काकडीच्या गोड पुऱ्या

काकडीच्या गोड पुऱ्या

काकडी आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर आहे.

काकडीत विविध विटामिन्स असतात.उदा. विटामिन सी ,

मॅगनीज, पोटॅशियम, बीटा कॅरोटीन इत्यादी. जे आपल्या शरीरासाठी

आवश्यक असतात. कधीकधी लहान मुले काकडी खात नाहीत.

म्हणून विविध पदार्थात काकडीचा वापर छुप्या पद्धतीने करून 

मुलांना काकडी खाऊ घातली पाहिजे. उद्देश हा की आपल्या मुलांची

विटामिन्स, प्रोटिन्सची गरज त्यामुळे पूर्ण होईल.

काकडीच्या गोड पुऱ्या.

साहित्य -

काकडी अर्धा किलो, गूळ एक पाव, डाळीचे पीठ एक वाटी,

मोहना साठी एक टेबल स्पून तेल, चवीनुसार मीठ, व पुऱ्या 

तळण्यासाठी तेल एक पाव.

कृती -

प्रथम काकडी स्वच्छ धुवून, साल काढून किसून घ्यावी. तो किस...

कुकरमध्ये वाफवून घ्यावा. त्यात बारीक केलेला गूळ, डाळीचे पीठ,

चवीनुसार मीठ व एक टेबल स्पून तेल घालून मिश्रण सारखे करावे.

आता त्या मिश्रणात कणिक घालून ते घट्ट भिजवावे. व तेल

कडकडीत झाल्यावर पुऱ्या तळून घ्याव्यात.

या काकडीच्या गोड पुऱ्या लहान मुलांना खूप आवडतील.

मग वाट कसली बघताय एकदा नक्की करून बघा.

मस्त खा.

स्वस्थ राहा.

धन्यवाद.

सौ रेखा देशमुख.