आज बोरिवली मधे मुलाला घेण्यासाठी उतरले. अहोंना कॉल करून विचारलं
कुठे आहात दोघे? मी उतरले बोरिवली स्टेशनला.
तर म्हणाले
तर म्हणाले
अरे ऐक ना..नाश्ता करतोय आम्ही तर एक काम कर तूच ये ना.. काहीतरी नाश्ता करू आधी मग जा तुम्ही दोघे!
मी पण आज्ञाधारक पत्नी आहे हो..
नवऱ्याने शब्द टाकायचा आणि मी साधी भोळी भाबडी बायको..म्हणून तो शब्द लगेच झेलायचा..म्हणून लगेच हो ला हो केलं आणि सांगितलेल्या ठिकाणी पोचले...
अहोंनी आधीच सँडविच आणि लिंबू सोडाची ऑर्डर सोडली (दिली) होती. ॲजयुजवल मी तिकडे जाऊन सगळ्यात आधी स्वतःच्या दोन चार स्वचित्रफिती (सेल्फी)घेतल्या.
तू पावभाजी खाणार ना! नवऱ्याने मला विचारलं
पावभाजीचा कुठल्याही प्रकारचा घमघमाट माझ्या नाकात प्रवेशला नाही त्यामुळे लगेच मी त्यांना प्रतीप्रश्न केला.
इथे पावभाजी मिळते?
अहोंनी हो म्हटलं..
आता बोरिवली त्यांच्या कामाचं ठिकाण म्हणटल्यावर माझ्यापेक्षा जास्त चांगलं त्यांनाच माहीत असणार ना..कुठे काय छान मिळते..आणि आत्तापर्यंत सगळे हॉटेल्स त्यांनी सुचवले आणि आम्ही तिथे जाऊन खाल्लं असं आहे. त्यामुळे त्यांच्या चॉईस वर शंकाच नाही..अर्थात मी सुद्धा त्यांचीच चॉईस आहे हो..
कित्ती कित्ती सुंदर ना..आणि सुगरण सुद्धा..पुरे झालं आता स्वतःच कौतुक..तर मुद्द्याकडे वळते..
नवऱ्याला म्हणाले..मी काही जास्त खाणार नाही. आधीच सँडविच मधले दोन घास मी खाल्ले आहेत. एखादा पाव खाईन. तुम्ही पण खाणार असाल तर वन बाय टू करा..नाहीतर मला नको..
प्रेम हो प्रेम..बाकी काही नाही..आता कुणावर ते विचारू नका..
प्रेम हो प्रेम..बाकी काही नाही..आता कुणावर ते विचारू नका..
तर फायनली पावभाजीची ऑर्डर आमच्या समोर येऊन ठाकली..आता उभी ठाकली म्हणायला प्लेटला काय पाय नाहीत त्यामुळे नुसतीच ठाकली...
असही मी जास्त खाणार नाही हे नवऱ्याला आधीच सांगितलं होतं कारण इत्तुस ते पोट माझं..किती खाणार ना मी.. एकतर मी गरीब बिचारी भोळी भाबडी..आता कोणी स्वतःहून मला असं म्हणत नाही ती वेगळी गोष्ट.. म्हणून मी स्वतःताच स्वतःला म्हणते हो..
तर..पावाचा एक छोटासा तुकडा मोडून अलगद त्यात भाजी उचलून मस्त पैकी त्यावर थोडासा कांदा घेऊन पहिला घास मुखाच्या स्वाधीन केला..आणि जिभेने चव चाखताच..मेंदूला धावत पळत धडपडत धापा टाकत जाऊन सिग्नल देऊन सांगितलं..
अरे यार...सगळी टेस्ट खराब केली पावभाजीची..
अहोंनी नेहमीसारखं विचारलं..
टेस्ट चांगली आहे का?
नेहमी त्यांच्या चॉईस वर मस्तच एक नंबर असे compliment देणारी मी..सरळ सरळ उत्तरले..
एकदम बेक्कार..
पावभाजीच्या नावाने चिकनच्या टेस्टची ग्रेव्ही आणि मसाल्यात गरम केलेले पाव खाते असं वाटते मला..
बहुतेक एवरेस्ट पावभाजी मसाला त्या लोकांना परवडत नसेल म्हणून चिकन मसाला वापरत असावे.. तसं तर माझ्या स्वभावानुसार मी तिथल्या पावभाजी करणाऱ्या मास्टर शेफला सांगून आले हो..
एकदम बेकार टेस्ट होती. चिकनची ग्रेव्ही पावासोबत खातोय असं वाटत होतं. त्यासोबत दोन रोटी आणि दोन चिकनचे पिस टाकले तर चांगलं वाटेल.. शेफ पण म्हणतो कसा..
हा..हम लोग चिकन ग्रेव्ही मे ही पावभाजी बनाते है..
आता ज्यांना पावभाजी मसाला परवडत नसेल त्यांना चिकन काय परवडणार..म्हणून चिकनाच्या गुबगुबीत चार फोड्या न टाकता दोन हड्ड्याचे पिस टाकून त्या सोबत दोन रोटी सर्व्ह केल्या असत्या तरी आनंदाने खाल्ल्या असत्या हो मी....
पण पावभाजीच्या नावाने ही असली कसली तरी ग्रेव्ही मुळीच खपवून घेणार नाही. एकवेळ आवडीच्या पदार्थासोबत तडजोड करू शकते मी..पण त्याच आवडीच्या पदार्थाच्या चवीत तडजोड मात्र कधीच करू शकत नाही..
#surbhisweets&snacks
#borivaliwestnearrailwaystation
#primelocationkasturbapolisstation
©® श्रावणी लोखंडे..
हॅशटॅग मधे ॲड्रेस दिला आहे..कोणीतरी माझी ही पोस्ट सुरभी पावभाजी मास्टर शेफ पर्यंत आणि त्याच्या मालकापर्यंत पोहोचवा रे.. जो ही पोस्ट त्यांच्या पर्यंत पोहोचवेल त्यांना माझ्या हातची अस्सल टेस्टची पावभाजी..
हॅशटॅग मधे ॲड्रेस दिला आहे..कोणीतरी माझी ही पोस्ट सुरभी पावभाजी मास्टर शेफ पर्यंत आणि त्याच्या मालकापर्यंत पोहोचवा रे.. जो ही पोस्ट त्यांच्या पर्यंत पोहोचवेल त्यांना माझ्या हातची अस्सल टेस्टची पावभाजी..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा