# कादंबरी – मानसी # भाग ३२

In this part mansis father is telling her truth about past and at the end of the part mansi got mail from head office abut her promotion.

                                                                   # कादंबरी – मानसी  # भाग ३२

                                                                      आईने घेतला कठोर निर्णय

क्रमश: भाग ३१  पुढे

बाबा त्यांच्या भूतकाळातील त्या घटनेचा एक एक क्षण मानसीला सांगत होते .  आई आठवून आठवून डोळ्यातून आपोआप येणारे पाणी  पुसत होती . मानसी पण बाबा जे सांगत आहेत त्या काळात तिथे पोहचली होती

मानसी  ऐकत होती आणि एक एक क्षण जगत होती .

बाबा पुढे सांगू लागले

" मी पुन्हा आई च्या रूम  मध्ये आलो . तुझी आई मला विचारु लागली शारदा कशी आहे ? तिला काय झाले ? मुलगी कि मुलगी ? बाळ कस आहे ? तुझ्या आई चे प्रश्न संपता संपत नव्हते . तिला काय उत्तर देऊ ? लगेच दुःखाची बातमी सांगतली तर दूध जाते . त्यामुळे मी तिला सारखे सांगत होतो . सर्व ठीक आहे तू आज अराम कर ?

तोपर्यंत आत्याचे मिस्टर गावावरून आले . आपल्या बायकोला होणाऱ्या  पहिल्या बाळासाठी  ते खूप खुश होते . त्यांना कसं आणि काय सांगणार होतो .

आल्या आल्या ते बायकोला बघायला गेले ? बघतात तर बायकोच्या बेड वर बाळ नाही ? तो पर्यंत मी त्यांच्या मागे मागे आलोच . लगेचच त्यांना डॉक्टरांना भेटवलं . डॉक्टरांनी त्यांना सर्व कथन केले . भाऊजींच्या पण डोळ्यात पाणी आले . बायकोला पुन्हा बाळ नाही होऊ शकणार हे जास्त त्रासदायक होत . कारण अख्ख आयुष्य दोघांच्या पुढे पडलं होतं . भाऊजी आणि मी दोघांनी मिळून गेलेल्या बाळाचे सोपस्कार केले . शारदे ची काळजी घेणं जास्त गरजेचं होत . भाऊजी म्हणाले  मी हिला घेऊन लगेच घरी जातो . तुमच्या घरी एका नवीन बाळाने आनंद आणलाय पण आम्ही कम नशिबी माणसं त्याच्यावर विरजण नाही घालणार . आम्ही आताच निघतो आणि भाऊजी काही ऐकायलाच तयार  नाही शारदेला  घेऊन ते निघाले पण . माझ्या झालेल्या बाळाला पहा असे त्यांना म्हणायची संधी आणि शक्ती दोन्ही मला मिळाल्या  नाहीत . तुझ्या आईला नक्की काय झालय  याची काहीच कल्पना नाही . मला सारखी विचारत होती . शारदा मला न भेटता का गेली ? शेवटी दोन दिवसांनी मी तिला सर्व सांगितले .

तुझी आई दुःखात बुडाली . तिला वाटू लागले माझ्याकडूच काहीतरी चुकले . माझ्या नंणदेच्या  आयुष्यातील दुःखाला मी कारणीभूत आहे . रोज तिला समजावून सांगत होतो. असे नसते अग , तू खूप केलेस .

या सर्व दुःखात आम्ही घरातल्या घरात बाळाचे बारसे केले . बाळाचे नाव श्रेयसी ठेवले .

तुझ्या आई ची तब्बेत ठीक झाल्यावर आम्ही शारदेच्या सासरी तिला भेटायला गेलो . कारण दुःखाच्या काळात म्हणावी तशी सोबत देता आली नव्हती . शारदेने  अंथरूण  पकडले ते सोडायलाच तयार नाही . ती मनाने खचली होती . आपले बाळ गेले आणि आता आपल्याला बाळ होणार नाही हि दोन्ही दुःख देवाने कोणत्याही आई ला देऊ नये .

आमचं  त्यांच्या घरी जाण्याने त्यांच्या घरचे वातावरण थोडे बदलले .१५ दिवसांच्या श्रेयसी ला बघून शारदे ला तिचं बाळच घरी आल्या सारखे वाटू लागले . श्रेयसी ला पाहून ती सुखावत होती , भाऊजी पण श्रेयसीला  घेऊन  बसत होते .

शेवटी आमची  पुन्हा घरी यायची वेळ आली. मानसी तुझ्या आईने पॅकिंग केली  आणि आम्ही निघालो . आम्ही निघालो तर शारदा  मोठं मोठयाने रडायला लागली ." म्हणत होती दादा माझ्या बाळाला घेऊन नका जाऊ .  मी मरून जाईल. "

इकडे तुझी आई रडायला लागली " शारदा जागी हो ... शारदा हि श्रेयसी आहे माझी मुलगी "

 शारदा म्हणाली " वाहिनी माझ्या पदरात तुझी हि मुलगी देशील का ? मला जगायला कारण मिळेल .

भाऊजी आले आणि शारदे ला आत ओढू लागले " अग  काय बोलतेस तुझं तुला कळतंय का ? त्यांच्या पोटचा गोळा ते कसे काय आपल्याला देतील . ?"

तुझी आई कपाळाला हात लावून बसली . एकवेळ प्राण मागितला  असता तर लगेच दिला असता पण श्रेयसी ला कशी देऊ ? सर्व जण शांत झाले आम्ही त्या दिवशी जाण्याचा बेत थांबवला .  घरात स्मशानशांतता होती . कोणचं कोणाशी बोलत नव्हतं . मी आणि तुझी आई आम्ही  दोघे त्या दिवशी श्रेयसीला खाली ठेवतच नव्हतो . आम्हाला तिला खाली ठेवायचेच नव्हते , खाली ठेवली कि  चुकून शारदा घेईल कि काय ? आणि घेतली तर परत दिलीच नाही तर ? या भीतीने  आम्ही तिला खाली ठेवलेच नाही .

दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा घरी जायला निघालो . शारदेला  आता तिच्या वागण्याचं वाईट वाटलं होत . ती खजील झाल्यासारखी माझ्या डोळ्यात डोळे घालून बघत नव्हती .  तुझ्या आईला म्हणाली " वहिनी माझं चुकलंच. मला माफ करा . मी असे कशी वागले ? ह्या देवाने माझ्यावर अशी कशी वेळ आणली ? आणि स्वतः च्या थोबाडीत मारून घेऊ लागली . तुझी आई तिचा हात पकडून तिला थांबवत होती आणि म्हणत होती " शारदे सांभाळ स्वतःला ... आणि दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून अर्धा तास रडल्या . मी म्हटलं आता इथून निघून जावं लगेच आणि बॅगा उचलल्या आणि बाहेर पडलो . तुझ्या आईला खुणावले  तू बाहेर ये मी वाट बघतो .

तुझी आई  दहा  मिनिटांनी बाहेर आली ती एकटीच आली . आणि मला म्हणाली " अहो मी चुकले नाही ना ? मला माझी चूक लक्षात यायच्या आत इथून चला आम्ही तिथून जे बाहेर पडलो ते मागे वळून पण बघितले नाही . आणि त्यानंर मी माझ्या बहिणीला कधीच कॉल केला नाही आणि तिने हि नाही . आम्ही श्रेयसी चा विषय

आमच्या साठी संपवून टाकला .

श्रेयसी चे सर्व फोटो मी शारदेच्या पोस्टाने पाठवले पण तरीही बारशाच्या दिवशी चा एक फोटो लपवून ठेवलाच . तिची आठवण आली कि मी हा फोटो बघतो .

शारदेच्या आयुष्यात श्रेयसी आल्याने ती पुन्हा नॉर्मल झाली आणि एक चांगली आई झाली . भाउजीनी पण तिला साथ दिली . श्रेयसी आज सुखात राहत आहे .

 मानसी चे आई आणि बाबा त्यांचा हा भूतकाळ  सांगताना  रडत होते आणि मानसी तर हुंदके देऊन रडत होती . आई बद्दल चा आदर वाढला होता .बाबानं बद्दलची माया वाढली होती .

मानसी उठली आणि मस्त चहा टाकायला किचन मध्ये गेली . मानसीने मस्त आल्याचा चहा केला आणि तिघांनी संध्याकाळचा  चहा प्यायला .

मानसीने श्रेयसी चा फोटो घेतला आणि तिच्या रूम मध्ये नेला . श्रेयसीच्या फोटो ला जवळ घेऊन बसली . आज अचानक तिला काळले होते कि ती ताई आहे .ह्या सगळ्या प्रकारात एका बहिणीची तिच्या बहिणी पासून ताटातूट झाली होती . आज जेवढ्यांदा तिने फोटो पहिला तेव्हा तेव्हा तिचे डोळे ओले झाले होते .

मानसीला  जी शंका होती कि ती दत्तक आहे  ती   खोटी निघाली त्यामुळे मानसीने सुटकेचा श्वास टाकला आणि स्वतः च्या बावळट पणा वर हसू हि आले . तिच्या हे हि लक्षात आले नाही कि ती तिच्या आई ची  झेरॉक्स  कॉपी आहे .

 कसं असतं ना एकदा का माणसाच्या मनात शंका किंवा संशय आला कि तो त्याला आतून पोखरून काढतो . त्याच्या विवेक बुद्धीला वाळवी लागते आणि मग तो निगेटिव्ह विचार करू लागतो .

मानसीला आताच्या आता तुषार ला कॉल करावासा वाटत होता आणि त्याला सांगावं कि तुषार मी एकटी नाहीये मला एक छोटी बहीण आहे . तुझ्या आईला सांग कि मी एकुलती एक नाहीये आणि मला एक नाही दोन दोन माहेर असणार आहेत  पण सांगणार कशी ? तिला तर माहीतच नव्हते कि तिला होकार आलाय आणि तुषार ने त्याचं काम चोख पार पाडलंय.

तुषार ने बाजी तर मारली होती पण मानसी चा कॉल न आल्यामुळे तो  अस्वस्थ होता . त्याला मानसी चा राग पण येत होता आणि तिला भेटण्यासाठी आतुर पण झाला होता .

दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे  ऑफिस ला गेली तर नायडू सर तिला म्हणाले कि त्यांना आणि त्यांच्या फॅमिलीला इथे comfortable होत नाहीये तर त्यांनी पुन्हा तामिळनाडू ला पोस्टिंग मागितली आहे . मानसीच्या लक्षात आले कि अरे देवा ! म्हणजे आता पुन्हा बॉस बदलणार . ठीक आहे जे आहे ते आहे आणि मानसी कामाला लागली .

तेवढ्यात तिला हेड ऑफिस वरून मेल आला कि

“ Congatulation ! Manasi has been promoted as ‘Senior Manger’ with effect from next month.

मानसी चे ग्रह तारे काय सगळेच फिरले होते कि काय ? सगळ्याच चांगल्या  गोष्टी होत होत्या .

म्हणतात ना भगवान के घर देर  होती है पर अंधेर नहीं " अगदी तसाच तिच्या आयुष्यात सगळ्या पेंडिंग गोष्टी एक एक करून होत होत्या .

ज्या ऑफिस मध्ये तिला एक दिवस अचानक जॉब सोडावा लागला होता त्याच ऑफिस मध्ये पुन्हा जॉईन होऊन एखाद्या डिपार्टमेंट ची रेस्पॉन्सिबल मॅनेजर बनणे हा प्रवास एखाद्या पुस्तकात वाचावा तितका सोप्पा नाही . हि एक प्रकारची तपस्चर्या आहे . सतत न थकता अविरत केलेल्या कामाचा हा मोबदला आहे .

मानसीने प्रामाणिक पणे काम करून हे प्रमोशन मिळवून  हे सिद्ध केले कि

Nothing is Impossible!!

🎭 Series Post

View all