# कादंबरी – मानसी # भाग २.

This part is about Mansi's interaction with her boss about her new job role

                                               # कादंबरी – मानसी  # भाग  २. बॉस  काय बोलला

थोडा वेळ  तशीच शांत बसून राहिली .थर्मास मधले गरम पाणी प्यायली आणि आलेला अश्रूंचा आवंढा गिळण्याचा प्रयत्न करत होती . डोळ्यापर्यंत आलेले अश्रू डोंळ्यातून न वाहू देता पाण्याबरोबर गिळण्याचा प्रयन्त करत होती . पण अश्रू पण हट्टी डोळे ओले करूनच गेले . तितक्यात तिचा फोन वाजला .

पर्स मधून फोन काढता काढता आलेला अश्रूंचा थेम्ब तिने पटकन पुसला . समोरून आई चा फोन आला होता

" हॅलो ! अग  मी आई बोलतेय .बाळ कशी आहे तब्बेत  ताप नाही ना आला ?"

"हॅलो आई मी बरी आहे. आता थोडी बिझी आहे .तुला कॉल करते थोड्यावेळाने "

"हॅलो मानसी तुझा आवाज असा का येतोय"

कसा ?

"अग रडतेस का तू?"काय झालं"

" नाही ग आई .. चल बाय नंतर करते .

आणि वॉशरूम गेली .तिथे कोणीच नव्हतं .आतून दार लावून तिने  मोठ्याने रडून घेतलं. गार पाण्याने तोंड धुतलं आणि मग शांत झाली . आपल्यावर झालेल्या अन्याय विरुद्ध आपल्याला सज्ज होयला पाहिजे असे ती मनाला समजावू लागली

थोडा  अवतार नीट करून ती थेट बॉस च्या कबिनं कडे निघाली . जाता  जाता ऑफिस बॉय हसून “हॅलो मॅडम ! चहा घेता का”? विचारू लागला .

"नको आत्ता  नको "

बहुदा मानसी च्या बाबतीत काय घडतंय हे त्यालाच माहित नसेल कारण सकाळ पासून इतक्या नॉर्मल तोच तिच्याशी बोलला होता .

मानसी मोठ्या धीराने सरांच्या केबिन कडे गेली . " मे आय कम इन सर?

ओह. मिस मानसी ! प्लिज कम इन .have a seat ? how are you ?

" बोलो बोलो क्या काम है?"

सर मैं दो  दिन के लिये छुट्टी पे थी मेरी तबियत ठीक नाही थी

"सर वो टीम लीडर ने कहा हैं कि मेरी पोझिशन आपने बदल दि हैं "

देखो मिस मानसी ये आपके लिये अच्छी apportunity है . उधर आपको नया  काम सिखन को   मिलेगा . वहा आपका रिपोर्टींग डायरेक्ट मेरे अंडर आयेगा .

" सर मुझे वो डिपार्टमेंट में काम नहीं करना हैं “

देखो मानसी  सोनाली के जगह किसी को तो काम कर ना तो पडेगा . मैने तुम्हारे टीम लीडर से भी डिसकस किया है और उसके according तुम  उस जॉब के लिये परफेक्ट हो .तुम्हारे जगह  पर मैने दुसरी लडकी को ऑलरेडी अँपॉईंट किया हैं।

सो जल्दी से जल्दी सोनाली को  मिलो वो तुम्हे हॅण्डओव्हर दे देगी ।

"सर आप प्लिज आप मेरे साथ ऐसा मत किजीये ।मैं वहा पर काम नहीं करना चाहती हूं| "

मिस मानसी आप मेरा वक्त जया मत किजीये | मेरे उपर भरोसा राखिये यही बात आप के लिये सही हैं । you  may go now .

