काकडीचे दोसे

काकडीचे दोसे

साहित्य -

तांदूळ तीन वाट्या, उडदाची डाळ एक वाटी, काकडीचा कीस

एक वाटी, ओल्या नारळाचा कीस एक वाटी, चवीपुरते मीठ,

दोन-तीन हिरव्या मिरच्या, थोडे मेथी दाणे, थोडा खाण्याचा सोडा

कोशिंबीर.


कृती -

तांदूळ व उडदाची डाळ वेगवेगळी भिजत घालावी. ५,६ दाने

मेथ्या वेगळ्या भिजत घालाव्या. तांदूळ ,डाळ व मेथ्या

किमान पाच ते सहा तास भिजले पाहिजे. नंतर हे सर्व साहित्य

वेगवेगळे किंवा एकत्र घेतले तरी चालेल मिक्सरमधून काढून घ्यावे.

त्यात चवीपुरते मीठ टाकून चांगले कालवून घ्यावे. व दुसऱ्या दिवशी

त्या मिश्रणात काकडी सोलून त्याचा कीस व नारळाचा कीस घालावा

दोन-तीन हिरव्या मिरच्या वाटून घालाव्या कोशिंबीर घालावी.

आवडत असल्यास थोडा हिंगही घालू शकता. शेवटी थोडा 

खाण्याचा सोडा घालून हे सर्व मिश्रण एक करून घ्यावे.

नंतर गॅसवर दोशाचा तवा ठेवून दोसे करून घ्यावे.

अतिशय पौष्टिक असे हे दोसे खायला छान लागतात.

चला मग करा सुरुवात.

मस्त खा.

स्वस्थ रहा.

धन्यवाद.

सौ. रेखा देशमुख