# कादंबरी – मानसी # भाग १५

family visited to see manasi

                                                             # कादंबरी – मानसी  # भाग  १५

                                                      मानसी ला बघण्याचा कार्यक्रम पार पडला

संध्याकाळचे ६ वाजले आणि दाराची बेल वाजली .पाहुणे दारात हजर .

पाहुणे आले ,बसले , मुलाच्या बाबांना आणि मुलाला बाबांनी पाणी दिले आणि मुलाच्या बहिणीला आणि आई ला मानसीच्या आई ने पाणी दिले . अजिबातच आधीची ओळख नसल्यामुळे कोणी काय बोलावे कोणालाच सुचत नव्हते . मुलीची बहीण घराचं निरीक्षण करत होती .मानसीच्या शाळा कॉलेज मध्ये मिळालेल्या ट्रॉफी बघत होती . मानसीची आई आणि मुलाची आई  दोघी  एकमेकींकडे बघून स्मितहास्य देत होत्या.

मुलाचे बाबा आणि मुलीचे बाबा दोघे जोरदार बॅटिंग करत होते .ते दोघे छान गप्पा मारू लागले . आमच्या गावाला असे होत . आम्ही इथे अमुक अमुक साली आलो वगैरे अश्या गप्पा झाल्या .

मग मुलगी काय करते . तीच शिक्षण कुठे झालाय , किती झालाय . ती कोणत्या कंपनीत कामाला आहे ,कोणत्या पोस्ट वर काम करतेय याची माहिती  सांगितली

मुलाच्या बाबांनी मुलाची सर्व माहिती सांगितली . मुलगा आपला मध्ये मध्ये बाबांनकडे बघे .. मधेच आई कडे बघे आणि मग बहिणीकडे बघे . बाबा सांगत असताना त्यांना मधेच त्याची माहिती पुरवत होता .

मुलाची आई म्हणाली मुलीला बोलावा आता बाहेर .

असे शब्द ऐकले कि मानसी ची धडधड वाढली . अर्थात ती काहीं पाहिल्यान्दा हे असं करत नव्हती .पण तरीही बाहेर जायची वेळ आली कि मानसी चे हात पाय गार पडायचे

मानसी ची आई " हो बोलावते “

असे म्हणून आत मध्ये गेली . मानासी चे रूप आज खूपच खुलले होते. बाबांनी तिला आणलेल्या साडीत ती खूपच सुंदर दिसत होती. आई ने तिला पाहिलं . आज मानसीने स्वतः ची स्वतः नेसली होती . आई ने एक काजळाची टीट  तिच्या कानामागे लावली .आणि म्हणाली चल जाऊ बाहेर

आईने कांदा  पोहे भरलेली डिश चा ट्रे भरून तिला बाहेर यायला सांगितले . मानसीने सर्वांना पोहे दिले आणि आई च्या शेजारी येईन बसली .

मुलाला पोह्याची डिश देताना तिची आणि त्याची एक क्षण नजरा  नजर झाली .

तिची आणि तिच्या भावाची मानसीशी नजरा  नजर तिच्या बहिणीने पाहिलं .

काय गम्मत असते ना हि ... पहिली भेट काहीतरी अविस्मरणीय असते . मानसीला मुलगा खूप आवडला ..खूप डिसेन्ट , खूप डिसेंट फॅमिली होती . त्याची बहीण पण खूप छान दिसत  होती . मुलाची आई त्या जरा शांतच होत्या  . त्या तशा जास्त मनमोकळ्या बोलत नव्हत्या . मानसीच्या आई ला हे लागेच जाणवले . पण मुलाचे बाबा तर इतके रमले होते गप्पा मारत बसले होते कि ते विसरूनच गेले कि ह्या फॅमिली ला आपण पहिल्यांदाच भेटलोय . एकदम दिसखुलास हसत होते , बोलत होते . मानसी चे  बाबा आणि मुलाचे बाबा खूप जुनीमैत्री असल्यासारखे गप्प मारत होते. आणि दोघांच्या बायका मात्र गप्पा बसल्या होत्या.

काय गम्मत असते ना . खर तर गप्पाष्ट बायका असतात पण तरीही अशा वेळी या बायका गप्प बसतात .

मानसीला मध्ये मध्ये एखाद दुसरा प्रश्न विचारायचे " ऑफस किती ते किती असते "?

कशी जातेस ? अशी माहिती काढून घेतली जात होती .

थोड्य वेळाने मुलाची आई म्हणाली

चला मग आता आम्ही निघतो " आम्ही एक दोन आठवड्यात कळवतो "

मुलाचे बाबा ना बहुदा थोडं वेगळे बोलायचं असावे .पण आता बायकोच्या तोंडातून शब्द गेला त्यामुळे ते पुढे बोलले नाहीत .

मुलीच्या हातात पेढ्यांचा बॉक्स ठेवत ते लोक निघून गेले .

बाबा एकदम खुश दिसत होते . त्यांना वाटलं होत कि हे स्थळ आता नक्की झालय असेच वाटत होते . पण मानसी आई म्हणाली " अहो त्यांचा होकार येऊ देत "

बाबा - " अग हो मला कळतेय ते ". मानसी तुला कसा वाटलं मुलगा? " तुझं काय म्हणणं आहे ?

