# कादंबरी – मानसी # भाग १३

in this part manasi 's father has brought information about her would be husband

                                                           # कादंबरी – मानसी  # भाग  १३

                                                            भाग  १३ मानसी ला आले स्थळ

मानसी च्या आई वडिलांनी तिचा बायोडाटा त्यांच्या समाजाच्या पुस्तकात छापायला दिला होता . तेव्हा पासून मानसी ला  वेग वेगळी स्थळं येऊ लागली . प्रत्येक वेळी त्या दिवशी ऑफिस मधून लवकर या .साडी नेसून तयार व्हा  आणि  आई ने केलेले चहा पोहे घेऊन बाहेर जायचे . असा नवीन सिलसिला तिच्या आयुष्यात सुरु झाला होता . कधी मानसी त्यांना आवडत नव्हती , कधी मानसीला तो आवडायचा नाही , कधी आईला घराणं नाही आवडायचं , कधी बाबांना  मुलाचा जॉब नाही आवडायचा . हाच तो असा काही कोणाला क्लीक होत नव्हतं .

मानसी च्या ऑफिस मध्ये तिच्या आधीच्या टीम मध्ये एक विजया  नावाची मुलगी होती .एकदम नाकासमोर चालणारी मुलगी . कधी कोणाशी काही बोलत नव्हती . दिसायला पण सुदर नाही पण रेखीव चेहरा होता तिचा . लांब सडक केस. फार बोलायची नहि. पण कामात हुशार होती . मानसी ची ती कधी मैत्रीण झालीच नाही .याच कारण ती हि अबोल ,आणि हि सुद्धा अबोल . समोरून गेल्यातर जनरली मुली स्माईल एक्सचेंज करतात तेवढं सुद्धा त्यांनी एकमेकींना कधी केले नाही.  दोघींना  जसा एकमेकींविषयी ना जिव्हाळा, ना प्रेम , पण दुश्मनी किंवा राग रुसवा असे पण काही नाही . जशी मानसी ला बरीच वर्ष झाली होती त्या कंपनीमध्ये तशीच तिला पण बरीच वर्ष झाली होती .

एक दिवस अचानक विजया  गळ्यात मंगळसूत्र घालून आली . आधी दोन दिवस रजेवर होती आणि आली  ती एकदम लग्न करूनच . ती च लग्न नव्हतं झालं तेव्हा ती दिसत होती तशीच ती आता पण दिसत होती . मानसीने तिला सकाळी पहिले तेव्हा तिच्या लक्षात सुद्धा आले नाही  कि हिच्या गळ्यात मंगळसुत्र आहे.

नंतर ऑफिस बॉय कडून कळलं कि मानसी मॅडम तुम्हाला कळलं का " विजया  मॅडम च लग्न झालं ?"

मानसी " छे काय पण काय बोलतोस ? अरे मी तिला सकाळी बघितले. नेहमी येते तशीच  आली ती

ऑफिस बॉय " अहो खरंच ... तुम्ही विचार कोणाला पण

मानसी ला शॉकच बसला  असं कास काय  अचानक लग्न करून आली हि मुलगी . आणि चेहऱ्यावर काही आनंद नाही , हातावर मेहंदी नाही . तिला वाटलं बाकीच्यांना तिने बोलावलं असेल लग्नाला . हि तर तिची मैत्रीण नाही म्हणून नसेल बोलावलं.

मानसी ताडकन उठली आणि तिला congratulation करायला खाली गेली .

दुसऱ्यांदा जॉब ला लागल्यापासून मानसी पहिल्यांदाच त्या डिपार्टमेंट मध्ये गेली .

 "विजया   congratulation ! wish you  a happy married  life.

विजया  " थँक उ मानसी "

मानसी " कधी झालं लग्न ? कोणत्या गावला दिली तुला ?"

विजया  " अ ग तुला माहित नाही का ? मी पळून जाऊन लग्न केले ते ?माझं सासर इथंच आहे ."

मानसी " रिअली ! काय बोलतेस काय ? ग्रेट.  “

असे म्हणत मानसी तिथून बाहेर पडली

मानसीला हा मात्र शॉक जरा जोरातच बसला . इतकी साधी दिसणारी मुलगी . अबोल मुलगी , स्वतः  च काम बरं  आणि आपण बरं  असे वाटणारी मुलगी पळून जाऊन लग्न करू शकते ? इतका राग आला कि असे वाटलं एक कानाखाली द्यावी तिच्या . आई वडील लहानाचे मोठं करतात . आणि अशा पद्धतीने आई वडिलांच्या भावनांशी खेळणे बरोबर आहे का ?.

विजया ने घरी आई बाबांना  मनवून बघायला पाहिजे होत .

प्रेम विवाह करण्यास विरोध नाही . आपलं प्रेम सिद्ध करून ते दोघांच्याही आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि देवा ब्राम्हणाच्या साक्षीने लग्न करायला पाहिजे .

असो विजया चे पण तिचे स्वतःचे मुद्दे असू शकतात . तिच्या आई वडिलांना ती जास्त ओळखत असणार .

विजया हे सर्व करून एकदम नॉर्मल होती चक्क दोनच दिवसात ती ऑफिस ला पण आली होती . तिचा नवरा नोकरी पण करत नव्हता . आणि खर तर तो दिसायला हि तिच्यापुढे काही खास नव्हता .

मानसी च्या मनातून हे जाईना . विजया  ने असे नको होते करायला असेच तिला वाटतं होतं .

