# कादंबरी – मानसी # भाग २४

In this part Manasi got new Manager and he is facing language problem to communicate

                                                    # कादंबरी – मानसी  # भाग  २४

                                                        हसी तो कुडी फसी !

क्रमश: भाग २३ 

मानसी सकाळी लवकर  उठली . ऑफिस ला जायला छान तयार झाली . आई ने तिच्या आवडीचा डबा करून दिला . मानसी मॅडम निघाल्या ऑफिस ला . जाता जाता तिला फुलांचा बुके घेऊन जायचं होतं . नवीन सर ऑफिस ला पोहचायचं आत तिला पोहचायचं होत .

आज मानसी ऑफिस ला जाताना मंदिरात पण जाणार होती . तिला असे दोन चार दिवसातून एकदा ऑफिस ला जाताना मंदिरात जायची सवय होती .

देवळात गेल्यावर आपण एका पॉसिटीव्ह ऑरा मध्ये येतो आणि आपल्या आजू बाजूला एक पॉसिटीव्हिटी चे वलय तयार होते . हे सर्व दिसत जरी नसले तरी त्याचा नक्कीच परिणाम दिसतो . म्हणून तर आपल्याला पूर्वीपासून परीक्षेला जाताना किंवा चांगल्या कामाला जाताना देवाला नमस्कार करायला सांगतात . घरातील मोठयानां नमस्कार करायला सांगतात . कारण काय माहितेय त्यांचा आशीर्वाद तर आहेच , पण डोकं खाली करा , म्हणजे वाका , म्हणजेच नतमस्तक व्हा , म्हणजेच नम्र व्हा . मी पण सोडून नवीन कामाला जावा तर तुमचं काम नक्की यशस्वी होईल . जर डोक्यात जर हवा असेल कि मीच तो मीच ती कि देव पण आपल्याला तोंडावर आपटवतो .

मानसी नवीन आव्हानं पेलण्यासाठी सज्ज होऊन आई  वडिलांचे आशीर्वाद घेऊन आणि देवा समोर नतमस्तक होऊन ऑफिस ला निघाली .

प्रसन्न मनाने , मानसी ऑफिस ला पोहचली . नेहमी प्रमाणे डायरेक्ट केबिन कडे गेली . बुके आणि तीचं  सामान तिच्या डेस्क वर ठेवलन आणि खाली बॉस ला भेटायला गेली

मानसी  - " गुड मॉर्निंग सर "

बॉस - " गुड मॉर्निंग मानसी , अरे वाह ! You are looking beautiful!!

मानसी " थँक उ सर " सर हमारे डिपार्टमेंट  में नये सर आने वाले है उनका कुछ पता चला क्या ? कौन है ?

बॉस " हा तुझे मेल नहीं आया क्या ? आज ११.०० बजे आयेगा वो "

मानसी " वैसे नाम क्या है उनका ?

बॉस " अरे  सुना है  ज्यादा बडा नहीं है । तामिळनाडू से  आया है । his name is Mr. Varad Raju Naidu.

मानसी " ओके.  सर, जब वो आ जायेंगे आप भी आना केबिन में मैने एक बुके लाया हैं उन्हे डिपार्टमेंट कि तरफ  से वेलकम करेंगे ।"

बॉस " चलेगा ।"

बॉस " अच्छा सुनो मानसी , सुना है कि बंदा  थोडा काम के बारे में स्ट्रीक्ट हैं ।"

मानसी " ओके । ठीक है |सर तो फिर आप आ जाना  उनके साथ ।"

बॉस " ठीक है ।

मानसी केबिन मध्ये आली आणि ऑफिस बॉय ला बोलावून जरा केबिन क्लीन करून घेतली . नवीन बॉस चा डेस्क पण क्लीन करून घेतला .आणि ती तिच्या कामाला लागली .

हळू हळू ११. ०० वाजायला आले आणि नवीन बॉस Mr. Varad नायडू आले ते पहिल्यांदा खाली बॉस च्या केबिन मध्ये गेले . बॉस च्या केबिन मध्ये  एकमेकांशी ओळख करून घेतली . तिथे चहा पाणी पण झाले मग सरांनी मानसीला फोन करून सांगितले कि ते आता वरती त्यांच्या केबिन मध्ये येत आहेत

मानसीने एका ऑफिस बॉय ला मदतीला घेऊन ठेवला होता . त्याच्या हातात बुके देऊन ठेवला होता . पुढील दोनच मिनिटात दोघे वरती केबिन पाशी आले . बॉस ने मानसी ची ओळख करून दिली . मानसीने पण वेलकम सर म्हणत बुके दिला .

बॉस  ने त्यांना  सांगितले " मानसी हमारी पुरानी एम्प्लॉयी है । पुरा डिपार्टमेंट अच्छे से हॅन्डल करती है ।"

नायडू " वके सर , आय गॉट इट "

त्यांच्या भाषेचा लहेजा ऐकून मानसीला पटकन हसूच आलं. प्रसंगाच भान राखून कसं बस तोंडावर रुमाल ठेवून हसू रोखलं.

मानसी ला जेव्हा पण सर काही बोलत मानसी ला हसायला यायचं

थोडक्यात नायडू साहेबांचा भाषेचा मेजर प्रॉब्लेम होता . हिंदी सुद्धा तोडकी मोडकी येत होती .आणि इंग्लिश येते पण त्यांचा उच्चार आणि आपला उच्चार या मध्ये बराच फरक होता . थोडक्यात त्यांच्याशी संभाषण करणं म्हणजे महा कठीण काम होत .

बॉस ने त्यांना त्यांची बसायची जागा दाखवली आणि खाली निघून गेले .

मानसी ला म्हणाले "सर को अपने डिपार्टमेंट के बारे में  सब बता दो ।"

मानसी ने भी मुंडी हिला के  जवाब दे दिया ।

थोडा वेळ  सगळीकडे शांतता . कोणाचं कोणाशी बोलत नाहीये .

शेवटी मानसी ने सुरुवात केली

मानसी  - " सर मैने आपको मेल भेजा है उसमे   सब क्लायंट लिस्ट है ।

नायडू सर " वके , मान्सी "

मानसी ला जेव्हा पण सर काही बोलत मानसी ला हसायला यायचं

तोपर्यंत  जेवणाची वेळ झाली . मानसी  त्यांना कॅन्टीन ला घेऊन गेली . कॅन्टीन मध्ये ओळख करून दिली . त्यांच्या जेवणाची सेटिंग लावून मानसी जेवायला बसली .

जेवता जेवता तिने आई ला फोन करून सांगितलें  असे असे नवीन बॉस आलेत  .त्यांचं नाव वरद राज नायडू . बहुतेक तामिळनाडू चे आहेत . त्यांना मराठी तर सोड हिंदी पण तोडकी मोडकी यते .

आणि आई ग ते इतके फनी उच्चर करतात ना कि हसायलाच यते . ओके  ला वके म्हणतात , मानसी ला मांसी म्हणतात बोलता बोलता मानसी खूप हसत होती

आई म्हणाली  " वरद म्हणजे माहिते का ? तुझे आवडीचे गणपती बाप्पा . म्हणजे साक्षात तामिळनाडू वरून  बाप्पा तुला भेटायला आले बघ ."

मानसी  -  " आई तुझं आपलं काही तरीच "

आई " अग,सांगण्याचा उद्देश असा कि कोणाच्या हि भाषेवरून, रंग ,रूपा  वरून कोणाला हसू नये . प्रत्येक माणसाचे कर्तृत्व  बुद्धीवर असते  . Give respect & take respect.

मानसी ची आई तिला वेळो वेळी चांगलं मार्गदर्शन करत असे त्यामुळे तिच्या कडून काही चुकण्याची शक्यता च नसायची. आणि मानसी पण एखाद्या लहान मुलासारखं आई शी गप्पा मारायची . आईशी तर ती हल्ली मैत्रिणी सारखीच वागायची . आणि शिवाय घरात  एकच मुल असलं ना कि आई वडील पण त्यांच्या प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व्ह होतात .

कुठेतरी मानसीला आई च म्हणणं पटलं होतं . जसा तिच्यासाठी हा बदल मोठा आहे तसाच नायडू सरांच्या आयुष्यात पण मोठा बदल आहे . त्यांची पण प्रमोशन च्या नावाखाली कंपनीने बदली केली होती . म्हणजे सध्या ते पण त्यांच्या कंफर्ट झोन च्या बाहेर आहेत . तर त्यांना जास्तीत जास्त कसं अनकंफर्ट मधून कंफर्ट करायचं हे सध्या तरी मानसी च्या च हातात होतं . न जाणो उद्या रामदास  सरं सारखी यांच्याशी पण ट्युनिंग जमली तर काम करायला पण मज्जा येईल.

मानसीच्या लक्षात आलं कि आईला मी त्यांना हसलेलं अजिबात आवडलं नाहीये आणि फोन ठेवते म्हणाली . आणि मनातल्या मनात पुन्हा हसली " वके "

अशा प्रकारे  नवीन बॉस चे  मानसीच्या ऑफिस मध्ये आगमन झाले आणि मानसी च्या लक्षात आले कि आता इथल्या ऑफिस ची धुरा एक प्रकारे सध्यातरी तिच्याच हातात आहे . कारण  इकडच्या  सर्व क्लायंट ला रामदास सरांची आणि मानसीची सवय झालेली होती . नायडू सरांशी सर्व क्लायंट च tuning  जुळे पर्यंत डिपार्टमेंट ची धुरा तिलाच सांभाळायची होती.म्हंणजे डबल काम असा विचार करून ती पटपट जेवून कामाला लागली

