काकुसासू भाग 2 ,अंतिम

Kakusasu


हरीश तर समजदार निघाला, छोटे दिर ही त्यांचा स्वभाव जाणून होते, नवरा तर तिच्या स्वभावाला खूप विटला होता ,पण फक्त तिला मूल नाही, आपल्या शिवाय तिचे कोणी नाही,माहेर ही उरले नाही.. मानसिक रित्या तिला येणाऱ्या काळात आपल्याला कोण वाली असणार आहे, कोण आपला सांभाळ करणार आहे..वेगळे होऊन राहिलो आणि काही झाले तर कोणाला ही मेलो तरी कळणार नाही ..ही भीती काका च्या मनात घर करून होती..



रोमा जरा चाचपडत, त्यांच्या खोलीत आली ,तिला त्या स्वतः नवख्या होत्या ,आणि त्यांची खोली तर अजूनच नवखी ,जी खोली फक्त बाहेरूनच बघत ती आज प्रत्यक्षात बघत होती.


त्या खोलीला asian paints लावलेले होते, त्यात paintings केलेल्या होती, कुठे चारही बाजूने वॉल लॅम्प लावले होते, खोली जणू राजमहाल होती... सागवानी टेबल खुर्ची, आणि बरेच काही, एक ac, खिडकी त्यातून बाहेरची बाग दिसत होती...प्रत्येक खिडकीत गुलाब ,त्यांना आवडते म्हणून बागेत एक झोका, बाहेर बागेत जायला रस्ता...दोघा साठी tea टेबल.. हे सगळे रोमा निरखून बघत होती...

रोमा, "वा मस्तच तुमची खोली तर, सुंदर सजावट, अप्रतिम मांडणी, अप्रतिम कलर कॉम्बिनाशन,खूप आवडते बहुतेक तुम्हाला हे सगळे..."

काकुसासू,"हो मला खूप आवडतात सजावटी करायला, पण फक्त माझ्या पुरत्या ,माझ्या खोलीपुरत्या करते मी "


रोमा, "हो का ,मग तर तुम्हाला इथेच रहावे वाटत असेल दिवसभर ,आणि म्हणूनच तुम्ही बऱ्याचदा बाहेर येत नाहीत..आणि दरवाज ही तिकडून आहे तुमचा मग तुमचे येणे जाणे ही त्याच वाटे मार्गे होत असेल हो ना ."

सासू..."हो पहिल्यांदा जेव्हा वाटणी झाली तेव्हाच ठरवले पुन्हा ह्या घरात जास्त सम्पर्क ठेवायचा नाही ,पण अजेसासू तुझी तिला वाटणी नको होती ..मग झाली रद्द आणि आलो पुन्हा ती भिंत पडून या घरात ,पण मुद्दाम हा दरवाजा मी वेगळा ठेवला आहे ,आता पुन्हा वाटणी करायची गरज रहाणार नाही, फक्त एक भिंत पुन्हा बांधायची..आणि संबंध कायमचा तोडायचा.."

रोमा त्यांचे ते रागिष्ट बोलणे आणि त्यातून वाहणारा तुसडेपणा आणि द्वेष वेळोवेळी हेच सांगत होता की त्यांना आता पुढे हे नाते नाही सांभाळायचे.....पण तरी काकू कुठेतरी दुखावल्या गेल्या आहेत त्यांना ही समजून घ्यायला हवे..मुल नसल्याची एक खंत त्यांना ही कुठे तरी खात असेलच आणि ह्यातून हा द्वेष निर्माण झाला असेल...त्या मोठे असून ही छोट्याच्या घरात पाळणा हलला... त्याचे नाव पुढे घेऊन जाणार वंश जन्माला आला.. हे दुःख खात असेल...रोमाने हा विचार करताच काकू काही तरी बोलली

"अग तुला सांगते तुझा नवरा ह्याला मी दत्तक घेणार होते,त्याची सगळी सोय करणार होते, त्याचे शिक्षण मोठ्या शाळेत करणार होते, मोठा झाल्यावर त्याला विदेशात पाठवणार होते.... माझी ही संपत्ती त्याला देणार होते..हे सुख आज त्याच्या नशिबी असते.. त्याला खूप मोठा बंगला मिळाला असता.. आणि तुझ्या ही नशिबी ही खोली असती...तू तिची सून होण्या ऐवजी माझी सून होऊन आली असतीस...पण शेवटी नशीब ग..तुला तिच्या हाता खाली राबने नशिबात होते ते होणार... मी आत्ताच तुझ्या सासूला म्हणत होते तुझी सून शिकलेली आहे, तिने काम केले नसेल तिला काही काम सांगत जाऊ नकोस... तू तिला आराम करू दे ,तिचे नवीन लग्न झाले आहे ..तू राबत होतीस तसे तिला राबवून घेऊ नकोस.. पण ती ऐकेल तेव्हा..शेवटी ती सासू आहे तुझी ..माझी सून असती तर तुला मी पलंगा वरून उतरू ही दिले नसते..."

रोमा हे ऐकत होती ,तिला आता सगळे सुस्पष्ट झाले होते ,की आपली सासू ही खरंच चांगल्या निर्मळ मनाची आहे ,त्या यांच्या बद्दल सतत चांगलं सांगत असतात .


तर मोठ्या काकुसासू ह्या विष ओकल्या समान आई बद्दल वाईटच वाईट सांगत आहेत... हे तर अति होत आहे ,जेव्हा सकाळी मी त्या दोघींचे बोलणे ऐकले तेव्हा ह्याच माझ्या सासुबाई चे माझ्या विरोधात कान भरून देत होत्या आणि आता जणू अश्या आव आणत आहेत की जणू त्या माझी बाजू घेत होत्या...


तिचा आता पारा चढला होता ,ती आता हा खोटे पणा सहन करू शकत नव्हती... तिला कोणी खोटे बोलणे सहन झाले नाही तर ती तोंडावर बोलून मोकळी होणारी व्यक्ती..सगळे सरळ सरळ, छक्के पंजे नाहीत..


रोमाने ठरवले मी माझ्या सासूबाई बाई बद्दल एक ही चुकीचा शब्द ऐकून घेणार नाही... हे मनतात ठरवले..ती पलंगावरून उठली आणि मोठ्या सासुबाई कडे बोलायला गेली...ती चांगलीच संतापलेली होती.. चेहरा सांगत होता आता खरे ते खरे आणि खोटे ते खोटे होणारच...


रोमा मनात म्हणत होती माझ्या गरीब सासुबाई सारखी मी ह्यांचे निमूठपणे ऐकून कशी घेणार..


माझ्या सासू सासऱ्यांना दबाव होता ,त्या हे दोन भाऊ जोडून ठेवता यावेत आणि स्वतःवर वाटणीचा आळ येऊ नये म्हणून आणि सासरे आणि सासूबाईला त्यांचा तिरस्कार निर्माण होऊ नये..म्हणून त्यांनी वाटणी जितकी टाळता येईल तितकी टाळली.. आणि निमूटपणे मोठ्या जावेचा राग सहन करत राहिल्या...

पण मी कौशल्य म्हणजे /रोमाची सख्खी सासू /नाही ऐकून घ्यायला...आज आत्ता जरी भिंत बांधली तरी हरकत नाही पण मी बोलणारच...


