Feb 27, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

काही अविस्मरणीय आठवणी भाग 2

Read Later
काही अविस्मरणीय आठवणी भाग 2

कथा मालिका

शीर्षक-काही अविस्मरणीय आठवणी भाग २

विषय-सामाजिक कथा

फेरी-ईरा राज्यस्तरीय कथा मालिका स्पर्धा


आसावरीला काहीतरी पाऊल उचलणे आवश्यक होते . आसावरीने कोणते पाऊल उचलले हे आता आपण या भागात पाहूया...


आसावरी या विचारात असतानाच ती मुलगी वर्गात आली. तिला झालेल्या प्रकाराची कल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे तिने

 आसावरी कडे पाहून स्मित केले. नंतर तिची नजर फळ्याकडे गेली होती व ती कावरी बावरी झाली नंतर तिने भिंतीकडे पाहिले स्वतःच्या डेस्क कडे पाहिले आणि ती रडवेली झाली लज्जेने दुःखाने अगतिकतेने ती खचून गेली होती आसावरीने सर्व गोष्टींचा विचार केला की मुलांना सुद्धा वाईट वाटत होते त्या मुलापर्यंत मेसेज जाणे जरुरीचे होते तसेच त्या निरागस मुलीला या धक्क्यातून बाहेर काढणे तिच्या पाठीशी उभे राहणे हेही तेवढेच महत्त्वाचे होते"बेटा अजिबात घाबरायचं नाही रडायचं तर नाहीच नाही ज्याने कुणी हे गैरकृत्य केलं असेल तो आपल्या आईला बदनाम करीत आहे कारण आईने मुलावर चांगले संस्कार केले नाहीत असे यातून दिसून येते पण आई कधीच वाईट नसते हेही तितकेच खरे आहे आम्ही सर्व तुझ्या बरोबर आहोत एकजुटीने याचा सामना करू"वर्गातील वातावरण एकदम बदलले जो ताण निर्माण झाला होता तो नाहीसा झाला आपल्यावर जबाबदारी आहे याची जाणीव सर्व विद्यार्थ्यांना झाली ती मुलगी पण सावरली व तासिका सुरळीतपणे सुरू झाली ही सर्व आपली मुले आहेत याची तिला पुन्हा जाणीव झाली हे विद्यार्थी आपली मुले आहेत ही आसावरीने खूणगाठ बांधली होती घडलेही तसेच आठवड्यातून एक दिवस महाविद्यालयाच्या तासिका साडेअकराला सुरू होत होत्या ती जाण्याच्या तयारीत होती तिचा बारावीच्या वर्गात शिकणारा मुलगा घरी आला अतिशय अस्वस्थ व चिडलेला होता क्रिकेटच्या मैदानावर त्याची एका मुलासोबत शाब्दिक चकमक झाली होती त्या मुलाने याला दमदाटी केली होती व दम दिला होता मुलांची भांडणं नेहमीच असायची तिच्या मुलाने आसावरीला त्या मुलाचे नाव ही सांगितले होते असावरीच्या तासिकेला समोरच्याच बाकावर बसणारा तो मुलगा होता हे तिने ओळखले होते डोक्यात अनेक विचारांचे थैमान सुरू झालेले असताना आसावरीने वर्गात प्रवेश केला तो मुलगा नेहमीप्रमाणे एकाग्रचिताने वर्गात आसावरी जे शिकवित होती ते आत्मसात करीत होता आसावरी वर्गात शिरताच विसरून गेली की हा तोच मुलगा ज्यामुळे तिच्या मुलाला मानसिक त्रास झाला होता कारण तिचा मुलगा लहान असल्यामुळे त्याला सर्वकाही सहन करावे लागले होते तासिका संपली सर्व काही पूर्वीप्रमाणे सुरू होते काहीतरी धमाका आता होणार याकडे सर्व वर्गाचे लक्ष होते तसे काहीच घडले नाही दुसऱ्या दिवशी त्या मुलाला सर्व काही समजले हे सुद्धा कळले की मॅडमला सर्व काही माहीत होते आसावरी ची तासिका सुरू झाली तो मुलगा वर्गात उभा राहिला व म्हणाला"ताई तुम्हाला माहित होते की मी तोच मुलगा आहे जाने तुमच्या मुलाला दमदाटी केलेली आहे तुम्हाला राग नाही आला का किंवा मला विचारले सुद्धा नाही की असे का केले"त्याच्या प्रश्नामध्ये आश्चर्य व पश्चाताप दिसत होता आसावरी शांतपणे उद्गारली"जसा तो माझा मुलगा आहे तसेच वर्गातील सर्व मुलांना मी माझी मुलं मानते तुमच्या प्रती सुद्धा माझी जबाबदारी आहे"अर्थात पुढे त्या मुलाच्या वागण्यात बदल झाला होता आजही तो प्रसंग आसावरी विसरू शकत नव्हती आसावरीला नवरात्र सुरू झाले की महाविद्यालयासमोरील एक प्रसंग प्रकर्षाने आठवायचा जगात चांगुलपणा आहे त्यावरच हे जग सुरळीत चालले आहे प्रसंग असा होता की नवरात्र सुरू झाले होते प्रत्येक वार्डात दुर्गादेवीचा उत्सव सुरू होत असे आसावरीचे महाविद्यालय गावातील मुख्य रस्त्याच्या एका बाजूला तर दुर्गा देवीचा मंडप दुसऱ्या बाजूला समोरासमोर होते सकाळी साडेसातला पहिली तासिका आसावरी ची बारावीच्या वर्गावर असे मुलांची अभ्यास ग्रहण करण्याची क्षमता सकाळी अर्थातच जास्त असते किचकट विषय त्यांना शिकविणे सोपे असते पण झाले असे की दुर्गादेवीच्या मंडपात सात वाजल्यापासूनच गाण्यांच्या रेकॉर्ड्स मोठ्या आवाजात लाऊड स्पीकरवर सुरू होत असे पण तक्रार करायला कोणीही धजावत नसे प्रस्थापित राजकारणी लोकांच्या गटाने दुर्गा देवीची प्रस्थापना केली होती शिक्षणाशी काही च देणे घेणे नाही या थाटात या रेकॉर्ड्स सुरू होत्या एक प्रकारे हुकूमशाही होती प्रस्थापित लोकांशी कोण पंगा घेणार तासिका सुरू झाली कर्कर्ष आवाजात रेकॉर्ड सुरू झाल्या होत्या मुलांनी एकच आवाज केला की"मॅडम आम्हाला तुमचा आवाज मुळीच ऐकू येत नाही;"आसावरीने विद्यार्थ्यांना चपराशाला सांगितले की त्यांना रेकॉर्ड्स बंद करायला सांगा चपराशाने उत्तर दिले की"मॅडम काहीच उपयोग होणार नाही ते ऐकणारे लोक नाहीत उलट आवाज मोठा करतील "आसावरीला हे आव्हान होते ते तिने स्वीकारले मुले मॅडम कडे कुतूहलाने बघत होती आता आपल्याला सुट्टी मिळणार मॅडम वर्गातून निघून जातील कारण त्यांचा आवाजच आपल्यापर्यंत ऐकू येत नाही आहे आता मज्जा मात्र अभ्यासू मुले काळजीयुक्त स्वरात म्हणत होती"मॅडम आता कसे करायचे"

