कधी तरी स्वतःसाठी

हो पण तो पैसा तू कुठे घालवतेल्य? स्वतःसाठी न तुला वेळ आहे ना इच्छा

\"कधी तरी स्वतःसाठी\"

स्कुटी बाहेर काढत दीप्तीने हाक मारली "अंशू अग चल पटकन उशीर होतोय ".

हो sमम्मा जोडे घालून पाठीवर सॅक मध्ये पाण्याची बाटली व टिफिन व हातात बॅडमिंटन रॅकेट घेऊन अंशू पटकन स्कुटीवर मागे बसली.

दोघी निघाल्या तेव्हा सकाळचे साडेसहा वाजले होते .अंशुल ला समर हॉबी क्लासला सोडून दीप्ती घरी यायला निघाली.
वाटेतच तिला सीमा भेटली," हाय दीप्ती काय चाललंय ?
\"तू इथे?
\" अग मी योगा शिकायला येते.\"
तुझं काय चाललंय दिप्ती?\"
\" काय चालणार ग ?तेच रुटीन.\"

\" अग हो-- पण आता समर वेकेशन मुलांना सुट्टी आहेत ना?\"

\" हो ग पण हे क्लासेस आहेत ना तिथे सोडायला, घ्यायला .\"

तुला पण योगा शिकायचं होतं ना?

हो पाहते पुढे कधीतरी, म्हणत दिप्ती ने स्कूटर स्टार्ट केली.
घरी पोहोचतात घरातली कामे तिची जणू वाट पाहत होती ती पटापट आटोपून ती अंशुलला घ्यायला गेली, तिथून आल्यावर उरलेले काम .
संध्याकाळी अंशुल चा दुसरा क्लास ही होताच .त्यात लग्नसराईमुळे बुटीकच काम ही वाढलेलं, या सर्वात स्वतःसाठी वेळच कुठे आणि कसा काढणार ?
बुटीक मध्ये दोन ड्रेस अर्जंट रेडी करायचे होते उद्या मिसेज मिरचंदानी घ्यायला येणार.
यावर्षी लग्नसराई जोरात आहे रात्री उशिरा पार्टी हून आल्यावर सकाळी उठणे हि खरं तर जीवावर येते.
विचार करत करत दिप्ती ने चहा केला व मुलगा समर ला आवाज दिला.
त्याची पण नीट च्या परीक्षेची तयारी, त्याला पण वेळेवर खाणं पिणं हवं. पण हे तर आपण आपल्या मुलांच्या प्रोग्रेस साठी करायलाच हव सर्वच पालक करतात.
.तिच्या आईने पण हेच केलं.

संध्याकाळी दीप्तीच्या आईचा फोन "आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या मग केव्हा येतेस?\"
कसल्या सुट्ट्या घेऊन बसलीए.आता हे क्लासेस आहेत ना समर व्हेकेशनचे त्यातून समर् चा नीट चा क्लास आहे मला जमेल असं वाटत नाही तूच ये ना." दादाला सांग रिजर्वेशनकरायला.
बर-\"

आई आल्याने दिप्ती ला व मुलांना खूप हायस झाल,लाड करणारी आजी आली ,घरात एक छान वातावरण निर्माण झाले.

एक-दोन दिवस दीप्तीच हे रुटीन पाहून आई म्हणाली "दीप्ती जरा स्वतःकडेही लक्ष दे, किती थकलेली दिसते जरा स्वतः करता वेळ काढ किती धावपळ?"
हो ग आई," पण हेच दिवस तर मुलांच्या प्रोग्रेसचे आहेत त्यांचा करिअर करण्याचे.

एक सांगू बेटा तुला ,तू जेव्हा अंशुल एवढी होती ना मी तुला गायन शाळेत घातलं होतं आठवते तुला सुट्ट्यांमध्ये ?
तेव्हा आज सारखी फीस नसायची पण अगदी कमीही नव्हती."
हो- आठवतंय ना, मला खूप नसे आवडत" ".
हो ना? काय फायदा झाला मग तुला आवड नव्हतीच त्यामुळे एक दोन वर्षात तू सोडून दिले."
काय करणार माझा आवाज नव्हता धड मला त्यापेक्षा खेळात जास्त मजा यायची.
तेच, तेच म्हणतेमी, खरंतर मला गाण्याची आवड होती पण आमच्या लहानपणी घरी चालत नसेल बाबांना मग मी आपली आवड तुझ्यावर लादली.
पण आता वाटते त्यावेळी मीच गेले असते गाण शिकायला तर मला अजून छान गाता आलं असतं.
काय होतं ना दीप्ती आपण आपल्या इच्छा ज्या पुऱ्या होत नाही त्या मुलांकडून पूर्ण करायची अपेक्षा करतो तिथेच चुकते त्यांना काय आवडते हे ना त्यांना त्या वयात कळते ना आपल्याला.
लोकांचे पाहून आपण त्या रेसमध्ये शामिल होतो.
हो पण आई आजचा जमाना वेगळा आहे ग स्पर्धा खूप वाढली आहे जर आत्तापासून नाही शिकले तर ते मागे पडतील.
तू कुठे मागासलीस?
तुला मी घरी शिवण भरत काम शिकवलं होतं तुला आवड होती आज तुझे स्वतःचे बुटीक आहे ना?
हो ना त्यामुळे बराच फायदा होतो खर्च चालवण्यात.
हो पण तो पैसा तू कुठे घालवते ?
आपल्यासाठी ना तुला वेळ आहे ना इच्छा. ,जरा आपल्या तब्येतीवर लक्ष दे.

.आईचे बोलणे ऐकून दीप्तीला सीमाने मेडिटेशनला चलण्यासाठी विचारलेल आठवलं,
हो आई मला कधीच मेडिटेशन शिकायला जायचं आहे त्याने माझे कॉन्सन्ट्रेशन ही वाढेल व अचानक येणाऱ्या विपरीत परिस्थितीत मी स्वतः सांभाळू शकेन..

\"हेच मी तुला सांगू इच्छिते,\"
हो अंशुल चे या आठवड्यात क्लास संपतीलच मग मी जाईन.
आणि हो ते रॅकेट पडून राहू देऊ नको तिच्याबरोबर तुम्ही प्रॅक्टिस कर.
हो आई तुझं बोलणं पटतंय मला. पुढच्या आठवड्यात मी क्लासला जाईन
आणि मी, आई म्हणाली घरी गेल्यावर मी पण गाण्याच्या क्लासला जाईन
आईने असे म्हणताच दोघी हसायला लागल्या.