रोमा, "काकुसासू तुम्ही खूप चुकीचे बोलत आहात असे तुम्हाला वाटत नाही का ,तुम्हाला खोटं बोलताना काहीच वाटत नाही का ,कसे पटते तुम्हाला तुमचे हे दुटप्पी वागणे...म्हणजे मला एक बोलायचे आणि आईंच्या कडे जाऊन एक बोलायचे... तुम्हाला मी ओळखत नव्हते आज पर्यंत पण आज मी तुम्हाला पुरते ओळखले..बरं झाला तुम्ही हरिष चे संस्कार केले नाहीत ते, बरेच झाले की तुम्हाला हरीश दत्तक दिला नाही ते, बरं झाला की तो त्याच्या आईच्या संस्कारात वाढला ते... नाहीतर मी सून होऊन आले असते तुमची तर मला दोन दिवस ही संसार करू दिला नसता तुम्ही... तुमच्या मोठया महाल पेक्षा आमचे झोपडे बरे लाख गुणा... मी धन्य समजते आजीला की त्यांनी वेळीच तुमचे गुण हेरले...हो आणि इथून पुढे तुम्ही माझ्या सासुबाई बद्दल एक शब्द बोलायचा नाही कारण मी तो ऐकून ही घेणार नाही "

इकडे काकुसासू हैराण होत्या त्यांना काहीच कळत नव्हते काय म्हणत होती ही रोमा ,तिला कसे हे सगळे माहीत झाले...त्यांना आज किती तरी वर्षांनी त्यांची खरी पायरी दाखवली होती..कोणी तरी त्यांच्या आई नंतर चांगली खरी खोटी सूनवण्याची हिम्मत केली होती.. या आधी कोणी त्यांचे कान पकडले नव्हते... जे रोमाने केले.. पुन्हा त्या कधीच त्या वाटेने गेल्या नाहीत..


हळूहळू त्यांना रोमाच्या स्वभावाची सवय होत होती, आणि निखळ मनाची रोमा पुन्हा त्यांच्याशी बोलू लागली होती, ती वाटणी झाली होती पण जरा वेगळ्या प्रकारे...काकुला सासू म्हणण्यापेक्षा ती काकुला आई म्हणू लागली होती...तिने तशी त्यांची परवानगी घेतली होती...


"काकू तुम्ही रुसलात का ,मी माफी मागते पण तुम्ही पुन्हा वाटणी हा शब्द पुन्हा घेऊ नका ,कारण आम्हाला तुम्ही हव्या आहात, तुमची काळजी वाटते, आणि तुमची काळजी घेणारे फक्त काका आहेत आणि ते पण थकले आहेत..म्हणून अजून जास्त काळजी वाटते ग..मी भले ही बोलण्याने तुसड असेल पण मनाने खूप चांगली आहे..जे झाले ते विसर आणि पुन्हा ये ह्या दारावाटे ह्या घरात... काकू अग तुला मुलगा नही याचे दुःख आम्हाला सगळ्याच आहे म्हणून मी आणि आम्ही एक मार्ग काढला आहे , हरीश त्या घरचा मुलगा राहू दे आणि मला तू तुझी मुलगी समजदू दे..आणि परत मूल नाही हा विचार कधीच येऊ देऊ नका ,"

काकुला रोमा चे वागणे खूप जवळचे आणि हृदयाला स्पर्शून गेले होते, पुढचा मागचा विचार न करता आपसूकच त्यांचा हात तिच्या डोक्यावर आशीर्वाद द्यायला वर गेला होता..पण तरी तिला हरीश शिवाय कोणी ही हवे नव्हते... आता तर तो मिळणारच नव्हता...मग फक्त एकत्र राहून यांच्या सोबत दिवस काढायचे होते... निदान हरीश रोज समोर तरी दिसेल, मनाला तीच एक वेडी आशा होती... तोच निदान मेल्यावर पाणी पाजले.. तोच माझा म्हणून अग्नी देईल...मनात अजून ही हरीश होता...जरी किती ही नाकारले तरी त्याला मनापासून मुलगा मानला होता... तिचा वाढता द्वेष हा त्यासाठी असलेले अतोनात प्रेमच होते जे तिला त्याच्या वर आई म्हणून बहाल करता आले नाही कधी..

कधी कधी तोडून टाकावे तरी आपलेच नुकसान आणि नाही तोडावे तरी आपलेच नुकसान ..




🎭 Series Post

View all