# कादंबरी – मानसी # भाग २३

in this part we are trying to understand tushar

                                                                # कादंबरी – मानसी  # भाग  २३

                                                                       तुषार एक मृगजळ

क्रमश: भाग २२ 

मानसी दुसऱ्या दिवशी जरा उशिराच उठली . रात्री च्या रात्रींत तिने  एखाद्या इन्वेस्टीगेशन ऑफिसर सारखी  तुषार ची केस सोडवली  होती ..

सकाळी उठली आणि सर्व आवरून घेतले आणि आई ला म्हणाली " आई मी त्या समोरच्या काकूंना कडून काल  घेतलेले टॉप्स अल्टर करून आणते . तुझी साडी नेऊ का पिको फॉल साठी .

जाताना आई ची पण साडी घेऊन गेली .

 मानसी च्या  डोक्यात आता ऑफिस चे विचार सुरु झाले  . उद्या पासून नवीन बॉस च जॉइनिंग होणार होते . शेवटी फर्स्ट  इम्प्रेशन इस द लास्ट इम्प्रेशन . तिच्या डोक्यात प्लनिंग सुरु झालं होतं . मानसी चे सगळे रिपोर्ट्स तयार होते . त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता . कारण रामदास सर जाता जाता सर्व रिपोर्ट्स ची कॉपी त्यांच्याकडे घेऊन गेले होते . त्यामुळे  as on today सर्व डेटा रेडी होता .

इतक्यात मानसीला तुषार चा  फोन  आला . मानसीने फोन पटकन उचलला . कालच्या घटनेमुळे आता त्यांच्या दोघांमध्ये एक प्रकारचा ऑकवर्ड पणा होता तो निघून गेला होता . कारण मानसीने क्षणाचाही विलंब न करता कॉल उचलला .

तुषार "हॅलो "

मानसी " हॅलो , तृप्ती आली का घरी ?"

तुषार "हो आत्ताच मीच घेऊन आलो तिला "

मानसी "गुड "

तुषार " हॅलो , ऐक ना , थँक उ सो मच "

मानसी "थँक उ काय ? "

तुषार "मला तर काही कळतच नव्हतं ? काय करावं ते ?"

मानसी " तृप्ती ची काळजी घे , ती लहान आहे अजून "

तुषार "हो ना , अग  इकडे आई बाबा पण नसतात , ती खूप हट्टी आहे . जर तीचं  मी काही ऐकलं नाही कि लगेच नाराज होऊन बसते"

मानसी "हो का ? अच्छा ! "

तुषार "मी आता आई ला सांगून तिला  गावालाच पाठवणार आहे "

मानसी "ओके "

तुषार "मानसी काल  मी खूप घाबरलो होतो . थँक्स यार तू मला समजून घेतलंस आणि मदत केलीस "

मानसी अजून हि थोडं हातचं राखूनच बोलत होती . तिला तसा तुषार च्या स्वभावाचा अंदाज नव्हता .

मानसी "पण काल नक्की कशावरून चिडली होती ती ? मला पण भेटायला ये म्हणून मागे लागली होती "

तुषार "  काही विचारू नकोस ? सांगेन तुला कधी तरी "

तुषार हि जरा कॉम्प्लिकेटेड विषय टाळायचा प्रयत्न करत होता . किंवा त्याला काल नक्की कशामुळे तृप्ती चिडली होती हे तो  मानसील सांगू शकत नव्हता . ऑलरेडी  तुषार चे इम्प्रेशन मानसी समोर उलटे पडले होते . काही वेळा माणूस करायला जातो एक आणि होतं एक . तसेच काहीसं झालं  होतं त्याच .  त्यामुळे सध्या शांतच राहावं असा विचार करून .जरा काळजी पूर्वक बोलत होता किंवा कोणतेही असा विषय टाळत होता कि ज्याने मानसीला ऑकवर्ड होईल .

मानसीला मात्र तृप्ती  ला का तिला भेटायचं होतं हे जाणून घ्यायचं होतं ?

मानसी " अरे फक्त तिला मला का भेटायचं होतं हे तरी सांग "

तुषार " कसं सांगू ? तेच कळत नाहीये ग ? तुला कदाचित नाही आवडणार ?

मानसी " एवढं काय ?

तुषार "आपल्या लग्ना बद्दल आहे . ?are you  comfortable to talk on  this topic .

मानसी एकदम शांत झाली . एक दोन मिनिट वाट बघून शेवटी तुषारच बोलला

तुषार " म्हणून तर मी बोलत नाहीये या विषयावर . मी कालच्या घटने वरून तुला एवढं तर नक्की  ओळखलंय  . काल तू बोलताना काही लाजत नव्हतीस , उलट एका क्षणात प्रॉब्लेम काय आहे हे समजून त्यावर सोलुशन काढण्यास सुरुवात केलीस . स्वाती ला तू कडक शब्दात बोलून , पोलिसात जाणार आहे असे सांगून सत्य तिच्या कडून काढून घेतलेस ? ग्रेट ! यावरून तू ऑफिस च्या कामात किती परफेक्ट असशील याचा मला चांगलाच अंदाज आलाय "

मानसी आपलं ऐकत होती

 तुषार "मुख्य म्हणजे कारण नसताना'तुला या प्रकरणात ओढलं होतं . मला  एवढंच माहित होतं  कि ती आज तुला भेटणार होती . मी तिला बराच वेळ शोधली आणि  शेवटी लास्ट चान्स घ्यावा म्हणून तुला कॉल केला . मला खरंच इतकं ऑड 'वाटत होतं तुला कॉल करायला . पण पोलिसांकडे जायच्या आधी नक्कीच एकदा तुझ्याशी बोलून घ्यावं "

मानसी "ओके . ठीक आहे . नो नीड तो गिव्ह एक्सप्लिनेशन "

मानसी "ओके  मग बाय , घे काळजी तृप्ती ची . बाय

तुषार "ओह ! यस , नक्की , थँक्स वन्स अगेन .

मानसी टॉप्स  अल्टर करून घेऊन घरी आली .

आई किचन मध्ये काम करत होती . मानसीने आईला काल  घडलेला सगळा सर्व किस्सा सांगितला . आई तर अवाकच "काय ग ! काय सांगतेस काय ? तरी पण तू तुषार आणि तृप्ती च्या कॉन्टॅक्ट मध्ये जास्त राहू नकोस . त्या फॅमिली कडून तिच्या आई ने नकार दिलाय .  तुला अजून कोणी भावंडं नाही या मुद्द्यावरून .

मानसी " हो का.. मला तसा  अंदाज आला च होता . कारण जर होकार यायचा असता तर केव्हाच आला असता . पण ह्या दोघांचं काय कळत नाही. तो हि मला म्हणतो तू मला भेटशील का ?

ती हि म्हणते भेटशील का?

असं त्यांनी करायला नको नाही का ?

आई "हो ना , म्हणूनच तर म्हटलं , जास्त कॉन्टॅक्ट मध्ये राहू नकोस .जर तुषार चा पुन्हा फोन आला तर त्याला सांग जे काही बोलायचं ते माझ्या वडिलांशी बोल "

मानसी " हो चालेल आई "

आई ने मानसीला डायरेक्ट सांगूनच टाकले कि त्यांचा नकार आलाय .

मानसीला योग्य वेळीच सत्य कळले ते बरे झाले कारण कदाचित अजून एक दोनदा  तुषार चा कॉल झाला असता तर ती मैत्रीण म्हणून  त्याला भेटायला सुद्धा तयार झाली असती .

एकंदरीत पाहता तुषार हा एक मृगजळ होता . मुलगा शिकलेला आहे , दिसायला चांगला आहे ,नोकरी चांगली आहे .पण एक तर त्याचा त्याला निर्णय घेता येत नाहीये . अरे बाबा, बोल एकदा हो का नाही ? हो असेल तर पुढचं बोलू , नसेल तर विषय कायमचाच संपला . इतकी साधं सरळ आहे . कशाला उगाच दुसऱ्याला अडकवून ठेवायचं ? अजिबातच ट्रान्स्परन्सी नाही . १५ दिवसाची वेळ मागून घेतली तर मग १५ नाही पण २० दिवसांनी तरी कळवलं पाहिजे कि नाही मुलीकडच्यांना . आई वडिलांनी तरी  काही नियम पाळले पाहिजेत कि नाही ? मुलाची आई बोलली कि अजून दुसरी स्थळं पाहू म्हणजे नकार कळवला तर ह्या मुलीचा  ऑप्शन  कायमचा बंद होईल ते पण नकोय . म्हणून काही कळवायचे च नाही . हे योग्य आहे का ?

