Feb 22, 2024
विनोदी

# कादंबरी – मानसी # भाग २१

Read Later
# कादंबरी – मानसी # भाग २१

                                                              # कादंबरी – मानसी  # भाग  २१

                                                                मानसीचा एक उनाड दिवस

मानसी का तो पुरा सिस्टम हिल गया रे !

तृप्ती ने कॉल तर कट केला आणि बाकी सगळं मानसीवर टाकून मोकळी झाली . मानसी पुन्हा धर्मसंकटात . तृप्ती ला भेटण्यात तिला काहीच प्रॉब्लेम नव्हता , पण कारण  नसताना आई वडिलांशी  खोट  बोलणे इथे प्रॉब्लेम होता . मानसी विचारात पडली काय करावं हेच तिला कळे ना .ती किचन मध्ये आली . आई ला म्हणाली " आई मी पोळ्या करू ?

आई " अरे वाह ! तुला करवश्या वाटल्या हेच भरपूर आहे बाळा. पण आज तुझी सुट्टी आहे ना तर तू आज आराम कर "

मानसी " मानसी च्या डोळ्यातून टचकन पाणी आले . इतका माझा विचार करणाऱ्या आईला मी फसवून तृप्ती ला भेटायला का जाऊ ?"

आई " मानसी काय झालं ग ?

मानसी " काही तरी डोळ्यात गेलं " आई मी आलेच डोळे धुवून

आई " तू आराम कर . आज दुपारी बाबा लवकर येणार आहेत म्हणाले मानसी घरी आहे तर संध्याकाळी कुठेतरी जायचा प्लॅन करू "

मानसी " हो चालेल मी जाऊन पडते मग "

मानसी रूममध्ये आली आणि तिने ठरवून टाकले तृप्ती , तुषार हे सगळे आई वडिलांनंतर . त्यामुळे त्यांना  फसवून किंवा अंधारात ठेवून ती तृप्ती ला भेटायला जाणार नाही .

हीच खरी प्रेमात ताकद असते . समोरच्या व्यक्तीचे आपल्यावर किती प्रेम आहे याची जाणीव असली तर आपण त्याला कधीच दुखवू शकत नाही . हे काही बंधन नसते . त्या व्यक्तीला आपल्या मुळे दुःख होऊ नये हि जाणीव तेच प्रेम देत असते . आणि न जाणता आपण पण त्या प्रेमाच्या बदल्यात प्रेम देत असतो .

मानसीला आपले आई वडील आपल्यावर किती प्रेम करतात याची जाणीव तर होतीच पण तिचेही त्यांच्यावर अतोनात प्रेम होते . आणि हे प्रेमाचे बंधन अधिक घट्ट होत होते.

पण तृप्ती च काय ?

ती मंदिरात येणार होती . तिची वाट बघणार होती .

तिला क्षणाचा हि विलंब न करता तृप्ती ला मेसेज पाठवला

“हॅलो  डिअर  तृप्ती , सॉरी  अग मी आई वडिलांना न सांगता तुला भेटायला नाही येऊ शकत , तुला पाहिजे तर तू माझ्या घरी केव्हाही ये , माझे आई वडील पण आपल्या बरोबर असतील . ते नक्कीच चांगला मार्ग दाखवतील . राग मानू नकोस . कोणत्याही नात्याची सुरुवात खोट्या पासून मला करायची नाहीये .”

मानसीने पुन्हा पुस्तकात डोकं खुपसलं .

स्वतःच्या निर्णयावर मानसी च खूप खुश होती . जर तुषार ला एवढा खरोखरच इंटरेस्ट असेल तर त्याने त्याच्या आई वडिलांना आधी सांगितलं पाहिजे . आणि तो जर असे न करता मानसीला डायरेक्ट कॉल करत असेल तर तो चुकतोय आणि त्याचा अशा वागण्याने तो अजाणता त्याच्या आई वडिलांना फसवतोय . आई वडील हे काही दुश्मन नसतात . ते जर एखाद्या गोष्टीला विरोध करत असतील तर त्याला काहीतरी कारण असणार किंवा त्यांचा अनुभव असतो . त्यांचा अनुभव चुकीचा हि असू शकतो किंवा आपल्याला न पटणारा असू शकतो  पण मग आपलं मुद्दा जर १००% बरोबर आहे तर खोटं बोलायचं प्रश्नच नाही . ते त्यांना पटवून द्या . किती सोप्प आहे गणित .

