# कादंबरी – मानसी # भाग २५

In this part someone is chasing Manasi from her way back to home

                                                              # कादंबरी – मानसी  # भाग २५

                                                           मानसीचा पाठलाग कोण करतंय

क्रमश: २४

तुषार  आणि मानसीचा कॉल   अजून चालूच होता

तुषार :  “ हॅलो काय झालं ? शांत का झालीस “

मानसी ला एवढी लाज येत होती कि तिला काही बोलावं तेच सुचत नव्हतं .

मानसी -  : ओके , चल फोन ठेवते .

तुषार :  थांब ना  घाई  काय  आहे ?  प्रश्नाचं उत्तर दे कि

मानसी :   नाही रे मला जमणार,  असे भेटणं मला नाही आवडत

तुषार : मला काहीतरी तुला सांगायचंय .

मानसी : घरातील मोठ्यांना सांगून नाही का चालणार ?

तुषार  - हे बघ आता जास्त न विचारता , तू येशील का ते सांग ?बाकी काही नको बोलूस

मानसी- " आज तरी नाही , मी विचार करून सांगेन .”

तुषार " हे बघ हे मी असे भेटायचं म्हणतो त्यामागे काही तरी कारण आहे म्हणूनच तर म्हणतोय .

मानसी " हो पण मी कमीत कमी आईला तरी सांगूनच येईन भेटायला . चालेल का ?"

तुषार " नको ना यार , एकदा मोठी लोक इन्व्हॉल्व्ह झाले कि गोष्टी एकतर पूर्ण ठरतात किंवा पूर्ण बिघडतात .मला ती रिस्क नाही घ्यायची "

मानसी काहीच बोलत नाही. काय बोलावे आणि कसं  त्याला समजवावे हे तिला काळेच ना

तुषार " हॅलो मॅडम एवढा काय विचार करताय ? मी काही पळवून नेणार नाही तुला "

मानसी : इश्श

तुषार " वाह म्हणजे तुला लाजता पण येते वाटतं ?"मला वाटलं फक्त झापतेस कि काय ?

तुषार ने आज तिला भेटण्याचा पाठ पुरावाच लावला होता . तिला जरा पण बोलूच देत नव्हता .

मानसी -" ऐक ना तुषार आज नको , आज माझं अजून खूप काम पेंडिंग आहे "

तुषार " ठीक आहे तुझी इच्छा , आता या पुढे मी काय बोलणार “

मानसी " सॉरी .

मानसीने ऑफिस मध्ये काम आहे असे काहीतरी सांगून त्याला न येण्या साठी पटवले . आणि फोन कट केला . मानसी ला आता एक मन वाटू लागलं कि भेटू का जाऊन त्याला ? काय होतंय ? नक्की त्याचं  काय म्हणणं आहे ते तरी कळेल . एवढा तो मागे लागलाय म्हणजे नक्कीच काहीतरी असेल .

दुसरं मन  असे वाटत कि बाबांना हे नक्कीच नाही आवडणार . बाबा मला नाही पण तुषार लाच झापतील .

तुषार हे काय रसायन आहे याचा थोडा अभ्यास  करायला पाहिजे . तुषारला मानसी खरोखरच आवडली होती , मग प्रॉब्लेम काय आहे ? तो त्याच्या आई वडिलांकडून कडून मानसीच्या घरी होकार कळवून सुद्धा ह्या गोष्टी सुरळीत करू शकतो . पण मग आई वडिलांना नकार देऊन इकडे मानसीला एकटीला का भेटायला बोलावतोय ? नक्की त्याच्या डोक्यात काय शिजतंय हेच कळेनासं झालय .

मानसी बाई तर एकदम  नाका समोर चालणारी मुलगी . ती तिची आई,आणि तिचे बाबा या पलीकडे तिचं असे वेगळं विश्व नव्हतं . या तुन बाहेर पाडण्यासाठी काही तरी डिसिजन घ्यावाच लागणार होता .

 मानसीने थोडं फार काम होत ते  उरकलं आणि घरी जायला निघाली .

नायडू सरांना बाय करून मानसी घरी जायला निघाली . ऑफिस मधून बाहेर आली बघते तर एक मुलगा  क्रीम कलर ची पॅन्ट आणि डार्क ब्लॅक कलरचा शर्ट घातलेला ,असा मुलगा  bike वर हेल्मेट घालून बसलेला . जस कि कोणतरी कोणाला तरी घ्यायला आलाय . तिला वाटलं असेल कोणाचा तरी भाऊ म्हणा किंवा नवरा ,किंवा बॉयफ्रेंड कारण त्यांच्या ऑफिस मध्ये तशा खूप मुली होत्या.

मानसीने त्याला बघितला पण तरीही हेल्मेट च्या नक्की कोण आहे हे तिला कळलं नाही . मानसीने गाडी स्टार्ट केली आणि निघाली घरी . ती जशी गेट च्या बाहेर पडली तसा  तो bike  वरचा मुलगा त्याने पण गाडी स्टार्ट केली आणि निघाला . मानसीला पण हे जाणवलं कि तो तिच्या मागे आहे . थोड्या वेळाने पुढच्या सिग्नल वर तो अगदी तिच्या गाडीच्या शेजारी गाडी उभी करून उभा राहिला . मानसी जरा चरकलीच  . हा काय पाठलाग करतोय का ? कि त्याचा पण हाच रस्ता आहे ? का हा तुषार तर नाही ना ? असे असंख्य प्रश्न तिला पडले .

पण जर तुषार असेल तर तो बोलल माझ्याशी ? एवढा शेजारी येऊन बोलणार नाही असे होणार नाही . म्हणजे हा तुषार नक्की नाही . असा तर्क वितर्क लावत ती घरी पोहचली .

घरी आली , चहा पाणी झाले आणि मग

आई म्हणाली  - " मानसी आपण दोघी आज जरा बाजारात जाऊ या , माझं थोडं काम आहे . "

मानसी म्हणाली " हो चालेल , लगेच निघू , म्हणजे बाबा यायच्या आत घरी येता  येईल "

मानसी ने फक्त ड्रेस change  केला आणि जीन्स टी -शर्ट घालून आई बरोबर बाजारात गेली. आई ला थोडं वाण्याकडून सामान आणायचं होतं , थोडा भाजी पाला आणायचा होता . खरेदी झाल्यावर येता येता  त्यांच्या दोघींच्या आवडल्या आणि ठरलेल्या दुकानातून पाणीपुरी खाऊन दोघी घरी आल्या .

मानसी ला आई म्हणाली  - " मानसी आता  थोडा वेळ अराम कर , मी तोपर्यंत जेवणाचं बघून घेते . मग मी तुला बोलावीन तू भाकऱ्या करून घे . तेवढीच तुझी पण भाकरीची प्रॅक्टिस होईल . "

मानसी पण तिच्या रूम  मध्ये गेली आणि बेड वर पडून होती . थोडा वेळ रिलॅक्स झाल्यावर ती कपडे बदलून किचन मध्ये आली . आई च काम चालू होत . आई ला अचानक विचारु  लागली " आई जर माझं काही चुकलं तर तू काय करशील ?

आई - " हा कसला प्रश्न आहे "

मानसी " असच ग मी विचारते ग ? तसं  मी सगळ्या गोष्टी तुम्हा दोघांना सांगूनच करते . पण इन future  कधी माझ्या कडून काही चुकले ,तर काय होईल अशी भीती वाटते मला”

आई " तू कशाला चुकशील ?

मानसी " म्हणजे अग , मी काही तरी वागले आणि तुम्हा दोघांना ते आवडले नाही तर ?

आई " नक्की काय म्हणायचंय तुला मानसी ? काय चूक झालीय असे तुला वाटतंय ?

मानसी " अंग काही नाही ग ? जस्ट विचारतेय ?

आई " मला नाही असल्या जर तर च्या प्रश्नांची उत्तर देता येंत

मानसी " ठीक आहे "

आई  " मानसी आपली सद्सद्विवेक बुद्धी वापरून जर वागलो तर आपल्याकडून चुका होत नाहीत हे लक्षात ठेव . आणि आम्ही काय शेवटी तुझे आई बाबा आहोत .अगदीच काहि चुकलं तर तुला फासावर लट्कवणार नाही. फार फार तर बाबा तुला ओरडतील , तुझ्यावर रागावतील . "

मानसी ला आज हे असले प्रश्न का पडले होते याची लिंक लागलीच असेल . मानसीला तुषार ला भेटायचं होत . घरी सांगू नकोस हे तुषार च म्हणणं होतं  आणि तुषार शी डायरेक्ट  कॉन्टॅक्ट ठेवू नको हे मानसीच्या आई चं म्हणणं होत

मानसीच मन तुषार कडे ओढलं जात होतं . तिलाही त्याला भेटावं वाटतं  होतं . नाही गेलं तर त्याचं  मन मोडेल . तिला त्याच मन दुखवायचं नव्हतं .

