कालासूर भाग २
कायं होतं ते नक्की काय झालं होतं मला आणि रुद्र पण तो जवळ आल्यावर परत तेचं का दिसलं मला हे देवा काय होतंय त्या गोष्टी परत का मला छळत आहेत. मही खूप अस्वस्थ झाली होती. त्या गोष्टींचा विचार करून तिचं डोक दुखू लागलं होतं आणि तशीच लोळत बिछ्यान्यावर पडली.
तिथे पार्टीमध्ये रुद्र आणि महीला बेस्ट कपल्स अवार्ड मिळतो म्हणून सगळे रुद्रला अभिनंदन करत होते. तो कसा बसा त्यांच्यातून निघून वासू आणि चैत्रा जवळ येतो.
"काय मग महाशय अभिनंदन आणि कायं रे तू एकटाच मही कुठे गेली." वासू महीबद्दल विचारू लागतो.
चैत्रा ही त्यांच्या बोलण्यात सामील होतं. "हा रे आमची उत्साहमूर्ती क्वीन मही कुठेय??"
रुद्र (मनात) काय सांगू यांना मी नक्की काय झालं...
रुद्रला विचारात मग्न बघून वासू परत विचारतो. "अरे काय झालं तु कसला विचार करतोयस मही कुठेय सांग ना यार "
रुद्र एक नजर चैत्राकडे बघतो आणि डान्स फ्लोअरवर झालं ते थोडक्यात सांगतो.
वासू आणि चैत्रा जवळ जवळ शाॅक होतात पण वेळ बघून शांत बसतात. वासू पण रुद्रला समजावून सांगतो आणि घरी पाठवून देतो. लगेच ते मही कडे यायला निघतात. रुद्र जायला तयार नसतो पण परिस्थिती बघाता निघून जातो पण झालेल्या गोष्टी त्याच्या मनाला खूप लागल्या असतात.
वासू आणि चैत्रा महीच्या घरी पोहचतात पण घरात प्रवेश करता त्यांना सगळं अस्ताव्यस्त दिसत. वासू चैत्राला बोलतो. तू महीच्या रुममध्ये जाऊन बघ तिथे आहे का मी इथं बघतो.
"हो... पण वासू अरे ती ठिक असेल ना." चैत्राही टेंशन मध्ये येऊन बोलते.
वासू धीर देत चैत्राला बोलतो."हो तू जास्त विचार नको करूस तिला आधी जाऊ बघ."
हम्म. चैत्रा महीला बघायला तिच्या रूममध्ये जाते. तर मही तिच्या बेडवर शांत पडून असते पण डोळे रडून रडून सुजलेले असतात.
चैत्रा महीला आवाज देते पण मही काही रिस्पॉन्स देत नाही तर तिला हात लावते आणि तीन ताड उडते. तिचं अंग चांगलंच तापलं असतं आणि रडतंच वासूला आवाज देऊन वरती बोलावून घेते.
ऐ वासू बघ ना यार काय झालं आहे हिला किती ताप भरला आहे.
वासू चैत्राला शांत करत सांगतो. "हो तिच आधी टेंपरेचर चेक कर. मी किर्लोस्कर काकांना कॉल करतो. वासू काकांना कॉल करून बोलावून घेतो आणि तो पर्यंत चैत्रा महीच्या डोक्यावर मीठाच्या पाण्याच्या घड्या ठेवते.
किर्लोस्कर काका येऊन महीला चेक करतात आणि चैत्राला विचारतात. "बाळ काय झालं महीने कसलं टेंशन घेतलं आहे का?"
चैत्रा एकदा वासूकडे बघते तशी परिस्थिती बघता वासू बोलू लागतो "ना.... नाही काका असं काही नाही झालं. अॅक्चुअली आम्ही पार्टीत गेलो होतो आणि अचानक तिची तब्येत खराब झाली मग आम्ही घरी निघून आलो."
"हम्म. मी तिला आता इंजेक्शन दिलं आहे. सकाळ पर्यंत ताप उतरेल. काळजी घ्या. चला बाळांनो मी आता निघतो. "एवढं बोलून किर्लोस्कर काकांना वासू सोडून येतो.
" चैतू चल आता शांत हो, मही ठिक होईल रडू नकोस. उद्या बघ कशी ठणठणीत होईल आणि परत आपल्याला कशी सतवेल बघं "कसंतरी समजवून चैत्राला मही जवळ थांबवून तो बाहेर जाऊन झोपतो.
चैत्रा रडतच रात्रभर महीच्या उशाशी बसून असते. सकाळी जाग येते तर बघते महीचा ताप उतरला असतो. मग ती थोड आवरून मही साठी ज्युस आणि नाश्ता बनवते. थोड्यावेळाने महीला जाग येते. तर तिला थोडा अशक्तपणा जाणवत असतो. तशीच ती रुम बाहेर येते तेवढ्यात चैत्रा तिला ओरडून डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करायला लावते. नाश्ता झाल्यावर मेडिसिन देऊन परत आराम करायला रुममध्ये पाठवते.