संध्याकाळचे ४ वाजायला आले होते . मानसीने नायडू सरांना चहा हवाय का विचारून तिला आणि सरांना चहा मागवला . पण म्हणावं तसं interaction होईना . कारण तेच जो माणूस काल पर्यंत त्याच्या रिजिनल भाषेत बोलून पटपट कामं उरकत होता त्याला आज बोलायला शब्द शोधून बोलावे लागत होत .त्यामुळे शंका असली तरी काय विचारवं हा प्रश्नच नाही का ?जसं कि भारतीय माणूस जर जर्मनीत गेला तर त्याला जर्मन माणसाशी बोलायला प्रॉब्लेम होतो कारण जर्मनी मध्ये लोकांना इंग्लिश भाषा सुद्धा तोडकी मिडकीच येते . ते लोक कंपलसरी जर्मन भाषेत च बोलतात . आपल्याला त्याचं काही कळत नाही आणि आपलं त्याला काही कळतं नाही . आपल्या तोडक्या इंग्लिश ला तो कसा बसा समजून घेऊन काही तरी उत्तर देतो . नायडू सरांचं आणि मानसीचा प्रॉब्लेम या पेक्षा काही वेगळा नव्हता .

ऑफिस सुटायच्या आधी मानसीला तुषार च्या नंबर वरून कॉल आला . मानसीला खरं तर त्याचाशी बोलण्यात काही इंटरेस्ट वाटत नव्हता . कारण आईने तिला कालच सांगितलं होतं कि त्यांच्या कडून नकार आलाय . तरीही तो सारखा कॉल का करतोय काय माहित ?. मानसीला आता त्याचा चॅप्टर च संपवून टाकावा असे वाटू लागल . असे वाटत होत कि त्याला खडसावून विचारावं कि तू असा असा का वागतोयस . गाढवा जर घरातून हो म्हणालास तर रीतसर तुझी बायको होईन कि , तेवढं सोडून कॉफी ला काय बोलवतोस . त्याचा फोन उचलू का नको असं मनात चालू होतं . तेवढ्यात नायडू सर मागून म्हणाले

" मांसी योर मोबाईल इज  रिंगिंग "

मानसी-  " येस सर ,shall I take  it ?

नायडू सर " शोर मांसी take it "

शेवटी मानसीने फोन घेतला

तुषार " हॅलो "

मानसी " हॅलो "

तुषार " झालं  का काम "?

मानसी " नाही अजून आहे बाकी थोडं "

तुषार " आज भेटायला जमेल का तुला ?"

मानसीला अशी तिडीक गेली ना डोक्यात . काय फालतूगिरी आहे

मानसी  -   " का रे ? काही काम होत का ?

तुषार -  " नाही असच , भेटलो असतो , गप्पा मारायला "

मानसी -  " हे बघ तुषार , तू मला काय समजतोस हे मला माहित नाही . पण तुला मी सांगते , मी तुझी बाल मैत्रीण नाहीये . ना आपण स्कूल किंवा कॉलेज चे मित्र मैत्रीण आहोत . तू कदाचित विसरला असलास तर तुला सांगते २० दिवसांपूर्वी तू मला बघायला आला होतास तेव्हा मी तुला आणि तू मला आयुष्यात पहिल्यांदा एकमेकांना पाहिलं . त्या प्रोग्रॅम मध्ये हि तू चुप्पी साधली होतीस . त्या नंतर २० दिवस उलटून गेले तुमच्या कडून माझ्या घरी एकही कॉल आलेला नाही . मुलगी पसंत आहे किंवा नाही हे सुद्धा कळवायची तुम्ही किंवा तुमच्या घरच्यांनी तसदी घेतली नाही . माझे आई वडील बिचारे वाटत बघत होते . शेवटी त्यांनी बाबांचा मित्र जे तुझ्या वडिलांचे पण मित्र आहेत त्यांना मध्यस्थी घेऊन तुझ्या घरी कॉल करायला लावला . तेव्हा तुझ्या आई ने मला अजून कोणी भाऊ किंवा बहीण नाही   , मी एकुलती एक आहे या  कारणामुळे नकार दिला . हे सर्व मला कालच कळले .   तू मला आज सहज कॉफी घ्यायला येतेस का ? असे विचारूच कसे शकतोस ?

आणि हे सगळं कळल्यानंतर मी तुझ्या बरोबर कॉफी घ्यायला येईन  असे वाटते का तुला ?

तुषार -  " अग  हो ...हो... किती ओरडतेस ? अजून मी तुझा नवरा झालेलो नाहीये ?

मानसी एकदम शांत झाली. actually  जरा लाजली,ओशाळली आणि हसली .

हसी तो कुडी फसी !

🎭 Series Post

View all