गणित सोप्प असले तरी सोडवायला गेलं कि चुकण्या ची शक्यता नाकारता येत नाही . आणि एक गणितात स्टेप बाय स्टेप जायचे असते . एक ज री स्टेप चुकली तरी उत्तर चुकू शकते.

मानसी च आयुष्याचं गणित खूप चांगलं होतं ती ते गणित अधिक गुंता गुंत ना करत स्टेप बाय स्टेप व्यवस्थित सोडवत होती

मानसीने आता मनातून तुषार चा आणि तृप्ती चा विचार कायमच  काढून टाकायचा ठरवला . हे एक प्रकारे उत्तमच झालं कारण तसेही त्यांच्याकडून होकार येणार नव्हता हे चित्र पण हळू हळू पुढे येत होते .

बाबा म्हणतात तसं  मानसीचा राजकुमार कोण आहे आणि कुठं आणि देवास ठाऊक .

इतक्यात बाबा आज दुपारीच जेवायला आले .

मानसी " अरे वाह ! बाबा आज लवकर ?

बाबा " हो तुला आई बोलली नाही का ? आज आपण सिटी मध्ये जाणार आहोत .

मानसी " हो बोलली ना ...वाह !

बाबा " तुमचं दोघींचं शॉपिंग करू , आणि मग येताना  हॉटेल मध्ये जेवायला जाऊ

मानसी " सही "

बाबा " हो चालेल , चला मग आवर लवकर "

मानसी खूप excite झाली आणि पटापट आवरायला गेली .आई ला किचन मध्ये मदत करायला लागली .

मानसी बाबा आणि मानसीची आई जेवणं  आटपून , बाहेर फिरायला  सिटी मध्ये गेले . मानसी ला आणि मानसीच्या आईला  शॉपिंग करायला नेलं . मानसीने ऑफिस वेअर दोन चार टॉप्स घेतले . त्याच्या वर मॅचिंग इअरिन्ग्स घेतले . मानसीच्या आईला पण एक पार्टी वेअर साडी घेतली , बाबांनी त्यांची शॉपिंग केली .जे जे हवे ते सर्वांनी घेतले .

चालून चालून थकल्यावर तिघे एका हॉटेल मध्ये गेले . तिघांना भूक लागली होती . हॉटेल मध्ये गेल्यावर मानसीने चार्ज  घेतला . मेनू कार्ड आईला अख्खा वाचून दाखवला . हे नको ते नको करत करत शेवटी नेहमी प्रमाणे पावभाजी  फायनल झाली. बाबांचा मेनू नेहमीच ठरलेला असतो .ते नेहमी उडीद वडा  संभार च खातात . तिघांनी भर पेट खाल्लं आणि त्यावर २/३ मँगो मिल्कशेक घेतला .

आई च शॉपिंग अजून थोडं बाकी होत पण तिघेही आता खाल्ल्यावर घरी जायच्या गोष्टी करु  लागले . मानसी पण म्हणाली " आई आपण आता जाऊ घरी . जाई जाई  पर्यंत १ तास लागेल .

असे म्हणता म्हणता तिघांची स्वारी घराकडे निघाली.

येताना जरा ट्राफिक लागलं त्यामुळे त्यांना यायला उशीर झाला . मानसी ला झोप यायला लागली . आई ला पण कंटाळा आला . बाबा आपले गाडी चालवत होते . त्यांना आता घरच्या चहाची तलफ आली होती .  फायनली ते घरी आले . घरात आल्या आल्या बाबा मानसीला

" मानसी एक कप चहा टाक ,

मानसी ची आई " मानसी मला पण एक कप चालेल ग "

मानसी हातपाय धुवून किचन मध्ये गेली आणि चहा टाकायला गेली

चहा करता करता तिच्या डोक्यात विचार घुटमळत होता . तृप्ती वेळेत घरी गेली असेल ना .

गरम गरम आल्याचा चहा तिघांनी प्यायला . आणि आजचा दिवस संपवला . तिघेही झोपायला आपापल्या  रुम मध्ये गेले.

मानसीने  घेतलेले टॉप्स एकदा घालून बघितले. कोणता टॉप ला किती  फिटिंग  करायचंय हे बघितले . सर्व झाल्यावर तिने मोबाइल हातात घेतला  दिवस भर बाहेर असल्याने चार्जिंग नव्हता .

ती चा फोन कॉम्प्लेटली ऑफ झाला होता . तिने चार्जिंग ला लावला आणि चालू करून घेतला . फोन ऑन केल्यावर धडा धड मेसेजेस येऊ लागले . ती मेसेजेस चेक करु लागली . तेव्हा तिला कळले १० मिस्ड कॉल तेही तुषार च्या नंबर वरून .

मानसी ला काय करावे कळे ना . आता रात्रीचे १० वाजून गेलेत  इतक्या उशिरा त्याला कॉल केला तर कसं वाटेल .

तिला काय करावं ते काळे ना . शेवटी ती धावत धावत बाबांकडे गेली

" बाबा ओ  बाबा , झोपलात का ?

बाबांना आता actually  ब्रह्मानंदी टाळी लागणारच होती . पण मानसी इतक्या जोरात जोरात धावत आली म्हणून उठले

बाबा " बोल ग काय झालं ?

मानसी ने सांगितले " बाबा काहीतरी प्रॉब्लेम आहे माझ्या नंबर वर तुषार च्या मोबाइल वरून  चक्क १० मिस्ड कॉल आलेत

मानसी "बाबा तुम्ही आधी फोन करून विचार काय प्रॉब्लेम झालाय "

 

बाबा "अग  काय झालय नीट सांगशील का ?"

मानसी " बाबा मला मगाशी तृप्ती चा फोन आला होता "

बाबा " कोण तृप्ती? "

मानसी ची आई आणि बाबा अवाक झाले हि काय बोलतेय तेच कळे ना त्यांना

मानसी : मी सगळं नीट सांगते तुम्ही आधी या नंबर वर कॉल करून विचारा कि काय प्रॉब्लेम झालाय का ?

बाबा " नाही मी असा कॉल नाही करू शकत . तू आधी मला नीट सांग “

मानसी " ओके. सांगते मगाशी मला तृप्ती म्हणजे तुषार ची बहीण ही चा फोन आला होता . तुषार म्हणजे गेल्या आठवड्यात आलेले स्थळ त्यांची मुलगा .

तिने मला  भेटायला गणपतीच्या मंदिरात भेटायला बोलावले होते ते हि तुम्हा दोघांना न सांगता ये असे म्हणाली . मी तिला सांगितले तू घरी ये . मी भेटायला येऊ शकते पण मी आई बाबांना सांगूनच येईन . त्या नंतर माझा तिचा काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही . मग आपण गेलो फिरायला .

आत्ता मोबाईल तर बघितले तिच्या भावाचे १० मिस्ड कॉल आहेत .

बाबा :” काय चाललंय काय कळतनाही बुवा , ह्या दोघांकडे  तुझा मोबाईल नंबर कसा आला “

मानसी " मला काहीच माहित नाहि “

बाबा " बाबा तुम्ही आधी कॉल करा मला त्या मुली साठी काळजी वाटत आहे

बाबा " ओके.

बाबांनी मानसीच्या  मोबाइल वरून तुषार ला फोन लावायला घेतला.

 

क्रमश:

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//