Feb 22, 2024
विनोदी

# कादंबरी – मानसी # भाग २०

Read Later
# कादंबरी – मानसी # भाग २०

                                                                         # कादंबरी – मानसी  # भाग   २०

                                                                                   बाबांचा मुड का गेलाय

मानसीने सुट्टी घेतली म्हणजे आई ला जणू काही सण असल्या सारखा वाटतो . आई ने लगेच उद्या काय मेनू करायचा याचं प्लँनिंग सुरु केलं .आई  मानसीला म्हणाली  " मानसी  बऱ्याच दिवसांनी उद्या घरी आहेस तर ये इकडे तुझ्या डोक्याला छान तेल लावून मालिश करते . "

 

मानसी " वाह ! मला ऐकूनच छान वाटतंय . किती तरी दिवसात हा योग नाही आला ग ? तुझा हात नुसता डोक्यावर पडला तरी बरं वाटतं ".

 

मानसीला आई च्या  हाताचा हेड मसाज खूप आवडतो . हे मानसीच्या आईला पण माहित होते . ती तिला तेल लावायला घेणार तेवढयात बाबा आले . मानसीची आई एकदम उठलीच अगो बाई हे आले पण अजून आमटी ला फोडणी घालायची राहिली आहे ती मानसी ला म्हणाली " आता राहू दे मी जेवण झाल्यावर तेल लावीन तुला "

 

मानसी पण म्हणाली : "हो चालेल "

आई किचन मध्ये गेली . बाबांना पाणी देतानाच त्यांच्या मुख कमला कडे बघताच आई साहेबांना , बाबा साहेबांचं काहीतरी बिनसलंय हे लगेच लक्षात आलं .

सध्या काही न बोलता जेवणा  नंतर बोलू आणि मानसीच्या आई ने आमटीला फोडणी दिली .

मानसी ने   जेवणाची  पानं घेतली . आणि आमटीला उकळी फुटल्या फुटल्या आई ने जेवणं वाढायला घेतली . बाबा पण लगेच जेवायला बसले.आज बाबा जरा शांतच होते . पण मानसी खूप गप्पा मारत होती. दोन दिवसाच्या सुट्टी घेण्याचे ठरवल्या पासून मानसी जरा रिलॅक्स झाली होती . मध्ये मध्ये ऑफिस च्या गप्पा मारत होती . आई तिला हो का ? अरे वाह !  अगो बाई ! अश्या reaction देत होती. बाबा जेवताना तसेही फार बोलत नाहीत त्यामुळे मानसीला काही त्यांच्यात  फरक जाणवला नाही .

 

जेवण आणि जेवण नंतर च काम झाल्यावर मानसीने वाटीत तेल कोमट करून आणलं आणि बसली आई च्या पुढ्यात . दोघी बोलता बोलता मसाज सुरु झाला . तेलाचा एक एक थेम्ब टाळू वर पडला कि मानसी स्वर्गीय सुखात जात होती आणि रिलॅक्स होत होती . आई ने पण चांगलं अर्धी वाटी तेल तिच्या डोक्यात मुरवलं . तेलची  चंपी झाल्यावर मानसीला अशी गुंगी आली ती लगेच झोपायला गेली .

 

मानसीच्या आई चे ऑलरेडी तेलाचा हात झाला होती . ती मानसीच्या बाबांना म्हणाली " अहो तुम्हाला लावू का तेल ?"

 

बाबांना मान हलवून होकार दिला आणि हेड मसाज करून घेतला . मसाज करत करता आई बोलत होती " मानसीने दोन दिवसांची सुट्टी घेतलीय . रामदास सर मुंबई ला शिफ्ट झाले .

बाबा आपले ऐकून घेत होते पण बोलत काही नव्हते . शेवटी आई ने मुद्द्यालाच हात घातला .

"काय झालं ? आज काही टेन्शन आहे का ?"

