कालचक्र भाग-४

अर्धसत्य जाणूनही तो तिच्या सोबत प्रवासाला निघाला होता.

अंश घरी पोहोचतोच तसा तो आधी रूमच्या दिशेने धावत जातो. लॉकर ओपन करतो आणि बघतो तसे त्याचे डोळे विस्फारून जातात आणि लगेच खिश्यात हात घालतो. तेच घाबरून त्याच्या शरीरातून एक थंड लाट सळसळते आणि डोकं धरून पलंगावर बसतो. प्रत्येक गोष्टीची जुळवाजुळव करतंच असतो तोच त्याला अजून एका गोष्टीची आठवण येते आणि तो वॉर्डरोब उघडून पाहतो. संपूर्ण रूम अस्ताव्यस्त करून‌ टाकतो तरी त्याला मिळत नाही आणि तो स्वतः शीच बोलतो. तो नकाशाऽऽऽ पण  तिच्याकडे नसेल ना... अन् असाच सुन्न होऊन जातो.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तो आधी शिवन्याच्या घरचा रस्ता गाठतो आणि कॉर्नर जवळ येऊन थांबतो. काल ज्या प्रकारे गोष्टी उलगडत होत्या त्यावरून तर त्याने अंदाज बांधला होता की नक्की शिवन्याचंही काही तरी कनेक्शन आहे पण तिला या गोष्टींची जाणीव आहे का ? अनेक प्रश्न त्यालाही पडले होते जे ती भेटल्याशिवाय सुटणार नव्हते.

फ्रेशर्स पार्टी मध्ये नंतर काय घडलं हे शिवन्याला थोडंफारचं आठवत होतं पण नंतर काय झालं याचा थोडाही अंदाज नव्हता आणि ती कॉलेजला जायला निघाली. वळणावर जाताच तिला अंशने आवाज दिला.

" शिवन्या "

" अरे हा सकाळी इथे कसा ?" शिवन्या स्वतः शी बोलते आणि ती त्याच्या गाडीच्या दिशेने जाते.

" हा, बोल‌ काय झालं ? आज इथे कसा आलास तू ? आज कॉलेज मध्ये नाही यायचं वाटतं." शिवन्या थोडं हसून बोलली.

" जायचं आहे गं पण मला आधी तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे." गंभीर चेहऱ्याने शिवन्याला तो बोलला.

त्याला पाहून शिवन्याही थोडी गंभीर झाली. " काही सिरिअस झालं आहे का ? कारण एवढ्या सकाळी तुझं इथे येणं थोडं मलाही विचित्र वाटलं आहे."

अंशने तिला काल जे घडलं ते सगळं सांगितलं आणि शिवन्यालाही काही ‌दिवस तिच्या सोबत घडतंय त्याचा हळू हळू उलगडा होतं होता. तिची ती विचित्र स्वप्न आणि तिला येणारे ते आवाज...

अंशने तिला ते घड्याळ दाखवलं आणि विचारलं. " हे तुझ्याकडे कसं आलं ?
"

" हे तर मला कुरिअरने आलं होतं आणि मी  हे ऑर्डर केलं नव्हतं पण बाबांनी पाठवलं असेल म्हणून मी ते ठेवलं कारण मला हे ऐतिहासिक आणि साहित्यिक गोष्टी शिकायला आवडतं. पण एक मिनिट हे तुझ्याकडे काय करतंय हे तर काल म्हणजे, मला का आठवत नाही ? काल नक्की काय झालं ?" शिवन्या थोडी चिडचिड करत म्हणते.

अंशही परिस्थिती बघता काही बोलण्याचा निर्णय घेतो अन् जास्त काही न विचारता गाडी कॉलेजच्या दिशेने वळवतो.