आता चैत्रा आणि वासूला मोठा प्रश्न पडला असतो की महीसोबत कसं बोलायचं.
"यार कसं विचारायचं महीला बघितलं ना किती शांत झाली आहे ती"
"हो पण महीने स्वतःला खूप त्रास करून घेतला आहे. त्याचं काय करायचं बोलावं तर लागणार आहे." वासू समजावत बोलतो.
हो. आपली मही सहन करते पण सांगत नाही. चैत्रा आणि वासू महीच्या रूम मध्ये जातात. मही बाल्कनीमध्ये बसून एकटक बाहेर बघत असते.
" मही... मही..."
मही तशीच बसून असते. वासू चैत्राला हात दाखवून शांत करतो आणि बोलायला चालू करतो.
"मही, हे बघ काल जे झालं आहे त्याबद्दल मी स्वतः तुझी माफी मागतो पण रुद्र असा मुलगा नाही आहे. खरतर तो काल येत होता पण परिस्थिती बघता आम्ही त्याला आणलं नाही. खरंतर चुकी नाही पण तो भावनेच्या भरात तसा वागला. पण जो तुला त्रास झाला त्यासाठी आम्ही त्याच्या वतीने तुझी माफी मागतो."
मही तरीही शांतच बसून असते.
वासू कळवळून महीला बोलतो. "काही तरी बोल गं. आता आम्हाला नाही बघवतं तुला असं." वासू आणि चैत्रा किती तरी वेळ तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतात पण ती काहीच रिस्पॉन्स देत नाही.
" मही तुला वेळ हवा आहे का? आम्ही तुझ्यासोबत आहोत पण आमच्याशी बोल अशी शांत बसू नकोस. चैत्रा बोलतंच असते की वासू तिला बाहेर घेऊन जात बोलतो. "चल चैत्रा आपण थांबू बाहेर तिला एकांतात राहू दे. बोलेल ती नंतर वासू चैत्राला धीर तर देतो पण त्याला कुठे तरी राहून वाटतं की रुद्रच जवळ येणं हे फक्त कारण नाही आहे काही तरी नक्कीच घडलं आहे ज्यामुळे मही एवढी शांत झाली आहे. एकवेळ तिच्याकडे बघून तो पण बाहेर निघून येतो.
तीन आठवडे असेच निघून जातात. चैत्रा आणि वासू महीची पुरेपुर काळजी घेत असतात तसेच अधून मधून रुद्राही वासूला कॉल करून महीची विचारपूस करत असतो.
कॉलवर रुद्र वासूला, "कशी आहे रे ती? काही बोलली का तुम्हाला ? माझ्यावर तिचा राग आहे का?" त्याची प्रश्नांची सरबत्ती चालूच होती की वासू त्याला शांत करत बोलतो.
"ठीक आहे आता मही. ऑफिसमध्ये कामात गुंतून असते मग एवढा विचार नाही करत ती आणि तू नको काळजी करूस ती नाही एवढं मनाला लावून घेणार. आम्ही विचार करत होतो की येत्या महिन्यात कुठे बाहेर ट्रीपला जावं म्हणजे थोडा हवा पालट होईलचं आणि जरा रिलॅक्सही होऊन जाऊ. थोडं फार बोलून दोघे फोन ठेवून देतात आणि कामाला लागतात.
काही दिवसांनी सगळं काही सुरळीत चालू असतं मही पण सगळं विसरून कामात बुडाली असते. मिटींगस, प्रोजेक्ट्स आणि क्लायंट सोबत भेटी गाठी चालूच असतात.
कॅबिनचा दरवाजा उघडून चैत्रा बोंबलतचं येते. "मही यार ही बघंं ना जागा खूप मस्त आहे आपण इथे कॉंम्पिंगला जाऊया ना. तसंही खूप दिवस झाले आपण कुठेच फिरायला गेलो नाही आहोत."
तसं मही पुढ्यातला तो जुनाट कागद उचलून ती जागा बघू लागते आणि बोलते एवढा जुना कागद कुठून मिळाला आणि ती जागा खरंच आहे का आधी बघ.
तशी चैत्रा टुगलवर त्या जागेबद्दल दाखवत सांगू लागते आणि मही पण लक्ष देऊन ऐकत असते. थोडं तिला विचित्र वाटतं जणू ती आधीही इथं जाऊन आली आहे. काहीतरी स्वतः शी निगडीत आहे. तिला विचारात गुंतलेलं पाहून चित्रा जोरात ओरडून बोलते. तसं मही तिच्या बोलण्यावर लक्ष देते.
दोघीही ठरवून वासूला कॉल करून लगेच सांगतात आणि वासूने ठरविल्याप्रमाणे त्याचा आऊटींगला जाण्याचा प्लॅन सक्सेसफुल होतो.
क्रमशः
© प्रणाली कांचन कृष्णा शिंदे
© प्रणाली कांचन कृष्णा शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा