काहीतरी सहजच

जे घडलंय घडून गेलंय ते दिवसच वजा करायचे.. कधी त्या चोरवाटा विसरुन जाव्यात..विस्मरणातच जावा अख्खा कालखंड कुठेतरी गायब व्हावा.. जमवता आलं पाहिजे..?
काहीतरी सहजच..

कोणत्या तरी अशा वळणावर येऊन थांबतो आपण की, तिथून मागे वळून पहाणं किंवा पुढे जाणं असह्य होतं..
मिळवलेले क्षण आणि गुंतवलेले यांतली तफावत तीव्रतेने जाणवायला लागते..
उरफाटी आकडेमोड दिवसांची खरंच करावी का..?
जे घडलंय घडून गेलंय ते दिवसच वजा करायचे.. कधी त्या चोरवाटा विसरुन जाव्यात..विस्मरणातच जावा अख्खा कालखंड कुठेतरी गायब व्हावा.. जमवता आलं पाहिजे..?
अश्रुंचे बांध थोपवता आले तर ..?पण ती मजा रहाणार नाही मग मिळवलेल्या सुखाची..
निसटून चाललेल्या या सुखाला परत माघारी बोलवायची तयारी असेल तर एक गोष्ट करावीच..सगळं स्विकारायची मना पासून.. जम्या तो जम्या..
बघायला हरकत काय आहे..? नशिबानं आयुष्य खूप दिलंय ते
उगीच दुःखाशी लपाछपी खेळायची की मोहोर त्याचा ही वेचायचा ..?
आनंदाचा बहर नंतर बरसतो असा की न्हाऊन माखून तृप्त व्हावं..
हो मी आयुष्य स्विकारलंय आहे तसं आनंदातल्या उधाणाला शोषून घ्यायला.
कुणासाठी थांबणं ,कुणी आहे का येणार बरोबर याची फिकीर करणं दिलंय सोडून ..
आहेत हात काही जणांचे ..जे सुटणार नाहीत याची खात्री ..
जे नाहीत त्यांना मागे सोडायची तयारी अंहं नाही केलेली अजून..
बघू जमेल तितकं ..अंतर फार नाही तसं..शेवटच्या टप्प्यावर फुललेला गुलमोहर कसा दिसतो ते एकदा बघायचंय मागे वळून.
©लीना राजीव.

🎭 Series Post

View all