कैरीचा गुळआंबा / मुरांबा

Raw Mango Jam , Goolaamba Recipe
वर्षभर टिकणारा आणि उन्हाळ्यात जेवणाची लज्जत वाढवणारा कैरीचा गुळआंबा कसा करतात पाहूया ....

साहित्य

1 - 2 ते 3 कैरी ( 1 बाऊल कैरीचा किस )

2 - 1 बाऊल किसलेला गुळ

3- पाव चमचा विलायची पूड

कृती -

1 - कैऱ्या स्वच्छ धुवून किसून घ्याव्या.

2- जेवढा किस असेल त्याचप्रमाणात किसलेला गूळ घ्यायचा.

3- गॅस मध्यम आचेवर कढई ठेऊन त्यात किस आणि गुळ घालायचा.गुळ विरघळेपर्यंत मिश्रण चमच्याने हलवत राहायचे .

4 - त्यामध्ये पाव चमचा विलायची पूड घालायची. त्यानंतर 10 मिनिट मध्यम आचेवर मिश्रण शिजू द्यायचे. ( त्यामधील पाणी सुकेपर्यंत शिजवायचे, जास्त वेळ शिजवल्यास गुळआंबा कडक होतो म्हणून प्रमाणातच शिजवायचा.)

5- टेस्टी आंबट - गोड गुळआंबा तयार.