-----------------------------------------------------------

काही दिवस सगळं काही सुरळीत चालू होतं. शिवन्या, शिखा, अनिकेत, अंश यांच्यात खूप छान मैत्री झालेली असते. फ्रेशर्स पार्टी नंतर जो-तो अभ्यासाला लागला होता. शिवन्या आणि शिखा यांचंही लायब्ररीमध्ये जाऊन नोट्स काढणं आणि लेक्चर अटेंड करणं हेच रुटींग झालं होतं. तेवढ्यात‌‌ कॉलेजमध्ये परिक्षेची नोटीस लागते आणि विद्यार्थी जोमाने अभ्यासाला सुरूवात करतात. असेच एक एक दिवस पेपर होतात आणि ‌आज शेवटचा पेपर असतो. पेपर देऊन झाल्यावर थोडं टेंशन फ्री होऊन आज सगळी मंडळी कट्ट्यावर जमून गप्पा मारत असतात. शिखा आणि अन्याची जुगलबंदी चालू असते. अन्या तिची खिल्ली उडवत असतो आणि शिखा त्याच्या मागे पळत त्याला पकडत असते. अशीच हलकी फुलकी ‌मस्ती सगळे एन्जॉय करत असतात.

शिवा एक नजर अंशला पाहते तर तो अन्या आणि शिखाची मस्ती पाहून खळखळून हसतं असतो. काही वेळ पाहतंच बसते पण अचानक तिला गर्द झाडीतून काळ्या आकृती जाणवू लागतात. ज्या गोष्टी ती स्वप्नात पाहू शकत होती ते तिच्या सत्यात येऊ पाहत होते.

" अंशऽऽऽऽ" ही हाक मारून एकदम जोरात ओरडते आणि कान बंद करून तशीच बसते. सगळे धावत जाऊन शिवन्या भोवती गोळा होतात.

अंश धावतच जाऊन तिला मिठीत घेऊन विचारतो पण ती घाबरलेली असल्यामुळे शांत करतो पण ती काही बोलण्याच्या स्थितीत नसते तरीही अंशलाही ‌थोडा अंदाज आला असतो. पण तोही काही नाही बोलत नाही. सगळ्यांना घरी निघून जायला सांगून तो स्वतः शिवाला सोडायला घरी जातो. 

कॉलेजमधून गाडी बाहेर जंगलातल्या रस्त्यावर लागते. गाडीमध्ये एकदम शांतता असते. इतक्यात ती शांतता भंग करून अंशच बोलायला सुरुवात करतो.

" काय पाहिलंस तू शिवन्या?" तिच्या हातावर हात ठेवून शांत करत विचारतो.

" ते...ते..मी ना, ते..ती लोकं  त्या बायका.. त्या आकृत्या...एक वर्ष होईल आता सगळं काही विचित्र घडतंय रे माझ्या आयुष्यात. मी कोण आहे ? मलाच का ? सारखं सारखं वाटतं राहतं माझ्यावर कोणी तरी लक्ष ठेवून असतं. मी हे सारं स्वप्नांत पाहत होते  ते आता हळूहळू सत्यातही दिसतं आहेत." शिवन्या रडत रडत अंशला सांगत असते.

अचानक अंशच्या गाडी समोर येऊन एक इसम बोलू लागतो की वेळ जवळ आली आहे, त्यांच्या पापाचा घडा भरला आहे. तू आला आहेस या सगळ्यांचा अंत करायला त्याचा आवाज चहूबाजूंनी घुमतो अन् इतक्यातच मुसळधार पावसाला सुरूवात होते. शिवन्याला आठवतं की हा तोच म्हातारा असतो जो त्या दिवशी दगडावर काही तरी कोरत होता जे तिने पाहिलं होतं. अशीच जाऊन ती गाडी बाहेर धावत त्या दगडापाशी जाते अन् ते पाहताच ती आश्चर्यचकित होऊन जाते. अन् तिच्या तोंडून फक्त एकच वाक्य निघतं.

" हा तर तोच नकाशा आहे."

अंशही काही वेळ शिवाकडे पाहतंच राहतो आणि ताबडतोब तिला घेऊन निघून जातो. तो समजून गेला होता की तिचं आहे ही... ज्याचा अंत करायला आली आहे ही अर्धनारी...

