# कादंबरी – मानसी # भाग ३१

in this part mansi's father will tell about that secret which is related to their past

                                                            # कादंबरी – मानसी  # भाग ३१

                                                             मानसीला कळणार सिक्रेट

मानसी मात्र अजूनही अस्वस्थ च होती . आई बाबांचं सिक्रेट काय आहे हे तिला अजून कळलंच नव्हतं . रोजच्या रुटीन मध्ये त्या सिक्रेटचा फारसा फरक पडत नव्हता . कुठेतरी फक्त  मनाला हुक लागलेलं होत .नाहीतर काही नाही . तिलाही कधी कधी असे वाटायचं मरूदे ते सिक्रेट . जोपर्यंत मला ते कळत नाही तोपर्यंत ते माझं टेन्शन नाही . तिने चुकून आई बाबांचे संभाषण ऐकले म्हणून ,तेही शब्द जर नसते ऐकले तर असे काही आहे याचा गंध पण तिला लागला नसता .

तरी पण मानसी थोडी माहिती काढून घ्यायच्या हिशोबाने एकदा अशीच वीकेंडला घरात आई बाबांशी गप्पा मारताना आई ला म्हणाली

" आई मला कोणी लहान भाऊ किंवा बहीण असत तर बरं झालं असतं ना ! घरात पण जरा मज्जा आली असती आम्ही दोघे/दोघी जण एकत्र खेळलो असतो , भांडलो असतो .

बाबा आणि आई दोघेही चूप झाले . तिच्या ह्या प्रश्नाचे कोणीच काहीच उत्तर दिले नाही .उलट गप्प झाले .

बाबांच्या पण लक्षात आले मानसी हल्ली फार वेगळे प्रश्न विचारतेय ? काहीतरी  तिला शंका आहे असे त्यांच्या लक्षात आले . उगाच मानत शंका कुशंका काढत बसण्यापेक्षा सत्य तिला सांगूनच टाकावे. आणि त्याच विचारात ते त्यांच्या खोलीत गेले

त्यांनी त्यांच्या खोलीत गेल्यावर त्यांच्या बुक्स च्या रॅक मधली एक जुनी डायरी काढली . त्या डायरी मध्ये एका छोट्या बाळाचा फोटो होता . तो फोटो बघताच बाबांच्या डोळ्यातून टचकन पाणी आले . बाबांनी तो फोटो पटकन आपल्या छातीशी धरला . तो फोटो पाहून ते भूतकाळात गेले त्यांना तो कठीण क्षण आठवला . त्यांच्या आयुष्यात त्यांनी एका कठीण प्रसंगाला तोंड दिले होते बहुदा  त्या क्षणाला आठवणे म्हणजे त्यांच्या वर्मा वर घाव घातल्या सारखे होते . आज मानसीने हा प्रश्न विचारून आई आणि बाबा दोघांना दुखावले होते .

ती किचन मध्ये पाणी प्यायला गेली  बघते तर आई पण रडत होती . मानसी येते या ची चाहूल होताच तिने अश्रू पुसले .

बाबा  बऱ्याच वेळाने रूम च्या बाहेर आले आणि त्यांनी त्यांच्या बहिणीला म्हणजे मानसीच्या आत्याला फोन लावला

" हॅलो "

समोरून शारदा म्हणजे मानसीच्या वडिलांची बहीण बोलत होती

"हॅलो दादा कसा आहेस . आज बऱ्याच दिवसांनी कॉल केलास . "

मानसी चे  बाबा " अग मी काय बोलत होतो , तू तुझे  मिस्टर आणि तुझी मुलगी सर्व मिळून गावाला या . मी इकडून मानसी ,मानसीची आई  आम्ही तिघे पण गावाला येतो . तिथून आपण गावदेवीला सर्व जण एकत्र जाऊ .

 शारदा -" ठीक आहे दादा , मी यांच्याशी बोलते आणि कळवते . दादा तरी पण तू  परत एकदा विचार कर थोडक्यासाठी गडबड नको . "

मानसी चे बाबा " शारदा कधी ना कधी तरी हि वेळ येणारच होती . आम्ही मानसी च्या लग्नाचं बघतोय , हि गोष्ट मानसीच्या लग्नाच्या आड नको यायला आणि मानसी च्या आई ला पण सर्वांना घेऊन गाव देवीच्या मंदिरात जायचंय . बाकी काही नाही झालं तरी ते तरी पूर्ण होऊन जाईल ."

शारदा " ठीक आहे चालेल "

मानसीच्या बाबांनी मोबाइल ठेवला आणि  दोघींना बोलावले आणि ठरलेला प्लॅन सांगितला . मानसीला त्यांनी सोमवारी पण सुट्टी टाकायला सांगितली .

गावाला जायचं म्हटल्यावर मानसिची आई खूप आनंदात होती . तिच्या चेहर्यावरचा आनंद लपत नव्हता . बाबा पण खूप excite दिसत होते . मानसी मात्र एवढी काही खुश नव्हती . आत्ता मधेच गावाला इतक्या वर्षांनी जायचं ? आत्या ला तर तिने पहिले पण नव्हते . ती आई ला म्हणाली

आई आत्या कशी आहे ग ?

मानसीची आई " अग आता बघशील कि छानच आहे ."

मानसी " आत्याला कोण आहे मुलगा कि मुलगी ?"

मानसी ची आई " मुलगी आहे तिचं  नावं श्रेयसी आहे . तुला आता ती पण भेटेल . "

मानसी " ओके "

इतक्यात बाबांचा फोन वाजला . कोणाचा  फोन आला होता कळलं का ? तुषार च्या बाबांचा

मानसी चे  बाबा " हॅलो "

तुषारचे बाबा " नमस्कार ! ओळखलं का ? अहो मी तुषार चे वडील बोलतोय "

मानसीच्या बाबांनी त्यांच्या कॉल ची अपेक्षा च सोडून दिली होती .ते पण जरा अश्यर्यचकित झाले  मानसीची आई त्यांना डोळ्यातून खुणवुन प्रश्न विचारत होती ,कोणाचा  फोन आहे ? ते पण मानसी कडे बघून बघून उत्तर द्यायचा प्रयत्न करत होते.

मानसी चे बाबा " नमस्कार ! काय म्हणता ? कसे आहात ?"

तुषार चे बाबा " अहो इकडेच आलो होतो ,म्हटलं तुम्हाला एक कॉल करून घ्यावा . अहो दिल से सॉरी . तुमच्या कडे येउन  गेल्यावर मला  तुम्हाला कॉल  करायला वेळच नाही मिळाला .आमच्या  मिसेस ची तब्बेत बिघडली होती "

मानसी चे बाबा " हो का . आमच्याकडे पण तेच झालय माझ्या मिसेस ची पण तब्बेत बिघडली होती .आता बरी आहे .

तुषार चे बाबा " अहो सांगायचं मुद्दा असा कि आम्हाला तुमची मुलगी मानसी पसंत आहे . तर पुढची बोलणी कधी करूयात ?”

मानसी चे बाबा " अरे वाह ! तुम्ही म्हणाल तेव्हा करू . फक्त या वीकएंड ला आम्ही नाहीये  आम्ही  गावी चाललोय .

तुषार चे बाबा " चालेल मग असं करू बुधवारी किंवा गुरुवारी आपण एकदा भेटू तुम्ही आमच्याकडे या. "

मानसी चे बाबा " मी घरी बोलतो आणि कळवतो "

तुषार चे बाबा " ठीक आहे चालेल "

तुषार च्या बाबांचा फोन आला तेव्हा  मानसी तिच्या रूममध्ये होती . आई आणि बाबा इतके खुश झाले आपण  म्हणतोना ना आनंद गगनात मावेना तसच काहीसं झालं त्यांचं .आई बाबांना म्ह्नणाली " बघा मी म्हणत  होते कि आपण गावदेवीला लवकर जाऊन येऊ . नुसता जायचा संकल्प केला तर लगेच एक गोड  बातमी मिळाली .

मानसी चे बाबा " तुझं आपलं काहीतरीच. अग प्रत्येक गोष्टीची वेळ असते त्याचा आधी किंवा नंतर काही नसते . आपल्या हातात फक्त कर्म करणे हे एकच असते . असो देवीचं तर देवीच्या कृपेने पण तुषार इतका चांगला life पार्टनर मानसीला मिळणार नाही . "

आई ने लगेच देवासमोर साखर ठेवली .तितक्यात मानसी तिच्या रूममधून बाहेर आली .

बाबांनी आईला खुणावले तिला आत्ता सांगू नकोस आपण तिला सरप्राईझ देऊ

आई मानसिकडे बघून नुसती हसली .

मानसीला वाटले कि आई गावाला जायचंय म्हणून बाबांवर  खुश  आहे म्हणून खुश आहे .

जेव्हा तुषार च्या बाबांनी फोन केला तेव्हा तुषार त्यांच्या बाजूलाच होता . तो त्याचा मोबाइलला सारखा चेक करत होता अर्धा तास झाला , एक तास झाला , मानसी त्याला फोन का करत नाही . मानसि चा आवाज ऐकायला त्याचे कान  तरसले  होते . मानसीला हि न्युझ अजून कळलीच  नव्हती .

बाबांना कळवायचे होते तुषार च्या घरी कि ते कधी येणार आहेत त्यांच्या घरी . म्हणून त्यांनी मानसि  च्या आई कडे विषय काढला

" अग आपल्याला माझ्या एका मित्राने बुधवारी रात्री बोलावलेय . आपण जायचं का ?

मानसीची आई " मानसी ला विचारा "

मानसीचे बाबा " अग  माझा एक मित्र आहे त्यांना एक मुलगा आहे .तो हि लग्नाचा आहे . त्यांच्या मुलाला पण मुलगी बघण्याचा कार्यक्रम आवडत नाही तेव्हा आपण असच जेवायला म्हणून जायचं . तू सहज मुलग्याला बघून घे "

मानसी " नको ना बाबा , मला पण नाही आवडत . असेल माझ्या नशिबात तो येईल समोर आता मला पण कोणत्या मुलाला बघायचं नाही "

मानसी चे बाबा " बर आपण जाऊन तर येऊ "

बाबांसमोर चालतो का कुणाचं शेवटी मानसी ला त्यांनी तयार केली . " मानसी साडी नेस ग त्या दिवशी "

मानसी रागाने " बाबा काय हो ?

दुपार ची  संध्याकाळ झाली तुषार ला मानसीचा कॉल गेला नाही तो बिचारा अस्वस्थ होत होता

मानसीच्या बाबांनी तुषार च्या बाबांना कळवले कि आम्ही बुधवारी येऊ तुमच्याकडे.

मानसीला अजून माहित नाहीये कि ती तुषार ह्या घरी जेवायला जाणार आहे .

मानसी घरामध्ये वावरताना तिला  पडलेला तो बाळाचा फोटो दिसला . मानसी ने तो फोटो पहिल्यांदाच बघितला होता .

फोटो बघता बघता ती आईला म्हणाली " आई हा फोटो कोणाचं आहे ग ?"

आई ने तो फोटो पहिला आणि आई च्या डोळ्यातून घळाघळा  पाणी आले .

मानसी " आई काय झालं ? हा कोणाचा फोटो आहे ? आणि हा फोटो बघितल्यावर तू रडतेस का ?"

मानसी ची आई " तू बाबांना विचार बाबा सांगतील .अहो हा फोटो तुम्ही बाहेर काढला का  आज ? "

मानसी चे बाबा " हो , ये इकडे मानसी तुला तेच सांगायचं आहे . तुझ्यापासून आम्ही एक गोष्ट लपवून ठेवली आहे . आज मी तुला सांगतो "

मानसी  ला ते सिक्रेट आज कळणार होते . मानसी पण मोठ्या क्यूरियासिटी ने ऐकू लागली

 साधारण २२ वर्षांपूर्वीची हि गोष्ट . तुझ्या जन्मानंतर तुझ्या आईला अजून एकदा बाळ होणार होतं .  तू साधारण २ वर्षांची असशील . त्यावेळी  आम्ही सर्व गावी राहत होतो . तुझ्या आत्याचं पण लग्न झालं होतं . ती तिच्या सासरी होती आणि त्याच दरम्यान तुझी आत्या पण प्रेग्नेंट होती . घरात सगळीकडे  आनंदी  आनंद होता . थोड्याच दिवसात घरात अजून दोन बाळ येणार आणि आपलं घर नंदनवन होणार . दिवसां मागे दिवस जात होते आणि ह्या दोघींचे दिवस भरत होते . सातव्या महिन्यात तुझी आत्या माहेरी डिलिव्हरी साठी आली . घरात दोन गरोदर बायका आणि  तू लहान फक्त २ वर्षांची . तुझी आई नणंदेच्या डिलिव्हरी मध्ये काही कमी नको पडायला म्हणून गरोदरपणात पण खूप काम करत होती . आत्येची खूप काळजी घेत होती . या सगळ्यात तिला तिच्या तब्बेतीकडे बघायला वेळ पण नव्हता . मला खूप टेन्शन यायचं . जमेल तशी मदत मी तिला करत असे . पण पुरुषाची मदत बाईचं कामं कमी नाही वाढवून ठेवते .