बाबा " टेन्शन नाही ग ? आपल्या मुलीच्या आयुष्यात काय लिहून ठेवलय तेच कळत नाहीये. आता तिच्या लग्नाच बघायला हवय . काहीच कमी नाही तिच्यात .दिसायला पण छान आहे तरीही का जमत नाहीये तिच अजून हेच कळत नाहीये मला "

आई " अहो ! जमेल .शेवटी काही गोष्टी आपल्या हातात नसतात . आपण  पण प्रयन्त करतच आहोत ना . मग असा का विचार करताय "

बाबा " अग त्या माझ्या मित्राचा   फोन आला त्याने फोन केला होता मुलाकडच्यांना . तर मुलाचे वडील गावी गेलेत आणि फोन वर मुलाची आई भेटली त्याला . त्या म्हणाल्या ... मुलगी छान हो... पण मुलगी एकुलती एक आहे. मुलीला आई वडिलांच्या पश्च्यात माहेर नाही राहणार . शिवाय मुलगी एकुलती एक असली कि तिला  आई वडिलांचा खूपच लळा असतो .आणि हे दुखण एका दिवसाचं आहे का हो .कायमचंच आहे . ह्यांना मुलगी खूप पसंत पडली पण मीच म्हटले थांबा जरा अजून बघू थोडी स्थळं "

म्हणजे एक प्रकारे नकार आल्या सारखाच आहे.

हे ऐकून मानसीच्या आई पण एकदम शांत झाली . तेल लावायचं थांबूनच गेली  . बाबांच्या चिंतेचं कारण काय आहे ते तिला कळलं आणि ती शांतच झाली

बाबा " काय ग ? शांत झालीस ?”

आई " मला आधी   पासूनच काही तरी  गडबड वाटत होती .अहो पूर्ण कार्यक्रमात त्या हसल्या नाहीत . त्या जरा नाखुषच वाटत होत्या . "

 बाबा " हो अग पण त्या मुलाचे बाबा किती चांगल्या गप्पा मारत होते . मला तर वाटले कि लगेचच होकार कळवतील . मी तर ऑफिस मध्ये लोन चा बोलून ठेवलं होत. समजा त्यांचा होकार आला तर  लगेच साखरपुडा करून घ्यायचा . पण कसलं काय ?

आई " तरी मी तुम्हाला म्हणत होते तुम्ही जरा शांती ने घ्या .होकार यायच्या आधीच तुम्ही तयारी ला लागलात”

असुदे आता .मला वाटतं  हे मानसीला नको सांगायला .तिला पण तो मुलगा आवडला होता ."

"आपण उद्या सरळ वधु वर सूचक मंडळात नावं  नोंदवू म्हणजे जास्त स्थळांची माहिती मिळेल "

बाबा " ठीक आहे "

कसं असतं  ना तरुण मुलीच्या आई वडिलांना तिची जोपर्यंत लग्न होताच नाही तोपर्यंत जिवात  जीव नसतो . तिचं  शिक्षण , तिचा चांगला जॉब हे सगळे टप्पे असतात अंतिम ध्येय तिला सासरी पाठवणे हेच असते.

मानसी ची आई " अहो  ऐका ना मानसी ने सुट्टी घेतली आहे दोन दिवस तर मी काय म्हणते तुम्ही घेता का सुट्टी ? आपण जरा गावाला जाऊन येऊ . आपण इकडे येऊन बरेच वर्ष झाली  पण आपल्या गाव देवी ला एकत्र जायचं राहूनच गेले ."

बाबा " झालं तुझं सुरु पुन्हा ग मी दर वर्षी  तुझ्या सांगण्यावरून मी जातोच ना .

"अहो ते ठीक आहे . जायच्या  आधीच चीड चिड  नका करू . माझ्या आपलं मनात आलं ते बोलले . नसेल जायच तर झोपा आता शांत . मग बघू काय करायचं ते ?"

अशा पद्धतीने आई चा पारा चढला  आणि दोघे हि झोपून गेले

दुसऱ्या दिवशी सकाळी मानसी उशिराच उठली . आई ने तिला मस्त गरम पाण्याने डोकं धुवून दिले . मानसी ची तर मज्जाच झाली . मानसीच्या आईने तिच्या आवडीचा  नाश्ता करून ठेवला होता .नाश्त्यावर ताव मारला . आणि केस विंचरायला रूम मध्ये गेली .

मानसीच्या मोबाइलला वर आज पुन्हा unknown  नंबर वरून कॉल आला . मानसीने true कॉलरवरून चेक केला . कॉल तृप्ती नावाच्या मुलीच्या नंबर वरून होता . मानसीची कोणी तृप्ती नावाची मैत्रीण नव्हती . मानसी ला वाटले कि बँक किंवा पोलिसी चे फोन येतात ना तसला कॉल असेल . ती पुन्हा केस विंचरायला लागली . केस विंचरून झाल्यावर आपलेच रूप आरशात न्याहाळत होती . छान झोप झाली , मस्त मालिश, आणि  अभ्यंग स्नान केल्यावर जरा चेहरा पण उजळला होता .

मानसी ने तिच्या पुस्तकातील एक पुस्तक घेतलं आणि वाचायला सुरुवात केली . पुन्हा त्याच नंबर वरून कॉल . मानसी ला वाटलं हा कॉल उचलला नाही तर ती पुन्हा पुन्हा कॉल येताच राहील म्हणून तिने कॉल उचलला .

समोरून

"हॅलो मानसी , मी तृप्ती बोलतेय "

मानसी " सॉरी मला कळलं नाही कोण तृप्ती ?"

समोरून " हॅलो  अग तुषार ची बहीण "

मानसी बेड वर पडून पुस्तक वाचत होती तुषार च नाव ऐकताच ताडकन उठून बसली .

मानसी " हॅलो .. काय म्हणतेस "

हा कॉल नॉर्मल कॉल नाहीये .मानसी पण हा कॉल हॅन्डल करण्यासाठी सज्ज नव्हती

तृप्ती " ऐक ना मानसी तू आज सुट्टी वर  आहे ना ? "

मानसी  शॉक मध्ये आयला मी आज सुट्टीवर आहे हे हिला कसं कळलं ?

मानसी " तुला कसं  कळलं "?

तृप्ती " ते जाऊ दे ग , मी ते तुला सांगेन नंतर . तू आज जर फ्री असलीस तर मला अर्धा तास भेटशील का ? आणि हो   हे आधी कोणाला सांगू नकोस “

मानसी ला ह्या दोघे भाऊ बहिणीचं आश्चर्य च वाटू लागलं . काय एवढं माझ्याशी काम आहे ?

मानसी " मी थोडा विचार करून सांगते "

तृप्ती " ऐक ना , तुझं हे ठरलेले उत्तर आहे . तुला मला भेटायला काय प्रॉब्लेम  आहे .

मानसी " प्रॉब्लेम काहीच नाही ग ,  मला नक्कीच आवडेल तुला भेटायला . पण सिक्रेट का ?

तृप्ती " तू सध्या एका मैत्रिणीला भेटतेस अशी भेट . फक्त एकदां आणि मग भेटल्यावर तुला पाहिजे तर तू सांग घरी पण भेटायच्या आधी नको सांगुस . आणि एक आज हा कॉल माझा तरी शेवटचा  असेल मी पुन्हा तुला त्रास देणार नाही . अजून एक आज मी संध्याकाळी ५ वाजता तुझ्या आवडीच्या गणपतीच्या देवळात  असेंल . मी तुझी वाट ६. ३० पर्यंत थांबू शकते . तोपर्यंत आलीस तर ठीक नाहीतर उद्या मी तुझा नंबर डिलिट  करेन . तू येशील अशा आशेवर आहे .

(मानसी तृप्ती  ला  भेटेल का  ? आई ला न सांगता जाईल का ? तृप्ती एकटी भेटायला येईल कि तुषार पण असेल ? मानसी काय निर्णय घेईल ते  हे  पुढील  भागात बघु   )

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//