हि विचारसरणी माणसाला स्वार्थी बनवते , उद्या त्यांना पण एक मुलगी आहे .यावरून तरी दुसऱ्याच्या मुलीला किती लटकवत ठेवावी ह्याचा विचार करावा ना .

मुळात आई वडीलां नी पण मुलांना प्रॉपर गायडन्स दिला पाहिजे . मुलं  जर चुकत असतील तर त्यांनी त्यांना मार्ग दाखवला पाहिजे .

मानसी जरा  मनातून वैतागलीच होती . आता पुन्हा कोणतरी दुसरा मुलगा येणार , पुन्हा  साडी नेसून उभे राहायचं ? पुन्हा तेच आणि होकार येई पर्यंत वाट पाहायचं .

तिला तर उद्या ऑफिस ला जायला पण कंटाळा आलं होता . नवीन बॉस , नवीन बॉस ला समजून घ्या , आपली कामाची पद्धत , त्यांची कामाची पद्धत याचा मेळ  बसवायचा .

बदल हा असाच असतो . जेव्हा जेव्हा आयुष्यात मोठा बदल होणार असतो तेव्हा तेव्हा एक स्वतःशी संघर्ष असतो . कारण आपण आपल्या कम्फर्ट झोन च्या बाहेर जात असतो . आणि कोणालाही कम्फर्ट झोन सोडायचा नसतो . एकदा का कंफर्ट झोन सुटला कि ऑटोमॅटिक डिसकंफर्ट सुरु होतो . आणि तेच तर नको असत . पण हे हि तितकाच खरं आहे कि जोपर्यंत तुम्ही तुमच्या कंफर्ट झोनच्या बाहेर येत नाहि तोपर्यंत प्रगती होत नाही .

मानसीच्या आयुष्यात सध्या काहीच स्थिर नाहीये . लग्नाचं काही फिक्स होत नाहीये ,ऑफिस मध्ये पण बॉस बदलल्या मुळे मोठा बदल होतोय . आणि या दोन्ही  बदलांमुळे मानसी तिच्या कंफर्ट झोन च्या बाहेर आली होती त्यामुळेच ऑटोमॅटिक ती अनकंफरटेबल झाली होती .

इतक्यात मानसीला ऑफिस मधून कॉल आला.

"हॅलो मानसी मी HR DEPT मधून सीमा बोलतेय, "तू उद्या येणार आहेस ना ऑफिस मध्ये ?"

मानसी "हो नक्कीच येणार आहे "

सीमा " ओके चालेल , मला रेखा मॅम नि तू उद्या येणार आहेस कि नाही हे चेक करायला सांगितले होते "

मानसी "ओके , मॅम  ला सांग मग मी येणार आहे ."

सीमा "ओके , बाय "

आता पर्यंत कधीच रजे वर असल्यावर उद्या येणार आहे कि नाही कोणी कन्फर्म केलं नाही .आजच का? हा प्रश्न होता . बहुदा नवीन मॅनेजर येणार आहे त्यासाठी असावे  .

मानसीने  त्यांच्या घर जवळ  एक फुल वाला होता त्याला एका मोठ्या बुके ची ऑर्डर दिली . म्हणजे नवीन बॉस ला इथल्या डिपार्टमेंट कडून वेलकम केल्या सारखं होईल . खरं तर आत्तापर्यंत तिला मेल यायला हवा होता कि कोण नवीन मॅनेजर आहेत . पण का कुणास ठाऊक उद्या त्यांची यायची वेळ आली तरी मानसीला कळले नव्हते कि नक्की कोण मॅनेजर आहेत . मानसी त्यांना ओळखते का नाही ओळखत ते उद्याच कळेल .

🎭 Series Post

View all