मानसी " बाबा तस तो काहीच बोलला नाही त्यामुळे त्यांचा होकार येई पर्यंत आपण वाट बघितलेली बरी "

बाबा " अग  बाळा त्याचा होकारा इतकी तुझी पसंती पण माझ्यासाठी महत्वाची आहे " तू खुश असणे हे हि महत्वाचे आहे.

मानसी " हो कळलं मला ..त्याचा होकार आला तर मी सांगेन तुम्हाला माझं म्हणणं " आणि मानसी पळाली रूममध्ये .

आई आपली किचन मध्ये गेली आवरा  आवरी करायला . मानसी गेली रूममध्ये तीच आवरायला .

बाबा पण आता थोडे शांत झाले होते . बघू आता वाट काय रिप्लाय येतोय ते .

मानसी रूम मध्ये गेली तर तिला कळले कि तिच्या मोबाइल वर रामदास सरांचे ५ मिस्ड कॉल होते .

या सर्व गडबडीत मानसी ने मोबाईल बराच वेळ पहिला नव्हता . आणि सरांचे ५ मिस्ड कॉल म्हणजे नक्कीच काहीतरी अर्जेंट असणार .

मानसीने  पहिला आधी सरांना कॉल लावला

" हॅलो सर , मी थोडी बीझी  होते ..मला कॉल चा आवाज नाही आला . सॉरी , काही अर्जेंट होते का ?”

रामदास सर " हा मानसी त्या xyz कंपनीच्या मॅनेजर चा मोबाइल नंबर पाहिजे होता . त्याचा चेक अकाउंट्स डिपार्टमेंट ला   दिलाय ते सांगायचं होते "

मानसी " ओह ओके ! मी पाठवते नंबर तुम्हाला "

रामदास सर " नो इट्स  ओके .झालंय आता काम  ."आणि सरांनी फोन कट केला

हे सर लोकं पण ना कधी कधी आपल्या सब ओर्डीनेट वर खूप दबाव आणतात . काम काय फक्त हेच लोक करतात का ?

मानसी ने पण त्या डिपार्टमेंट साठी ४ वर्ष काम केलय .  सरांऐवढी तिने पण मेहनत घेऊन डिपार्टमेंट नंबर वन पोझिशिअन ला आणल. आणि एका दिवसात किंवा एका चुकी मुळे लगेच अशी गणितं कशी काय बदलू शकतात .

मानसी ला सरांचं हे वागणे अजिबातच आवडले नाही . पण करणार काय ? काही वेळा दुर्लक्ष करणे उत्तम

मानसीने मनात ठरवून टाकले  उद्या सकाळी लवकर जाऊन सर्व पेंडिंग काम सर यायच्या आत उरकून टाकावे

मानसी साडी बदलून किचन मध्ये आली आणि आई ला म्हणाली " ऐक ना आई उद्या लवकर जायचंय " तर आपण आज रात्री साठी मुगाच्या डाळीची खिचडीच बनवू . मगाशी पण खाणं   झालय .तर आता जास्त करू  नको "

आणि हो आई उद्या डबा  नाही दिलास तरी चालेल  मी कॅन्टीन ला खाईन काहीतरी .कारण मी ८ वाजताच जाणार आहे "

मानसी ची आई ने मान हलवून उत्तर दिले काही जास्त बोलत नव्हती .

रात्री गरमा  गरम खिचडी पापड आणि गोड्या लिंबाचं लोणचे यावर ताव मारला तिघांनी आणि झोपायला पळाले .. ओव्हरऑल आजच दिवस सर्वांना खूपच  दमवून गेला होता.

तरी पण नेहमी प्रमाणे बाबा रात्री आपली बायकोच्या मनात नक्की काय चाललंय याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होते

" काय ग ? तूला कसा वाटलं मुलगा ? फॅमिली कशी वाटली ?

त्यांचा जर होकार आला तर आपलं काय म्हणणं आहे हे पण मला कळायला पाहिजे "

जर होकार आलाच तर लग्नाचं काय ? कधी ? कुठे ?कसं ?या गोष्टींवर पण विचार करायला हवा "

मानसी ची आई का कुणास ठाऊक जरा टेन्शन मध्ये होती . तिचा काहीच अंदाज येत नव्हता .

नक्की हे स्थळ मान्य आहे  की नाही हे काही कळत  नव्हतं . मुळात त्या काही बोलत नव्हत्या . त्यामुळे बाबाना काही अंदाज येत नव्हता..

मानसी बाईंची काय कथा सांगू .तिला आता हे दाखवा दाखवी च्या प्रकारचा खूप कंटाळा आला होता .नेहमी आपलं तेच साडी नेसून तयार होयचं मग.ठरलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची .

पण हा  मुलगा मानसी ला पसंत पडला तर होता पण तरीही तिला वाटत होत कि तो एवढा काही इंटरेस्ट घेत नव्हता ,कदाचित आई वडिलांनी जबरदस्तीने  आणल्या सारखा आला होता . आणि त्याची आई पण काही बोलत नव्हती .त्यामुळे होकार येतो कि नाही या बाबत ती साशंक होती.

मानसीच्या तिच्या लाइफ  पार्टनर कडून काही अपॆक्षा होत्या त्या अपेक्षा हा मुलगा पूर्ण करेल का नाही ?

🎭 Series Post

View all