©®विवेक चंद्रकांत...
1) पहिल्या रात्री नंतर तिला सकाळी जाग आली तर तशी ती पटकन उठली. लवकर उठून सगळ्यांचा चहा ठेवायचा आणि आदर्श सून म्हणून पहिल्या दिवशी तरी प्रभाव टाकायचा हा तिचा मानस होता.
ती बाहेर आली आणि किचन मध्ये तिला तिच्या सासूबाई चहा करतांना दिसल्या. तिची चाहूल लागताच त्या म्हणाल्या
" उठलीस सुनबाई? पटकन दात घासून ये म्हणजे मी तुझाही चहा ओतते "
तिला एकदम बरे वाटले. अगदी घरच्यासारखे
2) तिला जवळ बसवून सासूबाई म्हणाल्या
"त्याचे वय बत्तीस झाले, तुझे एकोणतीस, लग्नानंतरची मौजमजा झाली. आता काय तो एकमेव चान्स घ्यायचा घेऊन टाक.मला नात किंवा नातू पाहायची घाई म्हणून नाही तर तुमचेही वय वाढायला लागलेत म्हणून.
"त्याचे वय बत्तीस झाले, तुझे एकोणतीस, लग्नानंतरची मौजमजा झाली. आता काय तो एकमेव चान्स घ्यायचा घेऊन टाक.मला नात किंवा नातू पाहायची घाई म्हणून नाही तर तुमचेही वय वाढायला लागलेत म्हणून.
आणखी एक तुम्ही दोघेही सर्विस करतात. मुलाला कमीतकमी पाच वर्षे सांभाळावे लागते. माझे वय साठ तर तुझ्या सासऱ्यांचे ट्रेसष्ट. आता आमचे हातपाय ठीक आहे तर आम्ही तुमच्या मुलाची व्यवस्थित देखभाल करू शकतो. खरे की नाही?"
तिने मान डोलावली आणि त्याचं वेळेस इतकी समंजस सासू मिळाल्याबद्दल देवाचं आभार मानले.
तिने मान डोलावली आणि त्याचं वेळेस इतकी समंजस सासू मिळाल्याबद्दल देवाचं आभार मानले.
3) पंचेचाळीशी नंतर तिला रोजची धावपळ असह्य झाली.
एकदा ती नौकरीवरून घरी आली आणि सासूला म्हणाली.
एकदा ती नौकरीवरून घरी आली आणि सासूला म्हणाली.
"आई आता बस झाले. नौकरीचा कंटाळा आला. प्रमोशन मिळाल्याने काम वाढले आहे. घरचे बाहेरचे करून जीव वैतागला. आता मुलेही मोठी झाली. शिक्षणाला लागली. आता पैशाचीही काही कमी नाही. मग काय करू?"
तिच्या पाठीवरून हात फिरवत त्या म्हणाल्या
" बरोबर आहे. कधीकधी नको वाटते सारे, पण अख्खा दिवस घरी बसून तू काय करशील याचा विचार केलाय कधी? थोड्याच दिवसात कंटाळा येईल.त्यापेक्षा महिना, दोन महिना रजा घे अगदी without pay घेतली तरी चालेल.
महत्वाचं म्हणजे स्वतः कमवत असल्याने आपल्यात आत्मविश्वास असतो. घरी राहिली आणि काही दिवसांनी काही काम असले तर अगदी स्वतःच्या नवऱ्याकडेही पैसे मागायला संकोच वाटतो कारण ती सवय नसते.
विचार कर. मी केली ती चूक तू करू नकोस.... "
ती खरंच विचारमग्न झाली.
©®विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार. (लेखकाच्या नावासहितच share करा ही विनंती.)
©®विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार. (लेखकाच्या नावासहितच share करा ही विनंती.)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा