कालचक्र भाग-५

शक्तीपीठांचा रक्षक आणि अर्धनारीचा विजय हा अटळ होता.

त्या अंधाऱ्या गुफेत दोघेही निपचित पडून होती. हलकीशी किरणे शिवाच्या डोळ्यांवर पडली. हालचाल करत उठतचं होती की ती जाऊन अंशच्या अंगावर जाऊन आदळली आणि अंश हडबडून जागा झाला.

" शिवन्या, तू ठिक आहेस का ?" अंशने तिला थोड्या काळजीने विचारले.

" हो पण अंश आपण इथे कसे आलो आणि शिखा-अन्या कुठे आहेत ?" रात्रीच्या प्रसंगांमुळे शिवा कण्हत म्हणतं असते.

" काही नाही चल तुला सगळं नंतर सांगतो पण आता उजेड आहे तो पर्यंत आपण बाहेर पडूया." अंश घाई करत म्हणतो कारण त्याला आता शिवन्या बाबतीत कोणतीच रिस्क घ्यायची नसते.

दोघे गुफेतून बाहेर पडली अन् काही अंतरावर येताच त्यांना एक मनुष्य वस्ती दिसली. दोघंही थोडी निश्चिंत झाली. कारण जंगलात येऊन नक्की काय घडतंय याचा उलगडा त्यांना इथे होईल असं मनोमन वाटलं. एका खोलीजवळ जाऊन त्यांनी दार ठोकावलं पण आतून काहीही प्रतिसाद आला नाही. अचानक ते दार उघडलं गेलं आणि शिवन्याला आत खेचून घेतलं आणि ते बंद झालं. सगळं काही जलदगतीने झालं की याचा विचार करायला वेळच अंशला मिळाला नाही आणि तो शिवन्याऽऽऽ असं ओरडून मटकन खाली बसला. आजूबाजूला बघितलं तर संपूर्ण काळोख आणि जंगल होतं तेव्हा त्याला कळून चुकलं हा सगळा भास होता.

मिट्ट काळोखात शिवा घाबरून जिथे वाट मिळेल तिथे एकटी चालत होती त्या किंकाळ्या आता तिला जरा जाणवू लागल्या. थोडं थोडं तिला आठवू लागलं. नकाशाच्या आराखड्यात जशी चिन्हे होती ती तिला चालताना दिसू लागली.

इकडे शिवांश शिवाचा शोध घेत एका पुरातन मंदिराजवळ आला. तिथे एक पुरातन कालभैरवाची मुर्ती दिसली तसा तो नतमस्तक होऊन गेला. जसे तो डोकं त्या मूर्तीच्या पायावर ठेवतो तसे त्याला हळूहळू भूतकाळातल्या विचित्र गोष्टी दिसू लागतात. त्याने केलेली लढाई आणि कसे त्या कलिंगाला पेटीमध्ये बंद करुन टाकले जाते परंतु एक चूक होऊन जाते ती म्हणजे एका मनुष्याने लालसेपोटी त्याला मुक्त केलं होतं आणि तो आता सगळ्यांवर भारी पडत होता.

आताच्या घडीला त्याने अनेक शक्ती प्राप्त केल्या होत्या आणि हाच मायाजाळ पसरवून तो शिवाला मारण्याचा प्रयत्न करणार होता. नागमणी हा एकच पत्थर होता जो अंशला नकळत मिळालेला वारसा होता आणि तो त्या लॉकेटमध्ये होता.

सर्वपित्री अमावस्या असल्यामुळे त्याला तिचा बळी द्यायचा होता कारण त्यामुळे तो अनंतकाळ जगणार होता. या सृष्टीचा निर्माता म्हणून घेण्याची त्याची इच्छा आहे ती शिवाचा अंत करून पूर्ण होणार होती.

" पण नियतीच्या या खेळात तो स्वतः फसला होता. त्याने मायाजाळ तर विणलं होतं पण आता स्वतः त्याच्या काळाला निमंत्रण दिलं होतं जो की विनाशाचा अंत करणारा विधायक होता "

हळूहळू शिवा त्या झाडाजवळ पोहचत असते. आक्रोश अचानक वाढला होता. पक्ष्यांचा कलकलाट सळसळती झाडांची पाने आणि ती माणसे... सगळं काही जीवघेणा प्रकार चालू होता. शिवा झाडामागे लपून पाहतच होती की त्या कलिंगाने तिला पाहिलं तशी शिवा अचानक धावत सुटली तशी ती एका खडकाला जाऊन आदळली आणि बेशुद्ध अवस्थेत पडली. त्याचं अवस्थेत तिला उचलून त्याने हवनाच्या बाजूला आणून बसवले. तांत्रिक विद्येचा वापर करून तिला विवश केलं जातं होतं. एकीकडे बायकांच्या किंकाळ्या थरकाप उडवत होत्या आणि दुसरीकडे शिवामधल्या शक्तींनी प्रभाव दाखवणं चालू केलं होतं.

जशी जशी नागमणीची शक्ती जवळ येत होती तसं तसं कलिंगाची तंत्रशक्तीत विघ्न पडतं होते. मंत्रोच्चार त्यांने पटापट बोलायला सुरू केले आणि जशी त्याने तलवार उचलली तसा अंश धावत येऊन शिवन्याला घेऊन पळाला.

भयानक वास्तव्य त्या जंगलात त्यात गेल्यावर जीवंत राहू की नाही याची कल्पना नसतानाही ती दोघं मिळेल ती वाट पकडून जीव मुठीत घेऊन धावत होते. कलिंगाही त्यांचा पाठलाग करत होता. शिवा अचानक थांबली तसा अंशही थांबला पाठी वळून पाहिलं तर कलिंगा शिवा झेप घेणार इतक्यातचं अंशने त्याला हवेतूनचं दूर फेकले. त्याच्या शर्टातून एक तेजस्वी शक्ती बाहेर पडत होती. त्या शक्तीमुळे आसपासचा जंगलाचा भाग उजळून निघत होता. कलिंगाने ते पाहिलं आणि तो अंशवर धावून गेला पण अंशने परत त्याला उडवून लावले होते. क्रोधाच्या ज्वाला आता पेटल्या होत्या. शक्तीपीठांचा रक्षक आता जागृत झाला होता. एकीकडे कलिंगा, दुसरीकडे काळाचा दैवत अन् अर्धनारी मनुष्य रूपी शिवा...

अंशच्या खिश्यातून ते कालचक्र बाहेर पडलं आणि ते फिरू लागलं. त्यातून आकृत्या दिसू लागल्या. कलिंगाने केलेले स्त्रियांचे हाल, गर्भवती महिलांचे शोषण आणि स्वतःच्या अमर आयुष्यासाठी त्यांची निर्घृण हत्या हे सगळं पाहून शिवन्या संतापाने थरथरत उठली. लढाईमध्ये अंशच्या गळ्यातून तो नागमणी पडलेला तो उचलून तिने त्या तलवारीमध्ये बसवला.

ती उठली आणि त्या राक्षसाचा संहार करण्यासाठी गेली. सरळ डोक्यावरून तिने ती नागमणी तलवारीने वार केला आणि कलिंगाचे दोन तुकडे केले. कलिंगाला मात्र हे विसरून गेला की कालभैरव हा शक्तीपीठांचा रक्षक आहे आणि तांत्रिक विद्येचा देवता.

अंश आणि शिवन्याला या घटनेमुळे अनेक गोष्टी कळून चुकल्या की ते कोण आहेत आणि त्यांचा जन्म कोणत्या हेतूने झाला होता. तो नकाशा आणि ते घड्याळ यांचं रहस्य दोघेही जंगलात सोडून बाहेर पडले होते. कोणालाही माहीत नाही अशी गुफाही एक रहस्य होऊन राहिली होती. शिवा आणि अंश सुखरूप बाहेर पडले तशी ती गुफाही झाकली गेली. दुपारी अंश आणि शिवन्या त्यांच्या टेंटजवळ पोहचले पण शिखा आणि अन्या त्यांना रागाने पाहत होते.

"कुठे गेला होता रे तुम्ही सकाळी?" अन्या रागात विचारतो.

"मातीने भरलेल्या कपड्याने अंशने एक नजर शिवावर टाकली आणि हसत बोलला, " नवीन सुर्योदय पहायला."

शिखा आणि अन्या या उत्तरावर गोंधळून गेले.

शिवानेही हसत अंशकडे पाहिले आणि बोलली, " चला आपल्यालाही पुढे निघायला हवं. इथेच थोडी मुक्कामाला राहणार आहोत."

तसा अन्या उड्या मारत टेंट काढायला गेला. अंश आणि शिवाही फ्रेश व्हायला जातात.

काहीवेळाने ते चौघेही पुढच्या प्रवासाला निघतात. अशीच हसत खेळत, मज्जा मस्ती, अन्या अन् शिखाच्या ‌जुगलबंदीसह यांची ट्रीप पार पडते.

"नियतीने जो‌‌ डाव रचला होता त्यातून ती दोघं सुखरूप परतले होते. सत्याचा विजय झाला होता आणि काळावर मात केली होती. नव्या उमेदीने नव्या जीवनाचा सुर्योदय झाला होता."


समाप्त

© प्रणाली कांचन कृष्णा शिंदे

🎭 Series Post

View all