानिशा करते आणि मगच समोर जाते. आजही ते आठवलं की घाबरायला होतं.
म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती तेच खरं.

..............................
दुसरा प्रसंग

मी आठ महिन्याची प्रेग्नंट होते, आठवा महिना नाजूक असतो अस म्हणतात आणि म्हणून त्या महिन्यात प्रवास करायचं टाळतात.
त्यावेळी मी रोज शॉपवर जायची, त्याही दिवशी शॉप वर जायला निघाले. प्रेग्नंट असल्यामुळे मी गाडी हळु चालवायचे. मी एका बाजूने हळूहळू जात होते, अचानक मागेहून एका गाडीने माझ्या गाडीला धडक दिली.
माझी गाडी पडली, मी पाच ते सात फूट घासत गेले, माझ्या अंगावरचा ड्रेस फाटला. माझ्या पायातील चप्पल कुठच्या कुठे गेल्या. मी हळूच उठले, बघ्यांची गर्दी जमली होती, त्यातल्या एका मुलाने माझी चप्पल आणून दिली. माझी गाडी स्टॅण्ड वर लावून दिली. मला खूप रडायला आलं, माझ्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, आठ महिन्याची प्रेग्नंट त्यात हे...माझ्या बाळाला काही झालं तर नसेल या विचाराने सुन्न झाले. जमावाने त्या मुलीला खूप सुनावलं शेवटी तिने तिची चूक मान्य केली.
काही वेळ तिथे थांबून मी स्वतःला शांत केलं आणि मग घरी गेले.

त्यावेळी विरुद्ध दिशेने स्पीडने एखादी गाडी आली असती तर कदाचित माझं आणि माझ्या बाळाचं बर वाईट झालं असतं. पण आम्ही दोघेही सुखरूप होतो.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती हेच खरं...

समाप्त: