काकूसासू भाग 1

Kaku Sasu


काकुसासू

रोमा नुकतीच मोठ्या कुटुंबात लग्न होऊन आली...

जिथे दोन सासूबाई होत्या..आणि त्यांचा सगळ्यांचा आपला वेगळा तोरा होता..

तिची सासूबाई दोन नंबर ची....आणि मोठी सासुबाई म्हणजे नवऱ्याची काकू सासू...रोमा त्यांना काकू समोर म्हणत तर नवरा बायको सोबत असतील तर काकू सासू..


आणि तिच्या सासूबाईला आईच म्हणत...


दोघी ही सासू असल्या तरी जितकी सख्खी सासू रुबाब करत नसत त्यापेक्षा जास्त रुबाब ह्या मोठ्या सासुबाई करत, तितक्या त्या ह्या नवरा बायको मध्ये उगीच नसती ढवळा ढवळ करत..काय तर त्यांनी तिच्या सासुबाई वर ही हुकूमत केली होती आणि अजून ही करत आहे तर तू काय मग...तुला ही माझे एकूणच घ्यावे लागेल...इथे माझी सत्ता आहे अजून..बाकी जेव्हा वेगळे होऊ तेव्हाचे तेव्हा पाहू..


आतापर्यंत हे दोन भाऊ निमूठपणे प्रेमाने एकत्र संसार करत..त्यांच्या बायकांचे ही चांगले पटत ,म्हणजे पटू घेतले होते ते फक्त रोमाच्या सासूबाईने म्हणून टिकले होते सगळे.. कारण तिला नवऱ्याचा स्वभाव माहीत होता.. त्याचे त्याच्या भावा पुढे काही चालत नसे... आई वडील असेपर्यंत त्यांना दोघे भाऊ सोबत रहायला हवे होते...


एकदा नको जास्त आता वेगळे होऊ म्हणून छोट्या भावाने आणि मोठ्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला तेव्हा वडिलांना हार्ट अटॅक आला होता...आणि मग त्यांचा वाटणीचा विचार रद्द करावा लागला होता... त्यांना ही माहीत होते मोठी सून जरा आगाऊ आहे... पण त्यांना ते असताना वाटणी नको होती... दोन चुल नको होत्या... छोट्याला एक मुलगा मुलगी होते तर मोठ्याला मुलं बाळ नव्हते... त्यामुळे हरीश हाच त्यांचा मुलगा आणि तोच दोघा भावांमध्ये दुवा होता... त्याच्या सहवास मुळे मोठा भाऊ आणि काकू बदलून गेले होते...हरीश ला दोघा आई वडिलांची माया आणि लाड मिळत होते...


हरीश मोठ्या काकुचा जीव की प्राण होता आणि जेव्हा तो झाला तेव्हा त्यांनी ठरवले केतकी चे शिक्षण छोटा करू देत आणि हरीश चे शिक्षण आम्ही करू... आपण दोघे परिवार गुण्या गोविंदाने राहू...पण हरीश मला दे...पण रोमाची अजेसासूबाई यांनी तसे करण्यास नकार दिला... त्या म्हणाल्या तुम्ही जोपर्यंत सोबत आहात तोपर्यंत हरीश तुझा पुतण्या नाही तर मुलगा समज हो पण त्याला मुलगा म्हणून मांडीवर देणे म्हणजे छोटी वर अन्याय नको...तिची मुलगी जरी असली तरी मुलाला त्याच्या आई पासून तोडणे हा स्वार्थी विचार असेल जो मला पटणार नाही..

मोठ्या जाऊबाई ला वाटले ,हरीश न देण्या मागे छोट्या जाउबाईचा हात असणार...तिला तिचा मुलगा माझ्या मांडीवर द्यायचा नव्हता तर मग मला त्याचा लळा ही लावायचा नव्हता...मी उगाच त्यात गुंतत गेले.. उगाच त्याला जीव लावला... उगाच त्याचा खर्च करेन असे म्हणाले... जर तो माझा पुतण्या हीच ओळख असेल तर त्याला पुतण्या म्हणूनच वागवणार...त्याचे कश्याला नसते लाड पुरवायचे...कश्याला जीव ओतायचा...कश्याला प्रेम माया करायची...शेवटी जावेचे कारटे ते...शेवटी तिचेच रक्तच ते.. मी कोण त्याची...आणि मग तेव्हा पासून त्यावर काकूंची असलेली माया पातळ झाली...तिचे त्याच्या सोबतच वागणे बदलले...


तो मोठा झाला आणि तो काकुला ओळखू लागला त्याला ती आधीच काकू दिसत नव्हती..ती त्याला वागण्यातून झिटकरू लागली तसा त्याला समज झाला की काकु आता आधीपेक्षा दुरावत आहे...


त्याचे लग्न ठरले तरी काकू ने त्याला साधे विचारले ही नाही तुला मुलगी आवडली का, ती कशी आहे... ती शिकलेली आहे का... तुला पसंत आहे ना... ह्यातून फक्त एक समजत होते काकुला तो आपला करायचा होता ,आणि त्याच्या आई पासून त्याला तोडायचे होते.. म्हणजे आपल्या नवऱ्याचे नाव त्याच्या वडिलां ऐवजी लावायचे होते पण ते जमले नाही...त्याची कुठे तरी खंत राहिली ,आपल्या मागे आपले नाव लावणारे कोणी नाही ,ना ही प्रॉपर्टी सांभाळणारे कोणी... हरीश हवा होता मग काहीच खंत राहिली नसती...त्याचे सगळे लाड पुरवले असते.. खाऊ पिऊ घातले असते... दूर फिरायला गेलो असतो... त्याचे शिक्षण केले असते...विदेशी पाठवले।असते... मोठया तालेवार घराण्यातले माझ्या माहेरची मुलगी करून आणली असती... त्याचा थाट केला असता... त्याचा रुबाब असता... माझ्या आजे सासूला किती मिनत्या केल्या होत्या तेव्हा..  म्हणाले होते एका अटीवर छोट्याला आमच्या सोबत ठेवू की जर त्याला तुम्ही  तुमची शप्पथ देऊन त्याचा हरीश आम्हाला द्या...मग आम्ही लांब निघून गेलो असतो...आणि पुन्हा कधीच हरीश वर त्याच्या ह्या भिकरड्या आई वडिलांची सावली ही पडू दिली नसती...तो सर्वस्वी माझाच राहिला असता.. पण नाही ऐकले त्या म्हतारीने अन मलाच सांगितले तुझ्या मांडीवर हरीश ला देता येणार नाही त्याच्या आई पासून त्याला दूर करता येणार नाही... आणि माझा डाव।हाणून पाडला...

इकडे काकुसासू नेहमी त्यांचे वाईट कसे होईल ह्या विचारत असायची ,आणि कसे ह्या घराला माझी हाय लागेल ,कसा हरीश लग्न झाल्यावर आई वडिलांपासून दूर होईल, कशी त्याची बायको त्याला ह्या सासू सासऱ्या पासून दुर घेऊन वेगळे निघायला भाग पडेल...हे त्यांना आतून वाटत असत...माझा नाही झाला तर हरीश कोणाचा ही होऊन जाता कामा नये.. खुद्द त्याच्या बायकोचा ही नाही... तो माझाच मुलगा व्हावा मग त्याच्या वर इतरांचा हक्क असावा... खूप टोकाचा द्वेष करत काकू त्या घराचा..


हरीश चे लग्न ह्या घरात खूप मोठा आनंदाचा क्षण होता.. सासूबाईला सून खूप आवडली होती...गुण करत राहील अशी सून त्यांनी पसंत केली होती.. माझ्या सुनेला मी ह्या छोट्या घरात राहू देणार नाही ,आम्ही सहन केले ते ती सहन करू शकणार नाही, मोठ्या जाऊबाई चा।द्वेष तिला कळता कामा नये.. आणि मुलगा सून ह्या राजकारणा पासून दूर जावे...तशी छोट्या सासू ने रोमा ला घरातील प्रत्येक व्यक्ती बद्दल चांगलेच सांगितले होते.. खुद मोठ्या सासुबाई बदललं चांगलेच सांगितले होते...तिला मुलं नसल्याने तिची होत असलेली चीड चीड...तिला हरीश हवा होता दत्तक म्हणून पण ते तिला आजे सासुबाई ने नाही होणार सांगितले आणि कशी ती बदलली...हरीश वर कसा तिचा जीव असत...किती ती लाड करत..माझे आदर स्थान आहे त्या...कसे मला समजून घेत ...आणि बरेच काही..रोमाच्या सासूबाईने कधीच सुनेच्या कानात जाउबाईचा बद्दल विष पेरले नव्हते... म्हणून रोमा ही त्यांचा आदर करत राहिली...पण बऱ्याचदा हरीश च्या तोंडातून काकूबद्दल काही वेगळेच ऐकले होते तिने...

तशी काकू जरा एका संधीच्या शोधत होतीच तिला नव्या सुने बद्दल काही जाणून घ्यायचे होते,ती कशी आहे कशी वागते..हे समजून घेण्यासाठी तिच्या छोट्या जावेला विचारायला गेली...आणि जावेला काम करत असताना लगेच ओरडली.."अग आता तरी तू काम नको करायला ग ,आता तर तुझी सून आली आहे तर सगळेच काम तिला समजून सांगून मोकळी हो...तू का तिची नौकर आहेस की स्वतःला कामवाली समजतेस आता जरा तिला करू दे काम तू बस आरामात आयते खात ,केलेस की तू खूप राबवून काम आता तुझे दिवस आहेत.."