मानसी त्यांच्यापुढे काहीही करू नाही शकली .तिला ते समजून घेतच नव्हते .तिच्या बद्दल त्यांनी त्या डिपार्टमेंटला शिफ्ट होण्या व्यतिरिक्त काहीच ऑपशन ठेवला नव्हता . हे सगळं होई पर्यंत लंच टाइम आला . मानसी ची भूख जणू उडूनच गेली होती .पण तिला गोळ्या खायच्या होत्या . त्यामुळे ती डबा खायला कॅन्टीन मध्ये गेली . रोजचं  कॅन्टीन आज तिला खूप परकं वाटतं होतं .रोजच्याचं मैत्रिणी आज अनोळखी वाटत होत्या . तिच्याशी बोलायची कोणाची हिम्मत होत नव्हती . मानसी जेवायला बसली खरी पण जेवण घशाखाली उतरेना . डोकं नुसतं विचाराने भणभणत होत . काय कराव तिकडे जॉईन होऊ का ?काय होतंय ऑफिस तर तेच आहे

कदाचित सर म्हणतात तसा तिचा फायदाही होऊ शकतो . पण हे काम तिच्या मनाला पटत नव्हते . कामामध्ये आनंद मिळणार र नाही . पैसे कमविण्यासाठी मनाविरुद्ध दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये शिफ्ट व्हायचे ते सुद्धा हे लोक जबरदस्तीने ती ला तिकडे पाठवत आहेत हे काही तिच्या मनाला पटत नव्हते .तिचा सगळा मूडच गेला होता  . तिला तीच मन ओरडून सांगत होतं हा अन्याय आहे आणि या अन्यायाला तू बळी  पडू नकोस . ह्या सगळ्या विचारात घडलेली असताना अचानक पराग तिथे आला

"मॅडम काय म्हणताय ? कशा आहात ?तुम्ही दोन दवस इथे नव्हतात ?

इकडे दोन दिवस खूप मिटींग्स चालू होत्या . मला सगळं काही नीट नाही माहित पण खूप पर्सिलिटी चालू आहे . मॅडम मला तर वाटतं तुम्हाला गेल्या महिन्यात जे अँप्रिसिएशन मिळाले ना तेच खुपतंय सर्वाना . "

"जाऊ दे रे पराग तुझं  कसं चाललंय ?काम जमतंय का आता ?" मी इथे असें नसेन तू तुझं काम नीट कर म्हणजे मी तुला दिलेले ट्रेनिन्ग सफल झालं असं मी समजेन . आपण कोणाचं वाईट केलं नाही ना मग आपलं  कोण वाईट करू शकत नाही . आणि त्याने वाईट हेतूने केलं तरीही त्यातून चांगलच होईल . हा आता मला थोडा त्रास होतोय पण मी पण हार मानणाऱ्यातली  नाही . असे मानसी पराग ला मोठ्या तोंडाने म्हणत तर होती पण तीच तिलाच माहित नव्हतं कि आज आपण ह्या प्रॉब्लेम ला कसं तोंड द्यायचं

चार वाजता सोनालीचा सेंड ऑफ होता . त्याची तयारी सुरु झाली . बॉस ने एक छान केक ऑर्डर केला होता आणि सर्वाना मेल गेला होता सर्वानी ठीक ४ वाजता खाली ट्रेनिन्ग रूम मध्ये यायचं .

मानसी ला सकाळ पासून हक्काची अशी जागाच मिळाली नव्हती . ती आपली कधी कॅन्टीन ,कधी लॅब, कधी कॉन्फेरंस रूम मध्ये बसली होती. ती वरून तर शांत दिसत होती पण मनात ती खूप अस्वस्थ होती .?आता काय करावं हे काही तिला सुचत नव्हते . तितक्यात बॉस इकडून तिकडे चालले होते .त्यांनी तिला विचारले

“मिस मानसी आपने अभी तक सोनाली  से हॅन्डओव्हर लीया नहीं ।एक बार सोनाली चली गयी के आपको काम करने  में मुश्किल हो जाएगी ।जाओ जल्दी फिर शाम को उसका सेंड ऑफ हैं ।उसके पहले हॅन्डओव्हर लेलो ।“

मानसी जागेवरून उठली खरी पण आता हि वेळ स्वतःचा decision घेण्याची वेळ आली होती. तीने मनातल्या मनात एक पक्का decision घेतला होता . आता तिच्या चेहऱ्यावर तेज आले होते .तिला स्वतःला काय करायचंय हे तिला चांगलेच कळले होते आणि मोठ्या आत्मविश्वासाने ती बॉस च्या केबिन कडे निघाली .

🎭 Series Post

View all