# कादंबरी – मानसी # भाग ८

This part is about Manasi got call for interview

                                                                # कादंबरी – मानसी # भाग ८

                                                          मानसी ला इंटरव्हू साठी कॉल आला

मानसी च छान रुटीन सुरु झालं. सकाळी ती राजुचा अभ्यास घ्यायची दुपारी ३ ते ५ रांगोळीचे क्लास घ्यायची आणि रोज आईला किचन मध्ये तिला जमेल तशी मदत करायची . आई पण तिला सुरुवातीला छोटी छोटी काम सांगत असे . पिठाची कणिक मळायची , भाज्या छान स्वच्छ करून , बारीक कश्या चिरायच्या हि पण एक कला आहे . मानसी एक एक नवीन काम रोज शिकत होती . मुख्य म्हणजे हौशीने शिकत होती आणि छान जमायला लागल्यामुळे तिला मज्जा पण वाटू लागली होती . याच क्रेडिट तिच्या आईला च द्यायला पाहिजे . कामाकडे एक काम म्हणून न बघता ती एक कला आहे. त्याला आपण जर मन लावून केलं तर ती पण अवगत करता येत. मग मुलगा असो व मुलगी जेवणासाठी आपण जगतो तेच काम सर्वात महत्वाचे आहे . जेवण जर छान वातावरणात ,मनात चांगले विचार करत केले तर त्याला एक वेगळीच पवित्र चव येते . मानसी एक एक पदार्थ शिकत होती आणि तिचे आई बाबा आनंदाने खात होते. कधी कधी काहीतरी चुकत होत पण तेही आनंदाने खायचे . जेव्हा मानसी खायची तेव्हा  तिला कळायचं कि अरे देवा आज मीठ जास्तच झालंय . थोडं थोडं रोज केल्यावर आपोआप अंदाज येतो किती तेल , किती मीठ , किती पाणी घालायचे ते आणि मग पदार्थ चविष्ट बनतो .

राजू चा अभ्यास हा एक मोठा टास्क तिने स्वीकारला होता . राजू कडे अजिबातच लक्ष न दिल्याने तिचा बेसिक अभ्यास पण खूप मागे राहिला होता . मानसीने छान मोठे तक्ते बनवले . रोज आल्यावर तिच्याकडून पाढे म्हणून घ्यायची, मग कविता म्हणून घ्यायची,तिने तीच एक टाइम टेबल बनवले . आज हिंदी च्या कविता, उद्या मराठीच्या कविता, परवा, इंग्लीच च्या कविता, रोज केलेले ग्रामर चे तक्ते वाचायचे . असे तिचे रूटीन लावले ,राजू पण मानसी ताई सांगेल तस करत होती . मानसी तिच्या कडून राज होमवोर्क पण कारून घेऊ  लागली . हळू हळू गणित समजायला लागली ,गुणाकार , भागाकार,बेरीज, जमू लागले , वर्गात पण उत्तरे देऊ लागली . बाईंना पण तिच्यात फरक जाणवला . राजू ला पण कळत होते कि आपल्याला आता बाई काय शिकवत आहे ते कळत आहे . बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळे बाई काय बोलत आहेत ते कळू लागले होते . शिवाय मानसी प्रत्येक धडा वाचून तिला एक्सप्लेन करत असे. शब्द न शब्द चा अर्थ सांगायची. तिला वेगवेगळी उदाहरण देऊन समजे पर्यंत सांगायची . वेळ अली तर एखादा  यु ट्यूब वर व्हिडीओ दाखवायची . मग काय मानसीने मनावरचं घेतलं होत .राजुची गाडी रुळावर आणून सोडायची .

एखाद वेळी क्लास ला सुट्टी मिळाली कि राजू म्हणायची

"नको ताई आजचा अभ्यास बुडेल . सकाळी वेळ नसेल तर आपण संध्याकाळी क्लास घेऊ "

राजू ची आई आश्चर्य चकितच झाली . माझी मुलगी एव्हढी  कशी बदलली . मानसीला ती मनोमन शतदा धन्यवाद देत होती . आई म्हणून योग्य वेळी तिने योग्य पाऊल उचलले होते .

राजू मानसीच्या घरातील मेंबर च झाली होती जणू . मानसी पण आपली एखादी लहान बहिण असावी अशी तिला सांभाळून घ्यायची.

आणि राजू तर हळू हळू मानसी ताई ला कॉपी करायला लागली होती . टापटीप पणा , स्वच्छ राहणे, चांगले हातपाय धुणे , छान केस विचारायचे,जवळ एक स्वच्छ रुमाल ठेवायचा , आणि मुख्य म्हणजे अभ्यास करायचा अशा छान छान बदल तिच्या मध्ये घडत होते.

" संगत " हि किती महत्वाची आहे ना. आपण ज्यांच्या संगतीत असतो त्याचा प्रभाव आपल्यावर न कळत पडत असतो . म्हणून चांगले लोक आपल्या आजूबाजूला असणे हे फार महत्वाचे असते.

मानसी कडे दुपारी १० ,१२ बायका रांगोळी शिकायला यायच्या . रोज त्यांना  रांगोळी कशी काढायची, त्याची प्रॅक्टिस करून घ्यायची,बिंदू, सरळ लाइन,आडवी लाईन ,शंख, चक्र असे छोटे छोटी चिन्ह शिकवायची . मग रंगसंगती कशी सिलेक्ट करायची याच्या बद्दल सांगितलं . एक लाइट कलर ,दुसरा डार्क घ्यायचा मग

गालीछा  छान दिसतो . नंतर पाण्यावरची , पाण्याखालची , ताटाभोवतीची रांगोळी,फुलांची रांगोळी,

दारात काढायची रांगोळी असे अनेक प्रकार दाखवले , शिकवले . हळू हळू त्या बायकांना पण रांगोळी काढायला येऊ लागली . त्यांना हि मज्जा वाटू लागली . रोज प्रॅक्टिस पण छान होत होती . मग त्यांना शिक्षकच छान मिळाला होता . मानसी जास्त बोलायची नाही पण काढून काढून दाखवायची . बोटात रांगोळी कशी पकडायची , कशी सोडायची,असे करून दाखवायची आणि प्रॅक्टिस करायला लावायची. हे येत नाही तोपर्यंत पुढे जायची नाही . आणि मग ‘ प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ’ तश्या त्या सगळ्या सविता च्या मैत्रिणी शिकत होत्या .

मानसी च हे रुटीन छान चालू होत .

अचानक  सकाळी ११ वाजता एक कॉल तिला तिच्या ऑफिस मधून आला . तो कॉल एक दुसऱ्या डिपार्टमेंट च्या मॅनेजर चा होता .

" हॅलो मानसी मॅडम , कशा आहेत , मी रामदास बोलतोय "

" हॅलो रामदास सर "

" मी कॉल या साठी केलाय माझ्या डिपार्टमेंट ला असिस्टंट मॅनेजर ची पोस्ट खाली आहे . मला वाटतं  तुम्ही या पोस्ट साठी सुटेबल आहात. तुम्ही कुठे दुसरीकडे जॉईन झाला का? "

मानसी " नाही अजून कुठे जॉईन झाले नाही "

रामदास सर " मग एक काम करा एका फॉर्मल इंटरव्हू साठी या .मी जॉब रोल समजावून सांगतो .मला पण दुसरं कोणाला घेण्यापेक्षा तुम्हाला घेतलेलं बरं पडेल "

मानसी " हो चालेल "

रामदास सर " मग कधी आज किती वाजता याल "

मानसी " सर आता मी निघाले तर १२ पर्यंत पोहचेल चालेल का ?

रामदास सर " हो चालेल या " आणि फोन कट  केला.

मानसी तिच्या रूम मध्ये एकटीच होती . फोन कट  केल्यावर क्षणभर ती खुर्चीत बसली . तिचे हातपाय थरथरत होते  अचानक आलेल्या कॉल मुळे तिला काही सुचत नव्हते . काहीही अपेक्षा नसताना मागील बंध हळू हळू तुटत चालले असताना अचानक कॉल रामदास सरांचा कॉल आला . त्याच ऑफिस मध्ये पुन्हा नोकरी . त्याच कलीग बरोबर पुन्हा बसने . तेच बॉस पुन्हा संपर्कात येणार .रामदास सर जरी माहित असले तरी त्यांच्याशी कधी संबंध आलेला नव्हता . त्यांच्या स्वभावाचा काहीच अन्दाज नव्हता . त्यांनी मला का बरे सिलेक्ट केले असेल ? असे प्रश्न तर होतेच .

एक अनामिक धडधड होत होती .  आपोआप तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले . डोळ्यातून वाहणारे पाणी काय सांगत होत तिला काहीच कळत नव्हते . आनंद आहे का दुःख हे सांगणे जरा कठीणच .

तिला कळलेल्या डिटेल्स वरून हे कळत होते कि तिला ते असिस्टंट मॅनेजर ची पोस्ट देणार आहेत .हि ऑफर इतकी चांगली होती .त्यामुळे तिला आनंद पण होत होता . आणि एक म्हणजे हि पोस्ट टीम लीडर च्या पोस्ट च्या  equal होणार होती . मानसी ला या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता

मानसीला मनातून खुप उभारी आली . तिच्यावर आलेला प्रसंग ती विसरली नव्हती. टीम लीडर ला आता आपोआपच दाखवून देणार होती . तुम्हारी नाक के नीचे इसी ऑफिस मे और अभि तो मीटिंग में तुम्हारे साथ बैठूगी आर वो भी शान से !!!

म्हणतात ना ' जे काही घडतंय ते देव वरून सर्व पाहत असतो. 'त्याच्या असण्याचा अनुभव आपल्याला देत असतो .

मानसीला आत्ता लै भारी वाटतं होतं .जग जिंकल्यासारखं . "आज मैं उपर आसमा नीचे "

" मानसी ! काय करते ग " बराच वेळ बाहेर नाही आली म्हटल्यावर आईने विचारले

" आलेच आई सांगते तुला मी तयार होतेय बाहेर जायचय "

"आता कुणीकडे उन्हाची निघालीस "

"आलेच मी बाहेर मग सांगते "

मानसी लगबगीनं आवरून बाहेर आली . आणि आईला म्हणाली

"अ ग मला ऑफिस अधून कॉल आला होता .दुसऱ्या डिपार्टमेंट ला पोस्ट आहे बोलावलंय  इंटरव्ह्यू साठी मी आता जाऊन येते मग सांगते "

आणि मानसी तिच्या गाडीवर बसून निघून गेली पण ....

" सावकाश जा ग ... गाडी हळू हळू चालवं " आईच्या सूचना चालूच होत्या.

🎭 Series Post

View all