"काळचे चक्र अश्वांच्या गतीने जवळ येतं होते. अर्धसत्य समजूनही त्याला तिला वाचवणं गरजेचं वाटतं होतं. सापळा रचला होता आणि तोच खेळ मांडला होता. पुर्नावृत्तीला सुरूवात झाली होती."

दोघेही शिवाच्या घरी पोहचतात आणि फ्रेश होऊन गॅलरी मध्ये बसून झालेल्या गोष्टींचा विचार करत असतात तेवढ्या त्यांच्या मोबाईलची ट्यून वाजते अन् मेसेज ब्लिंक होतो. अंश मेसेज ओपन करून बघतो तर शिखा आणि अन्या ट्रिपचे प्लॅनिंग करत असतात.

" हे मित्रांनो, आपली सेमीस्टर संपली आहे आणि जरा सुट्टी ही मिळाली आहे तर आपण कुठे तरी बाहेर जायचा प्लॅन करूया का ?" अन्या सांगत असतो. शिखा ही त्याच्या बोलण्याला दुजोरा देते.

अंशही एक वेळ शिवाकडे पाहतो आणि काही दिवस जे घडत होतं त्यामुळे थोडं चेंज हवा म्हणून काहीसा विचार करून तो त्याचं आणि शिवाचंही जाण्याचं ठरवून टाकतो.

" हो, आपण जाऊया. मी आणि शिवाही येतोय पण नक्की जायचं कुठे ?" अंश अन्याला विचारतो.

"ते मी ठरवलं आहे फक्त आपल्याला उद्या दुपारी निघावं लागेल... तुम्ही पंधरा-वीस दिवसांची तयारी करुन ठेवा." अन्या सांगत असतो.

सगळ्या गोष्टी ठरवल्या असल्यामुळे सगळे त्याला होकार दर्शवतात.

"सगळ्यापासून दूर जाऊ म्हणून ट्रीप चा प्लॅन केला होता खरं पण तिथे जाऊन रिलॅक्स होणार की आणखी वादळ येणार याची त्यांना कल्पना नसते."

दुसऱ्या दिवशी हे चौघेही त्याठिकाणी जाण्यासाठी रवाना होतात.

अंश गाडी चालवत असतो तर अन्या त्याच्या भसाड्या आवाजात जोर जोरात तालासुरात गाणी गात असतो. शिखा त्याला ओरडून वैतागली असते तर एकीकडे शिवा सगळं काही विसरून मनसोक्त आनंद घेत हसत असते. अंश तिला आरशातून पाहत असतो आणि तो ही सगळ्या गोष्टींचा विचार सोडून त्यांच्यात सामील होतो. काहीवेळाने ते जेवणासाठी एका ढाब्यावर गाडी थांबवतात तिथे जेवून परत निघत असतात. यावेळी शिवा अंशच्या बाजूला बसते आणि पाठी अन्या शिखाच्या बाजूला घोरत पडलेला असतो. अंश धाब्यावरून गाडी काढतच असतो की तेवढ्यात एक म्हातारा काचेवर हात मारून मारून थांबतो आणि बोलतो.

" काळ आला आहे. तू प्रवासाला निघालास खरं पण नियतीने खेळ खेळायला सुरू केला आहे." तो माणूस बोलतच असतो पण अंश गाडी काढतो आणि सुसाट नेऊन जंगलाच्या दिशेने निघतो.

पुढे जाऊन एक नजर पाठी बघतो तर काय ? तोच माणूस असतो जो काल सायंकाळी त्याने त्याला नकाशा कोरताना पाहिलं होतं.

मनात भितीने काहूर माजलं होतं तरी त्याने दुर्लक्ष करून इच्छित स्थळी पोहचण्याचा निर्णय घेतलेला असतो. शांतपणे गाडी चालवत शिवाकडे पाहत असतो. तिची ती निद्रा अवस्थेतली निरागसता पाहत होता. झोपेतही ती हलकीशी कपाळावरची आठी ती अस्वस्थ होण्याची खूण दर्शवत होती तरी ती तो सोबत होता म्हणून निर्धास्त होती.

सकाळी ते चौघेही त्यांच्या इच्छित स्थळी पोहचतात. डोंगराळ भाग आणि नुकत्याच पावसाळ्याच्या ऋतूमुळे त्याने पांघरलेली ती हिरवळ. एखाद्याला त्या परिसराचं वेड लावणारी अशी सुगंधी माती, आकाशाला आणि त्या डोंगराळ भागात भिडणारे पक्ष्यांचे थवे अशी ही मंत्रमुग्ध करणारी जागा अन्याने निवडली होती त्यांचा २० दिवसांसाठी इथेच मुक्काम होता.

सगळ्या गोष्टींची जमवाजमव करेपर्यंत सायंकाळ झाली होती. लाकडं गोळा करणं आणि पिण्यासाठी पाणी शोधणं. नशीबाने पाण्याचा झरा जवळच मिळाला. तिथेच दोन टेंट रोवले त्यात एकामध्ये शिवा आणि शिखा तर दुसऱ्या मध्ये अंश आणि अन्या राहणार होते. रात्री सगळं आवरून शिवा बाहेर शेकोटी पेटवली होती तिथे बसली होती. तिला बसलेलं पाहून अंशही आला.

" किती छान वातावरण आहे ना इथलं ?" अंश शिवाला बोलतो.

" हो, निसर्गाच्या सानिध्यात राहणं मला खूप आवडतं आणि ही आपली ट्रीप लक्षात राहण्यासारखी असेल अशी जागा अन्याने निवडली आहे. खूप छान वाटलं इथे येऊन." शिवा खूश होऊन अंशला सांगत होती.

तिला पाहत फक्त "हम्म" एवढंच बोलतो.

काहीवेळाने ते दोघेही शेकोटी विझवून टेंटमध्ये झोपायला जातात. पण त्यांना ही गोष्ट माहित नसते की त्यांच्या कोणी तरी लक्ष ठेवून बसलेलं असतं.

पाच-सहा दिवस चौघेही खूप मज्जा मस्ती करतात. त्या जंगलात फिरतात. झाडावर चढणं, तिकडेच छोट्या छोट्या धबधब्यात जाऊन मस्ती करणं, फोटो आणि ट्रॅकिंग करतं ते थोडे पुढे आले होते. तिथेच एक गुंफा असते पण कोणाला त्या गोष्टीचा अंदाज नसतो. असेच ते तिथे मुक्काम करायचे ठरवतात आणि दुसऱ्या दिवशी निघायचं ठरवत असतात.

त्या रात्री अचानक कसल्याशा आवाजाने शिवाला जाग येते आणि ती टेंट मधून बाहेर येते. आवाजाच्या दिशेने ती जात असतेच की तिला पाठून अंश बघतो. शिवा त्या आवाजाच्या दिशेने वेगाने जात असते अन् अंश तिचा पाठी पाठी धावत असतो. जवळ पोहचता समजतं की तो आवाज त्या गुंफामधून येतोय. शिवा लगेच त्या गुफेत शिरते आणि अंश तिच्या मागे लगोलग शिरतो आणि एक झटका लागल्यासारखी शिवा उडून खाली पडते आणि ती गुंफेचे तोंड अचानक बंद होऊन जातं. त्या मिठ्ठ काळोखात फक्त ती दोघं... शिखा आणि अन्याला अंदाज नव्हता आणि शिवा आणि अंशला नकळत त्या ठिकाणी नियतीने पोहचवलं होतं.

"खेळाला प्रारंभ झाला होता पण या काळ्याकुट्ट अंधारात खेळ रंगणार होता. नियतीचे रचलेले डाव सांगू पाहत होते. काळाचा पुर्नजन्म झाला होता आणि तो यावेळेस तिच्यासोबतीने शेवट करायला आला होता."


क्रमशः

© प्रणाली कांचन कृष्णा शिंदे

🎭 Series Post

View all