पुढे असे झाले त्याच दिवशी तिचे बाबा ऑफिस मध्ये आले . तिला भेटायला . मानसी नेमकी खाली आलेली आणि तिने त्यांना पाहिलं .

विजया च्या बाबां च्या  डोळ्यात दुःख , राग ,काळजी असे सगळे भाव तिने पहिले . ते विजया ला म्हणाले

" काय ग पोरी असं वागताना आमचा जरा पण विचार नाही आला का ग ? अग  बाळा तुझ्या आई ने तू घरी परतली  नाहीस म्हणून जो धसका घेतला होता त्याने तिने हांथरुन पकडलं होतं . तुझ्या लहान बहिणी चा तरी विचार करायचा होतास ग ? कुठे कमी पडलो आम्ही ?”

विजया  शांत उभी काहीच बोलत नव्हती .

तिच्या वडिलांचा करुण चेहरा मानसी च्या डोळ्यासमोरून जाईना . काय त्या बापाची चूक ? मुली ला एक ना एक दिवस सासरी तर जायचं च असत पण कुठल्याही मुलीने  अश्या पद्धतीने कधीच सासरी जाऊ नये .

आई वडिलांनी सुद्धा मुलांवर  आपली मत न लादता त्यांना समजून घेतलं पाहिजे.

 त्या दिवशी मानसी एकदम  सिरीयस झाली आपल्या लग्ना बद्दल आणि तिने मनात ठरवून टाकलं कि मी जर लग्न करेन तर आई बाबांच्या पसंतीनेच लग्न करेन .

घरी गेली आणि आईला एक घट्ट मिठी मारली तिने ... आईला म्हणाली "आई या कामाच्या गडबडीत तुला  

बरेच दिवसात  जादूची झप्पी दिलीच नाही ग "

आई " हमम... आज काय लाडात आलीस एकदम . अशी तू जवळ आलीस ना कि खूप बरं वाटत ग. ? तू लहान होतीस ना तेव्हा एक मिनिट पण माझा हात सोडायची नाहीस ...... आई मानसीच्या लहानपणीच्या आठवणीत रमली ... आणि इतकी मोठी झाली तरी मानसीला पण तिच्या लहान पणीचे किस्से ऐकायला खूप मज्जा यायची . आई च्या गप्पा ऐकता ऐकता मानसीने समोर ठेवलेल्या पोह्याच्या चिवड्याचा फडशा पडला . चिवडे के साथ मसाला चाय मिल जाये तो क्या बात है । असे म्हणत म्हणत चहा पण गट्टम केला .

संध्याकाळी बाबा घरी आले ते एक बातमी घेवुनच आले. त्यांचा ऑफीस मधल्या ओळखींमधून एक चांगलं स्थळाचे डिटेल्स घेऊन आले . बाबांना ते स्थळ चांगलेच आवडले होते . मुलगा शिकलेला , दिसायला पण छान होता ,मुख्य म्हणजे त्याला  govt जॉब होता. govt जॉब मुळे  त्याला १०० % बाबांची पसंती मिळाली  होती .

 रात्री सर्वांचे जेवण झाले आणि मग सर्व जण गप्पा मारायला बसल्यावर . बाबांनी  विषय काढला

" मानसी , हे बघ ग . छान स्थळ आलय त्याचा फोटो पण आणलाय . मुलगा चांगला शिकलेला आहे. वडील शिक्षक आहेत . आणि मुख्य म्हणजे त्याचा जॉब याच शहरात आहे . आई वडील गावी असतात . सध्या तो मित्रांबरोबर एकत्र राहतो. पण इकडेच फ्लॅट घेण्याचा विचार चालू आहे ."

बाबांनी  एका दमात सर्व माहिती एकाच वेळी दोघींना सांगून टाकली . एकदा आई फोटो बघे आणि   मानसीला द्यायची मग मानसी बघे आणि आई कडे द्यायची .

बाबांची कंमेंन्टरी मागून चालूच होती .

मानसीची आई काहीच बोलली नाही आणि मानसी पण काहीच बोलली नाही . याचाच अर्थ त्या मुलाच्या बाबतीत नावं ठेवायला काहीच मुद्दा दोघीनांही सापडत नव्हता . बाबा मात्र इकडे त्यांच्या गप्प बसण्यावर जरा चिडले .

" अरे बोला काही तरी .. मी तुम्हा दोघींशी बोलतोय ... सांगा कि पटपट ...आवडला का नाही ते "

आई " अहो होय थांबा जरा असे पटकन काय बोलू . वरकरणी  पाहता काहीच वावगं दिसत नाहीये

विचार करायला काहीच हरकत नाही .”

बाबा " मानसी  तुझं काय म्हणणं आहे ? तुला एकंदरीत कसा वाटतोय "

मानसी " मला पण ओके वाटतोय " असे बोलली आणि मानसी तिच्या रूम मध्ये पळाली .

बाबांना मुलगा खूपच आवडला होता . मानसी चा life पार्टनर म्हणून एकदम शोभून दिसत होता . जास्त गोरा नाही , जास्त काळा नाही,जास्त उंच नाही ,जास्त जाडा नाही,जास्त बारीक नाही ,मुख्य म्हणजे मानसी त्याला आणि तो मानसी ला जोडास जोड होते .

कुणीही बघितलं तर पटकन म्हणेल " जोडी  शोभून दिसतेय ."

बाबांना असे झालं होतं कधी एकदा त्यांना कॉन्टॅक्ट करतो.

आता रात्रीचे १० वाजले होते म्हणून नाहीतर त्यांनी आता लगेच कॉल केला असता

🎭 Series Post

View all