मानसी तुषार ला बाहेर भेटावं का नाही यावरच विचार करत होती . तेव्हा तिच्या मोबाईल वर तुषार च्या मोबाईल वरून एक  मेसेज आला .

"हॅलो , आज बेबी पिंक कलर च्या टॉप मध्ये तू खूप क्युट दिसत होतीस "

हा मेसेज वाचून मानसी ची धडधड वाढली . ह्याने कधी मला पहिले . बेबी पिंक कलर चा टॉप तर तिने आज ऑफिस ला जाताना घातला होता .

मानसीला डाऊट आलाच होता तो bike  वरचा मुलगा तुषारच असावा . पण मग सिग्नल वर शेजारी उभा असताना तो काहीच बोलला का नाही ?मानसी ला या असल्या मेसेज ला काय रिप्लाय द्यावा कळेच ना .

थोड्या वेळाने पुन्हा मेसेज आला

" आणि हो जीन्स मध्ये पण चिकणी दिसत होतीस "

आता मात्र मानसी लै हादरली . काय करू ? ह्याने नक्की च माझ्या मागे जासूस लावले आहेत का हाच जासूस बनून फिरतो माझ्या मागे. ?

तुषार ला दुपारी एवढी बडबड केली एक प्रकारे झापलीच होती मानसी ने त्याला तरी तो असे मेसेज तिला पाठवत होता . मानसी ला  काही कळेना कि ह्याला झापाव का कॉप्लिमेंट म्हणून घ्यावं . कस रिऍक्ट व्हावं हेच कळेना . अशा वेळी कसली सद् सद् विवेक बुद्धी आणि कशी ती वापरायची ?

मानसीने बराच वेळ घेऊन तुषारला रिप्लाय दिला

"असं एखाद्या मुलीवर नजर ठेवणे हे वागणे बरोबर नाही "

तुषार ने लगेच मेसेज पाठवला

" आणि जर नजरेला च ती नजरे समोर हवी हवी शी वाटत असेल तर "

तुषार आता सुटला होता . खर तर त्याची विकेट पडली होती . हे जरा उशिराच कळलं .कारण जेव्हा एखादी मुलगी झाप झाप झापते तरी हि त्या मुलाला तिची बडबड ऐकावीशी वाटणे म्हणजे त्याची विकेट त्यानं टाकलेली असते . तस नसत तर मग मेल इगो जागृत झाला असता आणि तिने झापलं म्हणून तो हि झापून  किंवा भांडून मोकळा झाला असता  किंवा तिचा किस्सा संपवून टाकला असता.

काही गोष्टीआपल्या  हातात नसतात .आणि काही गोष्टी हाताबाहेर जाण्यास वेळ लागत नाही . मानसी आणि तुषार ने हातातल्या गोष्टी हाता बाहेर नेऊन ठेवल्या नाहीत म्हणजे झालं ?

मानसीच्या लक्षात आलं कि तुषार पण तिच्यात गुंतत चालला आहे . मानसीची सद् सद् विवेक बुद्धी तिने जागृत केली आणि तिने ठरवून टाकले कि ह्याला आपण एकदा भेटू ,त्याच काय म्हणणं आहे ते ऐकू आणि मग ठरवू कारण एकदा का इमोशनल attachment झाली कि ती तोडता येणार नाही .

तिने मागचा  पुढचा विचार न करता त्याला मेसेज टाकला

" उद्या मी तुला भेटेन पण कॉफी मी घेत नाही तर कधी आणि कुठे भेटायचं ते मी तुला मेसेज करून सांगेन "

तुषार ने रिप्लाय दिला

"ओके . थँक्स , मी तयार आहे . तू म्हणशील तेव्हा  आणि म्हणशील तिथे "

🎭 Series Post

View all