कढीवडा

Receipes In Marathi


पावसाळा म्हटलं की ,सगळ्यांच्या जिभेवर कसे गरमागरम वाफाळलेला चहा कॉफी गरमागरम भजी वडा वेगवेगळे प्रकार दिसू लागतात .लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पावसाळ्याच्या दिवसात अगदी आवर्जून खावासा वाटणारा म्हणजे बटाटा वडा .पाव वडा, कटवडा असे अनेक प्रकार आहेत.पण मी आज तुम्हाला कढी

वडा ची रेसिपी सांगणार आहे.


कढी वडा

साहित्य:-
बटाटे ५-६,
एक वाटी डाळीचे पीठ, अर्धी वाटी तांदळाचे पीठ ,एक छोटा चमचा तिखट, एक छोटा चमचा मीठ, पाव चमचा हळद ,चिमूटभर खाण्याचा सोडा, आणि दोन टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन.
जाडसर वाटून घेतलेले धणे,
लसूण,
एक इंच आले,
हिरव्या मिरच्या ५-६,
कोथिंबीर,
साखर ,मीठ,
तळण्यासाठी तेल,

कढी बनवण्याकरिता साहित्य
दही अर्धा लिटर
डाळीचे पीठ ,हळद ,मीठ, साखर, हिंगपूड, धनेपूड, जिरेपूड,
लसूण ,
कढीपत्ता ,
कोथिंबीर.

कढीकृती:-

कढी बनवताना प्रथम दही आणि डाळीचे पीठ चांगले फेटून घ्यावे. आणि त्याच्यामध्ये मीठ, साखर, हिंग पूड धने ,जिरेपूड घालून चांगले एकसारखे हलवावे .नंतर मग गॅसवर पातेले ठेवून त्याच्यामध्ये तेल घालून फोडणी घालावी कढीपत्ता हिंगपूड लसुण मग त्याच्यामध्ये आपण फेटून घेतलेले डाळीचे पीठ आणि दही घालावे. आणि एक सतत ढवळत राहावे. उकळी आल्यावर गॅस बंद करावा. आणि वरून कोथिंबीर घालावी. गरमागरम कढी तयार आहे.

बटाटे वडा कृती
बटाटे उकडून साल काढून बारीक चिरून घ्यावे .मग आले लसूण मिरच्या बारीक वाटून बटाट्याच्या फोडींवर घालाव्यात. मीठ व साखर चवीनुसार घालावे .एका कढईमध्ये दोन चमचे तेल मोहरी, कढीपत्ता हिंग जाडसर वाटून घेतलेले धणे, हळद घालून फोडणी करून त्याच्यामध्ये बटाटे घालावे .कांदा जरा आवडत असल्यास दोन मोठे कांदे बारीक चिरून याच फोडणी थोडा परतून बटाट्यावर घालावा .सारण हलक्या हाताने एकसारखे कालवून घ्यावे .तळहातावर थोडेसे चपटे सर आकार करून त्याचे गोल गोल गोळे करावे.

डाळीचे पीठ ,तांदळाचे पीठ ,मीठ, तिखट हळद घालून सरबरीत पीठ भिजवावे.त्यात चिमुटभर सोडा व कडकडीत तेलाचे मोहन घालून नीट कालवून घ्यावे.

पसरट कढईत तेल गरम करायला ठेवावे तेल गरम झाल्यावर एक एक वडा पिठात बुडवून तळून घ्यावे. खरपूस तळून घ्यावे. अशे हे वडे कढी बरोबर अगदी छान लागतात तुम्ही एखादा नक्की बनवा...


टीप:

वरचे डाळीच्या पिठाचे कव्हर फार जाड चांगले लागत नाही. अशावेळी पाणी घालून एकसारखे करावे .पातळ झाले असेल तर वडा तळत असताना पीठ सुटून बरीच बारीक भजी पडतात. अशावेळी एक चमचा डाळीचे पीठ टाकून परत पीठ एकसारखे करून घ्यावे.

धन्यवाद