कालापूर भाग १
"मही... मही...
अगं कुठे आहेस? चल लवकर वासू कधीचा कॉल करतोय आला तो वाट पाहतोय.
मही..यार ही कधी सुधारणार..." चित्रा
अगं कुठे आहेस? चल लवकर वासू कधीचा कॉल करतोय आला तो वाट पाहतोय.
मही..यार ही कधी सुधारणार..." चित्रा
मही द ग्रेट बिझनेस मेन व्यंकटेश नायडू यांची एकुलती एक मुलगी महेश्वरी व्यंकटेश नायडू. दिसायला एकदम राजकुमारी बघता क्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडेल पण तिला या प्रेम या गोष्टीत काडीमात्र रस नाही. एकदम साधी, मनमुराद, खोडकर, अल्लड आयुष्य जगणारी ही स्वच्छंदी अशी ही मही. अजून तिच्या आयुष्यात असं कोणी आलं नाही आहे की त्याला बघता क्षणी तिला भुरळ पडेल. बघूया पुढे कोणी येतेय का?
तिथे चैत्रा मही ला आवाज देऊन थकली पण महीचा अजून पत्ता नव्हता.
इथे मही तिच्या सवंगडी आरश्यासमोर बसून तयारी करण्यात व्यस्त होती तर चैत्रा वैतागून महीला बोलण्यासाठी रुममध्ये जाते आणि तिला बघून.."मही डार्लिंग तु खूप गोड दिसतं आहेस. आज किती मुलांचे हाल बेहाल होणार आहेत याचा काही नामोनिशाण नाही. आज माहोल है उसमे आप जान डालने वाले हो.."
चैत्राची मस्करी करतं मही बोलू लागते.
"गप्प गं किती बोलतेस आता तुला उशीर नाही झाला का? वासू तिथे तुला बघण्यासाठी येऊन बसला असेल आणि तु इथे मस्त गप्पा मारतेय. थांब मी भेटल्यावर वासूला सांगते लेट का झाला."
"गप्प गं किती बोलतेस आता तुला उशीर नाही झाला का? वासू तिथे तुला बघण्यासाठी येऊन बसला असेल आणि तु इथे मस्त गप्पा मारतेय. थांब मी भेटल्यावर वासूला सांगते लेट का झाला."
"म्हणजे काय बोलणार तू?" चैत्रा त्रागा करतं महीच्या मागे जाते.
चिडवण्याच्या हेतूने मही बोलू लागते. "हेच की चैतू अभिसोबत गप्पा मारण्यात व्यस्त होती."
"महीऽऽऽ दुश्मन भी ये कभी ना सोचे.." चैत्रा रडका चेहरा करत म्हणते.
चल चल रडू नको मस्ती केली जाऊया आता आधीच उशीर झाला आहे. असं बोलून दोघी कॉलेजच्या रियुनिअन पार्टीसाठी निघतात.
घड्याळ बघून वासू बोलतो. "काय यार ह्या मुली सगळ्या एक सारख्या अजून पत्ता नाही कुठे राहील्या काय माहीत किती वेळ यांना यायला."
"येतील रे त्या चल आपण आत थांबू."
तितक्यात वासू बोलू लागतो. "अरे पार्टी आहे म्हटल्यावर असाच यांना उशीर होतो त्यात महीला तर विचारू नको. एक वेळेस आमचं ध्यान तरी लवकर येईल पण मही बसली असेल तिच्या सवंगडी सोबत."
"चल यार मी तरी आत जाऊन बसतो त्या आल्यावर तुम्ही या." मिश्कीलपणे हसत बोलून तो आत निघून जातो.
"हो ठीक आहे." वासू चैत्राला कॉल करता करता बोलतो.
(थोड्या वेळाने एक गाडी एंटर करते)
"अगं हा बघ कसा अवतार करून बसला आहे संपली वाटतं पार्टी.." हळूचं चैत्रा महीच्या कानात बोलते.
"अरे तुम्हाला काय वेळेची किंमत तुमची वाट पाहण्याच्या नादात पार सुकून गेलो. बिचारा माझा दोस्त तो पण सुकला आत बसून.." बडबड करत वासू बोलू लागतो.
मही चैत्राच्या कानात 'याला बाई तुच सांभाळ मी चालली आत..' हे बोलून मही निघून गेली.
मही, वासू आणि चैत्रा एकाच कॉलेजमध्ये होते. यांच त्रिकूट कुठेही गेलं की एकत्र जात आज तर कॉलेजची रियुनिअन पार्टी होती मग कॉलेजची जानचं या पार्टीत नाही तर पार्टीला शोभा कशी येणार. त्यात यांचे कॉलेजचे किस्से आणि यांची दोस्ती म्हणजे अफलातून. यांच्याशी नडला तो नरकात सडेल.
मही- एक्सक्यूज मी....मिस्टर?
येस. तिला बघून...
सॉरी मिस्टर पण हा आमचा टेबल आहे तुम्ही चुकीच्या टेबलावर बसला आहात.
एकटक तिला बघत..
हॅलो ऐकता आहे ना तुम्ही हॅलो......(मनात) याला काय झालं असा काय बघतोय हा...
वासू त्याच्या खांद्यावर हात ठेऊन कानात बोलतो बघून झालं असेल तर ओळख करून देऊ?
ओशाळून तो बोलू लागतो. "अरे वासू काही काय बोलतोस असं मी सहज.."