मोठी जाव कशी आहे हे चांगलेच माहीत होते ,तिला कधीच माझे चांगले होत असलेले पटत नव्हते आणि आता ही तिला हरीश ने एका चांगल्या गुणी संस्कारी मुलीला लग्न करून आणले हे माहीत असेलच तरी त्यांना आमच्या घराचे सुख बघवणार नाही हे माहिती होते ,मग अश्यात नाते कसे नासवता येतील हा त्यांचा प्रयत्न आहे... जेव्हा माझ्या सासूबाईचे आणि माझे चांगले नाते होते तेव्हा त्यांनीच विरजण घातले होते आमच्या नात्यात...तसे ही सासुबाई सगळ्यांसमोर नाही पण ह्यांना म्हणाल्या होत्या ,"ही आई होऊ शकत नाही, कारण देवाची तशी इच्छा असेल ,त्यात हिच्याकडे स्वतःच्या संस्काराची शिदोरी नाही ,ती कुश्चित आहे ,स्वार्थी अप्पल पोटी बाई ह्या मुलावर काय संस्कार घडवेल, त्यापेक्षा हरीश त्याच्या आईच्या संस्कारात वाढलेला बरा, नको हीला तो दत्तक द्यायला. " आणि म्हणूनच त्यांनी हरीश ला दत्तक देऊ दिले नाही छोट्या जाऊबाई मनात विचार करत होत्या..

आज ही मोठ्या काकुसासुचा हाच एक डाव होता ,फूट पडायची आणि सासू सुनेची गम्मत बघायची... पण इकडे रोमाची सासू त्यांच्या जावेचा स्वभाव जाणून असल्यामुळे त्या त्यांना म्हणाल्या, "जाऊबाईचा मला तेव्हा ही कामेने मरण दिले नाही जेव्हा खूप काम होती ,तर आता तरी इतकी कामे नाहीत आणि मी आयते तेव्हा ही खाल्ले नाही तर मी आत्ता ही खाणे शक्य नाही, तेव्हा तुम्ही सगळे माझ्या कडून हक्काने करून घेत तेव्हा मी एकदा ही तक्रार केली नाही, हरीश रडायचा त्याला भूक लागायची तरी मला तुम्ही कधीच म्हणाल्या नाहीत की तू जरा अराम कर ,त्याला घे ,त्याला दूध पाज ,त्याला झोपी लाव आणि मग काम कर...मग आता तुम्हाला माझ्या आरामाची काय इतकी चिंता असावी...मला सुनेला काय सतत आराम करू द्यायचा असा ही हेतू नाही ,पण ती तिचे लग्नानंतर आयुष्य थोडे तरी निवांत जगते तर जगू दे, नाहीतर माझे आयुष्य कसे होते ही तुम्हाला सांगणे लागू नये.. मला जणू तुम्ही नौकर म्हणून आणली होती ,पण म्हणून मी माझ्या सुनेला तसेच वागवू हे होणार नाही..."

काकुसासू आणि आई ह्यांचे बोलणे ऐकत होती दुरून रोमा आणि तिला आत चालू असलेल्या संवादावरून कोणाचा आवाज कोणता हे कळत होते ,कोण काय बोलत आहे हे ही कळले होते ,त्यात आज कुठे काकुसासुचा खरा भेद कळला होता, त्यांच्याबद्दल जे आई नी सांगितले होते त्याश्या त्या आज वाटल्या नव्हत्या... त्यांचा आतला हेतू कळला होता... म्हणजे आईने जे सांगितले ते फक्त आईच्या आतील चांगुलपणा मुळे सांगितले परंतु काकुसासू मुळात कुश्चित आहेत हे जे मनापासून जाणवत होते ते आज प्रत्येक्ष सिद्ध झाले होते... आणि आता निश्चित झाले की काकुसासू आई बद्दल आणि आमच्या बद्दल मनात एक अढी धरून आहेत...

तश्या काकुसासू आणि आईचे बोलणे झाले आणि अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने काकुसासू तणतणत बाहेर निघाल्या... तितक्यात रोमा ही हळूच बाजूला झाली आणि वाळत घातलेले कपडे जणू काढत आहे हे भासवू लागली...तसे तिने दोघींचे बोलणे ऐकलेच नाही असे दाखवत होती..तिला बाजूला उभी असलेली पाहिल्यावर काकुसासू, तोंड वाकडे करून निघून गेली...


त्या त्यांच्या खास खोलीत गेल्या आणि कोणास ठाऊक काय मनात आले, त्या परत बाहेर आल्या तोपर्यंत रोमा कपडे काढतच होती...त्यांनी रोमला आपल्या आतल्या खोलीत येण्याचा इशारा दिला.."ये जरा आत सुनबाई ,थोडं बोलायचे आहे मला तुझ्याशी. "

तशी रोमा त्यांनी बोलावले हे पाहून आवक झाली.. तिने इशाऱ्यात म्हणाली, "कोण मी का काकू. "

काकुसासू, "हो मग इथे दुसरी कोण सून आहे आम्हाला ,तूच , ये जरा आत ये बोलू थोडं "

काकुसासू आता रोमला ही तिच्या सासुबद्दल काही वाही सांगून तिचे कान भरणार होती, तिला सासुबद्दल भडकवणार होती..आता खरा डाव रोमा मार्फत रंगणार होता..

काय सांगणार काकुसासू रोमला... काय असेल रोमाची भावना सासूबाई बद्दल पाहू पुढील भागात..

क्रमशः....????

🎭 Series Post

View all