काही अविस्मरणीय आठवणी भाग १

काही अविस्मरणीय आठवणी भाग १

कथा मालिका

शीर्षक-काही अविस्मरणीय आठवणी भाग १

विषय-सामाजिक कथा

फेरी-ईरा राज्यस्तरीय कथा मालिका स्पर्धा

,

आसावरी बारावीच्या चाचणी परीक्षेच्या उत्तर पत्रिका ‌‌तपासून घाई घाईने हाता वेगळ्या 

करीत होती. सुपरवायझर सरांनी उत्तर पत्रिका जमा करण्याची तारीख जाहीर केल्यापासून तशी नोटीस काढल्यामुळे तिच्या कामाला वेग आला होता. तिची दोन्ही मुलं मस्ती करीत होती तरीही त्यांना रागवायला सुद्धा तिला वेळ नव्हता पावसाचे दिवस असल्यामुळे पाऊस सुरूच होता

विद्यार्थ्यांचे त्यांच्या उत्तर पत्रिका नेण्याकरिता विद्यार्थ्यांचे येणे सुरू झाले होते. कोणाचे कुठे चुकले वगैरे सूचना आसावरी प्रत्येकाला देत होती त्यांचे समाधान झाले की मुले परत जात होती घराच्या व्हरांड्यातच ती गठ्ठे घेऊन तपासात होती.


काम जवळजवळ होत आले होते . त्यामुळे तिच्यावरील ताण नाहीसा होत होता. सगळं कसं शांत झालेलं वाटत असताना तिच्या लक्षात आले की एक मुलगा एका बाजूला थांबलेला आहे सर्व मुलं गेली होती त्याच्याकडे पाहताना आसावरीचा चेहरा प्रश्नार्थक झाला.\"का रे बेटा तुला तुझी उत्तर पत्रिका मिळाली ना? काही अडचण आहे का?

मी सोडवते. तिचा आश्वासक स्वर ऐकून तो थोडा गोंधळला. ग्रामीण परिसरातून येणारे विद्यार्थी असल्यामुळे सहजासहजी धीटपणे संवाद करू शकत नव्हते काहीसा न्यूनगंड होता त्यामुळे तो कधीच मॅडम सोबत बोलला नव्हता.


चेहरा परिचित असतो. वर्गातील सव्वाशे विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येकाचे आडनाव लक्षात ठेवणे कठीण होऊन जात ंं काही विद्यार्थी त्यांच्या स्वभावामुळे, गुणवैशिष्ट्यांमुळे लक्षात राहतात ते कायमचेच. तसा हा नव्हता हे मात्र नक्की. तो शांतपणे आसावरी कडे पाहत म्हणाला"मला इतिहास अतिशय कठीण  विषय वाटायचा. पहिल्या त्रैमासिक परीक्षेत मला फक्त आठ गुण मिळाले होते (१००पैकी) आणि आता वार्षिक चाचणी परीक्षेत 78 गुण मिळाले"


आता मात्र आसावरीला धक्का तर बसलाच आनंद त्याहून अधिक झाला त्याला जो आत्मविश्वास मिळाला होता ते पाहून ती आतापर्यंतचा ताण विसरली. तो प्रसंग ती कधीच विसरू शकत नव्हती


दुसरी एक आठवण तिला अतिशय क्लेशदायक, चिंता वाढविणारी वाटायची. ती नेहमीच तिला सलत असे. तालुक्याच्या ठिकाणी तिचे एकमेव महाविद्यालय होते. खेड्यापाड्यातून मुले मुली शिकायला येत असत. ११वी१२वी च्या विद्यार्थ्यांचा गट असा असतो की किशोर अवस्थेत प्रवेश केला असल्यामुळे संक्रमण काळ असतो अशावेळी जीवनातील ध्येय निश्चित नसते. उनाडपणा, बेफिकीर वृत्ती असते. नवीन शिक्षकांचा त्यांना परिचय नीट झालेला नसतो. आसावरी ची धडपड व तळमळ याची मात्र त्यांना जाणीव होऊ लागली होती. मुलींना तिचा आश्वासक स्वर एक आधार वाटायला लागला. खेड्यातून आल्यामुळे बुजरेपणा असलेल्या मुली आता धीटपणे बोलायला लागल्या होत्या. अशा वातावरणात एक दिवस महाविद्यालयातून तासिका संपल्यानंतर आसावरी घरी येऊन आपली नेहमीची कामे पूर्ण करून केव्हा एकदाची विश्रांती घेते या विचारात असतानाच अकरावीच्या दोन मुली तिच्या घराच्या खिडकीच्या बाहेरून तिला आवाज देत होत्या. घाबरलेल्या रडलेल्या अवस्थेत त्या म्हणाल्या"मॅडम आपल्या महाविद्यालयातील त्यांच्या गावातील मुले आम्हाला बस स्टैंड वर गावाला जाताना रोज त्रास देतात"त्यांना वाटले वर्गात आपल्या सर्व समस्या सोडविणाऱ्या मॅडम आपला त्रास दूर करतील पण महाविद्यालयाच्या गेट बाहेर गेल्यानंतर विद्यार्थ्यांवर तेवढे नियंत्रण राहत नाही हा भाग वेगळा असला तरी बाहेरच्या जगात गेल्यानंतर मले मोकाट होतात. त्यांना शेवटी त्यांच्या घरून कसे संस्कार मिळतात तेच बघावे लागते.


सुपरवायझर सरांशी याविषयी बोलणे झाले. तर म्हणाले"मॅडम बस स्टैंड वर बाहेरची मुले उनाड मुलांना साथ देतात. त्यामुळे आपल्याला मर्यादा पडतात. तशी आपण रीतसर तक्रार करू शकतो पण त्याहीपेक्षा शेवटी त्यांना आपण शिक्षा करण्यापेक्षा त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे ठरते शेवटी आपली जबाबदारी वाढलीच हे जाणून आज मात्र मुलींनाच या त्रासाचा सामना करावा लागेल या विचाराने आसावरीला अतिशय क्लेशदायक वाटले मुली जेव्हा परत जात होत्या तेव्हा आपण आज त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही याची आसावरीला जाणीव झाली आजही ती आठवण तिला सतावते कालांतराने हा प्रश्न मिटला पण त्या दिवशी आपण घरी आल्यामुळे काहीच करू शकलो नाही मुलींचा आपल्यावर किती विश्वास पण त्या दिवशी आसावरी हाताबल होती ही खंत तिला सतत ज जाणवत होती 

महाविद्यालयातील एक आठवण तिला सतत डोळ्यासमोर येत असे ती म्हणजे अकरावीची मुले ना धड लहान मोठी अल्लड काही उनाड काही वेगळ्याच धुंदीत जगणारी काहींना नवीन शिकण्याची जिद्द उत्सुकता तर काहींचं लक्ष मुलींची छेड कशी आणि किती काढता येईल याच करिता कॉलेजमध्ये प्रवेश घेणारी होती नीतिमत्ता शुद्ध चारित्र्य या मूल्यांपासून दूर गेलेली भरकट जाणारी मुले एकतर्फी प्रेम करून मुलींना त्रास देण्यात त्यांना असुरी आनंद मिळत होता अकरावी आर्ट्सच्या वर्गात एक सुंदर पण लाजाळू मुलगी आली आसावरी शिकवीत असताना ती लक्षपूर्वक नोट्स घ्यायची तिला एक महाविद्यालयातीलच मुलगा सतत त्रास देत असे सुरुवातीला दुर्लक्ष केले महाविद्यालयात शिकणे बंद होईल या भीतीने ती सहन करीत होती म्हणून पालकांना सांगितले नाही पण आसावरी च्या नजरेतून हे

सुटले नाही की ती मुलगी सतत धास्तावलेली दडपणाखाली असते इतर मैत्रिणींचा आधार घेते नेहमीप्रमाणे त्या दिवशी पहिली तासिका आसावरी ची होती साडेसातला आसावरीने अकरावीच्या वर्गात प्रवेश केला तेव्हा तिला वेगळेच दृश्य दिसले मुले आपसात कुजबुजत होती फळ्याकडे लक्ष गेले तेव्हा आसावरीला दिसले की संपूर्ण फळाभर त्या मुली विषयी घाणेरडा मजकूर लिहिलेला आहे फळ्यावरून भिंतीकडे नजर गेली तर तिन्ही भिंतीवर दारावर तिच्या डेस्क वर तिच्याविषयी वाईट लिहिलेल आहे की ज्यामुळे कोणालाही चिड येईल कोणत्याही प्रकारे त्या मुलीला घाबरून टाकणे हा त्या मुलाचा उद्देश होता सर्व तासिका संपल्यानंतर त्याने आदल्या दिवशी हे काम केले असावे या प्रकारामुळे सर्व वर्ग स्तब्ध झाला होता काहीतरी पाऊल उचलणे आवश्यक होते या विचारात आसावरी असतानाच ती मुलगी वर्गात आली तिला झालेल्या प्रकाराची कल्पना नव्हती नेहमीप्रमाणे तिने आसावरी कडे पाहून स्मित केले

पुढील मजकूर क्रमशः भाग दोन मध्ये पहावा धन्यवाद 

लेखिका -मृणाल देशमुख

टीम अमरावती





 असल्यामुळे