कादंबरी भाग ९
मागील भागाचा सारांश: कादंबरी व भूमी दुबईत पोहोचल्या होत्या. भूमीला वर्कशॉप असल्याने तिने कादंबरीला एकटीला डेझर्ट सफारीला जाण्यास सांगितले. डेझर्ट सफारीला गेल्यावर कादंबरीला एका मुलाने ओळखले, पण ती त्याला ओळखत नव्हती.
आता बघूया पुढे…..
"माझं नाव तुम्हाला कसं माहीत? मी तुम्हाला याआधी कधीच भेटलेले नाहीये." कादंबरीने कपाळावर आठ्या आणत विचारले.
"माझं नाव राघव आहे. आपण याआधी बऱ्याच वेळेस भेटलो आहे. आपली शेवटची भेट तुमच्या लग्नात झाली होती. मी सुरुवातीला तुम्हाला ओळखलं नव्हतं. माझ्या आईचं नाव कुसुम आहे. आता तुम्ही नक्कीच मला ओळखलं असेल." राघवने आपली ओळख करुन दिली.
"राघव तू! अरे आधीच सांगायचं ना. तुही किती बदलला आहेस. पहिले इतका स्मार्ट दिसत नव्हता. आता तर एकदम राजबिंडा दिसतो आहेस. मला अहो काहो का करत बसला आहेस?" कादंबरी चेहऱ्यावर हसू आणून म्हणाली.
"तू चक्क माझी तारीफ केलीस. वाह! आज तो दिन बन गया. तुला डायरेक्ट एकेरी नावाने हाक मारणं बरोबर वाटत नव्हतं. तू किती बदलली आहेस. तुही पहिल्यापेक्षा जास्त स्मार्ट दिसत आहेस." राघवने सांगितले.
"धन्यवाद. बरं राघव, आपण इकडे डेझर्ट सफारीचा आनंद घ्यायला आलो आहोत. गप्पा केव्हाही मारता येतील." कादंबरी एक भुवई उंचावून म्हणाली.
राघवने बाहेरील एका माणसाकडून तेथील सगळी माहिती घेतली. राघव कादंबरी जवळ येऊन म्हणाला,
"आपण जे पॅकेज घेतलं आहे, त्यात उंटावर बसून इथल्या इथे चक्कर मारतात. घोड्यावर आणि गाडीवर वाळवंटात फिरण्याचा आनंद घ्यायचा असेल, तर वेगळे पैसे द्यावे लागतील. आत गेल्यावर चहा, नाश्ता, जेवण मोफत मिळणार आहे. थोड्या वेळाने बेली डान्स आणि फायर शो होणार आहे."
"तिकडे त्या अरबी माणसाच्या हातात जो पक्षी आहे, तो कोणता आहे?" कादंबरीने बोट दाखवून राघवला विचारले.
"आपण जे पॅकेज घेतलं आहे, त्यात उंटावर बसून इथल्या इथे चक्कर मारतात. घोड्यावर आणि गाडीवर वाळवंटात फिरण्याचा आनंद घ्यायचा असेल, तर वेगळे पैसे द्यावे लागतील. आत गेल्यावर चहा, नाश्ता, जेवण मोफत मिळणार आहे. थोड्या वेळाने बेली डान्स आणि फायर शो होणार आहे."
"तिकडे त्या अरबी माणसाच्या हातात जो पक्षी आहे, तो कोणता आहे?" कादंबरीने बोट दाखवून राघवला विचारले.
"त्या पक्षाचं नाव फाल्कन आहे. तो युनायटेड अरब एमिरेट्सचा राष्ट्रीय पक्षी आहे." राघवने उत्तर दिले.
"अच्छा. एकदा आतमध्ये जाऊन बघूयात, मग बाहेर येऊन उंटाची सफारी करुयात." कादंबरीने बोलत कॅम्पमध्ये प्रवेश केला.
आतमध्ये मध्यभागी एक स्टेज तयार केलेले होते. स्टेजच्या गोलाकार बसण्यासाठी खाली सतरंज्या टाकलेल्या होत्या. ठिकठिकाणी छोटे टीपॉय आणि त्याच्या चौफेर टेकून बसण्यासाठी उश्या होत्या. एका बाजूला चहा, कॉफीचा स्टॉल होता, त्याच्या शेजारी सॅण्ड आर्ट करुन देणारा माणूस बसलेला होता. दुसऱ्या बाजूला जेवणासाठीचे कक्ष होते, पण ते अजून बंद होते.
"आपण बाहेर जाऊन एकदा उंटाची सफारी करुयात, मग इथे बसून गप्पा मारुयात." राघवने सुचवले.
कादंबरीने मान हलवून होकार दर्शवला. दोघेजण एकेक करुन उंटावर बसले. वाळवंटात जाऊन दोघांनी फोटो काढले. आजूबाजूच्या परिसराचे त्यांनी निरीक्षण केले. वाळूत चालून थकल्यावर दोघेजण आत जाऊन बसले.
"मी आपल्यासाठी चहा घेऊन येतो." बोलत राघव आपल्या जागेवरुन उठला.
राघवने दोन कप चहा घेऊन आला. चहाचा एक घोट घेतल्यावर कादंबरी म्हणाली,
"इकडे आपल्यासारखा चहा मिळत नाही का?"
"इकडे आपल्यासारखा चहा मिळत नाही का?"
"मिळतो ना. बर दुबई मध्ये काही ठिकाणी आपल्या पेक्षा भारी चहा मिळतो. तू दुबईत एकटीच आली आहेस का?" राघवने विचारले.
"नाही. माझ्या एका मैत्रिणी सोबत आले आहे. कंपनीतर्फे तिचं एक वर्कशॉप होतं, ती येणारच होती, तर मलाही घेऊन आली. तिला काम असल्याने तिने मला एकटीलाच इकडे पाठवलं. आम्ही काल रात्रीचं इथे आलो." कादंबरीने सविस्तरपणे सांगितलं.
"अच्छा. तुझ्या नवऱ्याने बरं तुला एकटीला दुबईला येऊ दिलं आणि हे काय तुझ्या गळ्यात मंगळसूत्र का नाहीये? म्हणजे तुझा नवरा कुठे आहे? तुमच्यात काही बिनसलं आहे का?" राघवला प्रश्न पडला होता.
यावर कादंबरी म्हणाली,
"राघव, जसं तुला काहीच माहीत नाही असं बोलतो आहेस."
"राघव, जसं तुला काहीच माहीत नाही असं बोलतो आहेस."
"कादंबरी, खरंच मला काहीच माहिती नाहीये." राघव गळ्याला हात लावत म्हणाला.
"तो कुठे आहे? हे मला माहित नाही. आमचा घटस्फोट झाला. अर्थात त्याने मला घटस्फोट दिला. तुला कुसुम आत्याने काही सांगितलं नाही का?" कादंबरी म्हणाली.
"सॉरी, मी असं डायरेक्ट विचारायला नको होतं. मी गेल्या एक वर्षापासून इथे आलो आहे. माझं आणि आईचं कामापुरतं बोलणं होतं. मला काहीच कल्पना नव्हती. आमच्यात तुझ्यावरुन बोलणं होण्याचा काही संबंधच नाहीये." राघवने सांगितले.
"तू अजून लग्न का केलं नाही?" कादंबरीने विचारले.
"मनासारखी मुलगी मिळाली नाही म्हणून." राघवने उत्तर दिले.
"मनात होती ती मिळाली नाही, असं म्हणायचं आहे का?" कादंबरीने मिश्किल हसून विचारले.
यावर राघव म्हणाला,
"मनात जी होती, ती अतिस्वार्थी निघाली. ती मिळाली नाही तेच बरं झालं."
"मनात जी होती, ती अतिस्वार्थी निघाली. ती मिळाली नाही तेच बरं झालं."
"ओह! तुझंही हृदय जखमी दिसतंय. तू एकटाच का फिरतो आहेस? इकडे कोणी मित्र झाले नाही का?" कादंबरीने विचारले.
"दहा दिवसांनी मी कायमचा भारतात परततोय. मित्र आहेत, पण त्यांना त्यांची कामं आहेत. सगळी दुबई पुन्हा एकदा फिरण्याचा विचार आहे. माझं इकडचं काम संपल्याने मी सध्या मोकळाच आहे." राघवने सांगितले.
तेवढ्यात नाश्त्याचं आणि कोल्ड्रिंक्सचं काऊंटर सुरु झालं. राघव नाश्ता घेऊन आला, तर कादंबरी कोल्ड्रिंक्स घेऊन आली. कार्यक्रम सुरु होईपर्यंत दोघांनी भरपूर गप्पा मारल्या.