सो गर्ल्स मीट माय चाईल्ड हुड फ्रेंड रुद्रा रेड्डी
हॅलो...
सॉरी मला माहित नव्हतं तुम्ही वासूचे मित्र आहात आणि खरतर याने पण आम्हाला सांगितलं नाही की कोणी सोबत आहे. मही दिलगिरी व्यक्त करतं.
रुद्र हसत हरकत नाही.
सो गाईज ओळख वैगेरे तर काय आता होतच राहील चला ना काही तरी.........
वासूचं बोलणं तोडत चैत्रा, मही "खाऊनऽऽ घेऊ हेच ना रे बकासूर.."
वासू लाजतं " हो". त्यावर सगळे हसत फूड कोर्टकडे जातात.
सगळे मस्त जेवत हसत-खेळत गप्पा मारत असतात.
पण इथे रुद्र वेगळ्याचं धुंदीत असतो. जेव्हा पासून महीला बघितलं तेव्हा पासून त्याला काही तरी वाटतं असतं जे त्याला बैचेन करतंय. पण महीला भेटून खूप भारी फिल करत होता जसं की आधी पासून एकमेकांना ओळखत असावेत.
तेवढ्यात अँकर येऊन अनाउन्समेंट करतो.
तर मंडळी आजच्या कार्यक्रमात काही खेळ आयोजित केले आहेत तर सगळ्यांनी जास्तीत जास्त मेंबर्स सहभागी व्हा आणि हो स्पेशली फॉर कपल्स त्यांना तर चांगली संधी आहे कारण आज बेस्ट जोडी अवार्ड आहे तो त्यालाच मिळणार जो लास्ट पर्यंत टिकून राहील.
असेच एक-एक करून ज्याला खेळात इंटरेस्ट असतो ते सगळे भाग घेतात. महीला पण खेळात भाग घ्यायचा असतो पण प्रश्न असा होता की कोणाला विचारू. तिच्या एका शब्दावर तर सगळे आले असते पण तिला समजून घेणारा हवा असतो. १०-१५ मिनिट असाच विचार करतं बसते तेवढ्यात लास्ट अनाउन्समेंट होते मग काय जिथे रुद्र बसला असतो तिथे जाऊन त्याला विचारते म्हणजे तुम्हाला काही हरकत नसेल तर आजच्या खेळात माझे जोडीदार होणार का?
रुद्र (मनात) यार ही मला स्वतःहून विचारायला आली. त्याच्या पोटात जणू असंख्य फुलपाखरू उडू लागली.
मही रुद्राला आवाज देतं,"मिस्टर रुद्रा तुम्हाला विचारलं मी..सॉरी तुम्हाला नाही आवडलं तर ठिक आहे ना प्रोब्लम जाते मी..
'अरे ही निघाली थांबवं रुद्र ती तुला एवढं विचारतेय आणि तू कायं माठासारखा बसला आहेस.' रुद्र महीला थांबवतं बोलू लागतो."
हा.... हा मही का नाही नक्की आवडेल"
हा.... हा मही का नाही नक्की आवडेल"
' मला आनंदच होईल तुमच्या सोबत खेळायला स्वतःच तोंडातल्या तोंडात पुटपुटतो.
"हं.. काही म्हटलं का तुम्ही??" मही
"नाही. चला जाऊ सुरू होईल." मनातच हुश्श करून दोघेही जिथे खेळ सुरू असतात तिथे निघून जातात.
महीचा उत्साह बघून रुद्रही जोश मध्ये येतो. असेच एक- एक गेम्स मही आणि रुद्र जिंकत असतात. अंतिम टप्प्यात दोघेही पोहचतात आणि तो सगळ्यांना माहिढ आहे पेपर डान्स पण यामध्ये थोडा ट्विस्ट येणार आहे चला तो पर्यंत डान्स करू.
जिंकलेले कपल्स पेपर डान्ससाठी तयार असतात तर एकीकडे मही आणि रुद्र थोडे शांत असतात कारण बाकीच्या गेम्स पर्यंत ठिक होत पण डान्स कसा जमणार खरतर याचं टेंशन रुद्रला आलं असत पण मही तेव्हा पण उत्साहात असते. तिच्याकडे बघून तो स्वतःला परत हरवून बसतो आणि म्युझिक चालू होतं. अँकर बोलतो लेट्स स्टार्ट तरी आपले रुद्र महाशय आपल्या धुंदीत तिला पाहत असतात.
मही त्याला हलवून जाग करते तेव्हा कुठे भानावर येतं तिच्या स्टेप्स मॅच करतो. डान्स करता काही जोडीदार बाहेर होतात पण रुद्र आणि मही अजून डान्स फ्लोअरवर भान हरपून डान्स करत असतात. रुद्र आणि मही डान्स करण्यात इतके एकमेकांना बघण्यात मग्न असतात की त्यांना आजूबाजूचं भान नसतं. त्यातच रुद्र महीच्या इतक्याजवळ येतो की रुद्रच्या ओठांचा पुसटसा स्पर्श महीच्या ओठांना होतो तेवढ्यात महीला झटका लागल्यासारखे त्याला जोरात छातीला पूश करून पाठी ढकलून देते आणि पार्टी मधून निघून घरी जाते.
(कायं होईल पुढे रुद्रच्या अशा वागण्यामुळे मही हर्ट झाली असेल का??)
क्रमशः
©®प्रणाली कांचन कृष्णा शिंदे
©®प्रणाली कांचन कृष्णा शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा