कालासूर भाग ५
आता कालासूरनेही शस्त्रांचा वापर करण्याचं ठरवलं तसं एक मायावी शस्त्र महीच्या दिशेने फेकलं. सुरक्षाकवच पुन्हा निर्माण करून तो त्या गुप्त मार्गे कुच करू लागला. रुद्रचं लक्ष त्याच्याकडे जाताच त्याने दांडपट्टा उचलून त्याच्यावर वार केला. तर त्या दांडपट्ट्यासोबत रुद्र दूर फेकला गेला तसं परत उठून त्याने वार केला पुन्हा तेच घडलं. रुद्रने दांडपट्टा सोडून इंद्रस्त्र काढलं आणि त्यावर धावून जाऊन त्याचे सुरक्षाकवच पूर्णपणे तोडून टाकले. रुद्र पुन्हा वार करणार इतक्यात कालासूरने त्याच्यावर वेगवान विषारी बाण सोडून मुर्चित करून बेशुद्ध करून टाकलं. त्याला पाहून लगेच तो उठून निघाला तो सरळ गुप्त धनाकडे आणि त्या.....
त्याचा काळ जवळ आला होता. तरी त्याची लालसा कमी होतं नव्हती. आता ती शक्तीची उपासना करणारी स्वामिनी जगदंबेचे रूप धारण करून या जगात अवतरली होती. तिच्या क्रोधाच्या अग्नीत त्याला भस्मकरूनच शांत होणार होती.
रुद्रला बेशुद्ध पाहून तिने जगदंबेचा अवतार घेतला होता. शक्तिची स्वामीनी सज्ज झाली होती. कालासूरचे कृत्य पाहून डोळ्यांत रक्त उतरून ते आग ओतत होते. कालासूरने जसे गुप्त गुहेत प्रवेश केला तसा तो तीन ताड उडाला अन् चार फुट मागे जाऊन पडला. पावन झालेल्या भूमीवर नरकासुरांचा काहीही अधिकार नाही हे त्या कृतीमधून सिद्ध झालं होतं.
महीने अस्त्रांमधून गदा अस्त्र बाहेर काढलं. जे आकाराने खूप मोठं होतं तसेच त्याला पकडण्यासाठी साठी दांडा होता आणि शत्रू जर लांब असेल तर त्याच्या पर्यंत पोहचण्यासाठी आतून लांब जाडजूड अशी साखळी टाकलेली होती. ती गदा घेऊन मही त्या गुहेतून बाहेर आली आणि जोरदार प्रहार कालासूरवर केला. कालासूर लांब फेकला जाऊन खाली जमीनीवर कोसळा तशी महीने पुन्हा एकदा गदा हवेमध्ये कालासूरच्या दिशेने भिरकावली तसा कालासूर मंत्रोच्चार करून गायब झाला व रुद्रच्या काही अंतरावर जाऊन उभा राहिला.
हळू हळू घटिका जवळ आली होती आणि काळ्या शक्तींचा प्रभाव वाढत होता. कालासूरने याचं संधीचा फायदा घेतं त्याने गुप्त गुहेत प्रवेश केला. समोरील दृश्य पाहून अचंबित झाला आणि त्या दिव्य भव्य शिवलिंगापुढे नतमस्तक झाला.
ही तिचं दिव्य गोष्ट होती ज्यामुळे कालासूर इथपर्यंत स्वतः च्या जीवाची पर्वा न करता आला आणि अनेक लालसी कृत्ये त्याच्या कडून घडत गेली होती. असाच उठला आणि कालासूर त्या शिवलिंगाला उचलायला जाणार तोच रौद्ररूपधारी महीने कालासूरच्या कंबरेत जोरदार लाथेचा प्रहार घातला तसा कालासूर जमीनीवर पडून कळवळला.
चवताळून उठून त्याने महीकडे एकदा पाहिलं आणि त्याची कामवासना जागृत झाली. तसा बोलू लागला. "लढा देऊन काही होणार नाही आहे. हे शिवलिंग आणि इथला खजिना असाचं वर्षानुवर्षे इथेच पडून राहून एक दिवस लुप्त होऊन जाईल. त्यापेक्षा तू माझी सोबत कर तुला मी माझी राणी बनवून घेईन अन् आपण दोघं या जगावर राज्य करू."
त्याची ती किळसवाणी नजर आणि वाणी ऐकून महीला त्याचा भयंकर राग आला. अन् ती धावत जाऊन मायावी अस्त्रांचा पेटीतून त्रिशूळ घेऊन गेली आणि एक उंच झेप घेऊन त्याच्या छाताडावर बसली.
त्रिशुळाचा वार एवढा भयंकर होता की कालासूराची किंकाळी गगणभेद करून गेली आणि वाईट कृत्यांचा विनाश झाला.
मही थोडी शांत झाल्यावर कालासूरावरून उठली. रक्तरंजित झालेले त्रिशुळ घेऊन ती गुहेतल्या झऱ्याजवळ जाऊन ते आधी स्वच्छ करून शिवलिंगाच्या दिशेने गेली. संपूर्ण गुहा गोमूत्र शिंपडून आणि पाण्याने स्वच्छ केली. शिव कलशातून येणारे पाणी घेतलं व तशीच रुद्रजवळ जाऊन बसली. त्याचं डोकं स्वतः च्या अंगावर घेऊन त्याच्या डोळ्यांवर हलकं पाणी लावून थोडंसं त्याला पाजलं. तसा हळू हळू रुद्र शुद्धीत येऊ लागला. महीने उठवून त्याला शिवलिंगासमोर दोघेही ध्यानमग्न अवस्थेत गेले. कर्कट नागने ही हळू हळू सरपटत येऊन गुप्त गुहेत प्रवेश केला अन् त्या दिव्य शिवलिंगावर विराजमान झाला.
ध्यान अवस्थेत त्यांना काळाचा देव सृष्टी करता आणि त्यांची स्वामिनी त्यांच्या समोर उभी ठाकली. शिव-स्वामिनीचं दर्शन घेऊन त्या दोघांचीही मनं धन्य पावली होती.
महीने ही त्याला काय घडलं याचा सगळा वृत्तांत सांगितला. रुद्र आणि मही काहीवेळ थांबून प्रसन्न मुद्रेने गुहे बाहेर पडले.
वाईट गोष्टींचा अंत झाला होता. काळावर पुन्हा एकदा सत्याचा विजय झाला. सगळीकडे सकारात्मकतेचा प्रभाव पडला होता.
इथे गावकऱ्यांना घेऊन चैत्रा आणि वासू डोंगराकडे निघालेच होते की समोरून रुद्र आणि मही येताना दिसले. चैत्राने धावत जाऊन महीला आधी मिठीत घेतलं आणि धायमोकलून रडू लागली. मही तिला शांत करत बोलली की ती ठीक आहे.
इकडे रुद्र आणि वासू गावातल्या सरपंचाकडे गेले आणि त्यांना सगळी हकीकत सांगितली. सरपंचांनी आणि गावकऱ्यांनी मनापासून महादेवाचे आणि रुद्र चे आभार मानले. रुद्र ने त्यांना त्या खजिन्याचा गावकऱ्यांच्या भल्यासाठी उपयोग करण्याचा सल्ला दिला. तसेच महा भव्य दिव्य शिवलिंगाचा आशिर्वाद तसेच या गावात त्याचा वास आहे असे सांगितले. काहीवेळाने सगळ्यांचा निरोप घेऊन निघण्याचा निर्णय घेतला.
चौघेही परतीच्या प्रवासाला निघाले होते. सकारात्मक ऊर्जेने गाव फुललं होतं. जाताना रुद्र आणि मही कुल्लाळेश्र्वर मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेऊन त्याचे नामस्मरण करतं पुढे गेले.
*समाप्त*
©®प्रणाली कांचन कृष्णा शिंदे
©®प्रणाली कांचन कृष्णा शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा