कच्च्या कैरीचे विविध प्रकार

कच्च्या कैरीचे विविध प्रकार

अलीकडे कच्ची कैरी बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. कच्च्या कैरीचे विविध पदार्थ बनतात. कच्ची कैरी आरोग्यासाठी वरदान मानली जाते.

कैरीचे पन्हे                                                                        साहित्य --    अर्धा किलो कच्ची कैरी, एक वाटी साखर किंवा गूळ (चवीप्रमाणे साखर किंवा गुळाचे प्रमाण कमी, जास्त घेऊ शकता) फोडणीसाठी थोडे तूप, जिरे, चवीसाठी किंचित मीठ.

कृती

प्रथम कच्ची कैरी स्वच्छ धुवून, उकडून त्याचा गर काढून घ्या. त्यात घट्ट, पातळ जसे हवे तसे पाणी घाला. व रवीने किंवा मिक्सर मधून मिक्स करून घ्या. मोठ्या पातेल्यात थोडे तूप टाकून त्यात जिरे टाका. जिरे तडतडल्यावर पातळ केलेला कैरीचा गर घाला. साखर व किंचित मीठ घालून दोन-तीन उकळ्या येऊ द्या. थंड झाल्यावर प्यायला घ्या. झाले अत्यंत चविष्ट असे कैरीचे पन्हे तयार. अशा तऱ्हेने तयार केलेले कैरीचे पन्हे आठ ते दहा दिवस आरामात टिकते.

दुसरी पद्धत

कच्चा कैऱ्या धुवून उकडून त्याचा गर काढून घ्या त्यात हवे तेवढे पाणी व साखर किंवा गूळ आणि चवीनुसार किंचित मीठ घालून रवीने चांगले मिक्स करून घ्या. फ्रिजमध्ये ठेवून हवे तेव्हा काढून त्याचा आस्वाद घ्या.

चला तर मग करा रेसिपीला सुरुवात.

मस्त खा.

स्वस्थ राहा. व्यस्त राहा.

सौ. रेखा देशमुख