Feb 28, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

अक्षताच्या कुटुंबाचा मुव्ही

Read Later
अक्षताच्या कुटुंबाचा मुव्ही
गोष्ट छोटी डोंगराएवढी

काळ आला होता पण वेळ आली नव्हती

एक चौकोनी कुटुंब होत . आई बाबा , मोठा आकाश ,लहानी अक्षता .

रविवार असल्याने बाबा आणि मुलांना सुट्टी होती . आज मुलांना संध्याकाळी मुव्ही बघायला जायच होत .
मुल आई आणि बाबांच्या मागे लागली होती .

आकाश ,अक्षता : " बाबा मुव्ही …मुव्ही… "

( खुप दिवसांनी मुलांनी मुव्ही बघण्याचा आग्रह केला असल्याने आईनेही मुलांना साथ दिली .)

बाबा : "ओके डन , चला पटापट तयारी करा ."

मुल खुप खुश झाली होती .

सगळ्यांनी तयारी केली आणि ६ ते ९ चा मुव्हीचा शो बघण्यास गेले .

घर शहरा बाहेर होत ,चित्रपट गृहात जाण्यास अर्धा तास लागला होता . तिथे गेल्यावर तिकीट काढून सगळ्यांनी मुव्ही बघीतला . सर्वांनी खुप मजा केली .

सर्व मुव्ही बघून घरी येण्यास निघाले होते . बाईकवर अक्षता बाबांच्या पुढे बसली होती . बाबांच्या मागे आकाश बसला होता . आकाशच्या मागे आई बसली होती .

शहरातून मुख्य रस्त्याला लागल्यावर रस्त्यावरचा उजेड कमी झाला होता . फक्त गाड्यांच्या लाईटांचा उजेड तेवढा होता .रात्री रस्त्यावर समोरून येणाऱ्या गाड्यांचे लाईट चमकत होते .

रेल्वेलाइनवर पुल होता . पुलाच्या बाजूचे कठडे काही काही ठिकाणी तुटलेले होते .बाबा गाडी चालवत असतांना पुल चढत होते . इतक्यात समोरून एक लोट गाडी आली , त्या लोट गाडीला उतार असल्याने ती जोरात पुढे बसलेल्या अक्षताच्या गुडघ्याला लागून उलट पडली . रस्त्यावर लाइट चमकत होते , अक्षताच्या गुडघ्याला लोट गाडीचा लोखंडी कोपरा लागला होता .यामधे बाबांचा गाडीवरचा तोल सुटून गाडी आडवीहोऊन घसरत समोरच्या ट्रकखाली गेली . गाडीचा अपघात झाला होता .

पण म्हणतात न " काळ आला होता पण वेळ आली नव्हती " .

अपघात झालेल्या ठिकाणी पुलावचे कठडे तुटलेले होते , जर गाडी खाली घसरली असती तर…..
समोर असलेला ट्रक बंद पडून उभा होता . ट्रक जर सुरु असता तर ….

अपघातात सगळ्यांना थोडफार लागल होत .

"सगळ्यांचा जीव सुखरूप होता हे महत्त्वाचे होते " .

खरच शेवटी एवढच म्हणता येईल " काळ आला होता पण वेळ आली नव्हती " .

Veena

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//