आसावरी निर्धाराने उठली काय होईल ते होवो यांचा सामना करायचाच व शांतपणे पायऱ्या चढवून त्या लोकांजवळ गेली कारण देवीचा मंच उंचावर उभारलेला होता त्या लोकांना हे सर्व अनपेक्षित होते फक्त या मॅडम महाविद्यालयातून आलेल्या आहेत रोज येथूनच जातात एवढे माहीत होते मुळात वाईट कोणीच नसतं चांगले गुणही असतातच यावर आसावरीचा विश्वास होता"ती म्हणाली"थोडा रेकॉर्डचा आवाज कमी करता का? मुलांपर्यंत माझा आवाज त्यामुळे जाऊ शकत नाही"एवढे बोलून हसत मुखाने पायऱ्या उतरून उत्तराची अपेक्षा न करता माघारी आली रस्त्याचे अंतर पार करताना तिला वाटले की आता आवाज मोठा होणार कारण पूर्वी तसेच तिला सांगण्यात आले होते पण आश्चर्य रेकॉर्ड्स बंद झाल्या होत्या वर्गात तिने प्रवेश केला मुले तिची व काय होणार याची वाट पाहत होती तासिका सुरळीतपणे पार पडली यानंतर कधीच आवाजाचा त्रास झाला नाही या गोष्टीची आठवण झाली की व्यक्तीमधील चांगले पणावर तिचा पुन्हा विश्वास बसायचा

एक आठवण अजूनही आली की आसावरीला भीतीने शहारे यायचे गावांमध्ये दोन गट एकमेकांशी संघर्ष करणारे होते महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन सुरू झाले होते मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रमांची छान तयारी केली होती खूप चांगले कार्यक्रम सादर होणार होते पण विरुद्ध गटाने राडा करायचा असे ठरविलेले होते त्यामुळे काही पालकांनी आपल्या मुलींना ज्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता त्यांना परवानगी दिली नाही मोठा पेज प्रसंग निर्माण झाला पण सर्वांनी सहकार्याने यातून यशस्वीपणे मार्ग काढला सायंकाळी स्नेहसंमेलन सुरू झाले मोठे सभागृह मुलींच्या प्रसाधनाकरिता देण्यात आले होते महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापिका व मुली यांची तयारी करण्याकरिता लगबग सुरू होती व अचानक लाईट गेले सर्वत्र अंधार झाला व गोंधळ शिट्या सुरू झाल्या आता काय होणार या विचारानेच धडकी भरली पण बाहेरून प्राध्यापक वर्गाचा आवाज आला"मॅडम घाबरू नका प्रत्येक दाराच्या बाहेर आम्ही पहारा देत आहोत "तुमचे काम सुरू ठेवा"हा फार मोठा आधार होता तो किती महत्त्वाचा असतो हे आठवले की आसावरीला आजही तो प्रसंग जाणवायचा थोड्याच वेळात लाईट आले स्नेहसंमेलन योग्य प्रकारे पार पडले अशा अनेक आठवणी आजही आसावरी च्या डोळ्यासमोर जणू काही कालच घडल्या आहेत अशा प्रकारे आठवत होत्या

एक आठवण अशी ही होती की तिला नेहमी चिंताग्रस्त करीत असे बारावीची वार्षिक चाचणी परीक्षा सुरू झाली की महाविद्यालयात दुसऱ्या गावावरून येणारे विद्यार्थी बस जर वेळेवर आली नाही तर पेपर सोडवण्यापासून वंचित राहत असत त्यावेळी अभ्यास तर झाला आहे पण वेळेअभावी आपण पेपर सोडवू शकत नाही याची घालमेल व दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असे तेव्हा काहींना शिक्षणापासून कसे वंचित राहावे लागते त्यांच्यामध्ये क्षमता असूनही कित्येक मुले प्रवाहात सामील होऊ शकत नाहीत या विचाराने आसावरी अस्वस्थ होत असे निवृत्त झाल्यानंतरही तिला करमत नसे आजही या सर्व आठवणी तिच्या डोळ्यासमोर फेर धरीत होत्या .


समाप्त धन्यवाद


लेखिका-मृणाल मधुकर देशमुख

टीम -अमरावती


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//