कालासूर भाग ४
तो त्यांचा पाठलाग करतं इथपर्यंत आला होता. झुडूपामागून त्याचे चकाकी डोळे रुद्र आणि महीवर टिकून होते.
'धापऽऽ', अचानक खाली जमीनीवर पडण्याचा आवाज आला. म्हणून रुद्रने लगेच वळून पाहिले तर विखारी डोळ्यांचा नाग आणि बेशुद्ध मही त्याच्या शरीरामध्ये अडकून पडली होती. तसा तो फुत्कारा देतं तिथून महीला घेऊन जातो. तर रुद्र त्याचा तितक्याच वेगाने त्याचा पाठलाग करत होता.
मिट्ट काळोख्या घनदाट जंगलात किर्रऽऽ रातकिड्यांचा आवाजासोबत घुबड्यांचा आणि वटवाघूळांचा आवाज घुमत होता. भीतीने अंगावर शहारा आणणारा हवेतील गारवा आणि सळसळत्या पानांचा आवाज क्षणाला क्षणाला वाढत होता. अशातच रुद्र महीच्या शोधात एका गुहेजवळ येऊन पोहचला.
महीला आवाज देतं त्याने गुहेत प्रवेश केला अन् थोडा पुढे गेला. समोर पाहून तो अचंबित झाला आणि तिथेच गुढघ्यावर नतमस्तक झाला.
सगळं पाहून तोही समजून गेला की नक्कीच काहीतरी त्याची लीला आहे म्हणून आम्ही दोघे एका ठिकाणी येऊन पोहचलो.
रात्र चांगलीच अंधारली होती. वासू आणि चैत्रा महीला आणि रुद्राला शोधून थकले होते. सकाळी गावात जाऊन गावकऱ्यांची मदत घेऊ असा विचार करून परत ते तसेच टेंटवर जाऊ लागले.
अमावस्येची रात्र होती. काहीही करून त्या गुहेत जाऊन आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचं जे धेय्य होतं ते अमलात आणण्यासाठी इथे 'उघड बोंब्या कालासूर' त्याची सेना घेऊन गुहेकडे येण्यासाठी सज्ज झाला होता. दीडशे वर्षांनंतर आजचा दिवस त्याला लाभला होता म्हणून अती आनंदात तो नाचत कर्कट डोंगराच्या पायथ्याशी येऊन पोहचला. तसा इथे गुहेतील तो नाग सावध झाला आणि सरपटत तो गुहेच्या बाहेर येऊन मुर्ती रुपी दगडात बदलून पहारा द्यायला लागला.
मही आणि रुद्र दोघेही ध्यानमग्न अवस्थेत गेले होते. महादेवाचं नामस्मरण करून ते नतमस्तक झाले व उठून तयारीला लागले. संकटांची चाहूल त्यांनाही लागली होती पण जे कार्य त्यांच्या समोर आलं होतं ते सिद्धीस न्यायला दोघेही सज्ज झाले होते. अजस्त्र मायावी शस्त्रांनी भरलेली पेटी त्यांनी उघडली आणि तयारीतच गुहेत बसले.
बाहेर गुहेच्या समोर भला मोठा दगड पाहून बोंब्या कालासूर चांगलाच चवताळला होता. त्याच्या सेनेला त्याने इशारा केला तसा त्याला हलवून पाहता ही तो जागचा हलला नव्हता. त्याने कंबरेला बांधलेल्या कापडी पुडी मधून अभिमांत्रिक भस्म काढून त्यावर टाकले तसा तो मुर्ती रुपी दगड काही वेळासाठी हवेत विरून गेला. अन् अक्राळविक्राळ रूपी कर्कट नाग पुनः हवेमध्ये घोंगावू लागाला. बोंब्या कालासूरच्या सैनिकांवर त्याने हल्ला चढवायला सुरूवात केली. दरवाजा उघडून बोंब्या कालासूरने त्याच्या काही अघोरी सेना तुकडी सोबत गुहेत प्रवेश केला.
डोळे दिपून टाकणारा प्रकाश त्यांच्या नजरेस आला आणि डोळे लालसेने भरले. सेनेला डोळ्यांनी इशारा करून सगळा खजिना उचलायला सांगितला. तितक्यात आतून काही तरी सुईईऽऽऽ करतच एका अघोरी माणसाच्या गळ्यात घुसला आणि तिथेच गतप्राण झाला. असेच लागोपाठ एक दोन चक्रासारखे दिसणारे अस्त्र येऊन दोन चार कालासूरच्या दोन चार माणसांना वार करून गेले. कालासूर सतर्क झाला आणि त्याने लगेच शांत होऊन स्वतः भोवती आणि त्याच्या सेनेभोवती एक सुरक्षाकवच निर्माण केले. परत एकदा रुद्रने आतून तीन-चार चक्र अस्त्राने हल्ला चढवला तर तो हल्ला निकामी गेला आणि हल्ला कुठून येतोय हे पाहण्यासाठी ते सैनिक पुढे कुच करत होते हे दिसून आलं.
इथे कालासूरने भस्म हवेत भिरकावून वलय निर्माण केलं आणि पारदर्शक आरसा समोर आला त्यात रुद्र आणि महीची प्रतिमा दिसत होती जेव्हा कुल्लाळेश्वरच्या पायथ्याशी त्यांनी आगमन केलं होते. सर्प कसा त्यांना या गुहेपाशी घेऊन येतो हे सगळं एक चलचित्रासारखं दिसतं असतं.
तसा तो चवळताळतो आणि बोलू लागतो. "दीडशे वर्षांपासून मी या दिवसाची वाट पाहिली आणि आता ही दोघं मिळून मला थांबवणार.."
"या... या उघड बोंब्या कालासूरसोबत ही काल आलेली मुलं लढणार. इतकी वर्षे कमावलेली माझी प्राण प्रतिष्ठा, माझी स्वप्न ही धुळीस मिळणार... हे शक्य नाहीय." खूप अहंकारात आणि गुर्मीत कालासूर चेकाळून बोलत होता.
गुहेच्या बाहेर घमासान युद्ध पेटले होते. कर्कट नाग त्याच्या विषारी दंशाने कालासुराच्या सैनिकांना मारत होता आणि आत रुद्रने ही अर्ध्याहून जास्त लोकांना यमसदनी पोहचवले होते.
हळू हळू कालासूर गुहेतील गुप्त खजिन्याच्या आवारात प्रवेश करू पाहत होता. इतक्यात महीने आगीचे गोळे फेकायला सुरूवात केली जे की ते कालासूराच्या सरंक्षणकवचाला कमजोर करण्याचं काम करत होते. काहीवेळाने त्या गोळ्यांमुळे दूर फेकला गेला पण तंत्र सिद्धी अवगत असलेला आणि बलाढ्य अंगामुळे वेळीच हालचाल करण्यात पारंगत असल्याकारणाने परत उठून उभा राहिला.
क्रमशः
©®प्रणाली कांचन कृष्णा शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा