# कादंबरी – मानसी # भाग २७

In this part tushar and manasi are discussing about their problems with each other and trying to understand each other

                                               # कादंबरी – मानसी  # भाग २७

                                                    भेटीतून काय निष्पन्न झाले

मानसी ने तिचा चेहरा दोन्ही हाताने झाकून घेतला होता आणि हमसून हमसून रडत होती . मानसी रडायला लागल्यावर तुषार गडबडला ,घाबरला ,गोंधळला. काय  कळायच्या आत तो पटकन जागेवरून उठला आणि तिच्या जवळ गेला . तिला कस थांबवू , हेच त्याला कळेना .

तुषार " मानसी रडू नको ना प्लिज  " सॉरी सॉरी . प्लिज रडू नको

मानसीला ती तिच्या आई जवळ खोटं बोलतेय हेच तिला पटत नव्हतं

तिच्या सर्वात प्रिय व्यक्ती बरोबर ती आज खोटं बोलत होती ह्या   गोष्टीचा तिला खूप त्रास होत होता

स्वतः चा च राग येत होता . ती ऑफिस मध्ये नसताना तिने आईला सांगितले कि ती ऑफिस मध्ये आहे .

शिवाय तिला आत्ताच कळले होते कि तुषार च्य आई ला ती पसंत नाही  , ती अशा पद्धतीने तुषार ला भेटायला आली होती अशी अनेक  कारणं होती तिला दुःख होण्याचं .

तुषार ला काही कळेना हिला रडायचं कसं थांबवायचं ?

तुषार ने तिला पटकन  त्याच्या खिशातला रुमाल काढला आणि तिला डोळे पुसायला ऑफर केला . मानसीने तो नाही घेतला . तुषार ला तिचा चेहरा सुद्धा दिसत नव्हता पण तिचे हात ज्याने  तिने तिचा चेहरा 'झाकला होते ते ओले झालेत एवढच दिसत होता . थोडक्यात मानसीच्या रडण्याने परिस्थिती हाता बाहेर गेली होती .आणि हि वेळ येईल असं त्याला हि नाही आणि तिलाही  वाटले नव्हतं . ह्या अचानक आलेल्या अवघड परिस्थितीत कसं वागावं हे तुषार ला कळेना .

" तो फक्त रडू नकोस मानसी , रडू नकोस ना प्लिज " असे वारंवार म्हणत होता

तुषार ला मानसी जवळ अजून बऱ्याच गोष्टी बोलायच्या होत्या त्या राहूनच गेल्या होत्या , आता तिने तर ठरवलेलं कि ती तुषार ला अशी कधीच भेटणार नाही .

ती आज आली हेच तिने भरपूर केले हे तुषार ला पण कळून चुकले होते . आणि आता हिच्याशी काही पुढे न बोललेच बरे हे हि तुषार ला कळून चुकले .

आपल्या  मुळे मानसी रडतेय हि गोष्ट पण त्याच्या मनाला खायला लागली . परत तसेच तो बिचारा करायला जातो एक आणि  होत एक .

पाच एक मिनिटांनी मानसी रडायची  शांत झाली . आता तिला ती रडली याचं  वेगळ गिल्ट तिला आलं . ती तुषार ला सॉरी म्हणू लागली .

" सॉरी तुषार मी असं रडायला नको होत . खरंच सॉरी "

तुषार मानसीला म्हणाला " सॉरी माझ्या कडून सॉरी , माझ्यामुळे तुला त्रास झाला "

दोघांच एकमेकांना सॉरी म्हणून झालं आता पुढे काय ? दोघं हि शांत झाले .

मानसीची ऑफिस ला जाण्याची वेळ जवळ येत होती . आज काय तो डिसिजन घेऊन टाकायचा होता . त्या दृष्टीने तुषार तसं बरच काही बोलला होता पण मानसी ने तस काही स्पष्ठपणे त्याला सांगितलं नव्हतं . ती त्याच्या साठी थांबायला तयार आहे का नाही ?ती यात त्याला मदत करणार आहे का नाही ?

खर तर ह्या प्रश्नांची उत्तरे तिच्या स्वतः कडेच नव्हती तर ती तुषार ला काय सांगणार होती .

तुषार ला आता मानसीला अजून दुखवायचं नव्हतं त्यामुळे तो जास्त नाही तो काहीच बोलत नव्हता .

शेवटी मानसीने हि मिटिंग संपवायची तयारी केली

मानसी - " तुषार माझा आज हाल्फ डे आहे . तू सुट्टी घेतली आहेस का ?

तुषार  - " हो माझी आज सुट्टी आहे "

मानसी - " हो का , माझ्या लक्षातच आले नाही मी पण सुट्टी टाकायला पाहिजे होती , पण मी हाल्फ डे टाकला .

तुषार " ओके  म्हणजे आता तुझी जायची वेळ झाली का ?

मानसी " हो ना . तसं  मी २ वाजे पर्यंत जाऊ शकते

तुषार ने घड्याळ  बघितले आत्ता १२. ३० वाजले होते म्हणजे फार फार तर १ तास ती थांबू शकेल याच अंदाज त्याला आला .

तुषार - "कॉफी नाही तर चहा घेशील का ? मला भूक लागलीय , मी आज ब्रेकफास्ट पण नाही केलाय . "

थोडक्यात तुषार ला भूक लागली होती .

मानसी -" माझ्या कडे डबा आहे तू डब्यातलं खातोस का ?

तुषार " तू चहा घेणार का ?

मानसी ने शेवटी त्याला हो म्हणून बोलली

तुषार " मंदिराच्या समोर स्नॅक्स सेंटर आहे तिथे जाऊ या का ?

मानसी " हो चालेल म्हणाली , आणि दोघे गणपती च्या मंदिरातून बाहेर पडले .

मानसी ला हे सगळं इतकं ऑड वाटत होत . जे काही चाललंय ते आत्ताच्या आता थांबवावं असे तीचं  मन तिला सारखं सांगत होतं . आपण चुकीचं वागतोय . हे अशा  पद्धतीने भेटून प्रॉब्लेम सुटणार नाहीये हे आता तिच्या लक्षात आले  होते . या क्षणाला ती त्याला मी ऑफिस ला जाते असे म्हणून निघूही शकली असती ,आणि तिला हे असच करावंसं वाटत पण होतं . पण तुषार ला वाईट वाटेल या एका कारणसाठी  ती हे सहन करत होती

ह्याचा नाश्ता झाल्यावर लगेच निघून जायचं असे तिने मनातून ठरवून टाकले

दोघे समोरच्या स्नॅक्स सेंटर मध्ये गेले .तुषार ने त्याच्यासाठी मेनू ओर्डर केला . एकंदरीत मानसी खूपच uncomfortable आहे हे तुषार  ला जाणवत होते.

शेवटी तुषार च बोलायला  सुरुवात केली

तुषार " काय ग कसं  करायचं ?तुझं काय म्हणणं आहे ?

मानसी " मी काय बोलू ? मला आता लग्न या प्रकाराचाच कंटाळा आला आहे ." तुषार मी आता निघते मला ऑफिस ला जायचंय.

तुषार " हो तू बोललीस मला तुला ऑफिस ला जायचंय .

मानसी " हो ना . तुषार मी एक गोष्ट माझ्या कडून क्लिअर सांगते . मी माझ्या आई वडिलांच्या शब्दा बाहेर नाही . मी तुला अशा पद्धतीने भेटू शकणार नाही. तुला पाहिजे तर मी आई बाबांना सांगेन कि एखाद महिना कोणाला बघायला बोलावू नका . आणि पाहिजे तर तुझ्या वडिलांना एकदा कॉल करून बघा त्यांचं नक्की काय म्हणणं आहे ते विचारून घ्या असे मी माझ्या आई वडिलांना सांगेन . तोपर्यंत जर तू तुझ्या आई वडिलांना सांगू शकलास तर ठीक नाही तर या पलीकडे मी काहीही करू नाही शकणार .

आज आपण भेटलो हे शेवटचं . जर देवाची इच्छा असेल तर  तोच काय करायचे ते करेल . "

असे म्हणाली आणि  मानसी निघाली तिच्या गाडीकडे . तुषार हि तिच्या   मागे मागे गाडी पर्यंत आला . काही बोलत नव्हता . त्याच्या साठी थोडी  कठीण परिस्थिती होती .दुःख , प्रेम,विरह अशा सगळ्याच भावना एकदम भरून आल्या होत्या . त्याची एक प्रकारची घुसमट होत होती . बिचारा भेदरलेल्या नजरेने मानसिकडे नुसता बघत होता . मानसी ला ते जाणवत हि होते पण ती त्याच्या कडे मुद्दामुन पाहत पण नव्हती . काही वेळा निःशब्द नजर सगळं काही सांगून जाते .

मानसी गाडीवर बसली पण आता एका क्षणातच ती त्याच्या डोळ्यासमोरून नाहीशी होणार होती. ती परत कधी भेटेल , किंवा भेटेल कि नाही याची काहीच कल्पना नव्हती . एक अनामिक भीती दोघांच्या मनातं होती .

ती निघणार तेवढ्यात तुषार ने मानसीला तिचा हात पुढे करायला सांगितला , मानसी ने पण हात पुढे  केला त्याने मानसीच्या हातावर एक गिफ्ट  ठेवले . मानसी म्हणाली " जर मी हे घेतले नाही तर तुला दुःख होईल आणि मी तुला या पेक्षा जास्त दुःख देऊ इच्छित नाही .तुला सांगते ह्या मध्ये जे काही पण आहे ते मी जर तुझी बायको झाले तरच वापरीन . आणि मला बायको करून घ्यायची जवाबदारी तुझी आहे हे लक्षात ठेव , मी त्या क्षणाची वाट बघीन .”

मानसीने ते गिफ्ट पर्स मध्ये ठेवले आणि गाडी स्टार्ट करून ऑफिस ला निघाली .

तुषार तिच्या गाडी कडे बघत होता अगदी ती दिसे नासी होई पर्यंत . जशी ती गेली तशी तुषार जड पावलांनी परत  देवळात आला आणि त्याचं  बाकावर बसला . त्याला त्या बाकावरून निघावसं  वाटत नव्हतं . भर उन्हात तो एकटाच त्या बाकावर बसून विचार करत बसला . यातून काय आणि कसा मार्ग काढावा याच विचार करू लागला . आई ला तो पटवू शकेल कि नाही , जर आई तयार नाही झाली तर ? असा नको त्या विचाराने त्याचे डोकं सुन्न झालं होतं .

मानसी पण ऑफिस ला पोहचली . मानसीचा अवतार बघूनच नायडू सरांना कळले कि आज मानसी ची चांगलीच गडबड आहे .

मानसी  - " हॅलो सर , सॉरी थोडा लेट हुआ "

नायडू सर " its vake mansi . if  want you can go home .you  look tired today .

मानसी " या सर , इट्स व्हेरी बॅड डे फॉर मी "

नायडू सर " today i will see all the clients in detail so there is no work for you. You may leave today”

मानसी आज कामाच्या मनस्थितीत नव्हतीच मुळी . सरांनी एक प्रकारे घरी जायला सांगितले ते बरेच केले

मानसी थोडा वेळ बसली आणि म्हणाली " are  you  serious sir ?

नायडू सर " एस मानसी , you  कॅन गो होम .

मानसी " थँक उ सर .

मानसी  काही विचार न करता ऑफिस च्या बाहेर पडली .

मानसीला कुठं जावं तेच कळेना . तीने  थोड्या वेळासाठी मन:शांती साठी मंदिरात जायचं ठरवलं . actually तिची पाऊल मंदिराकडे च वळली . जसा कि मंदिरातला देव तिला बोलावतोय . देवळाची  ओढ लागल्या सारखी ती मंदिराच्या दिशेने निघाली .

ह्या वेळी मानसी मंदिरात आली आणि डायरेक्ट  मंदिराच्या गाभाऱ्यात गेली . देवा समोर नतमस्तक झाली आणि घराकडे .

नेहमी प्रमाणे प्रदक्षणा घातली . प्रदक्षणा घालताना  ना ति त्या बाकाजवळ आली , आणि बघते तर तुषार त्याचं  बाकावर अजूनही बसलेला . तुषार च तिच्याकडे अजिबातच लक्ष नव्हतं . तो मोबाइलला मध्ये डोकं घालून बसला होता. आजू बाजूला कोण येतंय जातंय याकडे त्याचं लक्ष च नव्हतं . मानसी ने त्याला पहिले . ती त्याला न पाहता  घरी पण जाऊ शकली असती . पण मानसी त्याचं  बाकावर पुन्हा जाऊन बसली .

आणि तुषार ला अजून हे जाणवलं पण नाहीये कि मानसी चक्क त्याच्या शेजारी बसलीय . गेले ५ मिनिट मानसी शांत बसलीय कधी तुषार च्या लक्षात येईल कि ती त्याच्या बाजूला बसलीय

तेवढ्यात मानसीला तिच्या आई चा कॉल आला . मानसीने वेळ न घालवता फोन उचलला आणि आई ला म्हणाली " आई मी आज ऑफिस ला गेले नाही. जरा बाहेरच आहे . काय आहे काम ते मी तुला घरी आल्यावर सांगेन ."

या वेळी मानसीने धडाधड सत्य आई ला सांगून टाकल.

आई  -" हो  मला माहितेय तू आज ऑफिस ला नाहीयेस ते "

मानसी -" कस काय ग ?

आई-  "  अग मला त्या सविताचा फोन आला होता ती म्हणाली तिने तुला मंदिरात बघितली "

मानसी - " ओक, अच्छा "

आई  - " त्यासाठीच मी तुला मगाशी फोन केला होता  तेव्हा पण तू म्हणालीस कि मी ऑफिस मध्ये आहे आणि मागून मंदिरातील घंटा वाजलल्याचा आवाज येत  होता "

मानसी- : "हो ग मी मगाशी पण मंदिरातच होते पण मी एकटी नव्हते त्यामुळेच तर तुला मला नीट सांगता येत नव्हतं "

आई-  " ठीक आहे , ये मग तुझं काम झालं कि ?”

मानसी-  " हो येते थोड्याच वेळात "

मानसी ला बाप्पाने ऑर्डर दिल्यासारखं ती आई ला खर खरं सांगून मोकळी झाली . आता तिला खूप बर वाटत होत . चला एक गिल्ट कमी झालं .

ह्या कॉल च्या आवाजाने तुषार ला कळले कि मानसी त्याच्या बाजूला आहे . आणि काय सांगू त्याची कळी खुलली होती . तो तिथे नाचायचाच बाकी  राहिला होता . तुषार आणि मानसी दोघे एकमेकांकडे बघून  हसायला लागले .

🎭 Series Post

View all