सुरुवातीला बेली डान्स झाला, त्यानंतर जेवणाचे काऊंटर सुरु झाले. नाश्ता पोटभर केल्याने कादंबरीला भूक नव्हती, म्हणून राघवने जी प्लेट आणली होती, त्यातलंच तिने थोडं खाल्लं.
बेली डान्स झाल्यावर फायर शो सुरु झाला. फायर शो संपल्यावर सगळेच कार्यक्रम संपले होते. परतीच्या प्रवासाला निघण्यासाठी राघव व कादंबरी गाडीची वाट बघत उभे होते. स्कॉर्पिओ मध्ये बसून ते ज्या गाडीत आले होते, तिथपर्यंत गेले. यावेळी राघव व कादंबरी एकमेकांच्या शेजारी बसले होते.
"कादंबरी, मला तुझा इथला नंबर देऊन ठेव. मीही एकटाच फिरतो आहे आणि तुही एकटीच फिरणार आहेस, तर दोघे सोबत फिरुयात. मी तुला दुबई दाखवतो." राघवने सुचवले.
"एकदम भारी आयडिया. तू सोबत असशील, तर मलाही टेन्शन राहणार नाही. फिरायला सोपं जाईल." कादंबरी म्हणाली.
दोघांनी एकमेकांना आपापले नंबर दिले. कादंबरीचे हॉटेल आल्यावर ती राघवला बाय करुन गाडीतून उतरुन गेली.
गाडीतून उतरुन कादंबरी रुममध्ये गेली, तर भूमी लॅपटॉप मध्ये काम करत बसलेली होती.
"डेझर्ट सफारी कशी झाली?" भूमीने लॅपटॉप मधून डोकं वर काढून विचारले.
"मस्त. मी पहिले फ्रेश होऊन येते, मग आपण बोलू." कादंबरीने उत्तर दिले.
"बरं, तोपर्यंत मला मोबाईल देऊन जा. मी फोटो बघते." भूमी म्हणाली.
कादंबरी भूमीकडे मोबाईल देऊन फ्रेश होण्यासाठी बाथरुम मध्ये गेली. कादंबरी बाहेर येईपर्यंत भूमी तिचे फोटो बघत होती. कादंबरी बाहेर आल्यावर भूमी म्हणाली,
"कादंबरी, फोटो तर सॉलिड आले आहेत. कोणी काढले ग?"
"कादंबरी, फोटो तर सॉलिड आले आहेत. कोणी काढले ग?"
"राघवने." टॉवेलला तोंड पुसता पुसता कादंबरीने उत्तर दिले.
"आता हा राघव कोण?" भूमीने डोळे मोठे करुन विचारले.
"भूमी, जग गोल आहे, जे म्हणतात ते खोटं नाहीये. राघव हा माझ्या मावस आत्याचा मुलगा आहे. तो तिथे अचानक भेटला. मी त्याला ओळखले नव्हते, पण त्याने मात्र मला ओळखले. उद्यापासून तो मला दुबई फिरवणार आहे." कादंबरीने खुर्चीत बसत सांगितले.
"चला, तुला फिरायला जोडीदार मिळाला. आता मलाही तुझी काळजी राहणार नाही. राघवचं लग्न झालेलं आहे का?" भूमीने विचारले.
"आता इथे त्याच्या लग्नाचा काय संबंध? त्याचं लग्न झालेलं नाहीये. बरं तू माझ्यासोबत कुठेच फिरायला येणार नाहीयेस का?" कादंबरीने प्रतिप्रश्न केला.
"कादंबरी, मला कामातून वेळच मिळणार नाहीये. मी माझं काम एन्जॉय करते, तू तुझं फिरणं एन्जॉय कर. आता तुझ्या राघवही सोबत असेल. छानपैकी मजा कर." भूमीने सांगितले.
यावर कादंबरी म्हणाली,
"भूमी, तू दिवसरात्र त्या लॅपटॉप मध्ये डोकं खुपसून बसलेली असते, तुला कंटाळा येत नाही का?"
"भूमी, तू दिवसरात्र त्या लॅपटॉप मध्ये डोकं खुपसून बसलेली असते, तुला कंटाळा येत नाही का?"
"कादंबरी, माझं हे आवडीचं काम आहे. इथेचं माझं मन रमतं." भूमीने सांगितले.
थोड्यावेळ भूमी सोबत गप्पा मारुन कादंबरी झोपेच्या स्वाधीन झाली.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe