काय चाललंय हो त्यांच्या कडे

संध्याकाळी राधाबाई फिरून आल्या तेव्हा खूप उत्साही दिसत होत्या. गोपाळरावांना राहवेना. कां ग ?आज एकदम हॅप्पी हॅप्पी काही तरी खमंग बातमी मिळाली दिसते, दोन दिवस बाहेर गेली नव्हती पोटात गुडगुडत होत त्याला गॉसिप चे पाचक(हाजमोला) मिळालेले दिसतय .________________________-
काय चाललंय हो त्यांच्याकडे

राधाबाई मॉर्निंग वाॅक करुन परत आल्या. गोपाळराव ही थोड्याच वेळात आले .
आल्या आल्या त्यांनी राधाबाईंना विचारले,
"अगंss मी काय म्हणतोय काय चालले आहे ग त्यांच्याकडे"कोण आलंय?
"कोणाकडे हो"--मोबाईल मधून मान वर न करता राधा बाईंनीविचारले.

\"त्या sग--- गोपाळरावांना नाव काही आठवत नव्हतं त्या--- पाॅनीटेल बांधतात , उंच नाक वाल्या,
\"ती--नखरेल देशमुख न\"
\"हं-- हं त्यांच्याचकडे ग\"
"काय चाललंय?? काही बोलली नाही काल फिरताना, तशी ती आतल्या गाठीचीच आहे हो-
सगळ्यांच्या खबरा नेहमी काढत असते पsण आपल्या घरातलं या कानाचं त्या कानाला कळू देणार नाही."
"अगं त्यांच्या दाराशी नवीन कार पाहिली."
ती --होय ,त्यांच्या व्याह्यांची आहे,
"हे कसली घेतात नवीन त्याच जुन्या डबडयात चाललंय, महा कंजूस नवरा बायको"

राधाबाई आणि गोपाळराव सीनियर सिटीजन, दोघंच दोघं मुलं-मुली बाहेर देशात. रिटायरमेंट नंतर च लाईफ मस्त चाललं होतं. पेन्शन भरपूर. घर स्वतःचं व तब्येत?? बारीक-सारीक तक्रारी. या वयात दागिनेच ते मिरवायला.
दोघंही सकाळ-संध्याकाळ फिरायला निघत प-ण मुद्दाम वेगळेवेगळे, बरोबर गेलं तर बोलणार काय?? घरी तेच दारी तेच. म्हणून गोपाळरावांचा ग्रुप पुरुषांचा ,तर राधाच्या समवयस्कमैत्रिणी.
घरी आल्यावर कधी राधाबाई तर कधीगोपाळराव इकडच्या-तिकडच्या खबरा देत, बोलायला काही विषय हवा न!

"अहो---तुमचे ते बाजुच्या काॅलनीतले केळकर त्यांच्या नातीचे लग्नं ठरले म्हणे". राधाबाई ना उत्सुकता!
होssपण तो फारसा खुष नाही ये.
" कां??मुलगा पसंत नाही कि नौकरी धड नाही??
अग-- दुसऱ्या जातीचा आहे.
त्या केळकर ला कोकणस्थां शिवाय चालत नव्हतं.
नवी पीढी कोण ऐकणार?
\"होs ना आपल्या मुलांचं तर नीट झालं पण आपल्या हि नातवंडांनी असं केलं तर ??कारण ते तर बाहेर देशात राहणारे लग्नतरी करतील की नाही कोण जाणे??
प्रकरण आपल्या वरच घसरतय म्हंटल्यावर राधाबाईंनी विषय बदलला,\".
\"बरं त्या सगळ्या पुढच्या गोष्टी आज जेवायला काय करू

रात्रीच ,सकाळच काही नाही नं??
"त्या कोपर्‍यावरच्या देसाईं कडे, जेव्हा पहावे तेव्हा कधी झोमॅटो वाला ,तर कधी पिझ्झा वाला येताना दिसतो. आम्हीसंध्याकाळी फिरून येतो ना तेव्हा दिसतो.
"आळशी आहे हो ती देसाईंची सून मग काय होणार"?? हे असल खाऊन खाऊन केवढी ढोल झाली आहे.
कां ग ?आपण ही मागवू न कधीतरी ,
हो --मलाही कधी आराम हवा न!

