मिटेल दुरावा लवकरच.!

जातींभेदात अडकलेल्या प्रेमविरांची मनस्थिती

राज्यस्तरिय कविता स्पर्धा फेरी -२

विषय -दोन ध्रवावरचे दोघे आपण

कवितेचे शिर्षक-मिटेल दुरावा लवकरच...!



विरहात बेचैन सखी मी,
नयनात तुझेच प्रतिबिंब आहे,
छळणार्या त्या वेदनेला,
मी काठावरच रोखले आहे...

जातिवंत दरी ती अभेद,
लचके तोडणारा समाज,
चितांरोग तो काळजास,
कशी मिलनाची पुरी होईल आस.....

क्षतिजापल्याड ती प्रीत आगळी,
नभ धरतीचा खेळ खट्याळ,
दोन ध्रुवावर दोघें आपण,
कधी?बहरेल प्रेमाची बाग.....

पुनवेचा तो चंद्रमाही,
आपल्या प्रीतीचा साक्षीदार,
विरोधकांच्या नयनातून बरसती,
ज्वाला तिरस्काराची भयान....

प्रेरणा तुच माझ्या धीराची,
सहनशिलतेची तु विशाल ढाल,
पडेल अंजन डोळ्यात त्यांच्या,
निर्मळ प्रेमाचा होईल साक्षात्कार....

मिटेल दुरावा एक दिवस,
छेडल्या जातील तारा नभात,

गडगडणार्या विजेसोबत,

बरसतील सुखाच्या सरी हदयात...

®वैशाली देवरे

जिहा- नाशिक