आणि एक दिवस तुझ्या आत्या च्या पोटात दुखायला लागलं . तिला आम्ही दवाखान्यात नेलं . तुझी आई पण तिच्या बरोबर होतीच . तिचे पण दिवस भरायला आले होते .मला तर काहीच कळत नव्हते , बहिणीकडे बघू , कि बायको कडे कि मुलीकडे . माझ्या परीने मी प्रयत्न करत होतो . शेवटी डॉक्टरांना म्हटले

“डॉक्टर माझ्या बायकोचा  आणि बहिणीचा जीव आणि त्यांच्या पोटातले जीव त्याचे प्राण तुमच्या हातात आहेत . “

आणि  मी तुला  घेऊन मी बाहेर थांबलो .

अर्धा तासा  नंतर डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले तुमच्या मिसेस च्या पण पोटात दुखतंय . त्यांना मी चेक करतो कदाचित त्यांची पण आज डिलिव्हरी होईल .

पूर्वीच्या काळी आताच्या  काळासारखे मेडिकल सायन्स ऍडव्हान्स नव्हते . अशा वेळी डॉक्टर च्या हातात त्याला देव मानून तो जे करील ते करेल आणि आपण देवाची प्रार्थना करणे या व्यतिरिक्त काहीच ऑपशन नसायचा .

दवाखान्या बाहेर मी आणि तू खुर्चीवर बसून जो १ तास  काढलाय तो आठवला तरी माझ्या अंगावर काटा येतो .फार विचित्र वेळ होती .

काय होईल सांगू शकत नाही .

तास भराने डॉक्टर एका गोंडस बाळाला बाहेर घेऊन आले आणि माझ्या हातात दिल . आणि मला म्हणाले " अभिनंदन तुमच्या मिसेस ला मुलगी झाली . डिलिव्हरी नॉर्मल झाली . थोड्याच वेळात त्यांनाही बाहेर शिफ्ट करतो .

मी डॉक्टरांना विचारले माझी बहीण कशी आहे ? तीच बाळ कसं आहे ?

डॉक्टर म्हणाले  त्यांची तब्बेत जरा क्रिटिकल आहे . आम्ही अजून प्रयन्त करतोय . देवावर विश्वास ठेवा . आणि निघून गेले .

इवलेसे बाळ माझ्या  हातात मस्त डोळे मिटून झोपले होते . आणि तू आनन्दाने त्या बाळाला बघत होतीस आणि मला विचारत होतीस बाबा हे बाळाचे डोळे , बाळाचे कान .

थोड्याच वेळात डॉक्टर आले आणि म्हणाले " सॉरी मी तुमच्या बहिणीच्या बाळाला नाही वाचवू शकलो . आम्ही खूप प्रयन्त केला . "

देव पण  माणसाची अशी परीक्षा घेतो माझ्या हातात हसू आणि डोळ्यात अश्रू होते . आता आलेल्या या दुःखाला कस समोर जायचं काहीच कळेना .

डॉक्टरांनी थोड्याच वेळात तुझ्या आईला आणि बहिणीला बाहेर वॉर्ड मध्ये शिफ्ट केले . मी आई च्या कुशीत बाळाला ठेवले नि तसाच बहिणीला भेटायला गेलो .

शारदा माझी  बहीण बेड वर निपचित पडली होती . तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या

मला म्हाणाली " दादा का रे असे का झालं माझ्याच बाबतीत ?"

मी मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हटलं रडू नकोस बाळा , काही गोष्टी आपल्या हातात नसतात. थोड्या दिवसांनी तू पुन्हा चान्स घे होईल तुला बाळ परत . आता  तुझा जीव वाचला हे महत्वाचे .

तेवढ्या मला डॉक्टरांनी भेटायला बोलावले

एका फडक्यात गुंडाळले ते  निपचित बाळ माझ्या  हातात दिले आणि मला सॉरी असे म्हणाले

थोड्याच वेळा पूर्वी मी माझ्या गोंडस बाळास बाळाला हातात घेतले होते आणि आता माझ्या बहिणीच्या गेलेल्या मुलाला हातात घेतले होते . दोन्ही अनुभव एकाच दिवशी . काय अजब योगायोग आला होता .

डॉक्टरांनी मला सांगितले तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायचीय तुमच्या बहिणी ला आता पुन्हा बाळ नाही होऊ शकणार . खूप क्रिटिकल सिचवेशन मधून त्यांना वाचवली आम्ही . बाळ आणि बाळाची आई दोघांचे जीव धोक्यात होते . सॉरी .

मी काहीही न बोलता खिन्न मनाने बाहेर आलो.

🎭 Series Post

View all