दोन दिवस झाले राधाबाईंना सर्दी-पडसे झाले होते त्यामुळे बाहेर फिरायला जाणे झाले नाही. गोपाळरावांजवळ निवडणूक,मोदी ह्या विषयावर किती बोलणार??
गोपाळराव फिरायला गेले तेव्हा
कंटाळून राधाबाईंनी शेवटी बहिणीला फोन लावला
\"सुमे काय म्हणते बाळबाळंतीण??
अग बाई? इतक्या लवकर घेवुन गेले??तू नव्हत पाठवायच.
बर-- मला फोटो पाठव. ह्या मेल्या कोरोना मुळे कुठ्ठे जाता आले नाही.
आणखीन काय बारस कस झालं ?? काय दिलं,घेतल विचारुन झालं. गोपाळराव फिरुन परत ही आले, समोर बसून ऐकत होते आता बोलणं संपतय अस वाटत असतानाच परत तिकडून काही सांगितले जायच मग परत इकडून, शेवटी मग" जाऊ दे ग काही झालं तरी आई ती आईच वगैरे वगैरे बोलून फोन बंद झाला.

"काय बाई एकेक लोक असतात म्हणत पूर्ण प्रवचन गोपाळ रावांना ऐकवले गेले.
इतक्या खमंग बातम्यांचा परिणाम नवर्या ने केलेली बेचव खिचडी ही राधाबाईंनी नाक न मुरडता खाल्ली.
काहो--आज लवकर घरी परत आला अगं सुरेश च्या घरी जरा पैशांची अडचण आहे मुलांची सध्या नोकरी सुटली ये ना, विचारत होता मी म्हटलं मी देतो तुला जमेल तेव्हा परत कर शेवटी मित्रच ना आपण .
हो खरं अडीअडचणीला मित्रच कामास येतात. राधा ने दुजोरा दिला.

आज जsरा बरे वाटत होते.म्हणून राधाबाईफिरायला जायला म्हणून तयार झाल्या.
कां ग--जातिये
हो--बाई दोन दिवस झाले बाहेर च्या जगात काय चाललंय कळायला नको??
संध्याकाळी राधाबाई फिरून आल्या तेव्हा खूप उत्साही दिसत होत्या. गोपाळरावांना राहवेना.
कां ग ?आज एकदम हॅप्पी हॅप्पी काही तरी खमंग बातमी मिळाली दिसते, दोन दिवस बाहेर गेली नव्हती पोटात गुडगुडत होत त्याला गॉसिप चे पाचक(हाजमोला) मिळालेले दिसतय .
. "अहो कोपऱ्यावरच्या त्या परांजपे आहे ना त्यांची ती कामवाली बाई बडबडत जात होती फार भांडी टाकतात, एक बाई त्यांच्याकडे टिकत नाही.

"काs गं त्या दामल्यांच्या कडून लहान बाळ रडल्या चे आवाज ऐकू येतात!
अहो त्यांची मुलगी निशा आली आहे , तिच्या सासुबाईंन बद्दल बोलत होती सुनंदा , सासू खूप खडूस आहे, त्यावरून च सुनंदा नी जोशी मधे वाद झाला.
पण जोशी चा काय संबंध??
मी तेच म्हणते सुनंदा जे सागंतहोती ते निमूटपणे ऐकून घेतले तर ?पण नाही,काय आहे न, जोशी ला मुलगी नाही म्हणून उगाचच निशा च्या सासूची बाजू घेत होती.
मग?
मग काय, झाली वादावादी.
तू नाही न मधे पडली?
नाही तर--- आपल्या ला काय करायचे आहे?
हो, आपली मुल इतक्या दूर पर देशात रहातात आपल्याला काही झाले तर हेच शेजारी आपल्या मदतीला धावून येणार
होय हो मी आपली सगळ्यांशीजुळवून घेतं.

अगं तो चंदू आहे ना त् त्याचा सासरा आलेला आहे. भाजीवाल्याशी हुज्जत घालत होता ,त्यांच्या गावात म्हणे ही भाजी खूप स्वस्त आहे.
मग काय भाजीवाला काय कमी आहे "म्हणाला तुम्ही इथे आणून विकत जा."
चंदू म्हणत होता असा वैताग आहे म्हणे काय करणार?
म्हातारपण आहे झालं. वय वाढतं तसा हट्टीपणा ही वाढतो मला वाटते.

बरं ते जाऊ दे," रिमोट दे तर जरा मॅच पाहावी म्हणतो".
" नाही हो आज मला सिरीयल पाहायचय "
तू दुपारी पहा ना.
नाही मला आत्ताच पाहायचं आहे काय झालं त्या असावरी च.
"तू हट्टीपणा करते आहे ,तुलाही म्हातारपण आलेल दिसते "
असे म्हणत गोपाळराव हसायला लागले.
आणि तुम्ही?? तुम्हाला जसं काही बालपणच येत आहे न! राधाबाईनी टोमणा मारला.

________________________-